नक्षलींच्या हल्ल्यात ११ पोलीस शहीद 4 May 2011, 0442 hrs ISTझारखंडच्या लोहारडागा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ११ पोलीस शहीद आले असून अन्य वीस जण जखमी झाले आहेत. गावात गस्त घालून परतणाऱ्या या पथकावर मंगळवारी हा हल्ला झाला.
उरूमुरू गावात गस्त घालून परतणाऱ्यांना पोलिसांना धारधरिया गावाजवळ नक्षली असल्याची खबर लागली होती. तिथे पोहोचताच जमिनीखाली पेरून ठेवलेल्या सुरुंगांचा नक्षलींनी स्फोट घडवून आणला. जखमी पोलिसांना लोहारडागा येथील आरोग्य केंदात दाखल करण्यात आले. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकही नक्षली पोलिसांच्या हाती लागला नाही, अशी माहिती लोहारडगा पोलीस प्रमुख विक्रांत मिंझ यांनी दिली

No comments:
Post a Comment