Total Pageviews

Thursday 21 February 2013

HYDRABAD BLASTS-हैदराबाद स्फोटांनी हादरले

हैदराबाद - सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या शक्तिशाली बॉंबस्फोटांच्या मालिकेने हैदराबाद आज हादरले. राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या दिलसुखनगर भागात पंधरा मिनिटांत तीन स्फोट झाले. यात 20 जण ठार झाले, तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर देशभरात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला.

काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. जखमींना उस्मानिया हॉस्पिटल, यशोदा हॉस्पिटल आणि ओमीनी रुणालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीहून विशेष विमानाने राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दिलसुखनगर बस स्थानकाजवळ पहिला स्फोट बरोबर सात वाजून एक मिनिटाने झाला. त्यानंतर पाच मिनिटांच्या अंतराने दुसरा, तर पंधरा मिनिटांच्या अंतराने तिसरा स्फोट झाला. बस स्थानकाजवळ असलेल्या कोणार्क आणि व्यंकटाद्री चित्रपटगृहांच्या परिसरातच हे स्फोट झाले. स्फोटांच्या धमाक्‍यानंतर भेदरलेल्या गर्दीत एकच खळबळ उडाली. या वेळी पळापळ होऊन चेंगराचेंगरी झाल्याने काही जण जखमी झाल्याचे समजते.

आनंद खाणावळीबाहेर उभ्या असलेल्या एका सायकलला अडकविलेल्या डब्याचा पहिला स्फोट झाला. त्यानंतर तेथून काही अंतरावरच असलेल्या मोटारसायकलच्या डिकीचा स्फोट झाला. पाठोपाठ महामार्गावर असलेल्या पादचारी पुलाखाली तिसरा स्फोट झाला. कोणार्क व व्यंकटाद्री चित्रपटगृहांजवळही दोन स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र, या दोन स्फोटांबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

स्फोटाचा आवाज आल्यानंतर सुरवातीला परिसरातील हॉटेलमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, दुसरा स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी बॉंबस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला. स्फोट इतके शक्तिशाली होते, की परिसरातील दुकाने व घरांच्या काचा फुटल्या. एका हिरो होंडा मोटारसायकलमध्ये स्फोटके असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर बॉंबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. अनेक शैक्षणिक संस्था, शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे, फळबाजार व इतर बाजारपेठा असल्याने दिलसुखनगर परिसर नेहमी गजबजलेला असतो. या भागात साईमंदिरही आहे. आज गुरुवार असल्याने मंदिरातही बरीच गर्दी होती.

'आयएम', 'लष्करे'वर संशय
रात्री उशिरापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्फोटांची जबाबदारी स्वीकारली नव्हती. मात्र, इंडियन मुजाहिदीन (आयएम) व लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनांवर पोलिस व गुप्तचर यंत्रणेने संशय व्यक्त केला आहे. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकविल्यानंतर या संघटनांकडून देशात घातपात घडविण्याची भीती व्यक्त केली जात होती. दहशतवादविरोधी पथक त्या दृष्टीनेही तपास करीत असल्याचे समजते. रिमोट कंट्रोल किंवा टायमरचा वापर करून स्फोट घडविण्यात आल्याचा अंदाज आहे.

मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हैदराबाद बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये, तर गंभीर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

हा पूर्वनियोजित कट - गृहमंत्रालय
हैदराबादच्या दिलसुखनगर येथे झालेले साखळी बॉंबस्फोट हा दहशतवाद्यांचा पूर्वनियोजित कट असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. गजबजलेल्या दिलसुखनगर भागात जास्तीत जास्त हानी घडवून आणण्याचा हा प्रयत्न होता, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळ सातची वेळ, गजबजलेला परिसर आणि पाच मिनिटांत झालेले साखळी स्फोट हे पाहता मोठी हानी घडवून आणण्याची दहशतवाद्यांची योजना होती. दिलसुखनगर येथील कोणार्क थिएटरच्या परिसरात फळभाज्यांची मोठी बाजारपेठ आहे. दहशतवाद्यांनी या बाजारपेठेला लक्ष्य केले.

पाच वर्षांत तिसरा मोठा स्फोट
यापूर्वी 2007 मध्ये हैदराबाद दोनदा बॉंबस्फोटांच्या घटनेने हादरले होते. मेमध्ये मक्का मशिदीजवळ झालेल्या स्फोटात तेरा जणांना जीव गमवावा लागला होता, तर ऑगस्टमध्ये पार्क भागात झालेल्या स्फोटात 42 जणांचा बळी गेला होता. या घटना अशा -

18 मे 2007 - हैदराबादमधील मक्का मशिदीजवळ शुक्रवारच्या नमाजपठणानंतर झालेल्या बॉंबस्फोटामध्ये तेरा जणांचा मृत्यू. यानंतर उसळलेल्या दंगलीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये चार जण ठार

25 ऑगस्ट 2007 - हैदराबादमधील गर्दी असलेल्या पार्क भागातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलबाहेर झालेल्या दोन बॉंबस्फोटांमध्ये 42 जण ठार आणि 50 वर लोक जखमी. हरकत-उल-जेहाद-ए-इस्लाम ही संघटना त्यामागे होती

