पाकिस्तानचे
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षे तर पत्नी बुशरा बीबींना ७ वर्षांची
शिक्षा
पाकिस्तानचे
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षांच्या तुरूंगवासाची
शिक्षा झाली आहे.
पाकिस्तानचे
माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना १९० दशलक्ष
पौंडच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले
आहे. यानंतर या इम्राम खान यांना १४ वर्ष तर त्यांच्या पत्नीला ७ वर्षांच्या
तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आळी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे
न्यायाधीश नसीर जावेद राणा यांनी या प्रकरणातील निकाल दिला. यापूर्वी तीन
वेगवेगळ्या कारणांमुळे या निकालाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
इम्रान
खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी येथील तुरूंगात आहेत. दरम्यान आर्थिक
गैरव्यवहाराच्या बाबतीत या खटल्यातील आलेला निकाल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा
निकाल आहे.
इम्रान
खान आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या २०१८ ते २०२२ च्या कार्यकाळात एक जमीन
डेव्हलपरने बेकायदा लाभांच्या बदल्यात काही जमीन भेट दिल्याचा आरोप होता. इम्रान
खान आणि पत्नी बुशरा बीबी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. दरम्यान इम्रान
खान यांचा पक्ष आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या
शिक्षेची सुनावणी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारी देखील या शिक्षेची
सुनावणी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली.
जिओ
न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बुशरा
बीबी ज्या जामीनावर तुरूंगा बाहेर होत्या त्यांना देखील या प्रकरणात दोषी ठरवण्यात
आल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे.
“आम्ही तपशीलवार निर्णयाची वाट पाहत
असताना, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यावरील अल
कादिर ट्रस्ट खटल्याला कोणताही ठोस पाया नाही आणि तो कोसळणार आहे,” खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ
पक्षाच्या विदेशी मीडिया शाखेने एका निवेदनात म्हटले आहे. विधान.
“आम्ही न्यायालयाच्या सविस्तर निर्णयाची
वाट पाहत आहोत, पण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की
इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्याविरोधातील अल कादिर ट्रस्ट प्रकरणाला काहीच
भक्कम आधार नाही, त्यामुळे हे प्रकरण कोसळणार आहे”, असे मत इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-एन्सा
पक्षाच्या विदेशी मीडियी विंगने एका निवेदनात मांडले आहे.
२०२४च्या
सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाची कामगिरी चांगली राहिली होती.
यानंतर न्यायालयाचा हा निकाल इम्रान खान आणि त्यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला
जात आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांना या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरावे लागले
होते. तरीही त्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या, पण
सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत त्यांना मिळवता आले नाही.
ऑगस्ट
२०२३ पासून तुरुंगात बंद असलेल्या इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार आणि सत्तेचा
गैरवापर करण्यापासून ते एप्रिल २०२२ मध्ये त्यांना संसदेत विश्वासदर्शक ठरावानंतर
पदावरून हटवले गेल्यानंतर हिंसाचार भडकावणे असे डझनभर खटले सुरू आहेत.
९
मे २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी लष्कराच्या परिसरात
धुडगूस घालत आंदोलनासाठी समर्थकांना भडकवल्याचा आरोप वगळता बहुतेक प्रकरणांमध्ये
इम्रान खान यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे किंवा त्याची शिक्षा रद्द
करण्यात आली आहे.
इम्रान
खान यांच्या सुटकेसाठी त्यांचे समर्थक गेल्या अनेक दिवसांपासून हिंसक आंदोलने करत
आहेत.
No comments:
Post a Comment