Total Pageviews

Wednesday 13 March 2013

इटलीकडून भारताची फसवणूक-
* इटलीकडून भारताची फसवणूक भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या खलाशांना इटली सरकारने पुन्हा भारतात पाठविण्यास नकार देण्याचा निर्णय भारताला अमान्य असल्याचे, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.
केरळमधील दोन मच्छीमारांच्या हत्याप्रकरणातील इटालियन नौदलाच्या दोन सैनिकांना भारतात परत पाठवण्यास इटली सरकारने ठाम नकार दिल्यामुळे आपल्या देशाची अब्रू पुरती धुळीला मिळाली आहे. साहजिकच, संसदेत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आणि "देवभूमी' केरळमध्येही प्रक्षोभाची लाट उठली. भारताशी कसेही वागले तरी चालते, हीच बाब या निमित्ताने पुन्हा समोर आली असली तरी सुदैवाने भारत सरकार आणि खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या प्रकरणी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे आता इटलीबरोबरचे संबंध कायमचे बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.
इटलीहून आलेल्या एका तेलवाहू जहाजावरील इटलीच्या नौदल सुरक्षारक्षकांनी दोन भारतीय मच्छीमारांची हत्या केली, त्यास गेल्या महिन्यात बरोबर एक वर्ष पूर्ण झाले होते. खरेतर या कालावधीत आपण ताब्यात घेतलेल्या इटलीच्या या दोन सुरक्षारक्षकांची चौकशी होऊन त्याचा निकालही लागायला हवा होता; पण आपण हे सारे प्रकरण मुळातच होता होईल तेवढे सौहार्दाने हाताळत होतो. 105 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर, त्या दोघांची जामिनावर मुक्‍तता झाली आणि त्यांना नाताळचा सण साजरा करण्यासाठी इटलीला जाण्याची मुभाही दिली गेली. त्या वेळी पुढील चौकशीसाठी त्यांना परत पाठवण्याचा शब्द इटली सरकारने पाळला आणि जानेवारी 2013 मध्ये ते भारतात परतलेही. त्यानंतर त्यांना पुन्हा "मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी' इटलीला जाऊ दिले गेले, तेव्हाच इटली सरकारच्या दबावाला भारत सरकार बळी पडल्याची चर्चा सुरू झाली होती. कारण या दोघांनी मतदान केले नसते, तर जणू इटलीतील लोकशाही धुळीसच मिळाली असती! पण आता आपल्या त्याच निर्णयाचे परिणाम भारत सरकारला भोगावे लागत आहेत. कारण आता ते भारतात परतणार नाहीत, असे इटली सरकारने अधिकृतरीत्या आपल्याला कळवले आहे. भारत सरकारला या प्रकरणी खंबीर भूमिका घेणे भाग पडले; त्यास अर्थातच आणखी अनेक पदर आहेत.
गेल्याच महिन्यात उघड झालेल्या हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणातील "ऑगस्टा वेस्टलॅंड' कंपनीला वाचवण्यासाठी इटली सरकार त्या चौकशीत कसे अडथळे आणत आहे, ते स्पष्ट झालेले असतानाच आता पुन्हा एकदा इटलीने दणका दिला आहे. इटलीच्या दिल्लीतील राजदूतांना समज देऊन आपण या प्रकरणी काही ठोस पावले उचलू इच्छितो, याचे दर्शन आपण घडवले आहेच. आता पंतप्रधानांच्या या ठाम भूमिकेनंतरही इटली सरकारने बऱ्याबोलाने त्या दोघांना भारतात परत पाठवल्यास, इटलीशी असलेले राजनैतिक संबंध तोडणे, हाच अखेरचा मार्ग उरतो. इतकी टोकाची भूमिका सोनिया गांधी "यूपीए' सरकारला घेऊ देतील काय, हाच खरा प्रश्‍न आहे.

