Total Pageviews

Sunday 20 November 2016

बर्फाचे तट पेटून उठले। लदन शिवाचे कोसळते। रक्त आमुच्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते।-PRABHAT RUPGANDH

बर्फ नव्हे, ते रक्त आमचुचे on: November 20, 2016In: रूपगंधNo Comments बर्फाचे तट पेटून उठले। लदन शिवाचे कोसळते। रक्त आमुच्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते। पन्नास वर्षाचा कालावधी लोटून गेल्यानंतरही आज हे समरगीत पुनः पुन्हा माझ्या ओठावर तरळत आहे. कुसुमाग्रजांनी मूर्त स्वरूपात काव्यबद्ध केलेले ज्ञचीनी आक्रमण. अशाच त्या वर्षांपूर्वीच्या दिवाळीच्या पहाटे उभ्या हिंदुस्थानाच्या अस्मितेला आव्हान देण्यास शस्त्र सज्ज झाले. तेव्हा कवी प्रदीप म्हणाले होते, “”तुम हो चीन तो हम है प्राचीन!” परंतु चीनच्या या विश्वासघातकी आक्रमणाला खतपाणी घातले होते ते आमच्याच भोंगळ, स्वप्नाळू नेत्यांनी. त्यामुळे विसाव्या शतकातील एक ज्ञराजकीय घोटाळाक्ष होऊन अहिंसा, उदारमतवाद, विश्वबंधुत्व, शांततामय सहजीवन यांच्या फाजील अतिरकेकाला पंचशील हे गोंडस नाव दिले, तरी व्यवहाराच्या कसोटीवर ते टिकत नाही. “हिंदी-चिनी भाई भाई! जमीन हमारी है!’ असा उलटा तडाखा बसतो हेच शेवटी सत्य बाकी शेष उरते. जगामध्ये जर तुम्हाला तुमचे विचार प्रसारित करावयाचे असतील, तर प्रथम लष्करी ताकद वाढविणे अगत्याचे आहे आणि म्हणून चीनने आक्रमण केले तेव्हा, “झोपी गेलेला हिमालय जागा झाला’ व त्याच्या लक्षात आले रात्र वैऱ्याची आहे आणि म्हणून आम्ही कोठे आहोत, याची जाणीव करून दिल्याबद्दल तत्कालीन जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी तेव्हा “च्याऊ-माऊ’चे आभार मानून अभिनंदन केले होते. जनसंघाने आपले उत्तर प्रदेशातले राजकीय धोरण बदलून सर्वांना तिरंग्याच्या छत्रछायेखाली एकत्र होऊन “चीन’च्या विश्वासघातकी आक्रमणाचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले. खरोखर चीनचे हे आमच्यावर थोर उपकारच होते. कारण शेवटी स्वत:भोवती आवळून घेतलेला पिंजरा तोडून भरतीय सिंह-पिंजऱ्यातून बाहेर आला होता. साऱ्या जगाच्या शांततेचा ठेका जणू आपल्याच उरावर आहे. असा आभास चीनच्या एकाच टोल्याने डळमळीत झाला आणि सैन्य म्हणजे विकासाच्या मार्गातील धोंड म्हणणाऱ्या शांतीदूतांना ब्रिटन आणि अमेरिकेकडे सैन्याच्या मदतीसाठी याचना करावी लागली होती. Defence Versus Development च्या या घालमेलीत मात्र उभ्या हिंदुस्थानाला शरमेने मान खाली घालावी लागली होती. हा आमच्या सद्‌गुणांच्या अतिरेकाचाच पुन्हा एकदा झालेला इतिहास प्रसिद्ध पराभव होता. हृदय परिवर्तन व शांततामय सहजीवन या भाबड्या कल्पना वाचायला व ऐकायला फार गोड वाटतात; परंतु व्यवहाराच्या कसोटीवर त्या तग धरून राहत नाहीत. “कारण जो बलवंत, तो यशवंत’ हा इतिहास आहे. खऱ्या अर्थाने चीनच्या आक्रमणाची सुरुवात ही 1952 सालीच सुरू झाली