Total Pageviews

Wednesday 3 July 2019

कट मनी'च्या रूपाने ३० हजार कोटींचा भ्रष्टाचार?-महा एमटीबी 01-Jul-2019 दत्ता पंचवाघ




ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणेज्यांनी 'कट मनी' घेतला आहे, त्यांनी तो परत करावा, असे वक्तव्य केले, ते पाहता त्यांच्या 'आशीर्वादा'नेच हे सर्व चालले होते, असे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये आपलेच शासन असल्याने आपणास कोण विचारतो, अशा गुर्मीत त्या होत्या. पण भाजपने त्या राज्यात जोरदार मुसंडी मारल्याने ममता सरकारची एकेक कृष्णकृत्ये बाहेर येऊ लागली आहेत. 'कट मनी' हे त्यातील एक म्हणावे लागेल!

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत राजकीय हिंसाचार हा आता नित्याचाच झाला आहेलोकसभा निवडणुकीतील दारूण अपयशामुळे बिथरून गेलेले तृणमूल काँग्रेसचे गुंड विरोधकांच्या जीवावर उठले असल्यासारखे चित्र त्या राज्यात दिसून येत आहेराजकीय हिंसाचाराबरोबरच ममता बॅनर्जी यांचे अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याचे धोरण सुरूच आहेया सर्वांबरोबरच तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून झालेल्या एका मोठ्या भ्रष्टाचाराची चर्चा सध्या जोरात चालू आहेगरीबांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांतून 'कट मनी'च्या रूपाने तृणमूलचे नेते आणि कार्यकर्त्यांनी किती पैसा आपल्या खिशात लाटला, याची चर्चा माध्यमांमधून चालू आहे. भारतीय संख्याशास्त्र संस्थेतील एका प्राध्यापकानुसार, 'कट मनी' च्या रूपाने घेतली गेलेली रक्कम ३० हजार कोटी रुपये इतकी असू शकते! आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी कसे मोकळे रान करून दिले होतेहेच यावरून स्पष्टपणे दिसून येतेमागील आठवड्यातील याच स्तंभात या भ्रष्टाचाराचा ओझरता उल्लेख केला होताया गैरप्रकाराची प्रचंड व्याप्ती लक्षात घेऊन त्याची तपशिलात दखल घेणे आवश्यक आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत गरीब जनतेला नाडण्याचे कसे उद्योग करण्यात येत आहेत, यावर या 'कट मनी'ने झगझगीत प्रकाश टाकला आहे. पंचायती आणि नगरपालिकांमध्ये तृणमूल काँग्रेसची 'मक्तेदारीअसल्याने आतापर्यंत या भ्रष्टाचाराबद्दल कोणाचीही तोंड उघडण्याची हिंमत होत नव्हती. पण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालेते लक्षात घेऊन लोकांनी या भ्रष्टाचाराबद्दल उघडपणे बोलण्यास प्रारंभ केला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून 'कट मनी' घेतला जात असल्याची जाहीर कबुली द्यावी लागली. तसेच ज्यांनी अशी रक्कम घेतली आहे त्यांनी ती परत करावी; अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जाण्यास तयार राहाअसा दम पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना द्यावा लागलापण त्यामध्ये किती खरेपणा आहे, ते आगामी काळात दिसून येईलच. गरीबांचा कैवार असल्याचा आव आणणाऱ्या ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष गरीबांच्या पैशावर कसा डल्ला मारत होताहे या निमित्ताने दिसून आले आहे.आता ज्यांच्याकडून हा पैसा घेण्यात आला ती गरीब जनताही उघडपणे, आपले पैसे परत करावेतअशी मागणी करू लागली आहे. आपले हक्काचे पैसे परत करावेत यासाठी नगरसेवक, आमदार यांच्या घरांवर मोर्चे नेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमधून घरे बांधण्यासाठी, लहान उद्योग वा व्यवसाय सुरू करण्यासाठी जो निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, त्यातून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नेते वा कार्यकर्ते आपला 'हिस्सा' काढून घेत असत. आता, आपले पैसे परत करावेत, अशी पोस्टर्सही प. बंगालमधील विविध भागात झळकू लागली आहेत. आपण केलेल्या पापांची दखल घेण्याऐवजी या प्रश्नावरून भारतीय जनता पक्ष लोकांना चिथावत असल्याचे आरोप तृणमूल काँग्रेसकडून केले जात आहेत, याला काय म्हणायचे? नगरविकासमंत्री फिरहाद हकीमतपन दासगुप्ता आदी मंत्र्यांची नावे या भ्रष्टाचाराशी जोडली जाऊ लागली आहेतया मुद्द्यावरून जनता आक्रमक होऊ लागल्याचे लक्षात घेऊन तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे!

