Total Pageviews

Thursday 13 December 2012


 ढोंगी सेक्युलॅरिस्टांचा दयाळूपणा! TARUN BHARAT AGRALEKH

हिंदुस्थाhttp://www.tarunbharat.net/Encyc/2012/12/13/अग्रलेख.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=Nन

 

कॉंग्रेस सरकारमधील ढोंगी सेक्युलर लोकांनी देश विकायलाच काढलेला दिसतो आहे. मुंबईतील गोवंडी भागात पोलिसांनी जेव्हा बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी छापे टाकले, तेव्हा तेथे सापडलेल्या बांगलादेशंी घुसखोरांकडे धडधडीत पॅन कार्ड, रेशन कार्ड तर मिळालेच, पण नागरिकत्वाचे अधिकृत प्रमाण मानल्या गेलेल्याआणि युनिक आयडेंटीफिकेशन नंबर असलेले आधार कार्डसुद्धा या बांगला घुसखोरांकडे असल्याचे आढळून आले! मतांच्या लाचारीसाठी देशाला खड्ड्यात घालण्याची किती नीच पातळीपर्यंतची तयारी या लोकांनी केली आहे, याचा हा धडधडीत पुरावाच या घटनेने पुढे आणला आहे. आसाममध्ये घुसखोरी ही मोठी समस्या आहे. तेथे बांगलादेशी घुसखोर धडधडीतपणे मतदानावर परिणाम करण्याइतक्या संख्येने घुसले आहेत. या घुसखोरांना सरकारने देशाच्या बाहेर घालवावे, यासाठी तेथील विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. त्यामधून ‘आसू’ या विद्यार्थी संघटनेचा आणि ‘असम गण परिषद’ या राजकीय पक्षाचा जन्म झाला. हा इतिहास सगळ्या देशाने अनुभवला आहे. जगाच्या पाठीवर घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले, असा भारत हा एकमेव देश असेल़! मात्र, इतिहासातील या अनुभवातून या देशातील ढोंगी सेक्युलॅरिस्टांनी काही बोध घेतलेला दिसत नाही. आपल्या सेक्युलॅरिझम्‌च्या झिंगेत झिंगताना, देशाचे हित या लोकांनी गुंडाळून ठेवले आहे, असेच आता दिसते आहे.
आसाममध्ये आणि बांगला सीमेवर घुसखोरांची पद्धती आणि या देशात घुसून येथे प्रस्थापित होतानाच येथील लोकजीवनावर गंभीर परिणाम करण्याचे त्यांचे दुष्ट इरादे, यावर भरपूर लिखाण यापूर्वी झाले आहे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्रीकांतजी जोशी यांनी- ‘घुसखोरी ़: एक नि:शब्द आक्रमण’ या पुस्तकात या सर्व प्रकाराचा सविस्तर ऊहापोह केला आहे. गर्दनिया पासपोर्ट नावाचा एक प्रकार सीमेवर रूढ आहे. तेथे चिरीमिरी हातावर ठेवताच सुरक्षारक्षकच या घुसखोरांची मानगुट पकडून त्यांना भारतीय सीमेत घुसवतात. एकदा भारतात प्रवेश करताच हे लोक मतासाठी लाचार झालेल्या येथील ढोंगी सेक्युलर पुढार्‍यांच्या आश्रयाने वाटेल त्या गोष्टी मिळवतात. या वाटेल त्या गोष्टीत सर्व काही आले. महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीचे सरकार आले होते त्या काळात, मुंबईतील बांगला घुसखोरांना शोधून काढून बांगलादेशाकडे परत पिटाळण्याचा प्रयत्न सरकारने केला, तेव्हा बंगालमधील कम्युनिस्टांना या घुसखोरांचे प्रेमाचे एवढे भरते आले होते की, त्यांनी या घुसखोरांना बांगलादेशाकडे घेऊन जाणार्‍या रेल्वेवर हल्ला करून त्यांना सोडविले. इतके घरचे भेदी या देशात असल्याने या देशाच्या शत्रूंना काही वेगळे करण्याची काय गरज? मुंबईत आझाद मैदानावर जो नंगानाच देशद्रोही पिलावळीने घातला, त्याला या लोकांना या देशात मिळणारे हे राजकीय संरक्षणच कारणीभूत आहे. आझाद मैदानावर या लोकांची हिंमत इतकी वाढली की, पोलिसांच्या अंगावर हात टाकणे आणि महिला पोलिसांचा विनयभंग करण्याला यांनी मागेपुढे पाहिले नाही. हिंदुस्थानात होणार्‍या दंगली आणि बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी घटना यामध्ये या घुसखोरांचा मोठा सहभाग असतो, हे आता काही नवे राहिलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर या घुसखोरांना वेचून परत त्यांच्या गावी पिटाळले पाहिजे. देशात घुसलेल्या विदेशी नागरिकांना बेकायदेशीर रीत्या देशात भुईला भार होऊन राहू द्यायचे नाही. हा कुठल्याही देशातला सुरक्षा, सार्वजनिक व राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने प्राथमिक नियम असतो. मात्र, हिंदुस्थानात मतांची लाचारी आणि ढोंगी सेक्युलॅरिझम्‌चा बागुलबोवा यामुळे हिंदू नसला की त्याला काहीही करण्याला जणू संपूर्ण मोकळीकच आहे. मग तो विदेशी नागरिक असला तरीही त्याला बारा खून माफच आहेत!
महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षांना रस्त्यावर बघून घेण्याची भाषा करणार्‍या टगेगिरीच्या पक्षातील गृहमंत्र्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? हे गृहमंत्री विधानसभेत लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना दमबाजी करणार आणि बांगला घुसखोरांना मात्र पॅनकार्ड, रेशनकार्ड आणि आधार कार्ड देणार! व्वा रे दयाळू सरकार! मुंबईत गोवंडीतून अनेक गुन्ह्यांची सूत्रे हलतात. शहरात गुन्हेगारी, दहशतवादी घटना घडल्या की, त्यातील आरोपींचे लागेबांधे गोवंडीत असल्याचे लक्षात येते. त्या गोवंडीत पोलिसांंनी छापा टाकला, तर बांगलादेशातून घुसलेली तब्बल २८ मंडळी तेथे पोलिसांच्या हाती लागली. या लोकांची घरे पोलिसांनी झडतीत तपासली तेव्हा धक्कादायक सत्य लक्षात आले की, या लोकांकडे अधिकृत रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्डसुद्धा आहेत. अख्तर निझामुद्दीन शेख या बांगला घुसखोराकडे सरकारने दिलेले आधार कार्ड असल्याचे लक्षात आले. महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये देशातील नागरिकांना आधार कार्डसाठी तासन्‌तास रांगा लावूनही, आधार कार्डासाठी असलेले अर्जाचे नमुने मिळेनासे झाले आहेत. आधार कार्ड मिळणे दूरच, त्यासाठी लागणारा अर्ज मिळविण्यासाठीही संघर्ष करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी आधार कार्डासाठी अर्ज दिले, छायाचित्रे काढून नोंदणी केली त्यांनाही आधार कार्ड पोहोचणार नाही, याची जादू या देशातील पोस्ट खात्याने करून दाखविली आहे. देशभक्त नागरिकांनी संघर्ष करूनही त्यांना न मिळणारे आधार कार्ड बांगला घुसखोरांना मात्र मिळते, हे पाहून पोलिसही चक्रावून गेले. त्यांनी या शेख अख्तरकडे खोदून खोदून चौकशी केली तेव्हा त्याने हे कार्ड, शाळेचे बोगस प्रमाणपत्र वापरून पॅन कार्ड काढले आणि पॅन कार्डचा उपयोग करून आधार कार्डसाठी नोंदणी केली. हिंदू नाही म्हटले की त्याच्यासाठी राजकारणी, प्रशासकीय यंत्रणा सेवा करण्यास अगदी अहमहमिकेने पुढे असतात, असे दिसून आले आहे. कारण, हिंदू नसलेला माणूस म्हणजे आपल्या गठ्‌ठा मतांचा भाग आहे, असा भास कॉंग्रेसच्या आणि ढोंगी सेक्युलर लोकांना होतो. निवडणुका जिंकण्यासाठी या अहिंदू गठ्‌ठा मतदारांना वाटेल त्या सवलती द्यायला हे राजकारणी तयार होतात. ज्यांच्यावर गेली वर्षानुवर्षे येथील सामाजिक विषमतेच्या इतिहासात अन्याय झाला त्यांना आता स्पर्धेत सर्वांसोबत आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्याचा दुरुपयोग करत, केवळ मतांच्या लाचारीसाठी ज्यांनी येथे रझाकारी केली, ज्यांनी येथे राज्य करत हिंदूंवर जिझिया कर लादला, अशा लोकांना आरक्षण देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. या मानसिकतेमुळेच या देशात घुसलेल्या या बांगला घुसखोरांची हिंमत येथे नाव नोंदणी करून पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि अगदी आधार कार्ड मिळवण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. प्रश्‍न सर्व अहिंदूंचा नाही. जे या देशात पूर्वापार राहत आले आहेत आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात देणे वेगळी गोष्ट आहे. मात्र, केवळ मुसलमान आहेत म्हणून त्यांची पात्रता, त्याचे नागरिकत्व काहीही न पाहता त्याच्यावर सवलतींची खैरात करण्याची पराभूत मनोवृत्ती सोडून दिली पाहिजे. अशा पराभूत मनोवृत्तीतूनच बांगला घुसखोरांना मदत करण्याची देशद्रोही कृती घडते. अशा मनोवृत्तीतूनच अफजल गुरूसारख्याची फाशी पुढे पुढे लांबविली जाते. अशा पराभूत मनोवृत्तीतूनच दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहण्याचे पाप या देशातील राजकारणी करतात. अशा पराभूत मनोवृत्तीतूनच आझाद मैदानासारख्या घटनेत दहशतवादी गुंडांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यासाठी सत्ताधार्‍यांची जीभ रेटत नाही़!
देशद्रोह्यांना, परकीय घुसखोरांना पदराखाली घ्याल तर खबरदार! असे आता या ढोंगी सेक्युलॅरिस्टांना बजावण्याची गरज आहे. देशाच्या हिताशी सौदा कराल तर पुढच्याच निवडणुकीत जनता आस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे यांना प्रत्यक्ष मतदानातूनच जतावण्याची गरज आहे त्याशिवाय घुसखोरांचे आधार बनण्याची यांची खोड मोडणार नाही़!

No comments:

Post a Comment