आपल्या दोन नौदल सैनिकांना भारतात परत पाठविण्याचा निर्णय जाहीर करून इटली सरकारने भारताशी विश्‍वासघात केला, असा आरोप करताना,भारतीय मासेमार्‍यांना ठार करणार्‍या या सैनिकांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने सर्वच स्तरावरून प्रयत्न करायला हवे,
दोन भारतीय मासेमार्‍यांच्या हत्येत दोषी असलेल्या इटलीच्या या दोन्ही सैनिकांना निवडणुकीच्या मतदानासाठी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले होते. चार आठवड्यात परत येण्याचे हमीपत्र त्यांनी दिले होते.असे असतानाही त्यांना परत पाठविण्याचा निर्णय इटली सरकारने घेतला.हा शुद्ध खोटारडेपणा असून,भारतासोबत विश्‍वासघात आहे.भारत सरकारने त्या दोघांनाही देशात आणावे आणि त्यांच्याविरुद्ध नव्याने खटला चालवावा, अशी भाजपाची मागणी असल्याचे पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
इटली सरकार भारताला इतके मवाळ का समजते, हा देश भारतासोबत इतक्या सहजपणे कसे वागू शकतो, याविषयी आम्ही सरकारकडून स्पष्टीकरण मागणार आहेत, असेही ते म्हणाले. बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी ओट्टाव्हिओ क्वात्रोची याच्याबाबतही इटलीने अशाच प्रकारची भूमिका घेतली होती.आपण सर्वच या घटनेचे साक्षीदार आहोत आणि आता या देशाने पुन्हा एकदा भारताला दगा दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले
हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील तपासाचा दस्तऐवज देण्याची भारताची मागणी इटलीतील न्यायालयाने फेटाळली आहे. या तपासाच्या दस्तऐवजात गोपनीय माहिती असल्याचे कारण देत भारताची मागणी फेटाळण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदी करारातील घोटाळ्याची चौकशी इटलीतील न्यायालयात सुरू आहे.
मायदेशी गेलेले दोन आरोपी भारतात परतणार नसल्याने नाचक्की
* इटलीकडून भारताची फसवणूकइटलीकडून झालेल्या फसवणुकीमुळे भारताची नाचक्की झाली आहे. केरळच्या समुद्रात दोन भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा आरोप असणाऱ्या इटलीच्या दोन नाविकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी भारतात न धाडण्याचा निर्णय इटलीने घेतल्याने मंगळवारी नव्या वादाला तोंड फुटले. या पाश्र्वभूमीवर केरळमधील खासदारांच्या गटाने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली असता इटलीची ही भूमिका अस्वीकारार्ह असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत इटलीचे एक जहाज केरळ किनारपट्टीजवळ आले असता ही घटना घडली. या जहाजाच्या आसपास असणाऱ्या दोघा भारतीय मच्छीमारांना समुद्री चाचे समजून इटलीच्या नाविकांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात भारतीय मच्छीमारांचा मृत्यू झाला. यानंतर इटलीच्या मॅसिमिलीआनो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन या दोघा नाविकांवर खटला दाखल करण्यात आला. या खटल्याचे कामकाज सुरू असताना या दोघांनी नाताळनिमित्त मायदेशी जाण्याची अनुमती मागितली, सर्वोच्च न्यायालयाने ही अनुमती दिल्याने ते दोघे मायदेशी जाऊन आले. गेल्या महिन्यात इटलीतील निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांनी पुन्हा एकदा मायदेशी जाण्याची अनुमती मागितली, या वेळीही न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली, मात्र मतदान होऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही हे दोघे भारतात येण्यास तयार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
