Total Pageviews

Wednesday, 5 April 2017

गरज तरुणांच्या प्रबोधनाची- आजचा तरुण रामासारखा तर दूरच, पण माणसासारखा पण व्यक्त होत नाही याची खंत आहे. समाजातील वाढते अपराध, तरुणांमधील नशेची वृत्ती, स्त्रियांवरील अत्याचारच नव्हे, तर लहान मुलींवर लैंगिक आक्रमण, अपहरण, चोरी, दरोडे, खून, मारामार्या् यांचे वाढते प्रमाण, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमाने वाढलेले सायबर अपराध, त्यातून घडणार्याी उथळ प्रेमकहाण्या व नंतर स्वार्थापोटी केलेल्या वर्तनाचा परिणाम हत्या, आत्महत्या यात दिसून येतो.


April 6, 2017 0 हिंदू नववर्षाचा जल्लोष विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अजूनही काही ठिकाणी सुरूच आहे. जागोजागी गुढ्या, तोरणे, रामाच्या व देवीच्या देवळांची सजावट, देखावे, कीर्तन, भजन, प्रवचन, रामायणपाठ, रामरक्षा प्रत्येकजण आपापल्या परीने आपली श्रद्धा प्रभू रामचंद्रांच्या ठायी आणि सीता म्हणजेच देवी, म्हणजेच शक्तिरूपिणीच. हा जागर अजूनही देवी मंदिरांमधून होताना दिसत आहे. याच अनुषंगाने यवतमाळ येथील अवधूत आखाड्यात सलग तीन दिवस, रोज ९ ते १० तास १५० कलावंतांनी झटून संस्कार भारतीच्या ११ हजार चौरसफूट रांगोळीचा विक्रम गाठला. अरुण लोणारकरांनी १९ तास अथक परिश्रम घेऊन कोदंडधारी रामाचे चित्र अप्रतिम रेखाटले. त्याच रांगोळीत आणखी काही देखावेही चित्रांकित केले. पाणी वाचवा, बळीराजा चेतना, रक्तदान महादान यासारख्या ज्वलंत सामाजिक समस्यांवरील बोलके देखावे बघून कलाकारांच्या कलेबरोबरच यांचं सामाजिक भान व संवेदनशील वृत्ती यांचा आविष्कार होत होता. देखाव्यांमधले हे संदेश खरंच वास्तवात उतरले तर? इथेच रांगोळीतल्या रंगांची जीवनातील रंगांशी रंगसंगत कशी करावी, ते मात्र कळत नाही. समाजाचे प्रबोधन करणारा अतिशय उत्तम असा हा उपक्रम राबविला गेला. दर्शनासाठी अलोट गर्दी, देवळादेवळातून चाललेली संस्कृती टिकवण्याची धडपड, वक्त्यांच्या माध्यमातून झरणारं ज्ञानामृत, मात्र ऐकणारा श्रोतावर्ग कमीअधिक प्रमाणात सुजाण, पापभिरू, प्रामाणिक व जागरूक. या सगळ्या कार्यक्रमातून एक गोष्ट नेहमीच जाणवते ती म्हणजे समाजाची दशा आणि दिशा ठरवणारे तरुण कुठेच आढळत नाहीत. फार तर मिरवणुकीपुरते, बाईक रॅलीपुरते, ढोल-ताशा वाजवण्यापुरते काहीसे दिसतातही, पण संख्या फारच थोडी असते. तरुण पिढीला संस्कार व संस्कृतीचं महत्त्व पटवून देण्यात मागील पिढी असफल झाली, असेच चित्र दिसते. पर्यावरणाचेच प्रदूषण झाले आहे असे नाही; वैचारिक प्रदूषण झपाट्याने झाले असल्याचे समाजातील घडणार्या् घटनांवरून दिसून येते. आजचा तरुण रामासारखा तर दूरच, पण माणसासारखा पण व्यक्त होत नाही याची खंत आहे. समाजातील वाढते अपराध, तरुणांमधील नशेची वृत्ती, स्त्रियांवरील अत्याचारच नव्हे, तर लहान मुलींवर लैंगिक आक्रमण, अपहरण, चोरी, दरोडे, खून, मारामार्यां यांचे वाढते प्रमाण, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमाने वाढलेले सायबर अपराध, त्यातून घडणार्याप उथळ प्रेमकहाण्या व नंतर स्वार्थापोटी केलेल्या वर्तनाचा परिणाम हत्या, आत्महत्या यात दिसून येतो. एका सर्वेक्षणात गेल्या १५ वर्षांत ७९,१८९ तरुण-तरुणींनी प्रेमाच्या विफलतेतून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ७ मिनिटाला होणार्याे हत्या, सडकेवर वाहनांच्या अफाट व अचाट उपयोगाने होणार्यार घटना, दुर्घटना या एकप्रकारे हत्याच आहेत. गेल्या एका वर्षात देशात दीड लाख लोक विविध अपघातात मृत्युमुखी पडले. हजारो कायमचे अपंग झाले. कुणावर कुठलंच, कोणाचंच नियंत्रण नसल्याचेच निदर्शनास येत आहे. आज गरज आहे तरुणांच्या प्रबोधनाची, गरज आहे त्यांना सन्मार्गावर नेण्याची, गरज आहे त्यांना स्वत:च्या शक्तीची जाणीव करून देण्याची, गरज आहे समाजातील मुख्य धारेत त्यांना जोडण्याची आणि हे प्रबोधन कृतिशील हवं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. हे काम पालक उत्तम रीत्या करू शकतात. गरज आहे, आपल्या युवा मुलांंना सुसंस्कारित करण्याची. आधीच्या काळी शिक्षक हे विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करायचे. पण, तो काळ आज राहिलेला नाही. आपण रेखाटलेलं सुंदर चित्र प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर, रामराज्याची कल्पनाच असून चालणार नाही; वानरांना, रामाच्या सेनेला त्यांच्यातील हनुमंताच्या शक्तीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. जीवनाच्या, समाजातील समस्यांच्या खार्याा पाण्यातून, या भवसागरातून सुखरूप निघायचं असेल तर प्रत्येक वानराने राम नावाचा दगड सागरात स्वकष्टाने उचलून श्रद्धेने टाकायला हवा आहे. तेव्हाच हा सागर पार करण्याचे सामर्थ्य या समाजाला प्राप्त होईल. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीनुसार प्रयत्न योग्य दिशेने झाले तरच आणि फक्त तरच वाल्याचा वाल्मीकी होऊ शकतो.

