Total Pageviews

Wednesday 7 May 2014

TRUTH ABOUT BODOLAND KOKRAJAR

सध्या पुन्हा आसाम मध्ये हिसाचाराच्या बातम्या येत आहेत. कोकराझार येथे पुन्हा हिंसेचा आगडोंब उसळेल अशी स्थिती आहे. जरा या मागील पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे असे वाटते म्हणून ही माहिती आपल्याशी शेअर करतो आहे. कोकराझार येथे मुळात बांगलादेशी मुसलमानांची संख्या सर्वात ज्यास्त आहे. एकूण मुस्लीमांच्या संख्येपैकी ९९ % मुसलमान बांगलादेशी घुसखोर आहेत. बोडो ही जमात पंचमहाभूतांची उपासना करते. त्यातील एक गट यज्ञ करतो. ते हिंदूच आहेत. पुर्वांचलामधील केवळ बोडो ही एकच भाषा अशी आहे जिला लिपी देवनागरी आहे. त्यांची वेगळी साहित्य सभा आहे. बोडो समाज हा पुर्वांचलामधील सर्वात मोठा व प्रगत समाज आहे. आपले निवडणूक आयुक्त श्री. ब्रम्हा हे पण बोडोच आहेत. कुच बिहार शेजारचे हे खरे तर जुने त्यांचेच राज्य. घुपरी जिल्हा हा खरे तर बोडो बहुल लोकसंख्येचा. पण आता तेथे ८० % बांगलादेशी घुसखोर आहेत. बांगलादेशी घुसखोरांनी तेथील जमिनी बळजबरीने काबीज केल्या. सरकारने आपली व्होट बॅंक तयार करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला, अव्याहतपणे तेथे घुसखोरी होत राहिली. बोडो ही लढाऊ जमात आहे. अन्याय सहन करणारे ते नाहीत. अस्मिता जागृत असणारा हा समाज आहे. तेथील जंगले, जमिनी, वनखात्याच्या जागा , सरकारी जागा बांगलादेशी घुसखोरांनी काबीज केल्या आहेत. सरकारने त्या अधिकृत केल्या. गेल्या १५-२० वर्षात बांगलादेशी घुसखोर कोकराझार मध्ये घुसले. मूळ बोडो आंदोलन हे १९८२ मध्ये सुरु झाले. IDMT कायदा स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पारित केला. पण या कायद्यातील त्रुटी अशा आहेत की त्यातून बांगलादेशी घुसखोर नीट स्थापित व्हावेत. गेल्या १८ वर्षात फक्त ७०० ते ८०० घुसखोर परत पाठवण्यात आले आहेत. बांगलादेशी घुसखोर असणाऱ्या समाजाचा विकास जाणीवपूर्वक केला गेला परंतु त्या प्रमाणात बोडोंचा विकास मात्र झाला नाही. त्यातूनच Bodo lebaration tigers चा जन्म झाला.सशस्त्र उठाव केला गेला. Bodo Teritorial administrative Dixtrit तयार केले गेले. २००५ पासून बांगलादेशी घुसखोरानच्या विरुध्द भांडण चालू आहे. बांगलादेशी घुसखोरांनी त्यांची रणनीती बदलली. अबोडो हिंदू व मुस्लीम यांना एकत्र करून बोडोंना बाजूला करण्यात आले. अनेक बोडो मुलींवर अत्याचार करण्यात आले. त्याचे चित्रण यु ट्यूब वर उपलब्ध आहे. बोडो चिडणे स्वाभाविक आहे. कोकाराझारच्या ज्या जंगलात हत्या झाल्या त्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीर पणे राहात होते. त्यांना सरकारने नोटीसा पण दिल्या होत्या सोडून जा म्हणून. त्या गावातून काही बोडो माणसे जात असताना बांगलादेशी घुसखोरांनी त्यांना हटकले व मारून टाकले. ४ जण दगावले. त्याचीच ही प्रतिक्रिया. पण मूळ ४ जण मारल्याची काही बातमी सुद्धा आली नाही. एक अबोडो अतिरेकी, ज्याने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विभाग कार्यावाहांची हत्या केली होती तो आत्ता निवडणुकीला उभा आहे. कदाचीत निवडून पण येईल. आता तो अतिरेकी निवडून आल्यानंतर कदाचित परत हत्याकांड होऊ शकते. पुन्हा मागील वर्षी ज्याप्रमाणे उर्वरित भारतातील मुस्लिमांनी पूर्वांचलातील नागरिकांना लक्ष्य बनवले तसेच परत होऊ शकते. काळजी घेतली पाहिजे. मी काही बोडो समर्थक नाही, या सर्व हत्यांचा मी तीव्र निषेध करतो. वस्तुस्थिती आपल्याला कळावी म्हणून हे सर्व लिहिले आहे. -- अतुल अग्निहोत्री

No comments:

Post a Comment