भारताने हा प्रश्न राजनैतिक पातळीवर सोडवावा, असे आवाहन आम्ही केले होते, मात्र त्यास त्यांचा प्रतिसाद लाभला नाही, ही घटना समुद्रात घडल्याने आंतरराष्ट्रीय कायदा लागू होतो, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचा निकाल लागेल, अशी अधिकृत भूमिका इटलीने घोषित केली. या घडामोडींमुळे केरळमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. तेथील खासदारांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले. इटलीची ही भूमिका अस्वीकारार्ह असून यातून काही तरी मार्ग काढण्याची सूचना आपण परराष्ट्रमंत्र्यांना करू, असे आश्वासन पंतप्रधानांनी या खासदारांना दिले. काँग्रेस तसेच भाजपच्या खासदारांनीही इटलीच्या भूमिकेचा निषेध करीत पंतप्रधानांकडून हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
राहुल यांचे मौनम्इटलीच्या या भूमिकेवर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संसदेच्या आवारात अनेक पत्रकारांनी त्यांना घेरले व याविषयी प्रश्नांची सरबत्ती केली. राहुल यांनी मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला व मौन बाळगले
अनेक आघाड्यांवर तोंडघशी पडत असलेले केंद्र सरकार देशांतर्गत अनेक आघाड्यांवर तोंडघशी पडत असलेले केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय डावपेचातही दूधखुळे असल्याचा प्रत्यय इटालियन नौसैनिक प्रकरणी आला आहे . केरळमधील मच्छिमारांवर गेल्या डिसेंबरमध्ये इटालियन नौसैनिकांनी , त्यांच्या मते , गैरसमजातून गोळीबार केला होता . त्यात दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला होता . त्या घटनेनंतर भारतीय पोलिसांनी ती बोट आणि बोटीवरील सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते . घटना घडल्याच्या क्षणापासूनच इटालियन सरकारने आपले नागरिक अपराधी आहेत अथवा नाही , असा विचार करण्याऐवजी त्यांना भारतीय कायद्याच्या कचाट्यातून बाहेर कसे काढता येईल , एवढाच विचार केला आणि त्याचदृष्टीने व्यूहरचना केली . भारताने मात्र भोळसटपणाचे प्रदर्शन करीत , नको तेवढा विश्वास ठेवला आणि आपल्या ढिसाळ वृत्तीचे दर्शन घडवले . भारतीय सागरी हद्दीत येऊन दोन मच्छिमारांचा बळी घेणारे ते दोन इटालियन नौसैनिक आपल्या देशाच्या राजनैतिक धूर्तपणाखाली लपले असून त्यांना तेथून खेचून भारतात आणण्यात यश मिळाले , तरच देशाची अब्रू वाचू शकेल . अशा प्रकरणी अत्यंत कठोरपणे आपल्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असते ; परंतु भारतीय राज्यकर्त्यांमध्ये त्याचा कायमच अभाव दिसतो . मुळात ज्या दोन नौसैनिकांवर हत्येचा आरोप आहे , त्यांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात भारताने खूपच घाई केली . आंतरराष्ट्रीय संकेतांचे , नियमांचे पालन करण्याची घाई ही अनेकदा त्या देशाची कमजोरी समजली जाते . थोडेसे ताणून धरून , दमदाटी करून मगच नियमांचे पालन केले गेले , तर त्याचा आणखी वेगळा परिणाम होतो . परंतु आपण ' अतिथी देवो भव ' ची संकल्पना आणि संस्कार जास्त लावून घेतो . आरोपी नौसैनिकांना भारताच्या