Tuesday, 4 April 2017

काश्‍मीरमधील दगडांची परिभाषा ओळखा-विजय साळुंके


फुटीरतावाद्यांच्या भाषेतच बोलणारे- वागणारे लोक काश्‍मीरमध्ये गेल्या तीस वर्षांत वाढले आहेत. धर्मसंस्थेचे अवडंबर माजवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जगात अनेक ठिकाणी धर्म, वंश, वर्ण हे विद्वेष, विध्वंस व कलहाचे पर्यायवाची शब्द बनले आहेत. ज्ञात इतिहासात नैसर्गिक आपत्तीपेक्षा वरील कारणांनी मनुष्यजातीचा अधिक विनाश केलेला दिसतो. फुटीरतावाद्यांच्या भाषेतच बोलणारे- वागणारे लोक काश्‍मीरमध्ये गेल्या तीस वर्षांत वाढले आहेत. धर्मसंस्थेचे अवडंबर माजवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जगात अनेक ठिकाणी धर्म, वंश, वर्ण हे विद्वेष, विध्वंस व कलहाचे पर्यायवाची शब्द बनले आहेत. ज्ञात इतिहासात नैसर्गिक आपत्तीपेक्षा वरील कारणांनी मनुष्यजातीचा अधिक विनाश केलेला दिसतो. एकच धर्म, संस्कृती व भाषा असलेला समाज शोषण, अत्याचार, अन्याय व भ्रष्टाचारमुक्त असतो, असे म्हणण्याचा पुरावा कोठेच दिसत नाही, तरीही धर्म, वर्ण आदींचा आधार घेत हितसंबंधी द्वंद्व टिकवून धरण्याचा प्रयत्न करीत असतात. मध्ययुगात ख्रिस्ती आणि मुस्लिम यांच्यात प्रदीर्घकाळ चालेलल्या धर्मयुद्धाची नवी आवृत्ती युरोप, अमेरिकेतच नाही, तर साम्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या रशिया, चीनमध्येही आकार घेताना दिसते. भारतीय उपखंडात बाराव्या शतकात आलेल्या इस्लामची परिणती एकोणिसाव्या शतकात भारताच्या फाळणीत झाली; पण प्रश्‍न संपला नाही. जम्मू-काश्‍मीरमधील मुस्लिम बहुसंख्याकांचा नव्या परिस्थितीशी एकरूप होण्यास असणारा विरोध हा पाकिस्तानच्या तेथील हस्तक्षेपापेक्षाही मोठा व निर्णायक मुद्दा आहे. हे वास्तव आपल्याकडील उदारमतवादी व धर्मनिरपेक्षतेचे समर्थक विचारवंत व राजकीय पक्षांनी अजूनही पुरतेपणी लक्षात घेतलेले दिसत नाही. जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींच्या सरकारपर्यंत सर्वांचे काश्‍मिरी मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यातही मोदींचे काम अधिक कठीण आहे. कारण ते ज्या पक्षाचे व त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैचारिक वारसदार आहेत, त्याने मुस्लिमांचे भारतीय उपखंडातील राजकीय अस्तित्व स्वातंत्र्याच्या आधीपासूनच मान्य केलेले नाही. ज्या धर्माचे संस्थापक भारतीय भूमीवर जन्मलेले नाहीत, त्या धर्माच्या अनुयायांच्या निष्ठांविषयी या परिवाराने शंका घेतली आहे. फाळणीनंतरही भारतात जम्मू-काश्‍मीरसह सुमारे पाच कोटी मुस्लिम राहिले. त्यांना दुय्यम नागरिकत्व द्यावे, या भूमिकेपासून ते मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावा, या मागणीपर्यंत मजल गेल्याने काश्‍मीरमधील मुस्लिमांना मुख्य प्रवाहाबाबत पहिल्यापासूनच संशय होता. नेहरू-गांधींच्या सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसमध्येही बहुसंख्याक हिंदूंचे प्राबल्य असल्यामुळे कारस्थानी ब्रिटिश व बॅ. मोहंमद अली जीनांच्या फूटपाड्या भूमिकेला काश्‍मिरी मुस्लिमांनी उघडपणे वा थेट विरोध केला नाही. उलट काश्‍मिरींचे तेव्हाचे सर्वोच्च नेते शेख अब्दुल्ला भारत आणि पाकिस्तानच्या भांडणात मतलबी भूमिका बजावत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे राजकारण खेळत होते. केंद्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन झाल्यानंतर काश्‍मीरमधील विभाजनवादीच नव्हे, तर कुंपणावरील प्रादेशिक पक्ष व तेथील सिव्हिल सोसायटीही भारतातील विलीनीकरणाविषयीची संदिग्धता अधोरेखित करू लागली. काश्‍मीर खोऱ्यातील विभाजनवादाला १९८७ मधील निवडणुकीतील कथित गैरप्रकाराने निर्णायक वळण लागले. नंतर १९९० मध्ये हिंदू पंडितांना हुसकावून लावण्यात आल्यावर काश्‍मीर खोऱ्याचे स्वातंत्र्य वा पाकिस्तानातील विलीनीकरण सोपे होईल, असा विश्‍वास दृढ झाला. पंजाबात १९८२ नंतरची दहा वर्षे ‘खलिस्तान’ची चळवळ झाली. त्यात तीस हजारांवर लोक मारले गेले; परंतु पंजाबात शिखेतरांची संख्या चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक असल्याने; तसेच अकालीतर राजकीय पक्ष, प्रशासन, पोलिस दलांमध्ये खलिस्तानवाद्यांना संपूर्ण समर्थन मिळू शकले नाही. काश्‍मीर खोऱ्यात तशी स्थिती नाही. अली शाह गिलानीसारख्या फुटीरतावाद्याच्या भाषेतच बोलणारे- वागणारे लोक काश्‍मीरमध्ये गेल्या तीस वर्षांत वाढले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तीन-साडेतीन युद्धांनीही काश्‍मीरप्रश्‍न सुटला नाही. अशा परिस्थितीत पॅलेस्टिनींच्या ‘इंतेफाद’सारख्या जनतेच्या उठावाच्या मार्गाची चाचपणी २०१० पासून सुरू आहे. तरुणांच्या दगडफेकीतून त्याची चाचणी घेतली जात आहे. १९९० नंतर जन्मलेल्या पिढीने हिंसाचार आपल्या श्‍वासाइतकाच अनुभवला असल्याने ती नोकऱ्या, ‘पॅकेज’चे आमिष दाखवून वश होणार नाही. भारतीय लष्कर वा निमलष्करी दलातील भरतीमध्ये तरुणांच्या मोठ्या प्रतिसादाकडे भाबडेपणाने बघून चालणार नाही. ‘इस्लामिक स्टेट’च्या आत्मनाशी विचारांवर पोसलेले हे तरुण सुरक्षा दलाच्या सेवेत आल्यावर ‘ट्रोजन हॉर्स’ ठरू शकतात. काश्‍मीर खोऱ्यातील विद्रोहाचे अनेक टप्पे आहेत. २०१० मध्ये दगडफेकीच्या अस्राचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. पाकिस्तानच्या झेंड्याबरोबरच ‘इस्लामिक स्टेट’चे झेंडेही नाचविण्यात येऊ लागले. पश्‍चिम आशियात या विचारसरणीने आपल्याच धर्मबांधवांविरुद्ध जिहाद पुकारला. काश्‍मिरातही ‘खिलाफत’ प्रस्थापित करणे, हे दिवास्वप्न असले, तरी धर्मांधतेने त्यांची विचारशक्ती संपविली आहे. मुस्लिम समाजावर मुल्ला मौलवी व त्यामागील शक्तींचे संपूर्ण नियंत्रण असते. इराणमध्ये सर्वशक्तिमान शाह महंमद रझा पहलवी यांची राजेशाही मशिदीच्या माध्यमातूनच उलथवण्यात आली. धार्मिक स्थळांच्या अशा वापराचे धोके तुर्कस्तानातील कमाल पाशाने ओळखून मुल्ला मौलवीवर नियंत्रणाचे दोर आवळले होते. शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळच्या राजकीय भाष्यावर त्याने बंदी घातली होती. काश्‍मीर खोऱ्यातील मशिदीमधून जो भारतविरोध जोपासला गेला, त्याला सौदी अरेबियातील वहाबींनी पैसा पुरविला होता. काश्‍मीरमधील विभाजनवादात तेथील मुस्लिम नेत्यांची स्वतंत्र राहण्याची ऊर्मी, त्याला सौदी पैसा व पाकिस्तानी दहशतवादी यंत्रणेचे साह्य यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. बुऱ्हाण वणीचा उत्तराधिकारी ‘आझादी’ ऐवजी धर्माच्या नावाने दगड हातात घेण्याचे आवाहन करतो, या बदलाची नोंद घेतली पाहिजे. देशाच्या इतर भागांत भाजपचे बळ वाढत जाईल, तसतसे या दगडांचा आकार वाढत जाऊ शकतो. तेव्हा सौदीच्या वाळवंटात निर्माण झालेले ‘मृगजळ’ जगात सर्वत्र थैमान घालीत असताना त्याच्या मुळाशी असलेल्या ‘विकारा’वर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

