Total Pageviews

Monday 6 November 2023

केवळ मधमाशा घुसखोरी आणि तस्करी थांबवू शकणार नाही बीएसएफ ला सुद्धा सक्षम ...

गुन्ह्यांना आळा घालणार मधमाशांचे पोळे

बीएसएफने सीमेवर हाती घेतला अनोखा प्रयोग

गुन्हे रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-बांगलादेश सीमेवर मधमाशांची पोळी लावण्याचा अनोखा प्रयोग हाती घेतला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४,०९६ किमीची सीमा असून, त्यापैकी २,२१७ किमी भा पश्चिम बंगालला जोडलेला आहे.

गुरांच्या तस्करीसह अन्य गुन्हे रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-बांगलादेश सीमेवर मधमाशांची पोळी लावण्याचा अनोखा प्रयोग हाती घेतला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४,०९६ किमीची सीमा असून, त्यापैकी २,२१७ किमी भा पश्चिम बंगालला जोडलेला आहे.

पहिलाच उपक्रम

- 'बीएसएफ'च्या ३२व्या बटालियनने नादिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नुकताच सुरू केलेला हा अशाप्रकारचा पहिला उपक्रम

- यामागे सीमा सुरक्षा सुनिश्चित करण्यासह स्थानिकांना मधमाशपालन व्यवसायाशी जोडण्याचा उद्देश

- या प्रकल्पासाठी 'बीएसएफ'ला आयुष मंत्रालयाचे सहकार्य

- मधमाशांची पोळी व ती कुंपणावर बसवण्यासाठीच्या अन्य साहित्याचा आयुष मंत्रालयाकडून पुरवठा

२ नोव्हेंबरला प्रारंभ

- केंद्र सरकारच्या 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम'अंतर्गत 'बीएसएफ'चा उपक्रम

- आयुष मंत्रालयाला औषधी वनस्पती उपलब्ध करून देण्याची विनंती
- पोळ्यांच्या पेट्यांभोवती या वनस्पतींची लागवड करून मोठ्या प्रमाणात परागकण मिळवण्याचा प्रयत्न

- मधुमक्षिकापालनात समाविष्ट होण्याचे स्थानिकांना आवाहन

- उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गुन्हेप्रवण क्षेत्र

- नादिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सीमापार गुन्ह्यांची शक्यता

- या भागात गुरे, सोने, चांदी आणि अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न

- अशाप्रकारच्या बेकायदा कृत्यांसाठी तस्करांनी कुंपण तोडल्याच्या घटना

- सीमेवर तस्करीप्रवण भागात ठरावीक अंतरावर मधमाशांच्या पोळ्यांच्या पेट्या

- स्थानिकांच्या मदतीने आजूबाजूला तुळस, एकांगी, सातमुळी, अश्वगंधा, कोरफड, मोहरीची लागवड

No comments:

Post a Comment