Total Pageviews

Saturday, 15 March 2025

मराठी साहित्य आणि भारताची सुरक्षा, चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड युद्धावर मराठी साहित्य जरुरी- भाग 3



 

मराठी साहित्य आणि भारताची सुरक्षा,

चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड युद्धावर मराठी साहित्य जरुरी- भाग 3

भारता आम्ही तुलाच देव मानतो , हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो | राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा | ह्याच मातीवरी प्राण गेला तरी ,अमुची वीर गाथा उरे Iमर्द आम्ही मराठे खरे |

नवी दिल्ली येथील ९८व्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेकरता लिहिलेल्या. लेखाचा तिसरा आणी शेवटचा भाग खालील प्रमाणे होता.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर

आज चार ते पाच कोटी बांगलादेशीनी भारतामध्ये घुसखोरी केली असावी. ही घुसखोरी अजूनसुद्धा पश्चिम बंगालमधून सुरू आहे. दरवर्षी भारतीय पोलीस 03 ते 04 हजार बांगलादेशी पकडतात, परंतु ही घुसखोरी थांबण्याचे काही लक्षण दिसत नाही.

मतपेटीच्या राजकारणाला विरोध करावा लागेल. त्यासाठी सातत्याने त्याच्या विरोधात लेखन आणि प्रचार करायला हवा. ही राष्ट्रीय सुरक्षेची समस्या आहे, हे लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. 

आताच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक बांगलादेशींनी मतदान केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. घुसखोरी जर चालू राहिली तर २०२९  पूर्वी आसाम व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी बांगलादेशी बसल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येईल.

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान?’ या विषयावरती मी लिहिलेली पुस्तके सोडून अजून कुठलीही पुस्तके प्रकाशित झाल्याचे दिसत नाही. जर यावरती पुस्तके प्रकाशित झाली तर जास्त चांगले होईल.

आव्हान चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड वॉर, अनियमित युद्ध किंवा मल्टि डोमेन युद्धाचे

गलवानच्या लढाईमध्ये आपण चीनचे सत्तरहून जास्त सैनिक मारले होते.चीन बरोबर पारंपरिक लढाईची आपल्याला चिंता नको, चिंता आहे ती ३६५ दिवस चालणाऱ्या हायब्रीड वॉरची.

सध्या चीनचे भारताविरुद्ध (आणि जगातील अनेक देशांविरुद्ध) एक नवीन प्रकारचे युद्ध चाललेले आहे. त्याला हायब्रीड वॉर, झोन वॉर फेअर किंवा अनरिस्ट्रीक्टेड वॉर किंवा अनियमित युद्ध म्हणून ओळखले जाते. हे युद्ध ३६५ दिवस सुरू असते आणि वेगवेगळ्या स्तरावरती लढले जाते. या युद्धाचा उद्देश आहे की भारतात हिंसाचार वाढवून, अराजकता माजवून, भारताची आर्थिक प्रगतीचा वेग कमी करायचा, त्यामुळे भारत चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येणार नाही आणि कायमचा  चीनच्या आधिपत्याखाली राहील.

 नवीन युद्ध, अनरिस्ट्रीक्टेड वॉर / हायब्रीड वॉर

२०१४ नंतर नवीन युद्ध सुरू झाले ज्याला अनरिस्ट्रीक्टेड वॉर / हायब्रीड वॉर किंवा नियम नसलेले युद्ध असे म्हटले जाते. या युद्धामध्ये चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. याचे अनेक पैलू आहेत, आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, मानसिक युद्ध , प्रोपोगंडा वॉर, सायबर युद्ध, सोशल मीडियात घुसखोरी आणि अनेक पैलू.

हायब्रीड वॉरही एक लष्करी रणनीती आहे, जे पारंपरिक युद्ध, राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध, मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘हायब्रिड वॉरफेअरमुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या युद्धांत अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे.

आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध

चीनने भारतात केलेली आर्थिक घुसखोरी, भारताशी चाललेले आर्थिक युद्ध किंवा व्यापार युद्ध हा एक महत्वाचा आयाम आहे. आर्थिक युद्ध लढण्याकरता आपण आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमाने चीनची आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये झालेली घुसखोरी कमी करत आहोत. मेक इन इंडियाला महत्त्व देऊन चीन मधून येणाऱ्या गोष्टी भारतात बनवत आहोत, बनवणार आहोत.मात्र ही लढाई अनेक वर्षे चालणार आहे.

मानसिक युद्ध प्रोपोगंडा वॉर

मानसिक युद्ध ,प्रोपोगंडा वॉर, दुष्प्रचार युद्धाकरता चीनने भारतात अनेकांना विकत घेतले आहे. त्यांचे हस्तक भारताच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आणि सोशल मीडियावर चीनच्या बाजूने प्रचार करतात. हे युद्ध,  सामान्य माणसाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहे. हे युद्ध कसे जिंकायचे?

त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देश भक्ती, देश प्रेमाची भावना जागृत व्हायला पाहिजे, त्यांनी चीनच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये.

प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाचे कान आणि डोळे बनलं पाहिजे. भारताचे शत्रू कुठलाही दुष्प्रचार करत असतील, मानसिक युद्ध करत असतील अशांना शोधून त्यांची माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणेला दिली पाहिजे, ज्यामुळे हे युद्ध जिंकण्यात मदत मिळेल.

सायबर युद्ध

चीन आपल्यासोबत सायबर युद्ध लढत आहे. सायबर युद्ध जिंकण्याकरिता आपल्याला देशाची सायबर यंत्रणा  अधिक मजबूत करावी लागेल आणि हे काम सतत सुरू रहाणार आहे. ज्या प्रमाणे आपण आपल्या काँप्युटरमधील अँटी व्हायरस अपडेट करत असतो त्याच प्रमाणे त्याच प्रमाणे सायबर वॉर पासून वाचण्याकरिता आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा यंत्रणा अपडेट करावी लागणार आहे.

सोशल मीडियात घुसखोरी

चीनने आपल्या सोशल मीडियात घुसखोरी केली आहे पण आपण मात्र चीनच्या सोशल मीडियात घुसखोरी करू शकत नाही. कारण सोशल मीडिया चीनी कंट्रोल आहे. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्या दुष्प्रचाराला कसे प्रत्युत्तर द्यायचे ?.

 हायब्रीड युद्धाला प्रत्युत्तर

स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, हायब्रीड ऑपरेशन्सआपणसुद्धा चीन, पाकिस्तानमध्ये करू शकतो. तुम्ही आमच्या देशामध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग. इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना आम्ही राजकीय मदत करू शकतो.

हायब्रीड  युद्धाच्या विविध प्रकारांमध्ये चीन भारताच्या पुष्कळच पुढे आहे. म्हणून हायब्रीड युद्धाच्या प्रत्येक प्रकारच्या लढाईमध्ये प्रत्युत्तर देण्याची क्षमता, भारताला निर्माण करावी लागेल.

हायब्रीड युद्धात प्रत्येक भारतीय फ्रंट लाइन सैनिक आहे. कारण हे युद्ध  बंदुकीने लढले जात नाही. आता प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, देशाला सुरक्षित करण्याकरिता मी काय करू शकतो? प्रत्येक भारतीयाने चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.

मराठी भाषेत  चीनी हायब्रीड वॉर, ग्रे झोन वॉर, अनरिस्ट्रीक्टेड वॉर, अनियमित युद्ध किंवा मल्टि डोमेन युद्ध, आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, मानसिक युद्ध , प्रोपोगंडा वॉर, दुष्प्रचार युद्ध सोशल मीडियात घुसखोरी, सायबर युद्ध, मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप, वर काहीच साहित्य प्रकाशित झालेले नाही.