Shot 9 times, CRPF commandant Chetan Kumar Cheetah talks again

Apr 5, 2017, 08.36 AM IST HIGHLIGHTS Chetan Kumar Cheetah had slipped into deep coma two months ago He was hit by at least nine bullets during a gun battle with terrorists in Jammu and Kashmir RELATED VIDEOS Shot 9 times, CRPF commandant Chetan Kumar Cheetah talks againShot 9 times, CRPF commandant ... J&K: Terrorists attack CRPF convoy, 7 injuredJ&K: Terrorists attack CRPF co... Passing-out parade of CRPF dogs held in BengaluruPassing-out parade of CRPF dog... Burhan Wani's successor Zakir Musa asks protesters to throw stones at security forces for IslamBurhan Wani's successor Zakir ... NEW DELHI: Doctors are describing it as nothing short of a miracle. Chetan Kumar Cheetah, a CRPF commandant who had slipped into deep coma two months ago after being hit by at least nine bullets during a gun battle with terrorists+ in Jammu and Kashmir, is now conscious and talking. Doctors at the AIIMS trauma centre, where Cheetah spent a month in ICU, told TOI on Tuesday that he is fit to be discharged. When he was brought in, the 45-year-old had bullet injuries in his head, the upper limbs were badly fractured and the globe of his right eye had ruptured. "His GCS score, a test to gauge the severity of brain injury, was M3. He was in deep coma. Now his score is M6. He is conscious and all vitals are stable," a doctor said. At least three soldiers and one militant were killed in the encounter in Hajin area of Bandipora district of Kashmir on February 14, where Cheetah got injured. Sources said the terrorists had received prior information about the attack on their hideout. "We are planning to send Cheetah home on Wednesday," Dr Amit Gupta, professor of trauma surgery and critical care at the centre, said the recovery and its pace was no less than a miracle. The CRPF commandant was first taken to military hospital in Srinagar where medications were given to prevent bleeding. However, given the extent of the injuries and his comatose state, it was decided to airlift him to the AIIMS trauma centre. Within 24 hours of admission, surgery was conducted to remove a portion of the skull to reduce intra-cranial pressure. Cheetah was put on heavy antibiotics to reduce infection and his wounds were repeated cleaned, doctors said. "Once he was stable, different teams operated separately to treat the injuries. Ophthalmologists took care of the wound in left eye but the right eye couldn't be repaired; orthopedics worked on the fracture in the limbs while critical care experts planned his antibiotic therapy. But it was not the medical and surgical intervention alone that helped Cheetah spring back to life. His wife, Uma Singh, said the CRPF commandant's penchant for fitness and strong willpower helped too. "He is a very determined person and a fitness freak. I always knew he would recover," she said. Top Comment Salute to Chetan Kumar Cheetah(CKC) the gutsy toughie Commandant CRPF who was shot 9 times but now recovered and talking !His case is one of bravery of the highest order, robust health and very high . Singh, who lives in Delhi, said Cheetah would call him daily at a particular time but on the day of the encounter he didn't, which gave her a premonition that something was wrong. "Later in the day, when I called the control room, just out of anxiety, they told me he was injured," she said. The CRPF commandant has two kids, both of them studying in school, and Singh said they are waiting for dad to return

