Total Pageviews

Monday 24 December 2012

दहशतवादाला पायबंद घालण्याकरता पाकिस्तान गंभीर नाही
पाकिस्तानच्या बाबतीत भारताचे राज्यकर्ते हे नेहमीच पडखाऊ धोरण स्वीकारीत असतात. मतांचे राजकारण आमच्या राज्यकर्त्यांना छळत असते. पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक दिल्लीत आले राज्यकर्त्यांची जाहीर फ़जिती करून निघून गेले. नेहमीप्रमाणे आमचे राज्यकर्ते तीव्र संताप आणि निषेधाचे शाब्दिक बुडबुडे सोडत बसले. निषेधाचे असे खलिते राज्यकर्त्यांनी पाकिस्तानला आजवर हजारो पाठवले. पाकनी ना त्याकडे लक्ष दिले, ना दहशतवादाचे छुपे युद्ध थांबविले, ना या दहशतवाद्यांना पाठीशी घालणे बंद केले. आता तर या दहशतवादी हल्ल्यांचे खापरही भारतावरच फोडण्याचे त्यांचे उद्योग सुरू आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी त्यांच्या नवी दिल्ली भेटीत तेच केले. आधी त्यानी मुंबईवरील हल्ला आणि बाबरीचा विध्वंस सारखाच असल्याचे तारे तोडले. त्याविरुद्ध बोंब झाल्यावर त्यांनी पलटी मारली ? दुसर्‍या दिवशी मलिक पुन्हा बोलले की. मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार अबू जिंदाल हा भारताचाच गुप्तचर आहे. एवढ्यावरच थांबतामुंबईवरील हल्ला हे भारताचेच अपयश आहे असे सांगून जखमेवर मीठ चोळले. हा हल्ला आमच्या सुरक्षा यंत्रणांचे अपयश आहे हे खरेच, पण तो कट शिजवला आणि प्रत्यक्षात आणला तो पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी आणि हल्ल्याची सूत्रे हलविण्यात आली तीदेखील पाकिस्तानातूनच हे सत्य आता जगानेही मान्य केले आहे.
आताही पोकळ संतापापलीकडे आमच्या राज्यकर्त्यांनी काहीच केलेले नाही. उलट आमचे परराष्ट्रमंट्रानीमलिक यांचे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानची अधिकृत भूमिका नाही अशी सारवासारव केली. मलिक हे पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. ते भारताच्या अधिकृत दौर्‍यावर आले होते आणि तरीही आमचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की ते जे काही बोलले ती त्या देशाची अधिकृत भूमिका नाही. पाकिस्तानी गृहमंत्र्याची भूमिका अधिकृत आहे की नाही हे त्या देशाच्या पंतप्रधानांनी ठरवायचे की आमच्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी? .भारतव्देशाचे कडू जहर
पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी शनिवारी भारतीय भूमीवर पाय ठेवताना आपण पाकिस्तानी जनतेचा शांततेचा संदेश भारतीयांसाठी घेऊन आलो आहेत असे सांगितले खरे, पण त्यांच्या कोणत्याही वक्तव्यातून शांततेचा संदेश झिरपण्याऐवजी भारतव्देशाचे कडू जहरच ओकले गेलेले दिसले. तोंडात शांततेची भाषा आणि कृती मात्र अशांतता माजवण्याची असेच एकूण मलिक यांचे वर्तन होते. भारत २६।११ च्या तपासाचा आग्रह या भेटीच्या काळात लावून धरणार आणि त्या आग्रहाला टाळता टाळता आपल्या नाकात दम येणार हे ओळखून मलिक भारतावरच प्रतिहल्ला करण्याच्या तयारीने आले होते यात काही शंका नाही. त्यामुळेच त्यांनी २६।११ च्या घटनेची तुलना बाबरी मशिदीच्या विध्वंसाशी केली. बाबरी मशिदीचे पाडले जाणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याबाबत या देशाचे सरकार आणि नागरिक काय तो निर्णय घेणार आहेत. त्याच्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. उलट पाकिस्तानात मोठय़ा प्रमाणात हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत व हिंदूंची हकालपट्टी केली जात आहे, त्याची चिंता मलिक यांनी करावयास हवी होती. मलिक यांनी एक लक्षात घ्यावयास हवे होते की, २६।११ चा हल्ला हा पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी केला होता व त्यांना हाफिज सईद या अतिरेक्यांच्या म्होरक्याचे मार्गदर्शन लाभले होते. त्यामुळे हाफिज सईद व त्याच्या पाकिस्तानातील साथीदारांवर कारवाईची मागणी भारतातूनच नाही तर सर्व जगातून होत आहे, त्या मागणीचे पाकिस्तान सरकार काय करणार आहे हे सांगण्याचे मलिक यांनी टाळले. दुसरा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तो भारतीय लष्करी अधिकारी सौरभ कालिया याची कारगिल कारवाईच्या काळात पाकिस्तानी सैनिकांनी अत्यंत निघृण अशी हत्या केली, त्याबद्दल. हा युध्दातील चकमकीत झालेला मृत्यू नव्हता तर अत्यंत कपटाने व अमानुषपणे केलेली ती हत्या होती. त्याबद्दल आपण सौरभ कालियांच्या वडिलांची माफी मागणार का असे विचारले असता त्यांना सहानुभूती व दु:ख व्यक्त करून हा प्रश्न मिटवता आला असता पण त्यांनी हा सौरभ हा गोळीने मरण पावला की वाईट हवामानामुळे मरण पावला हे आपल्याला माहीत नाही, असे वक्तव्य करून भारतीयांच्या भावनांचा अपमान केला. मलिक यांनी तिसरे आक्षेपार्ह वक्तव्य केले ते भारताच्या ताब्यात आलेला लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबु जिंदाल हा भारतीय गुप्तचर संस्थेचा एजंट असल्याचे. हे वक्तव्य म्हणजे ह्यचोर तो चोर आणी वर शिरजोर असेच आहे. या अबु जिंदालचा २६।११ च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानी आयएसआयने वापर केला आणि नंतर त्याला भारताने पकडू नये यासाठी सौदी अरेबियात पाठवले, याचे धडधडीत पुरावे असताना मलिक यांनी ते नाकारण्याचा प्रचंड असा खोटारडेपणा केला आहे. त्यामुळे रहमान मलिक यांची ही भारत भेट दोन्ही देशांना अधिक जवळ आणणारी ठरण्याऐवजी त्यांना एकमेकांपासून दूर लोटणारीच ठरली. अशा स्थितीत दोन्ही देशांच्या गृहमंत्र्यांनी व्हिसा नियम शिथील करण्यासंबंधी केलल्या कराराचे महत्त्व आणि गांभीर्य कमी तर झालेच आहे. यापेक्षा ही भेट झाली नसती तर बरे झाले असते, असेच म्हणण्याची पाळी आली आहे.
एकीकडे भारताशी मैत्रीचा हात पुढे करायचा, वादाचे मुद्दे बाजूला ठेवून अन्य क्षेत्रांत देवाणघेवाण वृद्धिंगत करून सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर द्विपक्षीय प्रश्‍न जाणीवपूर्वक उपस्थित करण्याचा "उद्योग' पाकिस्तान सातत्याने करीत आला आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या 65 वर्षांत भारत-पाकिस्तान यांचे संबंध काश्‍मीर प्रश्‍नातच अडकून पडले आहेत. बदलत्या परिस्थितीत हा प्रश्‍न बाजूला ठेवून व्यापार, आर्थिक तसेच साहित्य, कला, सांस्कृतिक, क्रीडा अशा क्षेत्रांत सहकार्याचे दालन खुले करून संबंध सुरळीत करणे, ही दोन्ही देशांची गरज आहे. अलीकडेच इस्लामाबादेतील चर्चेत व्हिसाविषयक नियम शिथिल करणे, सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापारी संबंध वाढविणे या मुद्‌द्‌यांवर उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांचे एकमत झाले खरे; मात्र "संबंधात सुधारणा होण्यासाठी काश्‍मीर प्रश्‍न सुटणे आवश्‍यक आहे,' ही आपली नेहमीची "रेकॉर्ड' पाकिस्तानने याही वेळी वाजविली होतीच.पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मलिक यांची अवघ्या 15 मिनिटांत बोळवण केली. शिवाय, मुंबईवरील या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांबाबत काही कठोर कारवाई होत नाही तोपावेतो आपण पाकिस्तानला भेट देऊ शकत नाही, असेही ठामपणे सांगितले.