ताब्यात देण्यास नकार देऊन इटालियन सरकारने आपल्या या वृत्तीचा गैरफायदा घेतला आहे . आपल्या दोन निष्पाप नागरिकांचा बळी जाऊनही पाहुण्यांची बूज राखणारे भारत सरकार आणि प्रत्येक चाल नियोजनपू्र्वक रचणारे इटालियन सरकार अशा या मुकाबल्यात निर्णायक खेळी आता भारताला खेळावी लागणार आहे . गोळीबाराची घटना भारतीय हद्दीत घडली , हे सिद्ध झालेच आहे . केरळ सरकार आपल्या नागरिकांच्या अपराध्यांना जेरबंद करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलणारच , याची खात्री पटल्यावर इटलीने भारतीय वकिलाचीच मदत घेऊन हा खटला केरळकडून दिल्लीकडे वर्ग करून घेतला . त्याचवेळी यासंबंधी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी , असे न्यायालयाने म्हटले होते . तसे झाले असते , तर आतापर्यंत हा खटला निकाली लागून अपराध्यांना भारतीय कायद्यानुसार शिक्षाही झाली असती . परंतु विशेष न्यायालयाच्या स्थापनेकडे दुर्लक्ष केले गेले . याचा फायदा घेऊन , धार्मिक कारण देऊन या दोन नौसैनिकांना तात्पुरते मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली , तेव्हाच पुढील डाव रचला गेला . गेलेले नौसैनिक भारतात परतले आणि आपण शब्द पाळतो हे इटालियन सरकारने न्यायव्यवस्थेवर ठसवले . त्याच बळावर , या सैनिकांना देशातल्या मतदानासाठी म्हणून पुन्हा चार महिन्यांसाठी इटालीत पाठवले गेले होते . आधी आपला हेतू फार प्रामाणिक असल्याचा देखावा तयार करून मग खरे रूप दाखविणाऱ्या इटालियन काव्याची कल्पना भारताला आलीनाही . हे दोन नैसैनिक परत येतील , अशी लेखी हमी इटलीचे भारतातील राजदूत डॅनिअल मॅनसिनी यांनी भारतीय सुप्रीम कोर्टाला दिली होती . या लेखी हमीची पायमल्ली करण्याची आगळिक इटली करत असेल , तर आता भारताने काहीही करून त्या दोन अपराध्यांना भारतात आणले पाहिजे . हा खटला भारतात चालवला जाऊच शकत नाही ; कारण ज्या बोटीत हा गुन्हा घडला त्या बोटीवर इटालियन सरकारचा अधिकृत झेंडा फडकत होता , असा पवित्रा आता इटलीने घेतला आहे . परंतु ज्या मच्छिमारांवर त्या सैनिकांनी गोळीबार केला , ते दोघेही भारतीय सागरी हद्दीत होते . त्यामुळे हा खटला भारतातच चालवला गेला पाहिजे . इटलीच्या राजदूतांना बोलावून समज देण्यात आली असली आणि नापसंती व्यक्त करण्यात आली असली , तरी तेवढ्याने इटालियन सरकारवर काही परिणाम होणार नाही . याचे परिणाम फार गंभीर होतील असा इशारा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला आहेच . इटालियन राजदूताची हकालपट्टी , शब्द फिरवल्याबद्दल कायदेशीर कारवाई अथवा दोन देशांमधील व्यापारी संबंधांचा फेरविचार अशी काही टोकाची पावले आता उचलावी लागणार आहेत , असे दिसते . भारताच्या राजनैतिक डावपेचांची ही कसोटी असेल .
 
प्रतिक्रिया मिनल
- मंगळवार, 12 मार्च 2013 - 11:44 PM IST इटलीचे सरकार आपल्या लोकांना सोडेल का दिवाळी साजरी करायला ??????? तुम्हाला अमान्य आहे ते कोणी विचारताय का? आधीच मुरक्कपणा केला आता पाह्ल्तु निषेध करून शोभा नको
केदार - मंगळवार, 12 मार्च 2013 - 10:58 PM IST DJ
तुला गाढवाला गुळाची चव काय हि म्हण माहित आहे का??? ती तुला अगदी योग्य लागू होते.... mohan - मंगळवार, 12 मार्च 2013 - 10:25 PM IST इतलिअन बाई गम्मत बघत बसली आहे.शरदाचं चांदणे चाखण्यासाठी बाईला पाठींबा.
