Total Pageviews

Monday 20 November 2017

एल्फिस्टन येथील पूल सैन्यदल बांधणार हि बातमी जेव्हा कळली तेव्हा एक जुनी घटना आठवली

एल्फिस्टन येथील पूल सैन्यदल बांधणार हि बातमी जेव्हा कळली तेव्हा एक जुनी घटना आठवली. फेसबुक , व्हाट्सअँप काय इंटरनेट चा पण मागमूस नव्हता. पण घटना अगदी माझ्या माहीतीतील, पाली(सुधागड) येथे राहणाऱ्या शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या बाबतीत घडलेली.
स्व.दादासाहेब लिमये म्हणजे शिक्षणाला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व, आश्रम शाळा, सुधागड एजुकेशन चे संस्थापक आणि त्या बरोबर खेळाची प्रचंड आवड. 
पाली-सुधागड येथे असणाऱ्या वडेर हायस्कुल ला मैदान नव्हतं, शाळेच्या मागे उंच टेकडी ,मैदान नाही हि गोष्ट दादांच्या मनाला सलत होती. त्याच सुमारास त्यांना समजले कि तत्कालीन सैन्यदलाचे प्रमुख, जनरल अरुणकुमार वैद्य हे अलिबागशी संबधित आहेत. दादांनी वैद्यासाहेबांना १५ पैशाचे पोस्टकार्ड टाकलं आणि ह्या बाबत मदत करायची विनंती केली. "लिमये" असल्याने हा पण विचार केला होता गेले तर काय १५च पैसे फुकट जातील. काही दिवस गेले आणि अचानक पाली येथे काही सैनिकी अधिकारी हजर झाले. लोकांकडे दादासाहेब लिमयांची चौकशी केली आणि लोकांनी त्यांना दादांच्या घरी आणून सोडलं. अधिकाऱ्यांनी पत्राची चौकशी केली आणि पत्र दादानीच लिहिल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनी दादासाहेबांना नक्की कुठे मैदान करून हवं आणि किती मोठं मैदान हवं हे दाखवायला सांगितलं. पाहणी करून हि मंडळी निघून गेली परत काही दिवस काहीच हालचाल नव्हती आणि अचानक एक दिवस मोठ्या बुलडोझर आणि अन्य सामग्री सह सैनिकी ताफा पालीत दाखल झाला. अनेक दिवसाच्या मेहनती नंतर वडेर हायस्कुल ला एक मोठं खेळच मैदान मिळालं. मैदान इतकं मोठं आहे कि आरामात हेलिकॉप्टर उतरू शकेल. दादासाहेबांनी सैनिकांना जेवण खाणाची व्यवस्था करत असल्याचे सांगितल्यावर त्यालाही अधिकाऱ्यांनी नम्र पणाने नकार दिला आणि सर्व शिधा सामुग्री त्यांच्या कडे असल्याचे सांगितले. 
हि सगळी घटना दादानी स्वतः मला त्याच मैदानात उभं राहून सांगितली होती. एखाद्या ध्येयाने प्रेरित असणारी मंडळी काय करू शकतात ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच बरोबर अरुणकुमार वैद्य ह्याची पण कमाल वाटते कि केवळ १५ पैशाच्या पत्रावर केलेल्या विनंतीही देखील त्यांनी दाखल घेतली. 
माझ्या मनावर कायमचा कोरून ठेवलेला हा एक प्रसंग.

*( टेंडर नाही, फायली सरकवा सरकवी नाही, सब स्टॅंडर्ड मटेरियल नाही, कमिशन नाही, हप्ता नाही याच गोष्टींचं आर्मीने ब्रिज बांधायच्या कामाला विरोध करणाऱ्यांना दुःख आहे!! त्यांच्या नवं कमाईच्या अपेक्षांचा भंग झालाय. ब्रिज बांधून कमावू या अपेक्षेने लाळ गाळणार्याना तीच लाळ गिळून कोरडा पडलेला घसा ओला करायची वेळ आली. विरोध केला नाही तरच नवल!  ).*                                 (पाली ग्रामस्थ संपादित )

No comments:

Post a Comment