Total Pageviews

Thursday, 1 February 2018

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाअर्थसंकल्प समाधानकारकच म्हणावा लागेल-

 महा एमटीबी  01-Feb-2018- शशांक गुळगुळे

अर्थसंकल्प शेती, अन्नप्रक्रिया व गोरगरिबांवर योजनांची खैरात करणारा आहे. अर्थसंकल्पावरील भाषणाच्या सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी त्यांच्या सरकारचा भ्रष्टाचार मिटविण्याचा व डिजिटलायझेशनचा प्रयत्न राहणार असून, याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, असेही सांगितले. तसेच त्यांनी सदर अर्थसंकल्प हा शेतकरी, गरीब जनता, शेती उद्योग, ग्रामीण भाग, मूलभूत गरजा, ज्येष्ठ नागरिक व शिक्षण यावर भर देणारा असेल, असे सांगितले व त्याचे प्रत्यंतर अर्थसंकल्पात दिसले. म्हणूनच हा अर्थसंकल्प लोकसंकल्पम्हणावा लागेल. नेमक्या अर्थसंकल्पातील सर्वच क्षेत्रातील महत्त्वाच्या तरतुदींचा सविस्तर आढावा घेणारा हा विश्लेषणात्मक लेख...


शेती व ग्रामीण भाग

२०२२ हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्यांचे ७५ वे वर्ष असणार आहे. त्यामुळे या वर्षापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा यापूर्वीच सरकारने जाहीर केली होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी या अर्थसंकल्पात धोरणे आखण्यात आली आहेत. २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हे वाटते तितके सोपे नाही. पण, शासन यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. देशाचा आर्थिक विकास दर गेली तीन वर्षे ७.२ टक्के होता. तो पुढील आर्थिक वर्षी ७.५ टक्क्यांवर नेण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. याचा परिणामनक्कीच शेती व ग्रामीण भागाच्या विकासावर होईल. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे खरोखरच व्हावयास हवे. हे होत नसल्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होतो. काही शेतकर्‍यांना आत्महत्याही कराव्या लागतात. उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव शेतकर्‍यांना मिळेल, असे आश्र्वासन अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर करताना दिले आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशांसाठी गावातच मालाची विक्री केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे.

अन्नप्रक्रिया उद्योगासाठी या अर्थसंकल्पात १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतीचा विकास क्लस्टरप्रमाणे करण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात आहे. शेतकी उद्योगात आधुनिक तंत्रज्ञान येण्यासाठी ४७० एपीएमसी बाजारपेठा इंटरनेटशी जोडण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. ५८५ शेती बाजारपेठांच्या सुधारणांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नाशवंत पदार्थांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. त्यासाठी या पदार्थांवर प्रक्रिया करून ते जास्त टिकावेत म्हणून या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची स्वागतार्ह तरतूद करण्यात आली आहे. कृषिक्षेत्रासाठी ११ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय बांबू योजनेसाठी १,२९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मासेमारी, पशुसंवर्धनासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद आहे, तर कृषी सिंचन योजनांसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतात बागायती शेतीपेक्षा जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी कृषी सिंचन योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तरी अगोदरच्या सरकारच्या काळात सिंचन योजनांत भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा अधूनमधून झडत असतात. निदान भविष्यात तरी कोणत्याही राज्यात सिंचन योजनांत भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी घेतली जावयास हवी. ग्रामीण भागासाठी या अर्थसंकल्पात १४.३४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.



 महिलांसाठी काय?

आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या उज्ज्वला योजनेनुसार आठ कोटी महिलांना मोफत गॅसजोडण्या देण्यात येणार आहेत. महिलांच्या रोजगारावर भर देण्यात येणार असल्याचे आश्र्वासन या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. महिलांना प्रसूतीसाठी २६ आठवड्यांची म्हणजे साडेसहा महिन्यांची पगारी सुट्टी देण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्यात महिलांसाठी बदल करण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात आहे.