होती. जेव्हा चीनच्या सत्तापिपासू साम्यवादी सरकारने रशिया व भारत यांच्यावर जरब ठेवायची असेल तर तिबेट गिळंकृत केलाच पाहिजे. या दिशेने पावले टाकून दलाई लामा यांचा छळवाद मांडला आणि मॅकमोहन सीमा रेषा ही साम्राज्यवाद्यांच्या सडक्‍या डोक्‍याची कल्पना आहे, असे म्हणून बहिष्कृत केली. इतकेच नव्हते तर अस्काई चीनमधून- म्हणजेच भारताच्या जमिनीवरून पक्का रस्ता बांधून भारतावर आक्रमण करायचेच या पक्‍क्‍या निर्धाराने ही तरतूद (Line of Supply) करून ठेवली. खिंझेमान सारखे लष्करी महत्त्वाचे व भारत-भूतान-तिबेट या तीन देशांच्या सीमेवर असणारे ठाणे व तशीच इतर ठाणी आपल्या ताब्यात घेण्यास चीनने सुरुवात केली आणि त्याचवेळेस कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या न्यायाने आमचे संरक्षणमंत्री युनोमध्ये लाल चीनची भलावण करीत राहिले, तर पंतप्रधान पंचशीलाच्या तारा छेडत “च्याऊ आणि माऊ! आपण सारे भाऊ’ हेच तुणतुणे वाजवत राहिले. याचवेळी म्हणजे 55 सालच्या प्रारंभी बाराही महिने मालमोटराने वाहतूक करता येईल असा 750 मैल लांबीचा- ज्यातील 112 मैलाचा भाग हा भारतीय भूप्रदेशातून जाणारा रस्ता बांधून काढला आणि चीनच्या लाल सेनेने पद्धतशीरपणे नेहरू-मेनन यांचा झुलवत झुलवत भारत-चीन सीमेचे नकाशे छापले व त्यात भारतीय भू-प्रदेश चीनमध्ये दाखविण्यात आला, तेव्हा नेहमीच्या शिरस्ताप्रमाणे नेहरूंनी चौ एन लाय यांच्याकडे “कडक निषेध खलिता’ पाठवला. त्याला उत्तर मिळाले की, आम्ही जुनेच नकाशे पुनर्मुद्रित केले आहेत. त्यात काही बदल अजून करावयाचे आहेत. हे सर्व रामायण घडत असताना चौ एन लाय यांनी साळसूदपणे उत्तर सीमेशी काहीही संबंध नसणाऱ्या पाकिस्तानबरोबर एक करार घडवून आणला आणि त्यायोगे काश्‍मीर पलीकडचा, नेफा लगतचा भाग चीनचा आहे, हे आयुब खानने मंजूर करून टाकले. याला म्हणतात हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हे सर्व होताना कृष्ण मेनन महाशय मात्र आमच्या ज्येष्ठ सेनापतींचा दात पडलेले थेरडे म्हणून अपमान करीत होते आणि जनरल थोरातांसारखा अनुभवी सेनापतींनी चीन आक्रमण करील अशी धोक्‍याची सूचना देऊन चीनला उत्तर म्हणून एक सूत्रबद्ध सैनिकी योजना त्यांनी सरकार समोर मांडली; परंतु ती नुसती मेनननी फेटाळूच लावली नाही तर पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलीच नाही. कारण सडतोड वागणारे थिम्मय्या, थोरात यांच्यासारखे सेनापती मेननना नको होते. तर कौल यांच्या तोंडपुंजी व अवसानघातकी सेनापतीच हवे होते; परंतु चीनच्या या आक्रमक तडाख्यानंतर चीनचा शांतीचा उद्‌घोष करणाऱ्या सरकारला. 1963-64 संरक्षण अंदाजपत्रकात 708 कोटी 51 लक्ष रुपयांची तरतूद करावी लागली. जी त्या मागील वर्षांपेक्षा दुप्पट होती. तसेच थोरातांच्या सारख्या वयोवृद्ध, अनुभवी सेनापतींना सन्मानाने परत बोलावून राष्ट्रीय संरक्षण समितीची स्थापना करावी लागली. कै. कृष्ण मेनन यांनी राष्ट्राला अंधारात ठेवले आणि म्हणून उभ्या हिंदुस्थानाला शरमेने मान खाली घालावी लागली. विसाव्या शतकातील कधीही भरून निघणार नाही असा हा राजकीय घोटाळा केवळ मेनन यांच्या कोत्या कूपमंडुक बुद्धीचा परिपाक होता. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातही त्यांच्याविरूद्ध रान पेटले व त्यांना पदच्युत करण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागली. तेव्हा पं. नेहरु म्हणाले, मेनन गेले तर मलाही जावे लागेल! पंडितजींनी तोपर्यंत आपल्या अमर्यादा सत्तेचा भ्रम व लोकप्रियतेच अभिमान होता, परंतु स्वाभिमानी रामसुभग सिंग या बिहारी खासदाराने तेव्हा लोकसभेत नेहरूंना ठणकावले की, आम्हालाही तुमच्याशिवाय सरकार चालविण्याचा विचार करावा लागेल तेव्हा मात्र नेहरुंना जनमताच्या क्षोभापुढे मान तुकवून मेननची उचलबांगडी करावी लागली व कै. यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री नेमावे लागले. या दिवसांत अमेरिकेचे तेव्हाचे भारतातले राजदूत गॅलब्रेथ यांनी लिहिले आहे की, नेहरु चीनच्या आक्रमणानंतर मला पूर्णत: थकलेले दिसले व त्यांचे वागणे एखाद्या भाबड्या मुलासारखे वाटले. अर्थात खोटी जागतिक प्रतिष्ठा व भाबडा आशावाद त्याचीच ही परिणती होती. चीन चढाईच्या पहिल्या पाच दिवसांतच भारताचे लष्करी दीर्बल्य उघडे पडले. जुनी पुराणी युद्धसामुग्री, हिमालयात लढण्यास लागणारे उबदार कपडे व पर्वतीय रणनीतीचा अभाव याचा फायदा घेत चिन्यांनी दोनच दिवसाच्या लढाईत लडाखमधील गालवान खोऱ्यावर कब्जा बसविला व नेफाच्या कामेंग डिव्हीजनमधील तावांग हे महत्त्वाचे ठाणे काबीज केले व लोहीत डिव्हीजनमधील किब्रुत या ठाण्यामार्फत मजल मारली. 15 नोव्हेंबरपासून चीनी सैन्याने दुसरी मोठी चढाई सुरू केली. नेफाच्या लोहीत डिव्हीजनमधील वालॉंगवर त्यांनी हल्ला चढवला व 18 नोव्हेंबरला ते काबीज केले. याच दिवशी कामेंगे डिव्हिजनमधील सेला खिंडीतही भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. बोमदिला ते उत्तर प्रदेशातले ठाणेही-जे सीमेलगत आहे, चीनने गिळून घेतले. त्यामुळे वातावरण फारच गंभीर होऊन चीन पूर्वांचल भागातून आसामात खाली उतरतो की काय, या भयाने नेहरू सरकार पछाडले जाऊन, आसामी जनतेबाबतच्या विचाराने आमची मने व्यथित झाली आहेत असे त्यांनी उद्‌गार काढले; परंतु आपल्यास प्रतिकारच होत नाही, हे पाहून चीनने भ्रांत मनाने आसाम फूट हिल्सपाशी पोहोचताच एकतर्फी युद्धविराम जाहीर करून आश्‍चर्याचा धक्का दिला. चीनने युद्धविराम घोषित का केला? कारण भारताबद्दलचे चीनचे अंदाज चुकले, आसाम-बंगालमध्ये कम्युनिस्ट राजवट उठाव करील हा ही अंदाज चुकला. क्‍युबा प्रकरणामुळे अमेरिका साम्यवादी राष्ट्रांच्या विरोधात उभी होती. आशियामध्ये शिरकाव करून सत्तेचे बालबल राखावयाचे असेल तर भारताला साथ देणेच हितावह, हा अमेरिकेचा पवित्रा ओळखून व