Total Pageviews

Monday 3 November 2014

अल कायदा भारताच्या उंबरठ्यावर!- WAGHA LAHORE PAKISTAN BOMB BLAST

अल कायदा भारताच्या उंबरठ्यावर!- मुंबई तरुण भारत पंजाबच्या सीमेवरून कायम दरवाजे ठोठावणारी आणि नाही म्हटले, तरी कालपर्यंत इथल्या सीमेपासून काहीशी दूर राहिलेली अल कायदा नावाची दहशतवादी संघटना आता भारताच्या दारावर येऊन धडकली आहे. या संघटनेचा शिरकाव भारतीय हद्दीत होण्याच्या भीतीने सारी यंत्रणा हादरली आहे. परवा भारत आणि पाकिस्तानच्या वाघा सीमेवर ध्वजावतरण समारंभ पार पडल्यानंतर काही क्षणातच एका मानवीबॉम्बने स्ङ्गोट घडवून आणला. या भीषण स्ङ्गोटातील बळींची संख्या साठच्या वर पोहोचली आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या धोक्याच्या इशार्यांनी यंत्रणा अद्याप सजगही झालेल्या नसताना भारतीय सीमेपासून केवळ काही दूर अंतरावर घडलेल्या स्ङ्गोटाच्या घटनेने केवळ इथली सुरक्षाच नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. घटना तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या हद्दीत घडली असली, तरी या स्ङ्गोटाची भीषणता आणि त्याच्या आडून डोकावणार्या दहशवादी कृत्याचा धोका लक्षात घेता, पंजाबसोबतच संपूर्ण भारतातच सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तिकडे वाघा सीमेवर पाकिस्तानी यंत्रणेने शोधमोहीम हाती घेतली आहे, त्या मोहिमेतून जे काही हाती लागायचे ते लागेलच; पण त्याहीपेक्षा या स्ङ्गोटामागील जे षडयंत्र हळूहळू उघड होत आहे, ते अधिक घातक आणि भविष्यातील धोक्याची घंटा ठरणार आहे. गेली किमान तीन दशके कायम दहशतवादाच्या सावटात आणि रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार राहिलेल्या पंजाबचा प्रांत दहशतवादाच्या विळख्यातून मुक्त करण्यात जरा कुठे भारताला यश प्राप्त होऊ लागले असताना, स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारी दहशतवादी पिलावळं इथल्या हद्दीतून जरा कुठे हुसकावून लावली गेली असताना, आता पाकिस्तान व अन्य काही देशांच्या आश्रयात दबा धरून बसलेली खलिस्तानवादी अतिरेक्यांची ङ्गौज अल कायदाचा मुखवटा धारण करून पुन्हा एकदा आमच्या पंजाबमध्ये शिरकाव करू पाहात तर नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यास वाव आहे. निदान वाघा सीमेवरील परवाच्या स्ङ्गोटाच्या घटनेवरून मिळणारे संकेत तरी तेच आहेत. तशी ही सीमारेषा गेल्या काही वर्षांत तरी शांत राहिली आहे. बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या असोत वा बॉम्बस्ङ्गोटातून उडणार्या मानवी रक्ताच्या कारंज्या... या दोन्ही बाबतीत शांततेचा काळ अनुभवणार्या वाघा सीमेवर रविवारी सायंकाळी विशीतल्या एका तरुणाने मानवीबॉम्ब बनत धमाका करण्याची योजना आखली. आपल्या शरीराला १८ ते २० किलो स्ङ्गोटके गुंडाळून तो या सीमेपासून काही अंतरावर आला. इकडे सीमेवर नेहमीचा ध्वजावतरण समारंभ सुरू होता. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धून संपली, आकाशात दिमाखाने ङ्गडकणारे राष्ट्रध्वज संबंधित सैनिकांनी तेवढ्यात सन्मानाने खाली उतरवले. या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या गर्दीलाही क्षणभरानंतरच्या भयानक घटनेची जराशीही कल्पना आलेली नसणार; पण त्या मानवीबॉम्ब बनून आलेल्या युवकाने एक स्ङ्गोट घडविला आणि क्षणात या सोहळ्याचे चित्र बदलले. बालक, महिला, सैनिकांसह पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला. दहशतवादाच्या आणखी एका घटनेने सारे जग हादरले. हा मुद्दा आणि त्याचे गांभीर्य केवळ इथपर्यंतच मर्यादित राहात नाही. एका दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात येऊ घातलेल्या भीषण संकटाचा भयसूचक घंटानाद त्यातून ध्वनित होतो आहे. पाकिस्तानी सुरक्षारक्षकांनी या प्रकरणात तातडीने पावले उचलत स्ङ्गोटाच्या या प्रकरणात पाकच्या सीमावर्ती भागातून २० संशयितांना अटक केली आहे, तर दुसरीकडे स्ङ्गोटाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी एकूण तीन अतिरेकी