आरोग्यम् धनसंपदा...

 
या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना जाहीर केली आहे. ही योजना हे या अर्थसंकल्पाचे खास वैशिष्ट्य आहे. ही नव्याने तरतूद केलेली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना वार्षिक ५० कोटी लोकांना विम्याचा फायदा देणार आहे. यासाठी सरकारने पाच लाख कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला आहे. देशातल्या ४० टक्के लोकांना याचा फायदा होणार आहे. या योजनेचे नियमव स्वरूप जेव्हा सरकारतर्फे जाहीर केले जाईल, तेव्हाच या योजनेवर जास्त भाष्य करता येईल. त्याचबरोबर देशात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये १ मोठे हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात आहे. गोवासारख्या राज्यात हृदयरोगावर उपचार करणारी यंत्रणा नाही. गोवेकरांना हृदयरोगावरील उपचारासाठी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे जावे लागते. त्यामुळे तीन मतदारसंघांत एक मोठे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. क्षयरोग रोखण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात दीड लाख नवीन आरोग्य केंद्रे उभारण्याचाही प्रस्ताव आहे.

गरिबांसाठी असलेली मोफत डायलिसिसयोजना यापुढेही चालू राहणार आहे. हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. कारण, या आजारावर रुग्णाला सतत खर्च करावा लागतो. पण, भारतात कर्करोग, अल्झायमर पीडित व पार्किन्सन पीडितांचीही संख्याही प्रचंड वाढत चालती आहे. तेव्हा, या रुग्णांचाही विचार अर्थसंकल्पात अपेक्षित होता. हृदयरोगांसाठी वापरण्यात येणार्‍या स्टेन्टच्या किमती मात्र यापूर्वीच काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत.


इतर तरतुदी

पूर्वी नवे पारपत्र काढण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी बरेच दिवस लागायचे. ही सुविधा अवघ्या दोन ते तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. सौरऊर्जा वापरावर भर देण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात आहे. आपल्या देशात बर्‍याच भागात तळपता सूर्य असतो. त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रस्ताव योग्यच म्हणायला हवा. जलविद्युतनिर्मितीसाठी पाण्याचा फार मोठ्या प्रमाणावर साठा लागतो. औष्णिक विजेसाठी कोळसा लागतो. बर्‍याच वेळेला कोळसा खराब असतो. वाहतुकीवरही प्रचंड खर्च होतो. त्या तुलनेत सौरऊर्जेची निर्मिती कमी खर्चात होते. सौरऊर्जेचे युनिट बसविण्यासाठी जास्त खर्च होतो, पण ते बसविल्यानंतर निर्मिती खर्च मात्र फार कमी होतो. सरकारचे स्वच्छ भारतअभियान सुरूच आहे. ते अभियान पुढे नेण्यासाठी दोन कोटी शौचालये बांधण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. पायाभूत गरजांवर लक्ष केंद्रित असलेल्या या सरकारने सौभाग्य योजनेसाठी १६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यातून चार कोटी घरांना वीजजोडणी मिळणार आहे. २०२२ पर्यंत सर्वांना परवडणारी घरेदेण्याच्या योजनेनुसार येत्या दोन वर्षांत एक कोटी घरे बांधण्याचा व त्यापैकी यावर्षी ३६ लाख घरे शहरांत बांधण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करून काही प्रमाणात पर्यावरणाची काळजीही घेण्यात आली आहे. स्वच्छ पाणीयोजनेवर २६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण, नदीजोड प्रकल्पाच्या मुद्द्याकडे यंदा मात्र अर्थमंत्र्यांनी काहीसे दुर्लक्ष केलेले दिसते. अनुसूचित जाती व जमातींच्या कल्याणासाठी ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण सांडपाणी योजनांसाठीही मोठी तरतूद केली आहे. नद्या स्वच्छ राहण्यासाठी आयुष्मान भारत योजनाही या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. नद्या स्वच्छ प्रकल्पासाठी १६ हजार १६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नद्या स्वच्छ राहाव्यात म्हणून पर्यावरणपूरक उद्योगनिर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे सुतोवाच अर्थमंत्र्यांनी केले.


