Total Pageviews

Wednesday 23 November 2016

बीपीएल धारकांनो सावधान! जर त्यांच्या खात्यात ४५ हजारांच्या वर रक्कम जमा होत असेल, तर त्यांचे नाव बीपीएल यादीतून वगळले जाईल आणि त्यांना मिळणार्‍या शासकीय योजनासुद्धा बंद केल्या जाण्याची शक्यता आहेलोकांचा काळा पैसा आपल्या खात्यात जमा न करता त्यांनी शासनाला मदत करून स्वत:चे आणि देशाचेही नुकसान टाळले पाहिजे..-


November 23, 2016033 Share on Facebook Tweet on Twitter देशात काळा पैसा आणि भ्रष्टाचारामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. गरीब दिवसेंदिवस गरीब होत चालला, तर श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंत होत चालला आहे. हेच तत्त्वज्ञान बर्‍याचदा ऐकायला मिळत होते. मात्र, यावर उपाय सूचवायला किंवा त्या उपायांची अंमलबजावणी करायला कुणीच ध्वजावत नसे. म्हणूनच देशात दारिद्र्य रेषेखाली जगणार्‍या लोकांची संख्या वाढली. बीपीएलमध्ये आलेल्या लोकांना मग फुकट धान्य, राहायला घरकूल, तर काही शासकीय योजनांचा लाभ देण्याची जबाबदारी सरकारवर आली. याच लोकांना समाजात चांगला दर्जा मिळावा, त्यांना रोजगार मिळून त्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे, यासाठी शासनाने काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर घाव घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने काळा पैसा बाळगणार्‍यांनी आता आपला पैसा पांढरा करण्यासाठी त्याच गरिबांचा वापर सुरू केला आहे. शासनाने नोटाबंदीचा निर्णय आणल्यामुळे, आपल्याकडील काळा पैसा पांढरा करण्यासाठी लोक आता दुसर्‍यांच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकू लागले आहेत. मात्र, लोकांनीसुद्धा आता अज्ञानी न राहता या काळा पैसा बाळगणार्‍यांना थारा देऊ नये. अन्यथा दारिद्र्य रेषेखाली जगणार्‍यांना त्याच दर्जाचे जीवन जगावे लागेल. काही धनाढ्य आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांच्या बँक खात्यात जमा करू लागले आहेत. जो माणूस दारिद्र्य रेषेखाली असेल त्याचे उत्पन्न ४५ हजारांच्या आत असते आणि अशा लोकांच्या खात्यामध्ये जर दोन लाखांपेक्षा मोठी रक्कम जमा होत असेल, तर त्यांच्या खात्याची चौकशी करण्याचे संकेत आयकर विभागाने दिले आहेत. जर त्यांच्या खात्यात ४५ हजारांच्या वर रक्कम जमा होत असेल, तर त्यांचे नाव बीपीएल यादीतून वगळले जाईल आणि त्यांना मिळणार्‍या शासकीय योजनासुद्धा बंद केल्या जाण्याची शक्यता आहे. शासनाने जर असा कठोर निर्णय घेतला तर, अनेकांना मिळणार्‍या शासकीय योजना बंद होतील आणि ही परिस्थिती केवळ काही धनाढ्यांचा पैसा पांढरा केल्यामुळे त्यांच्यावर ओढवेल. त्यामुळे बीपीएल धारकांनी सावधान होण्याची गरज आहे. लोकांचा काळा पैसा आपल्या खात्यात जमा न करता त्यांनी शासनाला मदत करून स्वत:चे आणि देशाचेही नुकसान टाळले पाहिजे. टॅक्स भरा, रिलॅक्स व्हा! गेल्या अनेक वर्षांपासून आयकर विभागाची ‘टॅक्स भरा रिलॅक्स व्हा’ ही जाहिरात माध्यमांद्वारे झळकत होती. आपले अघोषित उत्पन्न घोषित करून सन्मानाने जगण्याची संधी आयकर विभागाने बर्‍याचदा लोकांना दिली आहे. मात्र, करबुडव्यांनी आयकर विभागाच्या या जाहिरातीचे गांभीर्य ओळखले नाही. काही चार्टर्ड अकाऊंटण्टच्या (सीए) चुकीच्या सल्ल्यावर विश्‍वास ठेवत, लोकांनी वर्षानुवर्षे कराची चोरी केली आणि आपल्या कष्टाने उभारलेला पैसा स्वत:च्याच हाताने काळा केला! आर्थिक अज्ञान आणि सीएमार्फत दाखविल्या गेलेल्या आमिषाला बळी पडून अनेकांनी आपले खरे उत्पन्न घोषित न करता, आयकर विभागाच्या डोळ्यांत धूळ फेकून कराची चोरी केली. वर्षानुवर्षे सातत्याने सुरू असलेल्या आयकर चोरीमुळे, भविष्यात आपल्याच मेहनतीचा पैसा आपल्यासाठीच घातक ठरेल, याची पुसटशीही कल्पना लोकांना आली नसेल. शासनाच्या पाचशे व हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे याच करबुडव्यांच्या पायाखालची जमीन आता सरकली आहे. आजवर घोषित न करता जमविलेली माया आता डोळ्यांदेखत मातीमोल होत आहे. भारतात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची करचोरी केली जाते. गेल्या काही वर्षांत आयकर विभागाने आपले जाळे विस्तृत करीत, करचोरी करणार्‍यांवर पाळत ठेवली असली, तरी कर चोरट्यांनी मात्र आपले उत्पन्न घोषित केले नाही. शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत बेहिशेबी संपत्ती घोषित करण्याचा आग्रह केला, तरीदेखील लोकांनी आपले उत्पन्न घोषित केले नाही. आता ‘तेलही गेले अन् तूपही गेले!’ अशी परिस्थिती काळा पैसा बाळगणार्‍यांची झाली आहे. शासनाने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्युत विभाग, नगर परिषद, पाणीपुरवठा या विभागाची लोकांकडे असलेली थकबाकी मागील तीन-चार दिवसांत कोट्यवधीने वसूल झाली आहे. लोकांकडे पैसा असतानाही लोक कर चुकते करत नाहीत, हेच यातून सिद्ध झाले आहे. ज्या नगर परिषदांची वर्षभरात काही मोजकी करवसुली व्हायची, त्याच नगर परिषदांमध्ये कोट्यवधींचा पैसा येऊ लागला आहे. सरकारकडून विकासाची अपेक्षा करणारे कर भरण्याची जबाबदारी का पार पाडीत नाहीत? चुकीच्या सल्ल्याद्वारे आणि आमिषाला बळी पडून शासनाचा कर वाचविणार्‍यांची स्थिती आता बिकट झाली आहे. त्यांचा घामाचा पैसाच आता त्यांच्यासाठी धोकादायक ठरतो आहे. ही परिस्थिती फक्त आणि फक्त कर चुकविल्यामुळे आली आहे, हे आतातरी देशातल्या कर चोरणार्‍यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. स नंदकिशोर काथवटे, ९४२३१०१९३८

No comments:

Post a Comment