राज्य विधानसभेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करून या सर्व प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाहीया संदर्भात सरकारकडे ५ यजार ९१३ तक्रारी आल्या असल्याची माहिती विधानसभेत द्यावी लागली. पण हे प्रकरण दिसते तेवढे किरकोळ नसल्याचे लक्षात येत आहे. जो भ्रष्टाचार झाला तो म्हणजे हिमनगाचे टोक असल्याचे दिसून येत आहे. केवळ दोन महत्त्वाच्या योजनांमधून 'कट मनी'च्या रूपात जी रक्कम घेतली गेलीती ६०० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,तर भारतीय संख्याशास्त्र संस्थेतील एका प्राध्यापकानुसार, 'कट मनी'ची रक्कम ३० हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे लक्षात घेता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, त्याची कल्पना यावी. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे,ज्यांनी 'कट मनी' घेतला आहे, त्यांनी तो परत करावाअसे जे वक्तव्य केले आहे ते पाहता त्यांच्या 'आशीर्वादा'नेच हे सर्व चालले होते, असे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये आपलेच शासन असल्याने आपणास कोण विचारतोअशा गुर्मीत त्या होत्यापण भाजपने त्या राज्यात जोरदार मुसंडी मारल्याने ममता सरकारची एकेक कृष्णकृत्ये बाहेर येऊ लागली आहेत. 'कट मनी' हे त्यातील एक म्हणावे लागेल! या 'कट मनी'मुळे तृणमूल काँग्रेसची अब्रू पुरती वेशीवर टांगली गेली आहे. भ्रष्टाचाराची स्वत: मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिल्याने सारवासारव करण्यापलीकडे त्या पक्षाच्या हातात काही राहिलेले नाहीआमच्या पक्षातील केवळ ०.१ टक्के नेत्यांनी 'कट मनीघेतल्याचे त्या पक्षास स्पष्ट करावे लागले. पण या 'कट मनी'ची व्याप्ती लक्षात घेता तृणमूल काँग्रेसच्या या स्पष्टीकरणावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? 'कट मनी'च्या तक्रारी बीरभूम, मेदिनीपूर, हुगळी, पुरुलिया आदी भागांतून मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. या भागात भाजपने जागा जिंकल्याने किंवा त्या पक्षाचा प्रभाव वाढल्याने तक्रारी घेऊन लोक न घाबरता पुढे येऊ लागले आहेतराज्याच्या अन्य भागांतील लोकही आज ना उद्या या भ्रष्ट व्यवहारास वाचा फोडल्यावाचून राहणार नाहीत!

. बंगालमध्ये 'कट मनी'ची चर्चा सुरू असतानाच अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याची तृणमूल काँग्रेसची वृत्ती कायम असल्याचेच दिसून येत आहेममता सरकारला अचानक अल्पसंख्याक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भोजनकक्ष नसल्याचा साक्षात्कार झाला आणि ज्या शाळांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्य विद्यार्थी आहेत, त्या शाळांसाठी असे कक्ष उभारण्याची योजना सरकारने आखली. या कृतीतून अल्पसंख्य समाजाचे लांगूलचालन केले जात असल्याचेच दिसून येत नाही का? ज्या शाळांमध्ये भोजनकक्ष नाहीतअशा सर्व शाळांमध्ये असे कक्ष उभारण्याचा विचार केला असता तर त्याबद्दल कोणी शंका घेतली नसती. पणकेवळ अल्पसंख्याक समाजाच्या शाळांसाठीच असे झुकते माप काहिंदू आणि मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये सरकार असा भेदभाव का करीत आहे, असा प्रश्न प. बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी उपस्थित केला. त्यानंतर ममता सरकारला सारवासारव करावी लागली. सर्वच सरकारी आणि अनुदानित शाळांमधून असे भोजनकक्ष उभारण्याची योजना असल्याचा खुलासा त्यांना करावा लागलाममता बॅनर्जी यांच्या राज्याचा कारभार कसा चालला आहे, याची यावरून कल्पना यावी. 'कट मनी' ज्यांना द्यावा लागलात्यांच्या करूण कहाण्या माध्यमांमधून झळकू लागल्या आहेतआज ना उद्या तेथील पीडित जनता ममता राजवटीविरुद्ध पेटून उठण्याची चिन्हे दिसून येत आहेत.


No comments:

Post a Comment