Total Pageviews

Friday 13 May 2011

CRICKETERS PLAY IPL & MISS WEST INDES TOUR

कशाला बघायची 'आयपीएल'? त्यात आता काही 'गेम' उरलेलाच नाहीय. या क्रिकेटने आपली सगळी वर्ल्डविनर टीम विस्कटून टाकली. त्यामुळे यातल्या संघांना पाठिंबा देताच येत नाही.. हे सगळं मिसिंग आहे या क्रिकेटमध्ये,' क्रिकेटवेडे नाना पाटेकर यंदाच्या 'आयपीएल'चं असं थेट 'एन्काउण्टर' करतात.

नाना म्हणजे हाडाचे क्रिकेट रसिक समजले जातात. मग सध्याच्या आयपीएल सीझनबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

यंदाचं आयपीएल मी अजिबात बघत नाहीए. खरं सांगायचं तर सध्या सुरू असलेले आयपीएल सामने मला अजिबात आवडतही नाहीत. या मॅचेसमध्ये काही राम राहिलेला नाही. कारण जेव्हा आयपीएलची मुंबई, पुणे, दिल्ली अशी कुठलीही मॅच पहायला बसतो, तेव्हा त्यात मला कुठेही आपला देश दिसत नाही. दिसतं ते फक्त विखुरलेपण. त्यात काय आनंद आहे? क्रिकेटच्या संघाकडे बघताना त्याला आपला देश हणून मनापासून पाठिंबा द्यावासा वाटला पाहिजे. म्हणूनच र्वल्ड कप पाहात असताना वेगळा उत्साह होता. आपण जिंकावं असं थेट हृदयापासून वाटत होतं. इथं आपण असं कोणाला हणावं. असं क्रिकेट पहायला मला नाही आवडत.

सध्या आयपीएल सीझन रंगात आहे आणि याच आठवड्यात तुमचा शागीर्द येतोय. क्रिकेटपुढे सिनेमा प्रदशिर्त करायला बडेबडे घाबरतात...

माझा या असल्या गोष्टींवर विश्वास नाही. मगाशीच सांगितल्याप्रमाणे सिनेमा चांगला असेल, तर तो प्रदशिर्त केल्यावर कधीही आणि कुठल्याही परिस्थितीत पाहिला जातो. मग आयपीएल काय आणि इतर सिनेमे काय

No comments:

Post a Comment