शिक्षण

 
डिजिटल शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगून यासाठी १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावही सदर अर्थसंकल्पात आहे. शिक्षणक्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

आदिवासी मुलांसाठी एकलव्यशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. पण, स्थलांतरित कामगार जे ऊसतोडणी, वीटभट्टी अशा ठिकाणी रोजगार कमावतात, अशांच्या रोजगाराची ठिकाणे सारखी बदलत असतात. यामुळे यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात, यांचा विचार करावा, असे अर्थमंत्र्यांना हा अर्थसंकल्प सादर करताना काही वाटले नाही.


अन्न, वस्त्र व निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत. यापैकी कापड उद्योगासाठी ७ हजार १४० कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. बांधकामउद्योग जो गेली कित्येक वर्षे मरगळलेल्या अवस्थेत आहे, त्या उद्योगासाठीही अर्थमंत्र्यांनी काही सवलती प्रस्तावित केल्या आहेत. लघु उद्योगांसाठी ३७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ५०० शहरांना अमृतयोजनेसाठी शुद्ध पाणी पुरविण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात आहे. गेल्या आर्थिक वर्षापासून रेल्वे खात्याचा वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात नाही. तो या सर्वसाधारण अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्यात येतो. रेल्वेप्रकल्पांसाठी १ लाख ८८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकलसेवेसाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन उद्योगाची वृद्धी व्हावी, परदेशी पर्यटकांत वाढ व्हावी म्हणून दहा पर्यटन स्थळे विकसित करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. ७० लाख नव्या नोकर्‍या येत्या वर्षात निर्माण करणार, अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली. पण, या नोकर्‍या कोणत्या उद्योगांत निर्माण होणार, याची माहिती देण्याचे अर्थमंत्र्यांनी टाळले. तसेच, शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेणे फार महाग झालेले आहे. यावर नियंत्रण घालू शकणारा प्रस्तावही या अर्थसंकल्पात नाही. अर्थात, शिक्षण हा केंद्र व राज्य सरकारे या दोघांचा विषय आहे तरी केंद्रीय अर्थमंत्री याबाबत दिलासा देऊ शकले असते. सामान्य माणसानेही विमान प्रवास करावा, हे या सरकारचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी ९०० नवी विमाने विकत घेण्याचा व ५६ नवे विमानतळ उडानयोजनेला जोडण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे.

भारतात सर्वसाधारण विमा उद्योगात चार सार्वजनिक उद्योगातील कंपन्या आहेत त्या न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी,’ ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’, ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी व नॅशनल इन्शुरन्स कंपनी. या अर्थसंकल्पात या चार कंपन्यांचे विलीनीकरण करून एकच कंपनी निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे या कंपन्यांवर होणारा प्रशासकीय खर्च बर्‍याच प्रमाणात वाचेल व अस्तित्वात येणार्‍या एका कंपनीच्या नफ्याचे प्रमाण चांगले असेल. पण, असा निर्णय बँकांबाबत मात्र अर्थमंत्र्यांनी घेतला नाही. त्यांना भांडवल पुरविण्यासाठी ८० हजार कोटींचे रि-कॅपिटलायझेशन बॉण्डस् विक्रीस काढण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोेरेशन लिमिटेड ही कंपनी ओएनजीसीकंपनीत विलीन करण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात आहे. २ ऑक्टोबर २०१८ पासून महात्मा गांधींची १७० वी जयंती सुरू होणार आहे. हे वर्ष शासन साजरे करणार असून यासाठी आयोजित करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.