बहुतेक मराठी वाचकांना मल्टी डोमेन युद्धाविषयी कल्पना नाही

अनेक सुशिक्षित असा प्रश्न विचारतात की चीनबरोबर आपले तिसरे महायुद्ध तर होणार नाही? त्यांना ही कल्पना नसते की चीन आपल्याशी गेले अनेक वर्षे ३६५ दिवस, दिवसातून २४ तास मल्टी डोमेन युद्ध लढत आहे आणि देशातील नागरिकांना याविषयी माहिती नाही किंवा फारशी परवा नाही. अनेक, खास तर कॉर्पोरेट वर्ल्ड चीनला आपला शत्रूच मानत नाही आणि त्यांना वाटते की चीन शिवाय ते आपला उद्योग धंदा चालवू शकत नाही. म्हणून हे अत्यंत जरुरी आहे की चीन वेगवेगळ्या प्रकारे भारताची प्रगती कशी थांबवतो आहे हे भारतियांना कळायला पाहिजे आणि सगळ्यानी योध्ये म्ह्णुन चीन विरुद्धच्या या युद्धामध्ये भाग घेतला तरच आपण चीन विरुद्ध मल्टी डोमेन युद्ध हे जिंकू शकतो.

मराठी साहित्यिक मल्टी डोमेन युद्धाविषयी मराठीमध्ये साहित्य निर्माण करून देशभक्त नागरिकांना एक माहिती योद्धा आणि मल्टी डोमेन युद्धात देशाला मदत करणारा देशभक्त नागरिक म्हणून तयार होण्यामध्ये मदत करू शकतात. देशभक्त नागरिकांची चीन, पाकिस्तान आणि देशाच्या शत्रूंनी चालवलेल्या मल्टी डोमेन मध्येसुद्धा काय जबाबदारी असेल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावरती  मराठी साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे.

मात्र याकरता मराठी साहित्यिकांना मेहनत करून मल्टी डोमेन युद्धाच्या वेगवेगळ्या आयामांवर साहित्य निर्माण करून आम जनतेला शिक्षित करावे लागेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, 14 March 2025

वाचस्पती कै. स्वर्णलता भिशीकर - चैतन्याची अद्भुत खाण!!--TARUN BHARAT-डॉ. अनघा लवळेकर

 कै. आप्पांच्या, कै. अण्णांच्या मानसकन्या.. ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या , स्वरूपयोग परिवाराच्या ज्येष्ठ साधिका लेखिका, कवयित्री, संवादिका, जीवन-समुपदेशिका ही आणि अशी अनेक रूपे ज्यांच्यात एकवटली अशा लताताई. 

ज्ञानाचा अभिजात वारसा, अध्यात्माचा स्वयंभू पिंड आणि जीवनाप्रति करुणेचा सहजभाव, ही त्रिपुटी असलेल्या दुर्मीळातील दुर्मीळ व्यक्तींपैकी एक म्हणजे वाचस्पती स्वर्णलता भिशीकर. सर्वांच्या आत्मीय ‘लताताई’ दि. 4 मार्च रोजीच्या रात्री हे लौकिक जग सोडून, अलौकिकाच्या प्रवासाला निघून गेल्या. परंतु, त्यांच्या समृद्ध चिंतनाचा, लेखनाचा, अध्यात्म साधनेचा, अर्थगर्भ काव्यलेखनाचा आणि प्रखर राष्ट्रसेवेचा आदर्श त्यांनी, आपल्या सर्वांसमोर उलगडून ठेवला आहे. 

चंद्रशेखर परमानंद तथा बापूसाहेब भिशीकर या संघप्रेरित कार्यकर्त्याच्या घरात, 1951 साली त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन काळात ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पा पेंडसे यांच्या परीस-स्पर्शाने, लताताईंच्या मूळ कुशाग्र प्रज्ञेला राष्ट्रअर्चनेचे व्यापक उद्दिष्ट मिळाले. त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी, ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्य करण्यात व्यतीत केले.

