Total Pageviews

Saturday 15 September 2012

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रोचे ) शंभरावे प्रक्षेपण
अवकाश क्रांतीचा महत्वाचा टप्पा
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने १० स्प्टॆमबरला एक इतिहास निर्माण केला . सतीश धवन अवकाश केंद्रावरून सकाळी पीएसएलव्ही हे अवकाशयान फ्रान्स आणि जपान यांचे उपग्रह घेऊन अवकाशात झेपावले आणि भारताच्या अवकाशझेपेची शंभरी साजरी झाली . ६३ उपग्रह आणि ३७ रॉकेट यशस्वीपणे अवकाशात धाडून आपण हे शतक साजरे केले आहे . १९७५ सालामध्ये भारताचा आर्यभट हा उपग्रह अवकाशात गेला ; परंतु त्यावेळी आपल्याला रशियाच्या रॉकेटची मदत घ्यावी लागली होती . काल आपल्या पीएसएलव्हीने अवकाशात झेप घेऊन फ्रान्स आणि जपान या देशांचे दोन उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले . यापैकी फ्रान्सचा उपग्रह ७२१ किलो वजनाचा होता आणि अवकाशविज्ञानामध्ये भारत किती दमदार पाऊले टाकत आहे , हेच दाखवून दिले . १९७५ ते १९८८ या काळात आपण १५ उपग्रह अवकाशात पाठवू शकलो होतो . मात्र १९९० ते सप्टेंबर २०१२ या काळात आपण ५२ उपग्रह यशस्वीपणे अवकाशात पाठविले . याच काळात आपण ' चांद्रयान ' मोहीम यशस्वी केली आणि यंदाच्या १५ ऑगस्टला पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांनी ' मंगळमोहिमे ' ची घोषणा केली . मंगळमोहीम ही अर्थातच खूपच अवघड आहे .
देशाची प्रगती विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीवर ठरणार येत्या काळात कोणत्याही देशाची प्रगती ही विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीवर ठरणार आहे. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तुमच्या देशाचे स्थान कुठे आहे, यावरच त्याचे जागतिक व्यवहारातील महत्त्व ठरणार आहे. त्यामुळेच भारताच्या या शंभराव्या अवकाश मोहिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा पाया हाच अन्य सर्व क्षेत्रातील प्रगतीचा आधार असल्यामुळे अवकाश तंत्रज्ञानाबरोबरच जैविक विज्ञान, आरोग्य विज्ञान, कृषि विज्ञान या क्षेत्रातही भारतात नवनवे शंशोधन चालू आहे. भारतासारख्या गरिबांची मोठी संख्या असलेल्या देशाने महागड्या अवकाश मोहिमा घ्याव्यात का हा एक कायम विचारला जाणारा प्रश्न आहे. भारताची शंभरावी अवकाश मोहीम ही पूर्णता व्यापारी स्वरूपाची होती. याचा अर्थ या मोहिमेतून भारताने आर्थिक कमाईही केली आहे. जगात अनेक अवकाश संस्था व्यापारी उड्डाणे हाती घेतात, पण ती महागडी असल्यामुळे अनेक देशांचीही त्यांच्या अवकाश कार्यक्रमांसाठी भारताला पसंती आहे. भारत आता अन्य देशांसाठी उपग्रहे बनविण्याचेही काम हाती घेत आहे. अर्थात या कार्यक्रमाने अदय़ाप पुरेसा वेग घेतलेला नाही, कारण भारताचीच उपग्रहांची गरज मोठी आहे व ती भागविण्यासाठी अन्य देशांची मदत घ्यावी लागते. अवकाश तंत्रज्ञानाचा वापर आता संरक्षण क्षेत्रातही सुरू झाल्यामुळे या क्षेत्रातील परावलंबित्व आता फार काळ ठेवून चालणार नाही. विशेषत: क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानात मोठय़ा प्रमाणात सतत संशोधन चालू आहे .क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र आणि हेरगिरी करणारे उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे ही तातडीची गरज आहे. अशा तंत्रज्ञानावरील खर्च अफाट असला तरी त्याला पर्याय नसतो, त्यामुळेच भारताला येत्या काळात व्यापारी उड्डाणांना प्राधान्य दय़ावे लागणार आहे. भारताने मंगळ व चांद्र मोहीम हाती घेण्याची घोषणा केली आहे. बाहय़अवकाशात फक्त बड्या राष्ट्रांचेच वर्चस्व राहू देणे भारतासारख्या मोठय़ा देशास परवडणारे नाही, त्यामुळे या मोहिमांचा श्रीगणेशा होतो आहे ही सर्व भारतीयांसाठी समाधानाची गोष्ट आहे.