कररचना

 
कंपनी कर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मध्यमलघु व अतिसूक्ष्मउद्योगांना फायदा होईल व रोजगारनिर्मिती वाढेल, असे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. वैयक्तिक आयकराबाबत नोकरदारांच्या तोंडाला अर्थमंत्र्यांनी पानं पुसली, असं म्हटले तरी वावगे ठरु नये. कारण, आयकराच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. फक्त स्टॅण्डर्ड डिडक्शनचाळीस हजार रुपये दिले. पूर्वी स्टॅण्डर्ड डिडक्शनहोते, मधल्या काळात ते काढून टाकण्यात आले होते. यामुळे नोकरदारांना ४० हजार रुपयांची सवलत मिळेल.


ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

ज्येष्ठ नागरिकांनाही ४० हजार स्डॅण्डर्ड डिडक्शन क्लेमकरता येणार आहे. आरोग्य विमा (मेडिक्लेम) आयकर कायद्याच्या कलम८० डी अन्वये ज्येष्ठ नागरिकांसाठी करसवलतीस पात्र करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. तसेच गंभीर आजारावर केलेल्या खर्चाची आयकर सवलतीसाठीची मर्यादा वाढविण्याचा प्रस्तावही यात आहे. प्रधानमंत्री वय वंदनयोजनेत १५ लाखांपर्यंत गुंतवणुकीस ज्येष्ठ नागरिकांना परवानगी देण्याचा प्रस्तावही यात आहे. अगोदर साडेसात लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येत होती. पण आता एका आर्थिक वर्षात गुंतवणुकीवर १० हजार रुपयांहून अधिक व्याज मिळाल्यास मूलस्त्रोत आयकर (टीडीएस) कापला जात असे. ती मर्यादा आता ५० हजार रुपये करण्यात आणि याचा वरिष्ठ नागरिकांना काहीही आर्थिक फायदा नसून फक्त आजचे मरण उद्यावर ढकलले गेले आहे. वरिष्ठांना ५० हजार रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात आहे. शिक्षण अधिकार व आरोग्य अधिभार तीन चार टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. हा अधिभार सेवा करात अंतर्भूत असतो. कॉंग्रेसच्या राज्यात १२ टक्के असलेला हा सेवाकर या सरकारने गेल्या चार वर्षांत १७ टक्के केला आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक बिलावर अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विशेषत: सर्व युटिलिटी बिलमहाग होणार आहेत. खासदारांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या वेळेस यास विरोध करावा व सामान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा.


शेतकरी आत्महत्या करीत आहेत, औद्योगिक मरगळ आहे, तरुण नोकर्‍या मागत आहेत. या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व खासदार यांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे व दर पाच वर्षांनी वाढ करायची, असाही प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे, यावरही दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटल्याचे जाणवले. पण, एकूणच आगामी निवडणुकीमध्ये मतप्राप्तीचा विचार न करता अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प समाधानकारकच म्हणावा लागेल


भारताची सौरझेप- महा एमटीबी-MUST READ


गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत उद्घाटनपर भाषण केले. या भाषणात पंतप्रधानांनी अन्य अनेक विषयांबरोबरच भारताच्या सौरऊर्जा निर्मिती व वापराच्या योजनांबद्दल जागतिक समुदायाला माहिती दिली, तर आजच हरितऊर्जा बाजाराचे निरीक्षण करणार्‍या मर्कोमकॅपिटलने आपल्या संशोधन अहवालातून भारताने यंदा २० हजार मेगावॅट सौरऊर्जा वापराचा पल्ला गाठल्याची आकडेवारी जाहीर केली. भारताने गाठलेला हा टप्पा फार मोठा असून २००९ मधील सहा हजार गिगावॅट क्षमतेपासून नऊ वर्षांत मोठी झेप घेतल्याचे दिसते. २०२२ सालापर्यंत भारताने राष्ट्रीय सौर मिशन अंतर्गत १ लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने भारताची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचेच या आकडेवारीतून स्पष्ट होते.

कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचे इंजिन म्हणजे ऊर्जा. घरगुती वापरापासून ते शेती, औद्योगिक प्रगतीसाठी ऊर्जा आवश्यकच असते. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाने आणि जीडीपी वाढीने भारत आगामी काळात महासत्ता होईल, असा आशावाद निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत असतात. पण, यासाठी ऊर्जेची उपलब्धता अत्यावश्यक असून त्यात सौरऊर्जा महत्त्वाची भूमिका निभावू शकेल. सौरऊर्जा ही सूर्यापासून थेट मिळवता येणारी ऊर्जा तर आहेच, पण तो भविष्यातील अक्षय्य ऊर्जेचा स्त्रोत सिद्ध होणार आहे. सौरऊर्जेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, वर्षातले पावसाळी दिवस वगळता इतरवेळी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा प्रखर सूर्यप्रकाश. तेव्हा असा हा ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत असलेलल्या सौरऊर्जेमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. सौरऊर्जा हा अक्षुण्ण ऊर्जेचा प्रकार आहे. सौरऊर्जेचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. जसे की, उष्णतेसाठी, वाळवण्यासाठी, खाद्यपदार्थ शिजवण्यासाठी आणि विजेच्या रुपात. सौरऊर्जेचा उपयोग कार, विमाने, जहाजे, उपग्रह, कॅलक्युलेटर, पथदिवे आणि अन्य उपकरणांतही अगदी सहज करता येतो. सौरऊर्जेची उपकरणे कोणत्याही ठिकाणी लावता येतात. अगदी घरांत, छतांवरदेखील सौरऊर्जेचा वापर करता येईल. या वैशिष्ट्यांमुळे सौरऊर्जा अधिकाधिक कशी वापरता येईल याचा विचार करण्यास सर्वांनीच सुरुवात केली आहे.

भारताचा विचार करता, संपूर्ण देशाच्या भूभागावर सुमारे पाच हजार ट्रिलियन किलोवॅट तास प्रति वर्ग मीटर सौरऊर्जा मिळवता येऊ शकते; जी जगाच्या एकूण वापरापैकी कित्येक पटींनी अधिक आहे. स्वच्छ ऊन असलेल्या काळात दर दिवसाला ४ ते ७ किलोवॅट तास प्रतिवर्ग मीटरपर्यंत सौरऊर्जा मिळते. देशात जवळपास २५० ते ३०० दिवस असे असतात, ज्यावेळी सूर्याचा प्रकाश संपूर्ण दिवसभर उपलब्ध असतो. त्यामुळे भारतात सौरऊर्जा निर्मितीसाठी उत्कृष्ट स्थिती असल्याचे कळते. भारतातील राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक सौरऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. केंद्र सरकारने भारताच्या याच क्षमतेचा वापर करत पुनर्वापरायोग्य ऊर्जा संसाधनांत सौरऊर्जा निर्मितीवर जास्त भर दिला आहे. भारतात आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९३६ सौर पथदिवे लावण्यात आले आहेत, तर १३ लाख ९६ हजार ३६ घरगुती सौरऊर्जेवरील दिवे देशभरात लावले गेले आहेत. हे प्रमाण नक्कीच उत्साहवर्धक आहे.

सौरऊर्जा वापराचे जागतिक प्रमाण पाहता, जर्मनी प्रथम क्रमांकावर आहे, तर भारत सहाव्या स्थानी आहे. या यादीत आणखी पुढे जाण्याची क्षमता भौगोलिक आणि वातावरणीय वैशिष्ट्यांमुळे भारतात अधिक आहे. आज जगातील विविध कंपन्या भारताकडे सौरऊर्जा क्षेत्रातील एक प्रमुख भागीदार म्हणून पाहत आहेत. कारण, भारताची लोकसंख्या ही जगातील क्रमांक दोनची असून ऊर्जेची गरजही प्रचंड आहे. आजही भारतातील कित्येक ठिकाणी वीज पूर्णपणे पोहोचलेली नाही. तेव्हा, ऊर्जेची ही तूट सूर्यप्रकाशातून पूर्ण करता येऊ शकेल. त्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरण, संचांची निर्मिती, विक्री भारतात करता येईल. त्यातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल.

