Total Pageviews

Friday 15 February 2013

HELICOPTER SCANDAL

इटालियन हेलिकॉप्टर्सच्या खरेदी प्रकरण भारतातले दुसरे बोफोर्स
इटालियन हेलिकॉप्टर्सच्या ३६०० कोटी रूपयांचे खरेदी प्रकरण म्हणजे भारतातले दुसरे बोफोर्स प्रकरण आहे . वर्षभर आधी हे प्रकरण उघडकीला आले तरीही सरकारने चौकशी करायचे टाळले . कंपनी इटालियन होती म्हणून ही टाळाटाळ झाली काय ? असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटलींनी पत्रकार वार्तालापात सरकारला विचारला .
सौदा रद्द करण्याची डाव्यांची मागणी हेलिकॉप्टर खरेदी भ्रष्टाचार आरोपाच्या पार्श्वभूमीवर , हेलिकॉप्टर्स सौदा विनाविलंब रद्द करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनी केली आहे . सदर प्रकरणी सरकारला संसदेत उत्तर देण्यास भाग पाडले जाईल , असेही माकपच्या पत्रकार वार्तालापात येचुरींनी स्पष्ट केले .
 ऑगस्टावेस्टलँड या उइटलीतील कंपनीने भारताशी हेलिकॉप्टर खरेदीचा करार व्हावा यासाठी जे पर्याय वापरता येतील ते वापरात आणण्याचा मार्ग अवलंबला. तत्कालीन हवाई दलाचे प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी पैशांच्या सोबत 'ललनां'चा वापर करण्यात आला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
२०१० साली घडलेल्या या कथित घोटाळ्याचे भारतात पडसाद उमटले असून संरक्षण मंत्रालयाने ३६०० कोटींच्या या खरेदीव्यवहाराच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, तसेच उर्वरित हेलिकॉप्टरच्या खरेदीलाही स्थगिती दिली आहे. ३६०० कोटींची लाच चारल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली असताना लाच घेणा-यांमध्ये माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांचे नाव असल्याची माहिती बुधवारी समोर आली. पण माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असे सांगत त्यागी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. असे असतानाच गुरुवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली की, या हेलिकॉप्टर करारासाठी त्यागी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पैशांसोबतच स्त्रियांचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती इटलीतील वकिलांनी जमा केलेल्या कागदपत्रांतून समोर आली आहे. मार्फत आपल्याला हवी असलेली कागदपत्रे कंपनीच्या अधिका-यांनी मिळवल्याचीही माहिती समोर येत आहे.
तपास अहवालानुसार या प्रकरणातील दलालाने दावा केला आहे की ते त्यागी यांना सहा ते सात वेळा भेटले. मात्र दलाल म्हणून अटकेत असलेल्या व्यक्तीला मी केवळ एकदाच भेटलो आहे, असे त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ३६०० कोटी रुपयांच्या या व्यवहारात मी कोणत्याही प्रकारे लाच घेतलेली नाही, असेही त्यागी यांनी स्पष्ट केले आहे.
त्यागी यांचे नातेवाईक जूली, डोस्का आणि संदीप यांची ओळख मध्यस्ती म्हणून इटलीतील अधिका-यांनी केलेल्या तपासात नमुद करण्यात आले आहे. यांनीच हा व्यवहार घडवून आणण्यासाठी मोठी मदत केली असेही यात नमुद करण्यात आले आहे. तसेच या कामासाठी त्यागी यांच्या नातेवाईकांना ७० लाख रुपयांची लाच देण्यात आल्याचेही या तपास अहवालात म्हटले आहे. तर उरलेली रक्कम आयडीएस इंडिया नावाच्या कंपनीतील सर्विस कॉन्ट्रॅक्ट द्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली, असेही यावेळी सांगण्यात आले.
दलालांच्या मैत्रिणींच्या मदतीने त्यागी यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. विशेषकरून जूली त्यागी हिच्याशी. कारण दलालीची रक्कम जूलीला देण्यात आलेली होती.या व्यवहारासाठी त्यागी यांच्या परिवाराशी एक करार करण्यात आला होता मात्र दलालीची रक्कम जूली त्यागी हिच्याकडे सोपवण्यात आली होती, असे तपास अहवालात म्हटले आहे.
त्यागी परिवाराती सदस्य आणि कंपनीत २००१ सालात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. जेव्हा कार्लो गेरोसा हा इटलीतील एका लग्नात जूलीला भेटला होता. याच काळात भारतीय हवाई दलाने भारतील महत्वाच्या पदावरील व्यक्तींसाठी हेलिकॉप्टरची मागणी समोर ठेवली होती.
जेव्हा ऑगस्टावेस्टलँड या कंपनीला आपण व्यवहारातून बाहेर फेकले जात आहोत अशी शंका आली त्यावेळी कंपनीने कार्लो आणि त्याचा बॉस राल्फ यांच्याशी संपर्क साधला. हे दोघेही त्यागी यांच्या नातेवाईकांना चांगले ओळखत होते. खरे तर १८००० फूट उंचीवरून उडणारी हेलिकॉप्टर व्हीआयपींसाठी हवी आहेत अशी अट होती. मात्र टेंडरमध्ये अचानक बदल करून तो १५००० फूट उंचीवरून उडणारी हेलिकॉप्टर हवी अशी अट करण्यात आली. याचा फायदा ऑगस्टावेस्टलँड या कंपनीला झाला आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यात आला. २००५ ते २००७ या कालावधीत त्यागी हवाई दलाचे प्रमुख होते तेव्हा दलालाने त्यांची कमीत कमी सहा वेळा भेट घेतली. दोन वेळा त्यांच्या नातेवाईकांच्या ऑफिसमध्ये तर एकदा बंगळुरु येथील एयर शो च्यावेळी, ज्याचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते.
दरम्यान, त्यागी यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले असले तरी ज्या तीन लोकांची नावं तपासात समोर आली आहेत ती आपल्या नातेवाईकांची आहेत असेही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यातील एक त्यांचा भाचाच आहे ज्याने त्यांची कार्लोशी भेट घालून दिली होती. मात्र टेंडर जरी आपल्या कार्यकाळात काढले गेलेल असले तरी त्यातील अटी या आधीपासून होत्या तशाच ठेवण्यात आल्या होत्या. तसेच हेलिकॉप्टर खरेदीचा व्यवहार हा आपण निवृत्त झाल्यानंतर तीन वर्षांनी करण्यात आला होता, असेही त्यागी यांनी सांगितेले आहे.
लाच देण्यासाठी सॉफ्टवेअर खरेदीचा वापर?
ऑगस्टावेस्टलँड कंपनीशी झालेल्या व्यवहारासाठी देण्यात आलेल्या लाचेतील काही रक्कम ही भारतातील सॉफ्टवेर खरेदीतून आल्याची माहिती मिळते आहे. सुमारे १४० कोटी इतक्या रक्कमेचा सॉफ्टवेअर खरेदीचा व्यवहार ट्युनेशीया येथून झाल्याचे कळते. सॉफ्टेवअर खरेदीत मोठ्या किमती लावून छुप्याप्रकारे लाच देण्याचाच हा प्रकार असल्याचे कळते आहे.
इटलीतील अधिकार्‍यांचा दावापैसा, ललनांचा वापर!हेलिकॉप्टर कंत्राटासाठीव्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाइटलीतील न्यायालयात अहवाल सादर