भारताला विकासाच्या वाटा मोकळ्या करून देण्यात या मोहिमेचे सर्वाधिक योगदान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भारतात माहिती-तंत्रज्ञान क्रांतीची मशाल या मोहिमेनेच पेटविली. त्या काळात टीव्ही, इंटरनेट यांसारख्या सेवा नव्हत्या. त्यामुळे भारताला रेडियोवरच समाधान मानावे लागत होते. पण, इस्रोने या सेवा भारताला प्रदान करण्यासाठी अंतराळात अनेक उपग्रह सोडले. त्यामुळेच आज संपूर्ण भारतीय या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत, हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. केवळ माहिती आणि तंत्रज्ञानच नव्हे, तर पर्यावरण, हवामान, कृषी, भूकंप, त्सुनामी यांसारख्या क्षेत्रांचीही माहिती क्षणात मिळवून देणारे स्वदेशी तंत्रज्ञान आमच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आणि त्यात यश मिळविले. प्रामुख्याने अमेरिका, चीन आणि रशिया या देशांकडे असलेल्या संरक्षणविषयक आणि टेहळणी करणारे उपग्रह असल्यामुळे भारतालाही अशा टेहळणी उपग्रहांची गरज भासू लागली.
केंद्रबिंदू चीनचा अंतराळ कार्यक्रमआज चीनने आपले अनेक उपग्रह अंतराळात सोडले आहेत. त्यात सर्वांत भीषण म्हणजे अंतराळातच उपग्रहाने अन्य देशाच्या उपग्रहाचा वेध घेऊन तो नष्ट करणारा उपग्रह! या उपग्रहाने अंतराळ विज्ञानापुढे एक मोठेच आव्हान उभे केले आहे. भारताच्या सीमेजवळ चीनच्या लष्कराची जमवाजमव, पाकिस्तानसोबत चीनने वाढविलेले संबंध, नेपाळला चीनकडून मिळणारी आर्थिक आणि अन्य रसद, म्यानमारमध्ये चीनने स्थापित केलेले हवाई आणि नाविक तळ या सार्‍या बाबी भारतासाठी धोकादायक आहेत. या सर्व देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताचा अंतराळात असलेला उपग्रह कार्यरत आहे. आज भारताचे शंभरावे प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर आपला केंद्रबिंदू चीनच होता
चीन हा कमालीचा महत्त्वाकांक्षी देश आहे . आर्थिक आघाडीवर त्याने प्रचंड यश मिळविले आहे .विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही त्याने चांगली प्रगती केली आहे आणि अवकाशावरही आपलेच स्वामीत्व असावे अशी त्याची आकांक्षा आहे . आगामी काळात अवकाशावरील स्वामीत्व हा कळीचा मुद्दा बनणार आहे . चीन त्यासाठी धडपडतो आहे आणि आपणही गाजावाजा करता त्याच दिशेने वाटचाल करायला पाहीजे . काल पाठविलेल्या दोन उपग्रहांसह आपण आतापर्यंत परदेशांचे २९ उपग्रह अवकाशातील नियोजित कक्षेत सोडले आहेत . त्यातून आपल्याला आवश्यक असलेले परकीय चलन मिळते आहेच ; परंतु प्रत्येक मोहिमेमध्ये तांत्रिक प्रगतीचे एक पाऊलही आपण पुढे टाकत आहोत . २००८ सालामध्ये एकाचवेळी १० उपग्रह अवकाशात घेऊन जाण्यात आपण यश मिळविले होते , ही गोष्ट अवकाशविज्ञानात आपण करीत असलेली प्रगतीच ठळकपणे अधोरेखित करणारी आहे . या प्रगतीच्या ओघात विकसित होणारे तंत्रज्ञान आपल्याला वैद्यकीय क्षेत्रापासून ते अपंगांना लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीपर्यंत अनेक गोष्टींमध्ये कामास येते . संपूर्ण देशाचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्य आशादायी आहे , असा विश्वास मिळतो . कालच्या यशाचे तेच महत्त्व आहे .ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी हजारो शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम घेतले. नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले. क्रायोजेनिक इंजीन मिळण्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेता भारतातच हे इंजीन तयार केले. नवनवीन इंधनांचा प्रयोग केला आणि आपली ही मोहीम पुढेच नेली. त्यामुळेच आज या दिवशी या मोहिमेत आपले योगदान देणारे सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत.
 .

No comments:

Post a Comment