Bangladeshi radicals find safe haven in West Bengal By ABHINANDAN MISHRA | New Delhi | 2 April, 201Around 3,500 highly radicalised individuals, some of whom owe allegiance to Harkat-ul-Jihadi Al-Islami, have entered India through West Bengal and Ait is West Bengal that is worrying us. Malda, 24 Parganas (North and South), Swarupnagar have gone out of control; there is little we can do there right now. Certain corrupt elements in the BSF, in connivance with the Border Guards Bangladesh have also been helping these infiltrators for a long time now. The number of such infiltrators is likely to be much more than 3,500,” a senior intelligence official


Bangladeshi radicals, Assam, West Bengal, Harkat-ul-Jihadi Al-Islami, Sheikh Hasina, BSF Bangladesh based radicalised elements and terror sympathisers have turned to West Bengal and Assam as their safe haven to escape the anti-terror operations that have been launched by Sheikh Hasina using the country’s elite anti-terror force, Rapid Action Battalion or RAB. The terrorist groups in Bangladesh have come under increasing pressure from the officials after the siege in Dhaka’s Holey Artisan cafe that took place in July last year and left 20 dead. Recently, in an exchange of dialogue between Indian security agencies and Bangladeshi counterparts, the latter told the Indian officials that around 3,500 highly radicalised individuals, some of whom owe allegiance to Harkat-ul-Jihadi Al-Islami, whose chief, Mufti Abdul Hannan, was sentenced to death by the country’s highest court last month and Jamaat-ul-Mujahideen Bangladesh (JMB), have entered India through West Bengal and Assam. However, New Delhi based senior sources with Intelligence agencies said that the number could be higher than 3,500. “It has become very easy for Bangladeshi Muslims to enter India and get a legal document in West Bengal. While the situation is changing in Assam where the security has become more stringent and substantial effort is being made by the government to stop infiltration, it is West Bengal that is worrying us. Malda, 24 Parganas (North and South), Swarupnagar have gone out of control; there is little we can do there right now. Certain corrupt elements in the BSF, in connivance with the Border Guards Bangladesh have also been helping these infiltrators for a long time now. The number of such infiltrators is likely to be much more than 3,500,” a senior intelligence official said. The official stated that the approach of the West Bengal government towards facilitating infiltration has led to a very alarming situation in the state, where illegal Muslim migrants are now fighting for resources with the genuine citizens. “The tension that is prevailing in certain areas of the state is just like in Assam, where the Bodos are fighting the Bangladeshi Muslims. Due to the approval of the political party in power, officials too have turned a blind eye towards infiltration and West Bengal has in the last two-three years become the main point for bringing in fake currency into India, which then is sent to other parts of the country, including Kashmir,” the official said. These radical elements, as per the official sources, are either lying low in West Bengal or have moved to other states like UP and Kerala.

Monday, 3 April 2017

काश्मिरींचे तारणहार April 4, 2017017 गेल्या ४० वर्षांत जम्मू-काश्मीरची ओळख टूरिझमसाठी नव्हे, तर टेररिझम्‌साठी होऊ लागली आहे. आज प्रतिभेचे माहेरघर म्हणून काशीकडे बघितले जाते, पण पूर्वी हा मान जम्मू-काश्मीरला होता.