भारताच्या शेतीक्षेत्राला नेहमीच विजेची गरज भासते आणि ती व्यवस्थित, नियमित भागवली जात नाही, अशी तक्रारही नेहमीच समोर येते. शेतीला पाणी देण्यासाठी, मोटारच्या उपयोगासाठी विजेची सारखी गरज असते. ती सौरऊर्जेवरील मोटारींच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकते. याचसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सौरपंप योजनाही राबवली. आता मोकळी जमीन, माळरान, पडीक जमीन या क्षेत्रावर सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीही काही उपाययोजना करता येतील. या ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती संच तर लावता येतीलच, पण यासाठी अंतर्गोल आरसे, एअर टर्बाईन हे नवीन प्रकारही वापरता येतील. सौरऊर्जेबाबत घेतला जाणारा आक्षेप म्हणजे तिच्या निर्मितीसाठी, उपकरणांसाठी अधिक खर्च येतो आणि मिळणारी वीज मात्र कमी असते. पण, अंतर्गोल आरसे, एअर टर्बाईनच्या वापराने सौरऊर्जानिर्मितीच्या खर्चात बचत करता येईल, असे या क्षेत्रातील अभ्यासक सांगतात.

सौरऊर्जेसाठी भारताने जागतिक पातळीवर इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या अलायन्सच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा होता. २०१६ साली स्थापन करण्यात आलेल्या या अलायन्सचे आतापर्यंत १२१ देश सदस्य झाले आहेत. या अलायन्सने जागतिक बँकेला सौरऊर्जेच्या निर्मिती आणि वापराच्या दृष्टीने अर्थपुरवठा करण्याची मागणी केली आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे सौरऊर्जेची व्यापकता आणि वापर वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २०३० सालापर्यंत १००० बिलियन अमेरिकन डॉलरच्या एकूण गुंतवणुकीपैकी अधिकाधिक रक्कम उभी करण्यात जागतिक बँक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. हे भारताच्या आणि जगाच्या दृष्टीने आश्वासक पाऊल म्हणायला हवे.