दोन दिवस आधी इशारा दिला होता - शिंदे
'हैदराबादमधील स्फोटांमध्ये सायकलचा वापर करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दोन दिवसांपूर्वीच दक्षतेचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळीही याबाबत मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांना याची माहिती दिली होती,'' अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

देशाला हादरविणारे दहशतवादी हल्ले
24 सप्टेंबर 2002 - अहमदाबादमधील अक्षरधाम मंदिरात दहशतवादी घुसले, 31 मृत्युमुखी.
25 ऑगस्ट 2003 - मुंबईत झवेरी बाजार, गेटवे ऑफ इंडिया येथे बॉंबस्फोट, 55 जणांचा मृत्यू.
29 ऑक्‍टोबर 2005 - दिवाळीच्या दोन दिवस आधी दक्षिण दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी तीन बॉंबस्फोट, 59 जण ठार.
11 जुलै 2006 - मुंबईतील सात उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये स्फोटांची मालिका. त्यात 189 लोकांचा बळी आणि हजारावर जखमी.
18 फेब्रुवारी 2007 - नवी दिल्ली-लाहोर समझोता एक्‍स्प्रेसमधील बॉंबस्फोटात 68 जण ठार.
30 ऑक्‍टोबर 2008 - आसाममध्ये बॉंबस्फोटांची मालिका. 61 जण ठार, तीनशेवर जखमी.
26 नोव्हेंबर 2008 - मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 166 जणांचा बळी आणि तीनशेवर जखमी.
12 फेब्रुवारी 2010 - पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 54 जण जखमी.
13 जुलै 2012 - मुंबईतील गर्दीच्या भागात झालेल्या स्फोटात 27 जणांचा बळी आणि 50 जण जखमी.

कसोटीबाबत साशंकता?
हैदराबादला गुरुवारी झालेल्या बॉंबस्फोटांमुळे तिथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी जेमतेम एका आठवड्याने म्हणजेच दोन मार्चपासून सुरू होणार आहे.

हैदराबादला झालेले स्फोट हे दिलसुखनगर भागात झाले. हे ठिकाण कसोटी होणार असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमपासून सात किलोमीटरवर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाची यापूर्वीची भूमिका पाहता ते हैदराबादला खेळण्याबाबत आता आक्षेप घेतील, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. अर्थातच याबाबतची चर्चा आता उद्याच सुरू होईल व त्यानंतरच तेथील कसोटीबाबतचा आढावा घेतला जाईल, असे भारतीय क्रिकेट मंडळातील वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले
काय बोलणार आता आपण...अजून आपण कसाब आणि अफजल ला फाशी दिल्याचा आनंद विसरत नाहीत तो पर्यंत अजून एक ब्लास्ट....नक्की काय चाललाय ते आपल्याला कधीच कळणार नाही..आता परत चौकशी परत दयेचा अर्ज परत राजकारण...आपला देश यामध्येच सीमित राहिला आहे...खरा विकास आपल्या नशिबातच नाही....मृतांना श्रद्धांजली...
On 21/02/2013 09:28 PM शिवराम गोपाळ वैद्य said:
अब सुशील कुमार शिंदे, चिद्दू, दिग्गी, शबाना आझमी, तीस्ता सेटलवाड जैसे नेताओंकी बत्तीसी अच्छी तरह से खुलनी चाहिए और उन्होंने बताना चाहिए की आन्ध्र प्रदेश की कांग्रेसी सरकार इस जघन्य हत्याकांड की जिम्मेदार है और उसे सत्ता में बने रहनेका कोई अधिकार नहीं है ! अगर यह घटना गुजरात में होती तो सुशील कुमार शिंदे फिरसे जयपुर की रिकॉर्ड बजाने में डेरी नहीं करते ! चाहे जो भी हो इस हत्याकांड के पीछे जो लोग है उन्हें बख्शा नहीं जाना चाहिए ! कांग्रेस सिर्फ मुडदे गिननेका काम न करें ! कुछ ठोस एक्शन की उम्मीद है मनमोहन सिंग से ! अब बहोत हो गया ! पानी सर के ऊपर से बह रहा है !
On 21/02/2013 09:25 PM Dhananjay Gujrathi said:
अफजल गुरु चे मृतदेह न दिल्यामुळे हल्ला झाला असावा लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी आणि दोशीना फाशी द्यावी त्यासाठी दहा वर्षाची वाट पाहू नका
On 21/02/2013 09:03 PM विजय तरवडे said:
अतिदक्षतेचा इशारा, नागरिकांना शांततेचे आवाहन, दहशतवादाच्या रंगावर चर्चा, निषेध, मेणबत्ती मोर्चा... हे असंच चालायचं???? याच्या पलीकडे जाऊन ठोस काही होणार का? आणि कधी होणार?
On 21/02/2013 08:32 PM janardan lute said:
which name will MR. Shinde give to this terrorism.....
On 21/02/2013 08:13 PM kedar said:
अफजल गुरु च्या फासी चा बदला...
On 21/02/2013 08:07 PM sunil said:
करणार कोण तर हे सारे राजकारणीच आहेत, या माघे.... election आले न आले कि झालीच यांची दिवाळी सुरु.....( असे बॉब हल्ले करून करतात दिवाळी साजरी ) मग त्यात कोणत्या धर्म जातीचा मारू कि जगू.... यांना निमित zhale भाषण द्यायला.....

No comments:

Post a Comment