एक काळ असा होता की, जम्मू-काश्मीरची ओळख- कश्यप ऋषींची भूमी, शारदापीठ, शैव तत्त्वज्ञानाचे उगमस्थान, आचार्य अभिनव गुप्त यांचे तत्त्वज्ञान, चिनारचे उंचच उंच वृक्ष, अक्रोडची झाडे, सफरचंदाच्या बागा, गुलाबांची मुघल उद्याने, दर्‍या-खोर्‍यांमधील निसर्गसौंदर्य आणि त्यात झुळझुळ वाहणारे झरे, छोटी-मोठी सरोवरं- विशेषतः दल लेक, हजरतबल दर्गा, छोट्या-मोठ्या पिरांचे दर्गे, माता वैष्णोदेवीचे मंदिर, शंकराचार्य टेकडी, केशराची शेती, अलिशान शिकारे, उनी कपडे, पश्मिना शॉल, बसोली कलाकृती, बर्फाच्छादित शिखरे, राजा हरिसिंगांचे शौर्य, काश्मिरी संगीत आणि पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र… अशी होती. पण, गेल्या ४० वर्षांत या राज्याची ओळख टूरिझमसाठी नव्हे, तर टेररिझम्‌साठी होऊ लागली आहे. आज प्रतिभेचे माहेरघर म्हणून काशीकडे बघितले जाते, पण पूर्वी हा मान जम्मू-काश्मीरला होता आणि येथेच शिक्षित होऊन सारे ब्रह्मवृंद, संतसमाज, त्यांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाचे सिंचन भारतभरच नव्हे, जर जगात सर्वत्र करीत असत. भारताचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आज मूठभर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी वेठीस धरला आहे. आज अनेक समस्यांचे माहेरघर म्हणून हा प्रदेश ओळखला जाऊ लागला आहे. पण, भारताने आशा सोडलेली नाही. या राज्यात सुख-समृद्धी नांदावी आणि या राज्याने विकासाच्या मार्गाने धावावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह झटत आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गतिशीलतेतून साकार झालेल्या ९.२ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे पंतप्रधानांनी केलेले लोकार्पण, हे त्याच दिशेने टाकलेले एक भरभक्कम पाऊल आहे. बोलणारे तर बरेच असतात, पण बोललेले शब्द खरे करून दखवणारे नेते आताशी फारसे दृष्टीस पडत नाहीत. पण, मोदींनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेले आश्‍वासन पूर्ण केले आणि त्यांच्या विकासाबाबतच्या आशादेखील जागविल्या. म्हणूनच आजवर भाजपाचे नाव उच्चारल्यावर विंचू चावल्यागत किंचाळणार्‍या मेहबुबा यांना, मोदी, राजनाथसिंह, नितीन गडकरी यांची तारीफ करताना शब्द कमी पडत होते! या नेत्यांकडून त्यांच्या अधिक अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. पण, मेहबुबांनी केलेली पंतप्रधानांसह इतर नेत्यांची तारीफ केवळ चेनानी-नाशरीदरम्यान उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वात लांब बोगद्याच्या निर्मितीमुळे झालेली नाही. त्यासाठी बरीच मोठी पार्श्‍वभूमी, पडद्याआड राहून अनेक नेत्यांनी तयार करून ठेवलेली होती. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्याकडे जम्मू-काश्मीरने पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी सातत्याने मेहबुबा मुफ्ती यांच्याशी सुसंवाद साधून राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचे फायदे त्यांना विदित केले आणि पीडीपीचे भवितव्य भाजपासोबत कसे सुरक्षित राहील, याचा फार्म्युलादेखील सांगितला. एक मुस्लिम कडव्या नेत्या म्हणून पूर्वी असलेली मेहबुबांची प्रतिमा आज बदललेली दिसतेय्, त्या मोदींच्या शेजारी बसलेल्या दिसताहेत, केदारनाथ यात्रेकरूंची विचारपूस करताहेत आणि खोर्‍यातून बळजबरी पलायन केलेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाबाबतही त्या बोलताहेत… या सार्‍या घटनांमागची खरी गोम ओळखायला यायला हवी. एकीकडे काही युवक विघटनवाद्यांच्या