Bipin - मंगळवार, 12 मार्च 2013 - 10:21 PM IST इटालीअन माफिया जगभर प्रसिद्ध आहेत. युरोप मध्ये तर ह्याना असभ्य म्हणूनच संबोधले जाते. अशी हि असभ्य संस्कृती आमच्या कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करते. अजून काय अपेक्षा करणार ह्या सरकार कडन ? भारतीय घटनेत सुधारणेचा विचार व्हावयास हवा.
Vijay - मंगळवार, 12 मार्च 2013 - 10:07 PM IST सरदार मनमोहान्साहेब खर खर का सांगत नाही? आईसाहेबांचा माहेरची माणस होती म्हणून सोडून दिली . आईसाहेबांच्या विरुद्ध ब्र काढण्याची तुमचात तरी हिम्मत नाही
निलेश - मंगळवार, 12 मार्च 2013 - 09:48 PM IST भारत सरकार ... काय बोलणार .. सगळी कडे SETTING .. विरोधी पक्ष आपापसात भांडत आहेत.. आणि सरकार देशाला लुटत आहे.. कधी हे सगळे थांबणार... जय हो MADAM .. जय हो कांग्रेस ... जय हो भ्रष्टाचार... ( मनमोहन तुम्ही शांतच राहा..)
निलेश - मंगळवार, 12 मार्च 2013 - 09:28 PM IST भारत सरकार ... काय बोलणार .. सगळी कडे SETTING .. विरोधी पक्ष आपापसात भांडत आहेत.. आणि सरकार देशाला लुटत आहे.. कधी हे सगळे थांबणार... जय हो MADAM .. जय हो कांग्रेस ... जय हो भ्रष्टाचार... ( मनमोहन तुम्ही शांतच राहा..)
sandesh - मंगळवार, 12 मार्च 2013 - 08:59 PM IST जगातील कोणताही देश भारताला घाबरत नाही. इटली देश दोन खालाशांसाठी भारताला सुनावतो. भारताचे कित्येक मासेमार पाकिस्तान जबरदस्तीने पकडून तुरुंगात टाकून हाल करतो पण भारताला आणि भारतीय समाजाला त्याकडे दुर्लक्ष करणे सुलभ वाटते. गांधीवादी आणि नेहरूवादी समाजाला अजून काय अपेक्षित आहे?
sagar - मंगळवार, 12 मार्च 2013 - 08:50 PM IST कॉंग्रेस सरकार ला पहिल्यांदाच कुणीतरी हाताचा पंजा दाखवला...(टाटा बाय बाय...आम्ही आता परत पाठवणार नाही त्यांना)
शिवराम गोपाळ वैद्य - मंगळवार, 12 मार्च 2013 - 08:08 PM IST पाकिस्तान सारख्या देशापुढे नांगी टाकणारे आमचे नेतृत्व इटली सारख्या बलाढ्य राष्ट्रापुढे काय उभे राहणार आहे? संतप्रधान मनमोहनसिंग यांचे पाय थरथरायला लागतील आणि लवकरच ते "असे आपण म्हटलोच नव्हतो", असा विश्वामित्री पवित्र घेऊन यातून "बाहेर" पडतील. नपुंसक, भ्रष्ट, कणाहीन आणि स्वार्थी नेत्याच्या भावनाना जगात कोणी कवडीची ही किंमत देत नाही.
दीपक - मंगळवार, 12 मार्च 2013 - 06:45 PM IST हा हा हा , वारे वा हे बरेच मस्त विनोद आहेत , पहिला : आमचे पंतप्रधान बोलले, दुसरा: टेहू इटली या madam च्या माहेरी देशाविरुद्ध, आणि तिसरा "आम्हाला मान्य नाही" , जसे काही इटलीचे सरकार , ह्यांना विचारतेच आहे. कोर्टाने निर्णय दिला पण त्यांना तसा निर्णय घेण्यास कोणी भाग पडले हे शेंबडे पोर सुद्धा ओळखते , हे राजपुत्राचे मामा - त्याच्याच आदेशावरून सोडले आहेत
sachin - मंगळवार, 12 मार्च 2013 - 04:49 PM IST @DJ
ला पण इटलीला पाठवा. याचे कॉम्मेंत्स काहीचे काही असतात . महेश - मंगळवार, 12 मार्च 2013 - 04:43 PM IST व्वा! अंजली, bahot खूब........