 महाविद्यालयीन काळामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या युवती विभागाच्या उभारणीत, त्यांचा मोलाचा सहभाग होताच; परंतु एकीकडे ‘विद्यावाचस्पती पदवी’साठीचे संशोधन करताना, ज्ञानप्रबोधिनीच्या कन्यका प्रशालेच्या पायाभरणीची जबाबदारीही त्यांनी पेलली. त्याचवेळी कै. आप्पांच्या स्वीय साहाय्यकाच्या भूमिकेतून, त्यांच्या संपर्काचा प्रचंड विस्तार लताताईंनी संपूर्ण समर्पित वृत्तीने केला आणि जोपासलाही! वाचन कौशल्य या अत्यंत कळीच्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या मूलभूत विषयावर त्यांनी मिळवलेली ‘विद्यावाचस्पती पदवी’ प्रायोगिक अभ्यासमालेतील मैलाचा दगड म्हणावी, इतकी शास्त्रशुद्ध आणि उपयोजित आवाका असलेली आहे. त्या अभ्यासाच्या जोरावर गती वाचनाचे प्रशिक्षण वर्ग ज्ञान प्रबोधिनीमध्ये, शालेय मुलांपासून ते औद्योगिक अधिकार्‍यांपर्यंत विकसित होऊ शकले, ही त्याची महत्त्वाची फलश्रुती आहे.

कै. आप्पांच्या निधनानंतर ज्ञान प्रबोधिनीचे द्वितीय संचालक कै.व.सी.तथा अण्णा ताम्हनकर यांच्याही कामात, त्या बरोबरीने उभ्या राहिल्या. ज्ञान प्रबोधिनीसमोर त्याकाळी असणार्‍या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, आशाताई भोसले यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम योजला गेला, तो लताताईंच्या आणि गो. नी. तथा आप्पा दांडेकर यांच्या अपार स्नेहाच्या माध्यमातून झालेल्या संपर्कामुळेच. असे असंख्य स्नेहबंध त्यांनी जोडले, जोपासले आणि ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात सामावून घेतले. देश-विदेशामध्येही भारतीय संस्कृती आणि अध्यात्म विचार यांची मांडणी, बाल आणि युवा वर्गापासून ते साधना मार्गावर चालणार्‍या अनुभवी साधकांपर्यंत विविध गटांसमोर त्यांनी सातत्याने केली. 

1990 साली ज्ञान प्रबोधिनीने सोलापूर येथे, कै. अवंतिकाबाई व कै. जनुभाऊ केळकर यांनी स्थापन केलेली ‘बालविकास मंदिर’ ही प्रस्थापित शाळा चालविण्याचा व वाढवण्याचा पत्कर घेतला, तेव्हा कै. अण्णा ताम्हनकर यांच्यासोबत लताताई आणि गायत्रीताई सेवक या सोलापुरात नुसत्या गेल्याच नाहीत, तर सोलापूरकरच झाल्या. लताताई तर गेल्या 35 वर्षांत, त्यांच्या विविधांगी कार्यामुळे सोलापूरवासीयांच्या आदराची आणि विश्वासाची जागा बनल्या. सोलापूरमधील शाळेत, बालविकासाच्या दृष्टीने केलेले अभिनव प्रयोग, शासनाच्या साक्षरता चळवळीला लताताईंच्या दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्वामुळे मिळालेली विलक्षण गती आणि सुयश, अध्यात्माच्या ओढीने जमणार्‍या हजारोंना मिळालेला त्यांच्या सत्संगाचा पावन स्पर्श, अशा कैक आघाड्यांवर लताताईंनी लोकांच्या बुद्धी आणि हृदयाला अनुकूल दिशेने घडवण्याचे कार्य अथकपणे केले. बालविकास मंदिराच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, शासनासमवेत त्यावेळी करावा लागलेला विधायक भूमिकेतील संघर्ष आणि त्याचवेळी त्याच रचनेतील सुजाण वृत्तींच्या माणसांना जोडून घेणारी त्यांची अत्यंत रुजू आणि स्नेहमयी वृत्ती, या दोन्हीचा लोकविलक्षण मिलाफ समाजाने अनुभवला.