आपल्या भारतभेटीवर पाणी पडल्याचे लक्षात आल्यामुळेच त्यांनी अखेर या गोंधळाचे खापर मीडियावर फोडण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आपल्या भेटीचा अजेंडा प्रसारमाध्यमे ठरवीत आहेत, असे त्यांनी सांगितले. मग मलिक यांची अपेक्षा, भारतीय प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहावे, अशी होती काय? दहशतवादाला कोणत्याही प्रकारे चिथावणी देण्याचे धोरण किती चुकीचे आहे, हे पाकिस्तानला कळायला हवे. मलिक ज्या वेळी भारतात येऊन मुक्ताफळे उधळत होते, त्याच दिवशी पेशावर विमानतळावर दहशतवाद्यांनी भीषण असा हल्ला चढविला आणि पाकिस्तानी सुरक्षेची लक्तरे चव्हाट्यावर आणली. पण, पाकिस्तानचे डोळे उघडणार का? पण, एक मात्र खरे, मलिक यांच्या या दौऱ्यातून काही निष्पन्न झाले नाही .पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांची वक्तव्ये पाहता दहशतवादाला पायबंद घालण्याच्या प्रश्‍नावर अद्यापही तो देश गंभीर नाही, हे स्पष्ट होते,

No comments:

Post a Comment