Budget 2018 : संरक्षणासाठी बरेच अपेक्षित


आकड्यांचा हिशोब लावला तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रात फारशी वाढ झालेली दिसत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशाच्या संरक्षणासाठी अर्थसंकल्पात केवळ १३ हजार कोटी वाढले आहेत. ही वाढ फक्त महागाईमध्येच जाईल. ख-या अर्थाने अर्थसंकल्प हा दूरगामी संरक्षण व्यवस्थेसाठी करायला हवा होता.
आकड्यांचा हिशोब लावला तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रात फारशी वाढ झालेली दिसत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशाच्या संरक्षणासाठी अर्थसंकल्पात केवळ १३ हजार कोटी वाढले आहेत. ही वाढ फक्त महागाईमध्येच जाईल. ख-या अर्थाने अर्थसंकल्प हा दूरगामी संरक्षण व्यवस्थेसाठी करायला हवा होता.
आपण पुढच्या १० ते १५ वर्षांचा विचार करून शस्त्रास्त्रे मागवतो. ती यायला चार ते पाच वर्षे लागतात. पण त्यासाठी त्यांना अ‍ॅडव्हान्स रक्कम द्यावी लागते. जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही संरक्षण क्षेत्र तसेच लष्कराला काही कमी पडू देणार नाही, असे वक्तव्य अर्थमंत्री दरवर्षी करतात. तुम्ही युद्धाला सक्षम नसाल तर शत्रू त्याचा फायदा घेतो, कारण शत्रूला आपली वास्तविकता माहिती असते. संरक्षण क्षेत्रात आपली क्षमता एका दिवसात वाढवता येत नाही. त्याला वेळ लागतो. तुमची क्षमता वाढली तर लढण्याची योग्यताही वाढते. क्षमता आणि योग्यता दोन्ही एकाच वेळी वाढली, तर शत्रू तुमच्यासमोर येण्याचे धाडस करीत नाही.
आज भारतीय संरक्षण क्षमता कुठल्या अवस्थेत आहे, याची पूर्ण जाणीव पाकिस्तान व चीनला आहे. त्यामुळेच आपण कोणतीही कठोर पावले उचलणार नाही, हे ते ओळखून आहेत. आपलीही तयारी नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीने राष्ट्राची मानसिकता बदलावी लागेल. अर्थ मंत्रालयातील अधिकाºयांना याची जाणीव नाही. यामुळे ते या बाबीकडे
दुर्लक्ष करतात. याला पंतप्रधान, अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांना सामोरे जावे लागते. ते सर्व भार सैन्यांवर सोपवतात. पण, जर क्षमता नसेल तर सैन्य काय करणार, असा प्रश्न आहे.
सुधारणा करायच्या असल्यास आपल्या सकल उत्पादनात म्हणजे जीडीपीचा अडीच ते तीन टक्के भाग पुढील पाच वर्षे संरक्षण क्षेत्रावर खर्च करायला हवा. तरच त्याचे चांगले परिणाम १० वर्षांनंतर दिसतील. पैसे जरी असले तरी अनेकदा संरक्षण उत्पादने बाजारात तयार नसतात. त्यांना बराच कालावधी लागतो. एका वर्षात दिलेली रक्कम जर कमी खर्च झाली असेल तर सरकार ती पुढच्या वर्षी कमी करण्याचे धोरण ठेवते. याला रोल आॅफ प्लॅन म्हणतात. संरक्षणाच्या बाबतीत हे चुकीचे आहे. हा पैसाही संरक्षण क्षेत्राला द्यायला हवा, त्यात तूट ठेवायला नको.
या अर्थसंकल्पात या गोष्टींचा विचार व्हायला हवा. तरच येणाºया काळात भारताची सुरक्षा व्यवस्था सुधारेल. अन्यथा पाकिस्तान आणि चीन आपल्या कमतरतेचा फायदा उचलत राहील, याचा आपण विचार केला पाहिजे.

संरक्षणासाठी ६ टक्क्यांनी वाढ

संरक्षण क्षेत्रासाठी सुमारे २,९५,५११.४१ कोटींची भरीव तरतूद केली आहे. ही रक्कम अर्थसंकल्पाच्या एकूण रकमेच्या सुमारे १२.१० टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या तरतुदीत सुमारे सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी दोन संरक्षण औद्योगिक हब उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

संरक्षण कर्मचाºयांसाठी अतिरिक्त १,०८,८५३.३० कोटींची तरतूद करण्यात आली असून या रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूणच संरक्षण क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी हे दिलासा देणारे बजेट ठरले आहे. गेल्या वर्षी २.७४ लाख कोटींची तरतूद केली होती.

शेजारी राष्ट्रांचा विचार केला असता देशाच्या जीडीपीच्या किमान ३ टक्के खर्च संरक्षण अर्थसंकल्पावर करायला हवा होता, असे मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.