ब्रिटन-अमेरिकेने विनाअट सैनिकी मदत भारताला सुरू केल्यामुळेच चीनने माघार घेतली. याशिवाय हिवाळा व नंतर लांब वाढत चाललेल्या या मार्गाला पुरवठा करणे अवघड होऊन सैन्यास त्रास होईल, हे ओळखून चीनने मागार घेतली यात मुळीच संशय नाही. Too few men, too few solider, too few arma हेच आपल्या पराभवाचे मुख्य कारण होते. सैनिकीकरणापेक्षा जगच्याच शांततेचा आम्ही ध्यास घेतला आणि औद्योगिक विकास करत असताना शस्त्रपुरवठा व सैनिकी व्यवहारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे साऱ्या जगात आमचे हसे झाले, भारतीय लष्करामध्ये मैदानातच लढण्याची जास्त क्षमता होती, परंतु पर्वतीय चढाईत लागणारी चपळता, काटकता व साधन सामुग्रीचा अभाव ही कारणेसुद्धा महत्त्वाची होती. तसेच मेननसारख्या कोत्या वृत्तीच्या, मतलबी, साम्यवादी धार्जिण्या वृत्तीमुळे लष्करातील थोर सेनापतींच्या नैतिक धैर्याचे खच्चीकरण हे पण एक कारण होते. परंतु त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहाद्दूर हिंदी जवानांनी बंदुकीच्या दस्त्यांचा, संगिनीचा उपयोग करून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बचेंगे तो और भी लढेंगे या मराठी बाण्याने झुंज देत धारार्तीर्थी देह ठेवले. या युद्धात (Logistic Support) साधनसामुग्रीच्या इतकी कमतरता होती की, एका लेफ्टनंट कर्नल हुद्‌द्‌याच्या अधिकाऱ्याने चपातीवर संदेश लिहून ती चपाती दिल्लीला पाठविली होती. यातील विनोदाचा भाग वगळला तरी युद्ध साहित्याचा अभाव हे सत्य बाकीच राहते. चीनचे हे आक्रमण ही हिंदुस्थानच्या दृष्टीने एक इष्टापतीच होती. अहिंसावाद व शांततामय सह जीवनाच्या भ्रामक गुलाबी स्वप्नरंजनात अडकून पडलेल्या आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला रट्टा बसल्यामुळेच आम्ही वेळीच सावरलो व 1965, 1971च्या संग्रामात यशश्री खेचून आणू शकलो. परंतु चीनी आक्रमण व त्यात आलेले अपयश त्याची शहानिशा करण्याकरता लोकांच्या मागणीनुसार सरकारने ले. ज. हेंडर्सन ब्रुक्‍स व ले. ज. पी. एस. भगत या दोघांची एक चौकशी समिती नेमली होती. त्यांनी आपला सडेतोड अहवाल सरकारला दिला; परंतु अतिशय त्रोटक स्वरूपात तो कै. यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेसमोर दि. 2 सप्टेंबर 1963 रोजी मांडला. राष्ट्रीय सुरक्षा गुप्ततेच्या नावाखाली तो पूर्णपणे जनतेसमोर आलाच नाही. स्वातंत्र्याच्या भल्या पहाटे म्हणजे 1948 मध्ये सरदार पटेलांनी नव्या लाल चीनचा स्वभाव आक्रमक आहे, हे भाष्य करून त्या दिशेने पावले टाकण्याचा सल्ला दिला होता. परंतु भारताला धर्म, भाषा, भिन्न संस्कृती यामुळे पाकिस्तानविरूद्ध लढावे लागले. या विचारांनी ग्रासल्यामुळे आम्ही आमची उत्तर सीमा उघडी-नागडी सोडून दिली. त्या हिमालयीन चुकांचे खापर खऱ्या अर्थाने कॉंग्रेस सरकारवरच फुटते, यात मुळीच संशय नाही.

No comments:

Post a Comment