1993 सालचा किल्लारी भूकंप, हा एका मोठ्या सामाजिक शैक्षणिक उलथापालथीचा कारण बनला. त्यावेळी हराळीसारख्या छोट्या गावात प्राथमिक शिक्षणाच्या वर्गांपासून, सुरुवात करून आज शेकडो विद्यार्थ्यांना सामावून घेणारी निवासी शाळा प्रकल्प संकुल उभारण्यामध्ये, अण्णा आणि लताताईंचे अथक परिश्रम शिंपले गेले आहेत. आता तर आसपासच्या परिसरातील तांड्या- वस्त्यांमध्ये ही शिक्षणाची गंगा पोहोचवणारी एक चळवळ म्हणून ‘हराळी केंद्र’ विकसित होत आहे. अशा सर्व उपक्रमांच्या पाठीशी असलेले लताताईंचे सखोल चिंतन आणि अदम्य प्रेरणा, कार्यकर्त्यांना बळ पुरवीत आली आहे. ‘ज्ञान बनो कर्मशील-कर्म ज्ञानवान’ हे वाक्य, लताताईंच्या आयुष्यात पूर्णांशाने प्रतिबिंबित झालेले दिसते. 

लताताईंचे सामाजिक काम केवळ शिक्षणाला पुढावा देणे एवढेच मर्यादित राहिले नाही, तर अक्षरशः ‘जे का रंजले गांजले-त्यांसी म्हणावे आपुले’ या उक्तीनुसार, त्यांनी शेकडो जणांच्या व्यथांवर हळूवार फुंकर घालत, सहज अशा संवादातून त्यांना आयुष्याची उभारी पुन्हा दिली. सर्व स्तरातल्या वयाच्या आणि वृत्तींच्या व्यक्तींनी, त्यांचे भरून आलेले आभाळ मोकळे करण्यासाठी आणि सार्थकतेने जगण्याची उर्मी जागी होण्यासाठी, लताताईंच्या कुशीत काही काळ विसावा घेतलेला आहे. ‘वज्राद्पी कठोराणि-मृदुनि कुसुमादपि’ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पंजाबच्या अशांत काळातील, ज्ञानप्रबोधिनीच्या युवतींनी केलेला अभ्यास दौरा लताताईंच्या निर्भय आणि तरीही स्नेहपूर्ण नेतृत्वामुळे, अनेक कसोटीच्या प्रसंगांमध्येही यशस्वी झाला. देवराळा येथील रूपकुंवर सती प्रकरणावेळच्या अभ्यास दौर्‍यातही, काही बांक्या प्रसंगांमध्ये ज्या लताताईंचे उग्रचंडीचे रूप बघायला मिळाले. त्याच लताताई त्यांच्या सहवासात आलेल्या कठीण, ताठर व्यक्तीलाही त्यांच्या रुजुतेच्या बळावर कसे वितळायला लावत, याचेही अनेक प्रसंग कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाले. 

अत्यंत रसाळ आणि प्रेरक लेखन, ही तर त्यांची एक खास अशी ओळख आहे. त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत आशयसमृद्ध आणि अक्षर वाङ्मय ठरावे अशी आहे. भगिनी निवेदितांच्या सार्ध शताब्दी वर्षांमध्ये, निवेदितांच्या कार्यावरील पुस्तिकासंचातील शिक्षण विचारांवरील लताताईंनी लिहिलेले पुस्तक, शिक्षण क्षेत्रासाठी एक अमूल्य असा ठेवा बनले आहे. स्वामी विवेकानंदांच्या ‘अ ीळीळपस लरश्रश्र ीें कळपर्वी छरींळेप’ या पुस्तकाच्या ‘हिंदूतेजा जाग रे’ या अनुवादापासून ते ‘उजळती वाट’सारख्या, कुमारवयीन मुलांना सोप्या सोप्या उदाहरणातून व्यक्ती विकासाचे नेमके मर्म सांगणार्‍या पुस्तकापर्यंत, त्यांच्या अभिव्यक्तीचा विस्तार आहे. 

