Total Pageviews

Saturday 10 November 2012

पाकिस्तानशी हिंदुस्थानने क्रिकेट खेळावे काय

पाकड्या अतिरेकी कसाबला एक मच्छर चावला आणि त्यासडेंग्यू नावाचा आजार जडला. त्या मच्छराच्या मर्दपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
मच्छरांचे शौर्य
पाकिस्तानशी हिंदुस्थानने क्रिकेट खेळावे काय? हिंदुस्थानची कडवट देशाभिमानी जनता ओरडून सांगत आहे, ‘नाही! पाकिस्तानशी क्रिकेट आम्हाला कदापि मंजूर नाही!’ पण देशाचे दुर्दैव असे की, त्यांना देशाभिमान आणि धर्माभिमान नसलेले राज्यकर्ते लाभले आहेत. कुणी एक आरपीएन सिंग नावाचा गृहराज्यमंत्री आहे. त्याने जाहीर केले आहे, ‘पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने होणारच. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आम्ही कडक सुरक्षा देऊ!’ मुंबईत राष्ट्रवादीचा कुणी नवाब मलिकही त्याचे सिलिंडर मोकळे करीत म्हणाला, ‘पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने व्हायलाच पाहिजेत!’ तिकडे भाजपच्या मुख्तार अब्बास नक्वीनेही मगखेळात राजकारण आणू नये अशी टिचकी वाजवून स्वत:च्या भाजपचेच हसे करून घेतले. जम्मू-कश्मीरचा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लानेही पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी क्रिकेट खेळावे असे सुचविले आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही यापाकिस्तानी क्रिकेट डिप्लोमसी स्वत:चे चांदतारे तोडले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे सामने हिंदुस्थानात होणारच असे सांगून त्यांची सेवा पाकचरणी रुजू केली आहे. ‘आपल्या देशात येणार्‍या इतर देशांतील खेळाडू आणि कलाकार यांची जबाबदारीही आपली असते. त्यांना संरक्षण देण्याचे कामही आपलेच आहे,’ अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. काय हो शिंदे, परकीय खेळाडू कलाकारांना संरक्षण देण्याचे काम जर तुमचे आहे तर ज्या देशाचे गृहमंत्री म्हणून तुम्ही खुर्ची उबवीत आहात त्या हिंदुस्थानी नागरिकांना संरक्षण देण्याची जबाबदारी कुणाची आहे? या देशातील जनतेच्या जीविताचे आणि मालमत्तेचे पाक दहशतवाद्यांपासून रक्षण करण्याचे काम तुमचेच आहे ना? मग ते का होत नाही? पुन्हा ते अफजल गुरू, कसाब, तो अबू जिंदाल या सर्वांना तुम्ही जे खास संरक्षणात जिवंत ठेवले आहे ती देखील तुमची जबाबदारीच म्हणायची! नाही तरी गुरू, कसाब, जिंदाल हेदेखीलकलाकार
आहेत, दहशतवादी हल्ल्याचीकला त्यांनी या देशात रक्तामांसाचा चिखल करून दाखवून दिली आहे आणि हे सर्व पाकिस्तानातूनच आले आहेत. तेव्हा तुमच्या या कामगिरीसाठी तुम्हालानिशान--पाकिस्तान किंवाऑर्डर ऑफ पाकिस्तान किताब देऊन सन्मानच व्हायला हवा. एकंदरीत काय, पाकड्यांना विरोध करणारी देशाभिमानी जनता मूर्ख आणि पाकिस्तानचीचाटूगिरी करणारी ही अवलाद तेवढी शहाणी. पाकिस्तानच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्याचीच तयारी सुरू आहे. आम्ही एका प्रखर देशाभिमानी विचाराने पाकड्यांबरोबर क्रिकेट खेळण्यास विरोध केला आहे. यात आम्ही राजकीय फायद्या-तोट्याचे गणित कधीच पाहिले