Total Pageviews

Sunday 20 August 2017

‘लव्ह जिहाद’ हा विषय वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत येतो. केरळमधील अशाच एका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या विषयाची वस्तुस्थिती नेमकेपणाने सांगणारा हा लेख.---सुनील लोंढे-लव्ह जिहाद’ थांबण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे करणे आवश्यक आहे.


• हिंदुस्थानात अधूनमधून ‘लव्ह जिहाद’वरून वादंग होत असतो. नेहमीप्रमाणे देशातील तथाकथित पुरोगामी ‘लव्ह जिहाद’ची बाजू घेत असतात आणि ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत असतात. ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणाऱ्यांनी किंवा तथाकथित संस्कृतीरक्षकांनी कायदा हातात घेणे हेदेखील चूकच आहे. मात्र त्याचवेळी ‘लव्ह जिहाद’ हा प्रकारच नाही असे मानणे धोक्याचे ठरेल. किंबहुना केरळमधील एका घटनेने या धोक्याची घंटा ठळकपणे वाजवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केरळमधील शफिन जहा विवाहप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. शफिन जहा यांनी गेल्या वर्षी एका हिंदू महिलेसोबत विवाह केला. नंतर तिने मुस्लिम धर्म स्वीकारला. केरळ उच्च न्यायालयाने हा विवाहच मधल्या काळात प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यावर रद्द केला. त्याविरोधात शफिन जहा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना म्हणजे देशात ‘लव्ह जिहाद’ असल्याचा पुरावाच आहे. तरीही बोगस पुरोगामी किंवा हिंदुत्वविरोधी मंडळी विरोध करीतच आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि ‘कन्फ्लिक्टोरियम’च्या संस्थापिका अवनी सेठी यांनीदेखील ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदू संघटनांकडून केल्या जाणाऱ्या जनजागृतीला, प्रचाराला जोरदार विरोध दर्शवला. अवनी सेठी यांनी ‘लव्ह जिहाद’ची भयानक वस्तुस्थिती समजून घेतली असती तर उथळ आणि भपकेबाज कार्यक्रम करण्यात वेळ दवडला नसता. बिगर इस्लामी भूमी इस्लामी करण्यासाठी जिहाद्यांनी रचलेल्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जात आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’चे लंडनस्थित नेते डॉ. के. बी. फारूख यांनी ‘लव्ह जिहाद’ची आखणी केली असून तलवार अन् हिंसा यांच्याविना करण्याचा हा जिहाद आहे. ‘लव्ह जिहाद’चा हेतू हिंदू वंशवृद्धीचा स्रोत नष्ट करणे, इस्लामी वंशवृद्धी करणे, हिंदू महिलांची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी वापर करून भारताचे इस्लामीकरण करणे हा आहे हे लक्षात घ्यायला हवे. हिंदू संस्कृतीमुळे हिंदुस्थानचे इस्लामीकरण होऊ न शकल्याने आता भ्रमणभाष, इंटरनेट या आधुनिक साधनांचा वापर करण्यात येत आहे. पूर्वी शत्रूराष्ट्राची गुपिते मिळवण्यासाठी ‘विषकन्यांचा’ वापर केला जात असे. आता हिंदू मुलींनाच ‘विषकन्या’ बनवून त्यांच्या पोटी जन्माला येणारी मुलेच हिंदूंच्या मुळावर उठू शकतात. त्यामुळे याकडे ‘धार्मिक संकट’ म्हणून पाहायला हवे. ‘लव्ह जिहाद’चा उपयोग स्वधर्मीयांची लोकसंख्या वाढवणे आणि त्याचबरोबर आतंकवादी कृत्याची आखणी करण्यासाठीही केला जातो. मुलींचे