कविता हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ‘देवचाफे’ हा त्यांचा वयाच्या विशीत लिहिलेला कवितासंग्रह. त्याला लाभलेले कुसुमाग्रजांसारख्या ऋषी-कवीचे, आशीर्वादपर प्रास्ताविक आणि राज्य सरकार पुरस्कारही मिळावा, ही त्यांच्या स्वयंभू प्रतिभेला मिळालेली महत्त्वाची पावतीच आहे. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा त्यांनी केलेला भावानुवाद म्हणजे, आत्मचिंतनाची हळूवार झुळूक आहे. सर्वांना प्रिय असलेल्या आणि अत्यंत अचूक आणि भरीव शब्द योजना असलेल्या, त्यांच्या अनेक पद्य, गीतांनी प्रबोधिनीच्या कित्येक पिढ्यांमध्ये प्रेरणेचा झरा वाहता ठेवला आहे. ‘आव्हान हे ज्योती ना किया’, ‘शुभ्र सुगंधित पुष्पे’, ‘गिरी कुहरातील गर्द बनातील’ अशा जोशपूर्ण गीतांपासून, ‘पाखरे भरारली निळी नभे झळाळली’सारख्या सुंदर अशा संचलन गीतापर्यंत आणि ‘राष्ट्ररथाला विजयी होण्यासम बल चक्रे दोन हवी’ या सुंदर शब्दांनी विणलेल्या, स्त्री पुरुष संपूरकतेवरच्या गीतापर्यंत किती किती गीतांना आठवावे? 

या सर्वांच्या पल्याडची त्यांची अजून एक ओळख म्हणजे, त्यांनी आयुष्यभर साधलेली आत्मविलोपी अध्यात्म साधना.

 कै. विमलाजी ठकार आणि स्वामी माधवनाथ, या दोघांचाही अनुग्रह त्यांना लाभला होता. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटल्याप्रमाणे, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणार्‍या योग्याचे रूप, त्यांच्यामध्ये आम्हाला नित्य बघायला मिळाले. ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ म्हणजे काय, हे लताताईंच्या सहवासातल्या प्रत्येकाला कोणत्याही औपचारिक शब्दांशिवायच उमगले असणार, यात शंका नाही! परमात्म्याचा अंश प्रत्येकाच्या स्वरूपात आहे, हे सत्य सहवासात येणार्‍या प्रत्येकाशी, त्यांच्या होणार्‍या वर्तनातून सहजपणे प्रतिबिंबित होताना आम्ही पुन्हा पुन्हा अनुभवले आहे. एक शब्दही न बोलता ज्यांना दुसर्‍यांच्या व्यथा समजतात आणि जे त्यावर हळूवार फुंकर घालतात, अशा मोजक्या साधकांपैकी लताताई एक आहेत. (होत्या असे म्हणायला जीभ धजावत नाही. इतक्या त्या मनातून अजूनही आम्हा सर्वांच्या निकट आहेत.) आयुष्यभर स्वतःच्या गरजांचा अत्यंतिक संकोच करून घेत असतानाही, इतरांच्या गरजांचा विशालवृत्तीने विचार स्वीकार करणे, हे त्यांना कसे जमले असेल?

 ‘मृत्यू’ या विषयावरीलही त्यांचे चिंतन दीर्घकाळ चालू असणार असेच वाटते. सुमारे 25 वर्षांपूर्वी काहीशा धाडसाने त्यांना मी एक प्रश्न विचारला होता, “माणसाचे अस्तित्व शरीराशिवाय वेगळे असते का? याबद्दल तुम्हाला काय वाटते? पुस्तकातील उत्तरे मला माहीत आहेत. पण, तुमचा अनुभव असेल तर तसे सांगा.”

