Total Pageviews

Saturday 13 October 2012

मारेकर्‍यांचे उदात्तीकरण- तरुण भारतजन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारे आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे.
संकुचित अस्मिता जेव्हा राष्ट्रीय अस्मितेपेक्षा मोठ्या बनतात, तेव्हा तिथे देशद्रोहाचा नंगा नाच सुरू होत असतो. पंथनिष्ठा, भाषाप्रेम, जात्याभिमान या गोष्टी कधीही देशप्रेमापेक्षा मोठ्या होता कामा नयेत. मात्र, कधी कधी या संकुचित अस्मितांचे भस्मासुर नकळत उभे रहात असतात. खलिस्तानचे भूत हे या देशातील राजकीय स्वार्थापोटी उभ्या केलेल्या भस्मासुरांमुळे उभे राहिलेले होते. हिंदुस्थान हा देश विविध भाषा, प्रांत, जाती, प्रार्थनापद्धती यांच्या विविधतेतून एकात्म जीवनदर्शन देणारा देश आहे. एकमेकांत बेमालूम मिसळणार्‍या रंगातून जसे इंद्रधनुष्य उभे राहते, त्याप्रमाणे भारतीय जीवनदर्शन जगाला आकर्षित करणारे आहे. विविधतेच्या तळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णन केल्याप्रमाणे सखोल सांस्कृतिक एकात्मतेचा प्रवाह वाहत असतो. कधी तो गुरुवाणीतील नामदेवांच्या अभंगातून दिसतो, तर कधी आपण हिंदूच असल्याचे सत्य न्यायालयात उद्घोषित करणार्‍या जैन आचार्यांच्या आचार्यवाणीतून प्रकट होत असतो. या अंगभूत समरसतेला आव्हान देत स्वार्थासाठी संकुचित अस्मितांचे इमले काही लोक जेव्हा उभे करतात, तेव्हा ते क्षणभर आकाशाला स्पर्श करत असल्याचा भास तयार होतो. मात्र, हे इमले नंतर या समाजात अंगभूत समरसतेच्या प्रभावाने पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतात. खलिस्तानच्या देशदोही दहशतवादाचा अंत अशाच प्रकारे पाहता पाहता झाला. भारतातील राजकीय स्वार्थाने पुष्ट केलेल्या भस्मासुराचे रूप म्हणजे जर्नेलसिंग भिंद्रानवाले होते. या भिंद्रानवालेच्या संकुचित अस्मितेच्या दुष्ट देशद्रोहाला सीमापार पाकिस्तानी सत्तेतून जेव्हा वारा घातला गेला, तेव्हा देशद्रोहाचा अंगार पंजाबमध्ये फुलला होता. कितीतरी निरपराध लोकांचे बळी या दहशतवादाने Top of Form 1
&&&&&&& घेतले. मात्र, खलिस्तानच्या या दहशतवादी कारवायांना पंजाबमधील सर्वसामान्य माणसाने कधीच पाठिंबा दिला नाही. शीख पंथ ही जरी एक प्रार्थनापद्धती असली, तरी त्याच्या मुळाशी हिंदू धर्मातील जीवनमूल्ये आणि संस्कारांचा भक्कम पाया आहे. यवनी आक्रमणांच्या काळात क्षात्रवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी हा पंथ सुरू झाला. या विचाराला खालसाचे रूप देताना गुरू गोविंदसिंग यांनीसवा लाख से एक लडाऊ, तैं गुरू गोविंद कहलाऊँअसे म्हणत एकेक सैनिक म्हणजे एक फौज अशी ताकद उभी केली. फत्तेसिंह आणि जोरावरसिंह यांनी धर्मासाठी कसे बलिदान केले जाते, त्याचे सर्वोच्च उदाहरण जगापुढे आपल्या पवित्र बलिदानाने प्रस्तुत केले. हा बलिदानाचा, धर्माभिमानाचा तेजस्वी इतिहास विसरून खलिस्तानवादी फुटीर आणि देशद्रोही आंदोलनाचा वणवा पेटविला गेला. कधीही पंजाबमधील शीख बांधवांनी या फुटीर आंदोलनाला मनापासून पाठिंबा दिला नाही. धार्मिक, आध्यात्मिक पवित्र भावनेचा दुरुपयोग करत आणि आध्यात्मिक आणि पवित्र जागेचा दुरुपयोग करत महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाप्रमाणे अमृतसरच्या सुवर्णमंदिराचा दुरुपयोग भिंद्रानवाले आणि दहशतवादी करू लागले होते. देशातील बहुसंख्य लोकांच्या, पंजाबमधील लोकांच्या भावनेच्या विरोधात हिंसेचे आणि दहशतवादाचे थैमान पंजाबमध्ये आणि भारतात या लोकांनी तयार केले होते. मात्र, पंंजाबमधील सामान्य माणूस या दहशतवादाच्या मानवताविरोधी काळ्या कृत्याच्या बाजूने कधीच नव्हता. याचा अंदाज घेऊन इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची आखणी केली. ले. जनरल के. एस. ब्रार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सैनिकांनी आपले बलिदान देत