संघटना सरसावल्या आहेत. यात अल कायदाशी संबंधित एका गटाचाही सहभाग आहे. पाकिस्तान आणि भारताला एकाच वेळी हादरा देणार्या या भीषण स्ङ्गोटानंतर काही वेळातच या तीन अतिरेकी संघटना स्ङ्गोटाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी समोर आल्या आहेत, हे विशेष. यात अल कायदाशी संबंधित जुंदुल्ला या नव्या गटाचा समावेश आहे. याशिवाय, जमात-उल-अहरार आणि महार मेहसूद या गटांनीही हा स्ङ्गोट आपल्याच मानवीबॉम्बने घडविला असल्याचा दावा केला आहे. इतके बळी घेणार्या घटनेची लाज बाळगायचे सोडून, जणू काय अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावल्याच्या थाटात एकाच वेळी तीन अतिरेकी संघटनांनी घेतलेला हा पुढाकार आणि स्वीकारलेली घटनेची जबाबदारी संशयास्पदही ठरली आहे. तपासणी यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठीचे हे डावपेच तर नाहीत ना? असाही प्रश्न त्यातून उपस्थित होतो. भारत तर काय, गेली काही वर्षे सतत दहशतवादाशी लढण्यातच या देशाची शक्ती आणि पैसा खर्ची पडत आहे; पण ज्यांनी या देशाविरुद्ध कुरघोेड्या करण्यासाठी कायम दहशतवाद पदराखाली जोपासला, त्या पाकिस्तानलाही या आणि अलीकडच्या कित्येक घटनांमधून धडा मिळाला आहे. त्यामुळे अल कायदा आणि तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी गटांविरोधात आरंभलेला लढा यापुढेही सुरूच राहील आणि दहशतवादविरोधी लढ्याबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचे कितीही दावे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेत, तरी त्यात तथ्य किती, हे सारे जग जाणते. पाकिस्तान असो वा इतर मुस्लीम देश, ज्यांनी कधीकाळी कुठल्या तरी ङ्गडतूस कारणांसाठी दहशतवादाला थारा दिला, आपल्याच घरात तो जोपासला, ते सारेच देश त्याच दहशतवादाचे दुष्परिणाम आज भोगताहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करायचा असेल, तर त्याचे बळी ठरलेले आणि त्याला आश्रय देणारे अशा सर्वच देशांना एकत्र येऊन जागतिक पातळीवर आपल्या धोरणांची निश्चिती करावी लागणार आहे, लढाईची दिशा ठरवावी लागणार आहे, तरच दहशतवाद समूळ नष्ट होऊ शकेल. मुळात पाकिस्तानची त्यासाठी तयारी आहे का? हा खरा प्रश्न आहे. ज्यांना या देशाने आजवर थारा दिला, त्या दहशतवादी संघटना कालपर्यंत भारताविरुद्ध कारवाया करीत होत्या, तेव्हा या पाकिस्तानातली सरकारे दुरून तमाशा बघून टाळ्या वाजवत राहिली. आता जेव्हा त्या दहशतवादाने स्वत:चे घरच पोखरणे सुरू केले, तेव्हा मात्र सर्वांनाच त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. आता सारे दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्याच्या गोष्टी करताहेत. आपल्या अतिरेकी कृत्याने उडविलेल्या माणसांच्या मुंडक्यांचा ङ्गूटबॉल करून खेळण्याची शिकवण तरुणाईला देण्याचे नीच कर्म जे करताहेत, त्यांचे इरादे ‘पाक’ असूच शकत नाहीत; पण पाकिस्तानला ते कधीच कळू शकले नाही. तो देश कायम भारताविरुद्धच्या दहशतवादी कृत्यातच समाधानाचा शोध घेत राहिला. ती लष्कर-ए-तोयबा असो वा मग हिजबुल मुजाहीद्दीन, त्यांना आसरा नेहमी पाकिस्ताननेच दिला आहे, हे सारे जग जाणते. एकीकडे त्याबाबत नकारघंटा वाजवत राहायची आणि दुसरीकडे त्याचे छुपे समर्थनही करत राहायचे, असला प्रकार पाकिस्तान नेहमीच करीत राहिला आहे. जगातील काही देश भारताविरुद्धचे षडयंत्र म्हणून का असेना, पाकिस्तानच्या त्या कृत्याला या ना त्या निमित्ताने पाठिंबा देत राहिले; पण घटना ९/११ची असो वा मग परवाची वाघा सीमेवरची. दहशतवादी कोणाचेच नसतात, हेच जागतिक वास्तव अनेकदा सिद्ध झाले आहे. तरीही, त्यापासून धडा घ्यायचे सोडून काही देश सातत्याने दहशतवाद्यांना पाठीशी घालत दहशतवादाला आश्रय देत राहिलेत. इराक असो की, सीरिया, त्याची ङ्गळे प्रत्येकालाच भोगावी लागली आहेत. आता पाकिस्तानचा नंबर आहे. अर्थात, भारताचे दुर्दैव असे की, त्याचीही यातून सुटका नाही. दहशतवादाविरुद्धची त्याची लढाई नजीकच्या भविष्यात तरी संपणार नाही, हेच खरे!

No comments:

Post a Comment