वादळापरी आम्ही पुढेच चालतो,
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो
मुगल आणि इंग्रजांच्या विरुद्ध ऐतिहासिक मोहिमेत मराठा
सैन्यपथकांनी उत्कृष्टपणे आपली कामगिरी रणांगणात दाखविली होती. मराठ्यांच्या
सैन्यासह मराठा नौदल शक्ती, पायदळ असलेल्या मराठ्यांच्या
सैन्याने तीन शतकांपासून भारतातील सैन्य दृश्यावर प्रभुत्व ठेवले होते. भारतीय
सैन्याच्या प्रसिद्ध रेजिमेंटपैकी मराठा लाइट इन्फंट्री सर्वात जुनी आहे. 1768 मध्ये दुसरी बटालियन बॉम्बे शिपायाच्या रूपात उभारण्यात आलेली मराठा लाइट
इन्फंट्रीची ही पहिली बटालियन आहे - 103 मराठा लाइट
इन्फंट्री. पहिली बटालियन मराठा लाइट इन्फंट्री, ज्याला नंतर
‘जंगी पलटन’ असे म्हटले गेले. 4 फेब्रुवारी हा मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा स्थापना दिवस आहे. या
ऐतिहासिक दिवशी 1670 मध्ये छत्रपती शिवरायांनी
प्रसिद्ध कोंडाणा किल्ला जिंकला, ज्याला आपण सिंहगड नावाने
ओळखतो. प्रथम अफगाण युद्धात ब्रिटिशांनी भारतातील वेगवान पाऊल घेऊन युद्धात
चालणारे - मराठा रेजिमेंटच्या नावात लाइट इन्फंट्री असे नावही जोडले व घोषित केले.
ही रेजिमेंट रात्रीच्या लढाईतही चांगली कर्तबगारी करण्यात प्रसिद्ध होती.
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटला शौर्य, उत्कंठा आणि बलिदान यांचा दीर्घ इतिहास आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान
रेजिमेंटला 15 युद्ध सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. दुसर्या
महायुद्धात रेजिमेंटमध्ये वाढ झाली. 6 बटालियन 13 बटालियनपर्यंत वाढले. नायक यशवंत घाडगे आणि शिपाई नामदेव जाधव यांना
व्हिक्टोरिया क्रॉस जिंकण्याचा सर्वोच्च सन्मान आहे. सध्या रेजिमेंटमध्ये 21 नियमित बटालियन, चार राष्ट्रीय रायफल बटालियन आणि
दोन प्रादेशिक सेनेची बटालियन आहेत. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटही एकमात्र सेना
आहे, ज्यांच्या दोन बटालियनांना 2 आणि 21 पॅरा स्पेशल फोर्स (एसएफ) मध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. विजयी जंगी
पलटनने 1768 पासून मराठा लाईट इन्फंट्रीचा मान राखून युनिटने
बलिदान आणि शौर्याचा इतिहास लिहिला आहे. युरोप आणि आशियातील दोन्ही विश्वयुद्धात
आणि आपल्या देशात सियाचीनसारख्या जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्रातदेखील देशाचे
संरक्षण केले. नेहमीच्या ब्रॅव्हो कंपनीऐवजी यँकी कंपनी असण्याची पलटनची परंपरा
आहे. 1944 मध्ये ब्रॅव्हो कंपनीला सातत्याने वाईट नशीब
म्हणून तत्कालीन कमांडिंग ऑफिसरने हे नाव यँकी कंपनीत बदलले. एक वर्षानंतर शिपाई
नामदेव जाधव यांनी व्हिक्टोरिया क्रॉस कमावला. दुसर्या विश्वयुद्धाच्या वेळी
इटलीत पहिली बटालियन मराठा लाइट इन्फंट्री (जंगी पलटन)ने कमालीच्या शौर्याने लढा
दिला. 1971 च्या बांगलादेशाच्या युद्धात हे युनिट लेफ्टनंट
जनरल एस. एस. ब्रार, वीरचक्र विजेते यांच्या नेतृत्वाखाली
ढाकामध्ये प्रवेश करणार्या सैन्याच्या पहिल्या बॅचचा भाग होता.
29 जानेवारी ते 31 जानेवारी या काळात औंध मिलिटरी
स्टेशन, पुणे वरील शिवनेरी ब्रिगेड येथे पहिली बटालियन मराठा
लाइट इन्फंट्री 250 व्या वर्षाचा उत्सव साजरा करीत आहे. 3 हजारहून अधिक सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांचे कुटुंब या कार्यक्रमात
सहभागी होतील. मराठा लाइट इन्फंट्रीने 6 लेफ्टनंट जनरल दिले
आहेत. रेजिमेंटची 10 मशिनीकृत इन्फंट्री रेजिमेंटस्, दोन तोफखाना रेजिमेंट आणि आर्मीमधील वायुरक्षा रेजिमेंटशी संलग्न आहे. या
व्यतिरिक्त रेजिमेंटने भारतीय नौदल जहाज (आयएनएस) मुंबई, 20
व्या स्क्वाड्रन वायुसेना (सुखोई) आणि दमण आणि दीव येथे भारतीय कोस्ट गार्ड एअर
स्टेशनसह आंतरसेवा जोडणी केली आहे. या रेजिमेंटची युद्धातील आरोळी आहे, ‘बोल, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
No comments:
Post a Comment