नाही. मुंबईवर२६/११ सारखा भयंकर हल्ला झालेला असताना आणि त्यात सांडलेले रक्त निरपराध्यांच्या किंकाळ्या ताज्या असताना त्याच सैतानांशी क्रिकेट खेळताना तुम्हाला लाजा नाही वाटत? एकातरी क्रिकेटपटूचा देशाभिमान जागा होऊन त्याने तडफेने उठून जाहीर का करू नये की, ‘‘नाही खेळणार आम्ही त्या पाकड्यांबरोबर क्रिकेट. ज्यांनी आमच्या भारतमातेवर वारंवार निर्घृण हल्ले केले आहेत, मुंबई रक्ताने भिजवली, संसदेस तडे दिले त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणे चुकीचेच आहे.’’ मात्र क्रिकेट संघातील एकातरी हिंदुस्थानी खेळाडूच्या धमन्यांत सच्चे राष्ट्रभक्तीचे रक्त सळसळत असेल तर शपथ. सगळेच पैशाला पासरी पैशासाठी हिरव्यांपुढेही हातपाय पसरी. सीमेवर जवानांनी शहीद व्हायचे. पाकड्यांच्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध्यांनी मरायचे. तुकाराम ओंबळेसारख्यांनी प्राणाची बाजी लावून शहीद व्हायचे आणि त्याच भूमीत क्रिकेटपटू म्हणवून घेणार्‍याव्यापार्‍यांनी देशाभिमानाची ऐशी की तैशी करीत खेळाच्या नावाखाली पाकड्यांशी एकप्रकारे जुगाराचा डावच लावायचा. या मंडळींना हाती तिरंगा धरण्याचा अधिकार खरोखरच आहे काय? तो रक्तबंबाळ तिरंगाही
धाय मोकलून रडत असेल. सीमेवरील जवानांनीच आता या पाकड्यांशी क्रिकेट खेळणार्‍यांचा धिक्कार करून या मंडळींच्या खोट्या प्रतिष्ठेचा बँडबाजा वाजवायला हवा. ते गृहराज्यमंत्री सिंग काय किंवा गृहमंत्री सुशीलकुमार काय, यांना या पाकड्यांबद्दल एवढा पान्हा का फुटावा? काय तर म्हणे पाकड्यांना संरक्षण देऊ! कोण लागतात तुमचे ते पाकडे? एवढाच तुम्हाला त्यांचा पुळका आला असेल तर पाकिस्तानात चालते व्हा. असे संरक्षण देशाला मिळाले असते तर संसदेवरही हल्ला झाला नसता आणि मुंबईत कसाब घुसला नसता. ओमर अब्दुल्ला म्हणतो, पाकिस्तानशी क्रिकेट खेळूया, संबंध सुधारतील. मग काय रे कश्मीरच्या नासक्या सफरचंदा, तुझे तुझ्या कुटुंबाशी संबंध बिघडून प्रकरणतलाकपर्यंत का गेले? संबंध बिघडताच बंगल्याच्या हिरवळीवर किक्रेट खेळायचे संबंध सुधारले असे जाहीर करायचे. क्रिकेटमध्ये इतकी जादू आहे ना? मग ममता बॅनर्जीबरोबर क्रिकेटचा सामना लावा आणि सरकारमधील बिघडलेले संबंध या क्रिकेटमुळे सुधारत असल्याचा दाखला द्या. जवानांच्या हाती बंदुका आहेत त्या पाकड्यांबरोबर लढण्यासाठी. त्या बंदुका म्हणजे बॅट आणि बॉम्ब म्हणजे बॉल नव्हेत. या देशातील राजकारणात नामर्द मच्छरांची पैदास वाढली आहे त्या मच्छरांनी सारा देश नामर्द बनवला आहे. म्हणूनच पाकड्या अतिरेकी कसाबला एक मच्छर चावला आणि त्यासडेंग्यू नावाचा आजार जडला. त्या मच्छराच्या मर्दपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. यापुढे जे राज्यकर्ते क्रिकेटच्या निमित्ताने पाकड्यांची चाटूगिरी करतील त्यांच्या जिभेसही या मच्छराने डंख मारून राष्ट्रकार्य करावे. कसाबला चावून मर्दानगी दाखविणार्‍या याडेंग्यू मच्छरासभारतरत्न देण्याची शिफारस लोकांनीच आता केली आहे. काय हो पाकड्यांच्याचाटू मंडळींनो, मच्छर मारू नका, पण निदान हिजड्यांप्रमाणे टाळ्या तरी वाजवा

No comments:

Post a Comment