Total Pageviews

Wednesday 1 August 2012

सैन्यदलांत महिलांसाठी संधी आनंद मापुस्कर

सैन्यदल म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हे. त्यामध्ये महिलांसाठीही अनेक संधी उपलब्ध आहेत. इंजिनीयरिंग , एरोनॉटिकल इंजिनीयरिंग , एअर ट्रॅफिक कंट्रोलर , फ्लाईंग विभाग , शिक्षण , कायदा , ग्राउंड ड्युटी विभाग अशा विविध विभागात त्यांना काम करता येतं.

सैन्यदलांमध्ये महिलांना पदवीनंतरच प्रवेश करता येतो. महिलांचा प्रवेश हा बहुधा शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधून होतो. शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यदलांमध्ये जास्तीत जास्त १४ वर्ष काम करता येतं. यामध्ये सुरूवातीची १० वर्ष व त्यानंतर ४ वर्ष वाढवून दिली जातात.

निवडप्रक्रिया

पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाते. तुम्हाला पदव्युत्तर परीक्षेत जर जास्त गुण असतील तर ते निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. निवड झालेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी बोलावलं जातं. एसएसबीने(सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) मुलाखतीची विभागणी दोन टप्प्यात केलीय.

पहिल्या टप्प्यातील परीक्षेत इंटेलिजन्स टेस्ट , पिक्चर पर्सेप्शन व डिस्कशन टेस्ट आदींचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवाराना दुसरा टप्पाही पार पाडावा लागतो. त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट , ग्रुप टेस्ट व मुलाखत असते.

तिन्ही टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.

भूदल

सर्वसाधारणपणे भूदलात महिला उमेदवारांना कायमस्वरूपी कमिशनमध्ये वैद्यकीय अधिकारी , नर्स अशा सहाय्यभूत सेवांमध्ये घेण्यात येत. मात्र याव्यतिरिक्त महिला विशेष भरती योजनेद्वारे ' शॉर्ट सर्व्हिस कमिशन ' मध्ये विविध अधिकारीपदांवर महिला अधिकाऱ्यांची निवड केली जाते. यात टेक्निकल , नॉन टेक्निकल व स्पेशालिस्ट अशा शाखा असतात. भूदलामध्ये महिला अधिकारी कॅप्टन , मेजर , लेफ्टनंट कर्नल या पदांवर काम करतात.
अधिक माहितीसाठी वेबसाईट - www.joinindianarmy.nic.in

भूदलातील महिला अधिकारी भरतीचे विविध मार्ग -

भरती योजना वय पात्रता

एन.सी.सी.(विशेष) महिला भरती १९ ते २५ वर्षे पदवीधर तसंच एन.सी.सी. ' सी ' प्रमाणपत्र परीक्षा ' बी ' ग्रेडमधून उत्तीर्ण होणं आवश्यक

शॉर्ट सर्व्हिस कमिशन -

टेक्निकल महिला २० ते २७ वर्षे इंजिनीयरिंग पदवी

शॉर्ट सर्व्हिस कमिशन -

नॉन टेक्निकल महिला १९ ते २५ वर्षे पदवी

किमान ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण २१ ते २७ वर्षे एल.एल.बी./एल.एल.एम. पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण

भारतीय नौदल

भारतीय नौदलात महिलांना अधिकारी पदांसाठी एक्झिक्युटिव्ह , शिक्षण व इंजिनीयरिंग शाखांमध्ये प्रवेश घेता येतो. अधिक माहितीसाठी वेबसाईट -www.nausena-bharti.nic.in

नौदल भरती योजनांसंबंधी माहिती खालीलप्रमाणे

एक्झिक्युटिव्ह शाखा

भरती योजना वयोमर्यादा पात्रता

शॉर्ट सर्व्हिस कमिशन -एअर ट्रॅफिक कंट्रोलर साडेएकोणीस ते २५

बीएस्सी(भौतिकशास्त्र/गणित/इलेक्ट्रॉनिक्स) किमान ६० % गुण आवश्यक किंवा एमएस्सी(भौतिकशास्त्र/गणित/इलेक्ट्रॉनिक्स) किमान ५५ % गुण

शॉर्ट सर्व्हिस कमिशन - ऑब्झर्व्हर १९ ते २३ कोणत्याही विषयातील पदवीधर. किमान ५५ % गुण तसंच १२वीला भौतिकशास्त्र व गणित विषय

असणं आवश्यक.

शॉर्ट सर्व्हिस कमिशन - लॉ २२ ते २७ कायद्यातील पदवीधर किमान ५५ % गुण आवश्यक

शॉर्ट सर्व्हिस कमिशन - लॉजिस्टिक साडेएकोणीस ते २५ खालील विषयातील पदवीधर वा पात्रता धारक (प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणं आवश्यक) बीए

(अर्थशास्त्र) , बीकॉम , बीएस्सी(आयटी) , सीए , कॉस्ट अकाउंटंस , केटरिंग टेक्नोलॉजी , बीसीए/एमसीए , बीई/बीटेक

(मेकॅनिकल/मरिन/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/आय.टी) , आर्किटेक्चर किंवा पीजी डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट

नौदल शिक्षण शाखा

वयोमर्यादा - २१ ते २५ वर्षे

पुढील विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

भौतिकशास्त्र (बीएस्सीला भौतिकशास्त्र विषय आवश्यक)

गणित (बीएस्सीला भौतिकशास्त्र विषय आवश्यक) ,

रसायनशास्त्र (बीएस्सीला भौतिक व गणित विषय आवश्यक)

कम्प्युर सायन्स/अॅप्लिकेशन

इंग्रजी , अर्थशास्त्र , इतिहास , राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी.

मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , संगणकशास्त्रातील बीई पदवी.

नौदल इंजिनीयरिंग शाखा

भरती योजना वयोमर्यादा पात्रता

शॉर्ट सर्व्हिस कमिशन

( नेव्हल आर्किटेक्चर) २१ ते २५ वर्षे बी.ई./बी.टेक ( नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल / सिव्हिल / एरोनॉटिकल/मेटॅलर्जी /एरोस्पेस इंजिनीयरिंग) किमान ६० %

गुण आवश्यक.

विद्यापीठ भरती योजना

( नेव्हल आर्किटेक्चर) १९ ते २४ वर्षे बी.ई./बी.टेक ( नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल / सिव्हिल / एरोनॉटिकल / मेटॅलर्जी /एरोस्पेस इंजिनीयरिंग) किमान ६०

% गुण आवश्यक.


फ्लाईंग ब्रँच

भारतीय हवाईदल

इंजिनीअरिंग पदवीप्राप्त महिला शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे हवाईदलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये प्रवेश करू शकतात.

वयोमर्यादा : १९ ते २३ वर्ष तसंच अविवाहित असणं आवश्यक.

शिक्षणः कोणत्याही विषयातील पदवीधर किमान ६० % गुण तसेच १२वीला भौतिकशास्त्र व गणित विषय असणे आवश्यक. किंवा इंजिनीयरिंगचा चार

वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक (किमान गुण ६०%) .

एरोनॉटिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स)

परमनंट तसंच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये तंत्र शाखेत एरोनॉटिकल इंजिनीयर्सना इलेक्ट्रॉनिक्स विभागात घेतलं जातं. विमानांची दुरुस्ती व देखभाल करणं तसंच एअरफोर्स स्टेशनवरील संदेशवहन व सिग्नल्सच्या कामाची जबाबदारी यांच्यावर असते. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्सची पदवी परीक्षा वा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं.

एरोनॉटिकल इंजिनीअरिंग (मेकॅनिकल) :

या अभियंत्यांना विमानाची देखभाल , दुरुस्ती तसेच भव्य वाहनांची दुरुस्ती हे काम असतं. फायर आर्म्स व अॅम्युनेशनच्या सुरक्षेची व देखभालीची
जबाबदारी यांची असते.

यासाठी एरॉनॉटिक्स , मेकॅनिकल , प्रॉडक्शन या विषयांतील इंजिनियरिंग पदवी असणं आवश्यक आहे.

याबरोबरच ग्राऊंड ड्युटी विभागातील प्रशासकीय लेखा विभाग , लॉजिस्टिक्स आदी शाखांमध्येदेखील अन्य पदवीधरांना प्रवेश दिला जातो.

ग्राउण्ड ड्युटी विभाग

ग्राऊण्ड ड्युटी विभागात पाच प्रकार आहेत.

किमान २० वर्षं तर कमाल वयोमर्यादा शिक्षणानुसार खालीलप्रमाणे ठरते.

पदवीधर-२३ वर्षं , पदव्युत्तर पदवीधर-२५ वर्षं , एमएड/पीएचडी/आयसीडब्ल्यूए-२७ वर्षं

अॅडमिनिस्ट्रेशन:

या विभागात मनुष्य व साधनसामुग्री या दोन्हीच्या व्यवस्थापनाचे काम पहावं लागतं. या विभागातील काही अधिकाऱ्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोलर वा फायटर

कंट्रोलर म्हणूनही काम करावं लागतं.

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षेत ६० टक्के गुण आवश्यक.

लॉजेस्टिक विभाग -

हवाईदलाचे मटेरियल मॅनेजमेंटचे काम या विभागाद्वारे केले जाते. हवाईदलांमध्ये लागणाऱ्या विविध उपकरणांची खरेदी प्रक्रिया तसंच आपल्याकडील
सामानाची यादी करुन त्याची निगराणी करणं हे काम करावं लागतं.

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षेत ६० टक्के गुण आवश्यक.

अकाऊंटस विभाग :

यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटचं काम करावं लागतं. इंटर्नल ऑडिटरचं कामही करावं लागतं.

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम (६० टक्के गुण आवश्यक.) , एमकॉम/सीए/कॉस्ट अकाऊंट (५० टक्के गुण आवश्यक)

हवामानशास्त्र : हवामान विभागात काम करत असताना उपग्रहाद्वारे पाठवलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करुन तसंच हवामान निरीक्षणाच्या विविध

उपकरणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीवरुन हवामानाविषयक सल्ला ऑपरेटर्संना द्यायचा असतो.

शैक्षणिक पात्रता : विज्ञानशाखेतील पदव्युत्तर पदवी(मास्टर्स)मध्ये ५० टक्के गुण आवश्यक व पदवीस्तरावर गणित व भौतिकशास्त्र (कोणत्याही वर्षी) ५५

टक्के गुण आवश्यक.

इ) शिक्षण विभाग :

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (मास्टर्स)मध्ये ५० टक्के गुण आवश्यक. वेबसाईट - www.careerairforce.nic.in

महत्वाचं - भूदल , नौदल , हवाईदलातील विविध भरतीसंबंधीच्या जाहिराती एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये पाहाव्या. तिन्ही सैन्यदलांच्या वेबसाईटवरही यांची माहिती

आणि कोणत्या काळात जाहिरात प्रकाशित केली जाते , याचीही माहिती या साइटवर असते

No comments:

Post a Comment