deep - मंगळवार, 12 मार्च 2013 - 04:39 PM IST ...... असं नाही हं करायचं !
prashant - मंगळवार, 12 मार्च 2013 - 04:12 PM IST @Aditya
तुला काय वाटते ? न्यायालय कोण कंट्रोल करते ? राजेश - मंगळवार, 12 मार्च 2013 - 04:01 PM IST इटली देशाने अप्रतिम कानाखाली मारली आहे आपल्या !
सतीश - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:49 PM IST सर्व मूर्खे आहेत appan का विचार करतो .
ANJALI AJAY - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:47 PM IST कु - तो - बु री या- रही - हो गि -यु हि- को - बे फा - हि- होता
Sanjay - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:44 PM IST  
स्वप्नील - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:32 PM IST अरे कोण बोललं.....कसला तरी आवाज आला.......
DJ - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:29 PM IST तरी बरे'भाजपेयीं'चे सरकार नव्हते. नाहीतर केंद्रीय मंत्र्यांनी एअर इंडियाच्या खास विमानाने दोघा खलाशांना इटलीला नेउन सोडले असते आणि इकडे पकाऊ कवितांचे सरकारी संमेलन भरले असते आणि प्रत्येक शब्दामागे मिनिटांचा पॉज घेत विरहाच्या व्याकुळ कवितांचा पूर आला असता. डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असे नेभालाता सारखे नक्कीच करणार नाही. गोड शब्दात इटलीच्या सरकारने ऐकले नाही तर नक्कीच अंतर राष्ट्रीय कायद्यानुसार त्या खलाशांना नाक घासत इथे आणले जाइल.
Aditya - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:27 PM IST त्यांना इटली ला जायची परवानगी न्यायालयाने दिली होती, सरकारने नाही. उगाच सरकार ला शिव्या घालून काय उपयोग?
रा.व्यं.मंगरुळकर - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:19 PM IST इटलीचा निर्णय भारताला अमान्य आहे असे पंतप्रधान म्हणत आहेत.पण इटली सरकार कोठे तुम्हाला विचारत आहे कि हा निर्णय तुम्हाला मान्य कि अमान्य ?आणि हा निर्णय जरी भारताला अमान्य असेल तरी सोनियाजींना मान्य कि अमान्य हा मुद्दा महत्वचा ठरेल.आता इतर ठिकाणी जसा त्या इटालियन कनेक्शनचा उपयोग करून घेतात तसा उपयोग त्यांनी करून त्या गुन्हेगारांना परत आणून दाखवावे.
Indian - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:17 PM IST अहो सर ...असे बोलण्या आधी मेडम ची परवानगी घेतली का ?
A Ra Deshpande - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:12 PM IST आता काय दोन खालाश्यांसाठी इटली विरुद्ध अनु युद्ध पुकारायच का? इतलिअन न्यूज पेपर वाचा म्हणजे कळेल इटली सरकार का पुन्हा परत पाठवण्यासाठी नाही म्हणत आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार आता हा मुद्दा राजकीय पक्षांनी त्यांचा तुच्छ राजकारणासाठी महत्वाचा बनवला आहे त्यामुळे त्यात नैसर्गिक न्याय संभवत नाही. झालेली घटना दुर्देवी आणि अपघाती होती. तिथे तिथल्या राजकारणामुळे आणि इथे इथल्या राजकारणामुळे ज्यांचा ह्या घटनेशी संबंध नाही ते ह्यात पडत आहेत.
प्रथमेश.पराशर - मंगळवार, 12 मार्च 2013 - 03:06 PM IST इटलीची महाराणी आणि इटलीअन राजपुत्र ला सांगा त्यांना परत घेयून या !
मयुर चोरघे @ सलाला ओमान - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:46 PM IST की राव जोक करता कि की काय ? असे बोलू नका नाहीतर तुमची खुर्ची जाईल.
Padmakar - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:43 PM IST थोडक्यात म्हणजे इटालियन शाविर्लाकांनी चांगलाच हात दाखवला .हिम्मत असेल तर सगळ्या इटालियन उद्योगांना भारतातून गाशा गुंडाळला सांगा . सगळ्या इटालियन लोकांना २४ तासात भारत सोडण्याचे आदेश द्या लगेच वठणीवर येतील.
रोहन कांडलीकर - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:42 PM IST हाहाहा मला लहानपणी ऐकलेल्या/वाचलेल्या काही गोष्टी आठवल्या.. त्यात कुठला तरी राक्षस कुठल्या तरी माणसाला पकडतो.. मग तो माणूस म्हणतो कि मी बायका मुलांना भेटून परत येईन... आणि हा राक्षस त्याला सोडून देतो.. आणि मग तो माणूस त्याच्या बायकामुलांना भेटून परत येतो... आपल्या मनमोहन ला दयाळू राक्षस व्हावसं वाटलं का ते इटली चे होते म्हणून..!! त्यांची पाप काय आता सोनिया फेडणार आहे का? मुर्ख लोचट साले...!
अभी - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:29 PM IST इथून पोष्टाने पण मतदान करता आल असत. तेवढी पण अक्कल नाही सुचली का तेव्हा ह्या सरकारला?
रामदास कदम - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:27 PM IST सोनियाच्या माहेरच्या माणसाना पकडायची परवानगीच कुणी दिली मनमोहन सिंग ला. हातचे गेल्यानंतर जागा होणारा हा आपला पंत प्रधान नुसता कधीतरी बोलणार पोपट आहे
A G S - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:17 PM IST इटालियन मरीन यांना सरकारी आश्वासना नंतर हि परत पाठविण्याचा इटालियन सरकार चा निर्णय,आणि हेलीकोपतर भ्रष्टाचाराचा आणि भारत सरकार ची मिली भागात आहे किंवा काय याची चौकशी सुप्रीम कोर्टानेच करावी सी बी आय विश्वसनीय नाही भारत सरकार चे नाव गिनीज बुक मध्ये यायला हवे आणि मोसाहित सर्वाना लाइफ टाईम अचीव मेंट अवार्ड देण्यात यावे.
शकील शेख - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:05 PM IST मेडम च्या माहेरचा निर्णय आहे, मान्य करून कस चालेल ?
सचिन - मंगळवार, 12 मार्च 2013 - 02:02 PM IST आसाही ते इटलीच्या ताब्यात तर होता फक्त जागा बदलली आहे त्यामुळे चिंता नसावी मनमोहनला...! आसाही ते मेदमच्या महेरातले इथे राहिली कान आन तिथे राहिली काय काय फरक पडणार...!! फरक पडणार तो जाणत्याला, जन्ताला
babare - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:52 PM IST मुक्मोहन आता काय करणार..गप्प बसणार
नाना फडणवीस, सदाशिव पेठ - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:49 PM IST खरच आपले सरकार किती मुर्ख आहे याचीच हि प्रचीती आहे, हातात आलेले असतांना सोडले आणि आता हातात येत नाहीत म्हणून रडत बसले आहेत... खरच षंढ सरकारचा निषेध करावा तेव्हडा थोडाच आहे..
संजय Mankar - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:49 PM IST भारतात हि इटलीचे सरकार आहे .... कसा मिळेल न्याय ???
नाना फडणवीस, सदाशिव पेठ - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:48 PM IST खरच आपले सरकार किती मुर्ख आहे याचीच हि प्रचीती आहे, हातात आलेले असतांना सोडले आणि आता हातात येत नाहीत म्हणून रडत बसले आहेत... खरच षंढ सरकारचा निषेध करावा तेव्हडा थोडाच आहे..
अजय - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:47 PM IST अरे वा वा मौन आणी मंद मोहन सिंग बोलले पुन्हा एकदा आणी तेही इटलीविरुद्ध. खरच दिवा विझायाची वेळ आली वाटते यांच्या खुर्चीचा..... अहो मौन जी ते कॉंग्रेस चे माहेरचे पाहुणे आहेत. आहे का कुणात हिम्मत त्याविरुद्ध बडबड करायची. हेच बीजेपी ने केले असते तर थाय्थायात केला असता या काँग्रेसी गुलाम लाचारांनी. आता कुठे गेले सर्व पालटू कुत्रे???? भुंका तुमच्या इटलीच्याच मादाम वर. त्यांना सोडून देण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे माहेरच्या लोकांकडून. आता बसा भासःन्बाजी करत. दुसरे येतेच काय आपल्याला.
man - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:46 PM IST congress ne paise khaun aropinchi madat keli ahe
prasanna - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:36 PM IST "
इटलीतील निवडणुकांसाठी या दोन खलाशांना भारताने इटलीला जाण्याची परवानगी दिली होती"...गोऱ्यांच्या गुलामगिरीची मानसिकता अजून गेलेली नाही.. परशुराम - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:36 PM IST माननीय "मौन" मोहन, तुम्हाला निर्णय अमान्य असून काय फायदा? तुमच्याच नतद्रष्ट सरकारने त्यांना इटलीला पाठवून दिले त्यानी गुन्हा करून सुद्धा. कृपा करून आता या सत्तेवरून पायउतार व्हा नाहीतर ते काम आम्ही येत्या निवडणुकीमध्ये करूच.
परशुराम - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:36 PM IST माननीय "मौन" मोहन, तुम्हाला निर्णय अमान्य असून काय फायदा? तुमच्याच नतद्रष्ट सरकारने त्यांना इटलीला पाठवून दिले त्यानी गुन्हा करून सुद्धा. कृपा करून आता या सत्तेवरून पायउतार व्हा नाहीतर ते काम आम्ही येत्या निवडणुकीमध्ये करूच.
राजे - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:34 PM IST भारता मध्ये जेवढे "इटालीयन" असतील त्यांना अटक करून फोडून काढा. आणी देशातून हाकलून द्या. ते जातील मग बोंबलत इटली ला. आणी त्यांना जाताना सांगा पुन्हा भारतात यायचा असेल तर येताना त्या गुन्हेगारांना घेऊन या. मोकळ्या हाताने याल तर सक्त मजुरिच मिळेल.
संजय - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:29 PM IST मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना किती लाख देणार ते बोला आणि मिटवून टाका.दुसरं काय करणार हे नेभळ्ट सरकार
मनीष - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:24 PM IST सोनिया गांधीला कर म्हणाव आता हस्तक्षेप !!!!
बगुनाना - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:23 PM IST अहो सर परंतु मेडम ची पूर्व परवानगी असणे गरजेचे आहे असले निर्णय घेण्यासाठी
Sanjay - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:17 PM IST मनमोहनसिंग म्हणे आम्हाला अमान्य( रोबोट बोलला): हो पण तुमचे ऐकतंय कोण.....कोण विचारतय तुम्हाला ....?
Common Man of India - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:14 PM IST दोन खलाशांनि मतदान केले नसते तर इटलीमध्ये सरकार स्थापन झाले नसते का ? त्या खलाशांना भारत सरकारनि का पाठवले ? आता बसा x @x @ निषेध करत ..... मेरा भारत महान !!!!!
.govind - मंगळवार, 12 मार्च 2013 - 12:58 PM IST गाढव सरकार सोनिया मुळे हे सर्व झाले . त्यांना सोडलेच कशाला .आता बोंबलून काय उपयोग

No comments:

Post a Comment