पालक कौटुंबिक प्रतिष्ठेपोटी अशा घटनांची पोलिसांकडे नोंद करण्यास तयार नसतात. ‘लव्ह जिहाद’चा प्रारंभ अकबराच्या काळापासून झालेला आहे. हिंदू पालक नोकरी-व्यवसाय यातच व्यस्त असल्यामुळे मुलींना धर्मसंस्कार, धर्मशिक्षण याविषयी त्यांच्यात अभाव जाणवतो. घरातून मिळालेले स्वातंत्र्य, पाश्चात्य संस्कृतींचे अंधानुकरण, तथाकथित सर्वधर्मसमभावाचे उपदेश, त्यामुळे मुली ‘निधर्मी’ बनतात. त्याचाच गैरफायदा ‘लव्ह जिहादी’ मुलांकडून घेतला जातो. आजकाल चित्रपट, जाहिराती, प्रसारमाध्यमे यामुळेही तरुण पिढीवर नको ते परिणाम होत आहेत. पैसा हाच श्रेष्ठ ही भावना तरुणतरुणींमध्ये प्रचंड वाढत चालली आहे. त्याचाही गैरफायदा ‘लव्ह जिहाद’साठी घेतला जातो. हिंदू मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी पुढील मार्ग अवलंबले जातात. मोबाईल दुकान थाटून तेथे येणाऱ्या हिंदू मुलींचे क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला जातो. त्याद्वारे काही वेळेला आपण हिंदू असल्याचे सांगून तर काही वेळेला निधर्मी विचारसरणीचे असल्याचे भासवून गोड बोलून परिचय वाढवला जातो. काहीजण विवाह जुळवणाऱ्या संस्थांचा उपयोग करतात. त्यानंतर भेटवस्तू देणे, उच्च राहणीमान आणि आकर्षक पेहराव करून मोटरसायकलवरून फिरायला जाणे अशा विविध प्रकारे तिला चंगळवादी जीवनाची चटक लावतात. कधी कधी ब्लॅकमेल करून विवाह करणे भाग पाडले जाते. घरातील दागिने, पैसा काढून घेतले जातात. त्याचबरोबर इतर तरुणींनाही जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. अशाप्रकारे ही ‘जिहादी रोमिओ’गिरी सुरू असते. ‘लव्ह जिहाद’कामी काही संघटना जिहादींना सहाय्य करतात. तसेच अरब देशांतूनही यासाठी आर्थिक रसद पुरवली जाते. दमाम (सौदी अरेबिया) येथे असलेली ‘इंडियन फॅटर्निटी फोरम’ ही संस्था याच कारणासाठी पैसा गोळा करते आणि तो जिहादी सिम कार्ड, गाडी, पॉकेटमनी यांवर खर्च करते. त्याशिवाय उच्च जातीतील मुलींना जाळ्यात ओढल्यास काही लाखो रुपये पारितोषिक म्हणून दिले जातात. ‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांतरित झालेल्या आणि फसलेल्या दुर्दैवी तरुणींसमोर अनेकदा मोजकेच मार्ग उरतात. आपल्या भगिनींना या दृष्टचक्रापासून वाचवण्यासाठी हिंदू बांधवांनी रक्षाबंधन व भाऊबीजेला भेटवस्तू देण्याबरोबर ‘लव्ह जिहाद’ची माहिती करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संरक्षक कृतीगट स्थापन करणे, हेल्पलाइन चालवणे, धर्मांतरित झालेल्या हिंदू मुलींना स्वधर्मात आणणे, प्रवचनकार, धर्मगुरू यांनी धर्मशिक्षण देऊन हिंदू धर्माची महती पटवून देणे. मुलींचे समुपदेशन करून ‘लव्ह जिहाद’चे दुष्परिणाम दाखवून देणे, पालक मेळावे घेणे, विवाह संस्थाचालकांचे प्रबोधन करणे, मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे, त्यांची दैनंदिन वागणूक, मित्र-मैत्रिणी आणि खासकरून मोबाईल यांवर लक्ष ठेवणे अशा अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागेल. इस्रायलमध्ये ज्यू आणि मुसलमान यांच्या विवाहाला कायद्याने बंदी आहे. हिंदुस्थानातही ‘लव्ह जिहाद’ थांबण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment