Total Pageviews

Wednesday 15 February 2023

भारताची सागरी सुरक्षा – भाग १

https://marathibooks.com/books/bharatachi-sagari-suraksha-part-1/ 

भारताची सागरी सुरक्षा – भाग १

150.00 70.00

भारताचा पश्चिम किनारा स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच तस्करीप्रवण राहिला आहे. किनाऱ्यावरून सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अंमली पदार्थ देशात नियमितपणे तस्करीने येत राहिले. १९९३ मधील मुंबईतील मालिका स्फोटांकरता स्फोटके याच किनाऱ्यावरून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, तस्करी रोखण्यासाठी उपाय योजले गेले. ’कार्यवाही-स्वान’ सुरू करण्यात आली. तिचे उद्दिष्ट, बंदी घातलेल्या आणि अवैध मालाचे, किनारपट्टीवर गुप्तपणे होणारे अवतरण रोखण्याचे होते. ’कार्यवाही स्वान’ अंतर्गत एकही नौका पकडली गेली नाही. २६-११-२००८ ची दुर्घटना, सुरक्षा दलांकरता एक मोठा धक्का होता.

ख्यातनाम संरक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषक ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे याच विषयाला वाहिलेले अभ्यासपूर्ण इ-पुस्तक, भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल, हे सर्व हितसंबंधियांनी, म्हणजेच सुरक्षाकर्मी, धोरणकर्ते, संबधित उद्योगपती, सुरक्षातज्ज्ञ, तंत्रज्ञानाचे पुरवठादार आणि इतरांनीही वाचायलाच पाहिजे.

तीन भागांच्या या इ-पुस्तकाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची गुणवत्ता सुधारणे आणि बळकट करण्याकरता सर्व हितसंबंधियांत विविध माध्यमांतून माहितीपूर्ण चर्चा सुरू व्हावी अशी आशा आहे.

या इ-पुस्तकाच्या प्रत्येक भागाची किंमत रु.१५०/- असून सवलत किंमत रु.७०/- आहे.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन / Brig Hemant Mahajan
किंमत : रु. १५०/-


No comments:

Post a Comment