हातातील बाहुले बनून लष्करी जवानांवर दगडफेक करण्यात गुंतले असताना, त्याच राज्यातील सकारात्मक विचार करणारे चार हजारावर युवक, भक्कम पहाडीतील दगड फोडून बारमाही वाहतुकीसाठी बोगदा उभारण्यात स्वतःला झोकून देतात, हा बदलदेखील अधोरेखित केला जायला हवा. मोदींनी काश्मिरी युवकांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न तर दाखविलेच, पण त्याच वेळी शेजारी राष्ट्र पाकिस्तानला एक संदेशही दिला. काश्मिरी जनतेचे खरे तारणहार तुम्ही नाही तर भारतीय जनता, भारतीय नेते आणि भारतीय संसदच आहे, हेदेखील त्यांनी पाकिस्तानला दाखवून दिले आहे. मोदींनी, गेल्या वर्षी श्रीनगरमध्ये पूर आला असताना, तेथील सरकार अस्तित्वहीन झाले असताना, लोक ‘त्राहि भगवान’ झाले असताना आणि मदतीसाठी कुणी मिळते का याकडे डोळे लावून बसले असताना, भारतीय लष्कराच्या तुकड्या तातडीने रवाना केल्या आणि तेथील जनेतेचे अश्रू पुसले, हे मेहबुबा विसरलेल्या नाहीत. गेल्या वर्षीच सारा भारत दिवाळी साजरी करण्यात, दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत कुटुंबासह फटाके फोडण्यात आणि फराळावर ताव मारण्याचा आनंद घेत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काश्मीरच्या सीमेवर देशाच्या रक्षणार्थ डोळ्यांत तेल घालून जागणार्‍या जवानांच्या भेटीला गेले, हेदेखील काश्मीरची जनता आणि तेथील मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. भारताची विभिन्न राज्ये मूलभूत समस्यांचा सामना करीत असताना, काश्मीरचा-भारताच्या अभिन्न अंगाचा- अंतःकरणपूर्वक विचार करून पंतप्रधानांनी या राज्यासाठी घोषित केलेले कोट्यवधी रुपयांचे पॅकेज या राज्यातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्धांसाठीदेखील किती महत्त्वाचे ठरले, हे सांगण्याची गरज भासू नये. पैसे देऊन भरकटलेल्या युवकांना दगडफेक करण्यास बाध्य करणे अतिशय सोपे आहे. या युवकांच्या पालकांना धमकावून, तुमचा पाल्य दगडफेकीत दिसला नाही तर याद राखा, असे धमकावणे तर हुर्रियतसारख्या संघटनांना अतिशय सोपे आहे. त्यापेक्षाही सोपे म्हणजे जम्मू-काश्मिरातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शाळा जाळून टाकणे. अशा २६ शाळा सहा महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांच्या समर्थकांनी जाळून टाकल्या. विघटनवादाचे समर्थन करणार्‍या तमाम नेत्यांची मुले जम्मू-काश्मीरच्या बाहेर शिक्षण घेत आहेत. काहींची मुले विदेशात नोकर्‍या आणि व्यवसाय करीत आहेत, पण यापैकी एकाही नेत्याचा मुलगा अथवा नातेवाईक दगडफेकीच्या घटनांमध्ये पुढाकार घेत नाही. ही तर आपल्याच जातभाईंची फसवणूक आहे ना! आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांची शिक्षणं उत्तम दर्जाची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करणारी व्हावी, याची काळजी करणारी हुर्रियतवादी मंडळी खोर्‍यातील आम आदमीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध का होत नाही? मोदींविरुद्ध, भारत सरकारविरुद्ध आणि भारतीय संसदेने घेतलेल्या कुठल्याही जनहितार्थ निर्णयाविरुद्ध बंदचे आवाहन करणार्‍यांमध्ये हुर्रियतवादी पडद्यामागची भूमिका का निभावतात? हादेखील शोधाचाच विषय आहे. जो न्याय हुर्रियतवाल्यांना तोच खोर्‍यातील आम जनतेलाही मिळायला हवा. म्हणूनच मोदींच्या हस्ते सुरू झालेल्या भुयारी मार्गाने जम्मू-श्रीनगर अंतर तर घटलेच आहे, शिवाय दिल्ली आणि श्रीनगरची जवळीकही वाढली आहे. आता काश्मिरी जनतेनेच, आपला तारणहार कोण, हे ठरविण्याची वेळ आली आहे…!

