Total Pageviews

Tuesday 3 January 2012

'चीन भारतावर आक्रमण करणार नाही - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग

http://www.esakal.com/eSakal/20120103/5219573400604316785.htm
स्मरण १९६२ च्या घोडचुकांचे..! (भाग ३)
ब्रिगेडिअर हेमंत महाजन
आम्हाला सैन्याची गरज नाही. पोलिसदल पुरेसे आहे - पंडित नेहरू

'चीन भारतावर आक्रमण करणार नाही - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग

९६२ मधील चिनी आक्रमणाचे यंदा पन्नासावे वर्ष सुरू आहे. या युद्धापासून आपण काय बोध घेतला? सध्या आपले चीनशी हिंदी-चिनी भाई भाई संबंध आहेत, की चीनशी पुन्हा एकदा लढाई होणार आहे? तसे झाल्यास आपले सरकार व लष्कर कितपत कार्यक्षम आहे? वास्तविक पाहता १९६२ च्या युद्धात केवळ १० टक्के सैन्याने भाग घेतला होता. हवाईदल व नौदलाचा अजिबात वापर केला नव्हता. गेल्या ७-८ वर्षांत चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर होत आहे. चिनी सैन्याचे रस्ते आपल्या सीमेपर्यंत भिडले आहेत. पण आपले रस्ते आजही सीमेपासून ५० ते ६० किलोमीटर अलिकडेच बंद झाले आहेत. आपले पर्यावरण मंत्रालय रस्ते बांधायला परवानगीच देत नाही.

No comments:

Post a Comment