 

आजही त्यांचे खणखणीत शब्द मला स्पष्ट आठवतात. त्या म्हणाल्या होत्या, “होय. मी असा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी हे विश्वासाने सांगू शकते की, शरीर हे माणसाचे खरे अस्तित्व नाही.” त्यानंतर त्याविषयी कोणतीही शंका माझ्या मनात उद्भवली नाही. अशाच काही निमित्ताने, दोन वर्षांमागे त्यांनी मला ओशो यांचे ‘अबाऊट लिविंग अ‍ॅण्ड डाईंग’ हे पुस्तक वाचायला सांगितले. ते वाचत असतानाही, लताताईंचे 25 वर्षांपूर्वीचे शब्द माझी सोबत करत होते. गेली दीड वर्षे ज्या दुर्धर आजाराचा सहवास त्यांना लाभला, त्यालाही त्यांनी स्नेहभावाने कसे आपलेसे केले, हे त्यामुळे आता उमगते. अत्यंत समत्वचित्ताने स्वतःच्या निर्वाणानंतर काय करायचे याचे टिपण स्व:हस्ताक्षरात करून, पूर्ण तयारीनिशी या अनुभवाला त्या सज्ज झाल्या होत्या. हे केवळ कल्पनेपलीकडील वास्तव आहे.

 

अशा लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाला लौकिक जीवनात जे अनेक पुरस्कार मिळाले, त्याच्या कितीतरी पलीकडे आणि उंचावर असे स्थान त्यांना ओळखणार्‍या, किंचित सहवासही लाभलेल्या किंवा त्यांच्याविषयी फक्त ऐकलेल्या हजारो-हजारो लोकांच्या हृदयात मिळालेले आहे. त्यांच्या कर्मयोगाचा आणि आत्मविलोपी वृत्तीचा वारसा जमेल तसा पुढे नेणे, हेच खरे तर त्यांचे पुण्यस्मरण आहे. म्हणूनच असे वाटते,

 

देवाघरचा पारिजात हा फुलला अपुल्या घरी,

विशुद्ध सात्विक शुभ्रसुमांनी दरवळली ओसरी।

स्मरति रूपे किती बिलोरी पूर्णिम् चंद्रापरी,

छाया-माया तुझी निरंतर जपतो हृदयांतरी।

शब्दांना ओलांडून जावे तिथे तुझा गं गाव,

चैतन्याने चैतन्यागृही सहजच केला ठाव।

आदरणीय लताताईंच्या स्मृतीस सस्नेह-सादर अभिवादन!

 

 




https://www.mahamtb.com//Encyc/2025/3/8/Vachaspati-Swarnalata-Bhishikar.html

Pakistan Train Hijack बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला काय नेमकं हवंय

Wednesday, 12 March 2025

NAVBHARAT बलोची लिब्रेशन आर्मी का पाकिस्तानमे ट्रेन हायजॅक बलुचिस्तान को...