217
कोटींच्या लाचेची कंपनीची होती तयारी
त्यागी बंधूंना दिली गेली 72 लाखांची लाच?नवी दिल्ली : भारताकडून 3 हजार 600 कोटींचे हेलिकॉप्टर कंत्राट मिळविण्यासाठी इटलीची सरकारी कंपनी 'अगस्तावेस्टलँड' 217 कोटी रुपयांची लाच देण्यास तयार झाली होती, अशी माहिती इटलीतील तपास अधिकार्‍यांनी तेथील न्यायालयात सादर केलेल्या अहवालात दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या अहवालानुसार, 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात लाच सॉफ्टवेअर कंपन्यांच्या माध्यमातून देण्यास आली असून या करारासाठी सुंदर ललनांचाही वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
इटलीची विमान उत्पादक कंपनी फिनमेकॅनिकाचे कार्यकारी प्रमुख ग्युसेप ओर्सी आणि अगस्तावेस्टलँडचे ब्रुनो स्पगनोलिनी यांना भ्रष्टाचार प्रकरणी इटलीत अटक झाल्यानंतर या व्यवहारातील अनेक खुलाशे समोर येत आहेत. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात एक तपास अहवाल सादर केला असून त्यानुसार ओर्सी आणि ब्रुनो यांनी मुख्य दलाल क्रिस्टीयन मिशेल याला 7.5 टक्के कमिशन म्हणजे 217 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर 362 कोटी रुपयांची लाच दिल्यानंतर हा करार पार पाडला. यातील 72 लाख रुपये माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्या परिवारातील ज्युली, डोक्सा आणि संदीप त्यागी

No comments:

Post a Comment