सुवर्णमंदिराचे पावित्र्य भंग होऊ देता या पवित्र धार्मिक स्थानाच्या आडून मानवतेचा खून पाडणार्‍या, आध्यात्मिक मूल्यांना हरताळ फासणार्‍या, गुरुबाणीला भ्रष्ट करणार्‍या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवादी भस्मासुराचा अंत झाल्यावर पंजाबधूनच काय, संपूर्ण देशातून कोठूनही नापसंतीची एक रेषाही उमटली नव्हती. सहजधारी आणि केशधारी अर्थात शीख आणि शिखेतर हिंंदू यांच्यात भावाभावाचे नाते आहे, दोघांच्याही धमण्यांमध्ये वाहणारे रक्त एकच आहे. दोघांच्या हृदयाच्या स्पंदनांचा ताल एकच आहे. दोघांचेही मायभूमीवर प्राणापलीकडे प्रेम आहे, हे या घटनाक्रमाने सिद्धच केले होते. मात्र, या देशातील बांधवांमध्ये द्वेषाचा आणि संघर्षाचा भडका उडवूनच आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजणे शक्य आहे, असे ज्यांना वाटत होते, अशा लोकांनी मूठभर लोकांच्या संकुचित अस्मितांना फुंकर घालून त्यांच्या हातून इंदिराजींची दुर्दैवी हत्या, अरुणकुमार वैद्य यांची हत्या अशी भ्याड कृत्ये करायला लावली. देशातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेने आपल्या मतदानातून आपल्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारा कायदा, सरकार आणि व्यवस्था निर्माण केलेल्या असतात त्यांना काही लोक जेव्हा आपल्या स्वार्थाकरिता परकीय शक्तीचे साहाय्य घेऊन आव्हान देतात, तेव्हा त्यांना दहशतवादी असे म्हटले जात असते. अशा दहशतवादाला संपविण्यातच खरी देशभक्ती असते. अरुणकुमार वैद्य आणि लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्यासारख्या बहादूर लष्करी अधिकार्‍यांनी हा दहशतवाद संपविण्यासाठी आपल्या सैनिकांसोबत तळहातावर शिर घेऊन काम केले होते. अशा देशभक्त लष्करी अधिकार्‍यांवर हल्ला करणारे कधीही देशाचे, मानवतेचे, अहिंसेचे, शांततेचे शत्रूच असतात. या असल्या राक्षसांचे कोणत्याही प्रकारे उदात्तीकरण होता कामा नये. सर्वसामान्यांच्या हिताकरिता कितीही मोठ्या सत्तेच्या विरोधात जे टक्कर देतात, ते क्रांतिकारक असतात. त्यांची दहशतवाद्याशी तुलनाही होऊ शकत नाही.
सुवर्णमंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे ले. जन. ब्रार काय किंवा जनरल अरुणकुमार वैद्य काय, त्यांचा या ऑपरेशनमध्ये वैयक्तिक स्वार्थ काहीही नव्हता. मातृभूमीच्या विरोधात, या देशातील समाजपुरुषांचा द्रोह करत, धार्मिक भावनांचा दुरुपयोग करत ज्या शक्ती कार्यरत होत्या, ज्यांचा देशाला आणि समाजाला धोका होता त्यांचा खात्मा करण्यासाठी जिवाची बाजी लावून या भूमिपुत्रांनी अतुलनीय धैर्य, संयम आणि पराक्रमाचे दर्शन देत हे ऑपरेशन यशस्वी केले होते. जन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारे आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे. जर्नेलसिंग भिंद्रानवाले आणि त्यांच्या अनुयायांनी जसे सुवर्णमंंदिराचा आणि आध्यात्मिक भावनेचा दहशतवादासाठी दुरुपयोग केला, तसाच दुरुपयोग आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची मंडळी त्यांना मिळालेल्या विशेषाधिकाराचा दुरुपयोग करत या देशद्रोह्यांचे आणि मानवतेच्या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण करण्याच्या मागे लागले आहेत. आपल्या देशासाठी लढणार्‍या अरुणकुमार वैद्य यांच्यासारख्या सेनापतींच्या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण म्हणजे थेट देशद्रोह आहे. असल्या देशद्रोहाचा तीव्र विरोध केला पाहिजे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सगळा देश इंदिरा गांधींचे चिरंजीव राजीव गांधींच्या मागे उभा राहिला होता. आता इंदिरा गांधींच्या किंवा जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकर्‍यांचे कोणत्याही प्रकारे उदात्तीकरण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे
 

No comments:

Post a Comment