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये एका रेल्वेगाडीचे अपहरण होणे आणि त्यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांना २४ तासांपेक्षा अधिक काळ झगडावे लागणे या दोन्ही बाबी या विशाल प्रांतातील ठसठस आणि अस्वस्थता दर्शवतात. क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसला एका बोगद्यात थांबवून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी तिचा ताबा घेतला. रेल्वेगाडीतील २० पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि जवळपास २०० प्रवाशांना ओलीस ठेवले. ही घटना मंगळवारी घडली आणि बुधवारी प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेल्या कारवाईत ५७ बंडखोर मारले गेल्याचा आणि जवळपास १००हून अधिक प्रवाशांची सुटका केल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला. विविध दाव्यांतील तथ्यता पडताळणे अवघड आहे. पाकिस्तान किंवा बलुच सरकारी माहितीस्राोत विश्वासार्ह नाहीत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे (बीएलए) दावे तपासून पाहणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना मुळातच पाकिस्तान किंवा बलुचिस्तानमध्ये मर्यादित प्रवेश असतो, त्यामुळे त्यांच्याकडून आकड्यांविषयी फार तपशील मिळू शकत नाही. कारवाई थांबेल कधी आणि कशी हेही अनिश्चित आहे. बंडखोर कितीही मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी लष्कराच्या वाढत्या रेट्यासमोर कधीतरी ते हार जाणारच. मात्र इथे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे, कारण शरीराला स्फोटके बांधलेले आत्मघातकी बंडखोर प्रवाशांच्या सोबत बसलेले आहेत. त्यांना संपवण्यासाठी प्रवाशांच्या जीविताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या कोंडीच्या मुळाशी वर्षानुवर्षे अनुत्तरित राहिलेला बलुचिस्तानच्या अस्मितेचा आणि अनास्थेचा मुद्दा आहे. बलुचिस्तान हा क्षेत्रफळाच्या बाबतीत पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत. पंजाब, सिंध आणि खैबर-पख्तुनख्वा या इतर तीन प्रांतांच्या तुलनेत अधिक संसाधन समृद्धही. पण या समृद्धीचा फायदा कधीही स्थानिक बलुच जनतेला मिळाला नाही. पाकिस्तान लष्करात पंजाबींचे प्राबल्य. राजकारणातही पंजाब आणि सिंध प्रांतीयांची चलती, त्यातही पंजाबी अधिक प्रस्थापित. बलुचिस्तान किंवा पूर्वीच्या कलात प्रांताचे पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही या देशात सर्वार्थाने एकात्मीकरण, एकजिनसीकरण होऊ शकले नाही. धर्माच्या नावाखाली सर्वांना एका छताखाली आणण्याचा हट्टाग्रह राबवला गेला. त्यातून स्वतंत्र भाषा, स्वतंत्र संस्कृतींची गळचेपी झाली. बांगलादेशाची निर्मिती या अंतर्विरोधी अस्वस्थतेतूनच झाली. बलुचिस्तान त्याच मार्गावर आहे. पण बांगलादेशचा तुकडा पडल्यामुळे सावध झालेला पाकिस्तान बलुचिस्तानला विलग होऊ देणार नाही. त्यासाठी एकच मार्ग पाकिस्तानातील विविध पक्षीय राजकारणी वर्षानुवर्षे आचरतात. तो मार्ग आहे दडपशाहीचा. यातून स्थानिक जनतेचे समाधान कधीही होणार नाही याची त्यांना पर्वा नाही. ही दडपशाही किती टोकाची असावी? २००६ मध्ये बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री आणि बलुच आंदोलनाचे नेते नवाब अकबर बुगटी यांना पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत ठार मारले गेले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे दहशतवादी किंवा बंडखोराप्रमाणे मारण्यापर्यंत या दडपशाहीची मजल जाऊ शकते. पण यातून काहीही साधले नाही. आज जवळपास २० वर्षांनीही बलुचिस्तान धगधगत आहे. उलट बलुच हल्ल्यांची तीव्रता आणि वारंवारिता अधिक वाढलेली दिसते. त्यावरही पाकिस्तानी राजकारण्यांची पळवाट ठरलेली. या आंदोलनाला भारत, इराण किंवा अफगाणिस्तानची फूस आहे हा नेहमीचा दावा. सारा दोष एकदा का ‘परकीय शक्तीं’च्या माथी मारला की उत्तरदायित्वातून मोकळे होता येते. ताज्या हल्ल्याबद्दल भारताकडे बोट दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेतच.

#Pudhari TV पाकिस्तानात एक्सप्रेसच अपहरण, पाकचे 30 जवान मारले

बलुचिस्तान मध्ये ट्रेनचे अपहरण पाकिस्तानी सैन्य आता काय करेल हिंसाचार अज...