अमेरिका, रशिया, चीननंतर भारत हा संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश आहे. लष्कराच्या दृष्टीने अर्थसंकल्पात संरक्षण विभागासाठीची तरतूद ही जीडीपीच्या सध्याच्या १.५६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा पॅनलने डिसेंबर महिन्यात संरक्षणावर जीडीपीच्या २ ते २.५ टक्के जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी संरक्षण बजेट वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. सध्या भारताची संरक्षण तरतूद फक्त १.६२ टक्के एवढी आहे.
२०१५-१६मध्ये एकूण रक्कम २,४६,७२७ कोटींवरून २०१७-१८मध्ये अर्थसंकल्पात जेटलींनी संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार रुपये दिले होते. ही रक्कम एकूण अर्थसंकल्पापैकी १२.७८ टक्के एवढी होती.
संरक्षणक्षेत्राच्या २,९५,५११.४१ कोटींच्या या एकूण बजेटपैकी ९९,५६३.८६ कोटी इतकी रक्कम ही कॅपिटल बजेट म्हणून देण्यात येणार आहे. संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी याचा उपयोग होणार आहे
चीन व पाकिस्तान यांच्याकडून सतत कुरबुरी सुरू असताना संरक्षण खात्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात येईल, ही आशा आज फोल ठरली. संरक्षण खात्यासाठीच्या तरतुदीत यंदा गेल्यावर्षीपेक्षा केवळ 7.81 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 
गेल्यावर्षी संरक्षण खात्यासाठी 2 लाख 74 हजार 114 कोटी मंजूर झाले होते. यंदा ही तरतूद 2 लाख 95 हजार 511 कोटी रुपयांची झाली आहे. ही तरतूद एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) केवळ 1.58 टक्के इतकीच आहे. 1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धानंतर आतापर्यंतच्या काळात इतकी कमी तरतूद प्रथमच करण्यात आल्याचे दिसून येते. ती किमान 2.5 टक्के असायला हवी होती, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
नवीन शस्त्रास्त्रे व आधुनिकीकरण यांच्यासाठी यंदा 99 हजार 563 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचवेळी सैन्य दलांच्या दैनंदिन खर्चासाठी व वेतनासाठी 1 लाख 95 हजार 947 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सैनिकांच्या निवृत्ती वेतनासाठी लागणार्‍या 1 लाख 8 हजार 853 कोटी रुपयांचा यामध्ये उल्लेख नाही. 
शस्त्रास्त्रे व आधुनिकीकरणासाठी दिलेल्या तरतुदीतील सुमारे 80 टक्के रक्कम ही पूर्वी खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांची देणी देण्यासाठी राखून ठेवण्यात येत आहे. याचा अर्थ नव्याने काही शस्त्रास्त्रे खरेदी करायची असल्यास वा प्रकल्प निर्माण करायचे असल्यास, त्यासाठी अत्यंत तोकडी रक्कम शिल्लक राहणार आहे. लष्कर, नौदल व हवाई दल यांच्या विविध मागण्यांना यंदा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतील, हे स्पष्ट दिसून येत आहे. अर्थात, सरहद्दीनजीक परिसरात रस्त्यांचे जाळे व अन्य इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा मनोदय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. लडाख भागात जाण्यासाठी रोहतांग येथे बोगदा तयार झाला आहे. हा बोगदा सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल, असा आहे. झोझिला पास येथील 14 कि.मी.चा बोगदा बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. अरुणाचल प्रदेश येथील सेला पास येथे नवीन बोगदा बनविण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे.
नवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन
२०१८- १९ या वर्षासाठी आज लोकसभेत अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात दरवेळी संरक्षण विषयला जास्त महत्व दिले जाते. मात्र, यावेळी संरक्षण या विषयावर अर्थमंत्र्यानी अधिक बोलणे टाळले. गेल्यावर्षी संरक्षणावर २.६२ लाख कोटी तरतुद केली होती. यावेळी संरक्षण उत्पादने आणि या क्षेत्रातील गुंतवणूक आमंत्रित करण्याचा त्यांनी उल्लेख केला.
लष्करा विषयी जेटलींचे मुद्देः
* जेटली यांनी वर्षभरात लष्कराने केलेल्या विविध कारवायांचे कौतूक केले.
* लष्कराच्या आधुनिकीरणावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.
* औद्योगिक संरक्षण आणि औद्योगिक विकास कॉरीडोर स्थापन करणार

* सरकार औद्योगिकपूरक संरक्षण उत्पादन धोरणाची निर्मिती करणार आहे.