पंतप्रधानांचे आवाहन- जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी ‘टेररिझम’ हवा की ‘टुरिझम’ हवा, याचा निर्णय करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेनानी ते नाशरी हा देशातील सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग देशाला अर्पण करताना केले-Maharashtra Times


| Updated: Apr 4, 2017 जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी ‘टेररिझम’ हवा की ‘टुरिझम’ हवा, याचा निर्णय करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेनानी ते नाशरी हा देशातील सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग देशाला अर्पण करताना केले. हा भुयारी मार्ग करताना दगड फोडणारे काश्मिरी तरुण राज्याचे भाग्य घडवित होते तर काही तरुण भरकटल्याने दगड फेकीत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. त्यांचे शब्द प्रसारमाध्यमांमधून विरण्याआधीच फुटीर नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी ‘संपूर्ण काश्मीरमधले रस्ते तुम्ही सोन्याने मढवून त्यावर हिरे जडवलेत तरी आमचा स्वयंनिर्णयाचा हक्क आम्ही सोडणार नाही,’ या भूमिकेचा पुनरुच्चार केला. दुर्दैवाने, एकेकाळी काश्मीरमधील आक्रमक राष्ट्रवादी आवाज असणारे ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनीही ‘हा काश्मिरात पूल व रस्ते बांधण्याचा मुद्दा नसून तो राजकीय प्रश्न आहे,’ असे गिलानी यांच्या विधानाचे मवाळ भाषांतर केले आहे. काश्मीरचा खरा प्रश्न हा धार्मिक किंवा राजकीय नसून तो विकासाचा आहे आणि तेथे एकदा विकास झाला की सारी आंदोलने आपोआप थंडावतील, अशी एक लोकप्रिय थिअरी देशातील विचारवंत गेली अनेक दशके मांडत आहेत. केंद्रातील वेळोवेळच्या सत्ताधाऱ्यांनीही हे प्रमेय मान्य करून जम्मू-काश्मीरला सातत्याने वाढीव अनुदाने किंवा योजनांबाबत झुकते माप देण्याचे धोरण स्वीकारले. भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘कश्मिरीयत, इन्सानियत आणि जम्हुरियत’ अशी त्रिसूत्री त्यांच्या ऐतिहासिक भाषणात मांडली होती. तिचाही संदर्भ पंतप्रधान मोदी यांनी परवा दिला. मात्र, दगड फेकणारे तरुण हे सारे ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का, ही शंका आहेच. नोटबंदीनंतर काश्मिरातील दगडफेक अचानक कमी झाल्याचे वृतान्त झळकले होते. त्यानंतर, ताज्या वृत्तान्तात दगडफेक करणाऱ्या मुलांचे, युवकांचे त्यांच्या वय व शक्तीनुसार गट पाडण्यात आले असून त्यांना रोजचे तीनशे ते सहाशे रुपये ‘कॅश’ दिले जातात, असे म्हटले आहे. हे पैसे कुठून येतात, हे ओळखणे कठीण नाही. सोमवारीही दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर महामार्गावर ‘केंद्रीय राखीव दला’च्या जवानांवर हल्ला करून सहा जणांना जखमी केले. २४ तासांतला हा दुसरा हल्ला होता. पंतप्रधानांनी पाकव्याप्त काश्मीरमधली स्थिती पाहा आणि आपली पाहा, असे भावनिक आवाहनही केले. ते योग्यच होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये किमान नागरी हक्कही तेथील नागरिकांना नाहीत. मुद्दा असा आहे की, विकासाची भाषा किंवा काही प्रमाणात प्रत्यक्षात होणारा विकास हेच काश्मीर समस्येवरचे एकमेव अंतिम उत्तर आहे का? आणि तसे ते नसेल तर नेमके काय करायला हवे? पाकिस्तानमधून काश्मीरमधील फुटिरांना मिळणारा सर्व प्रकारचा पाठिंबा तोडण्यात भारतीय सुरक्षा दलांना जसे अपयश येते आहे, तसेच तेथील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनाही फुटिरतावाद्यांना राजकीय प्रक्रियेत सामावून घेता आलेले नाही. जम्मू आणि काश्मीर यांना जवळ आणणारा भुयारी मार्ग हे आपल्या विकासाचे प्रतीक आहे, असे बहुसंख्य काश्मिरी नागरिकांना वाटत असेल तर त्यांचा आवाज आज उमटताना दिसत नाही. तो आवाज बंदुकीच्या किंवा फुटिरांच्या आवाजापेक्षा मोठा होईल, त्या दिवशी पंतप्रधानांच्या आवाहनाला खरा अर्थ प्राप्त होईल चेनानी ते नाशरी या आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आणि साहजिकच काश्मीेरबाबत नव्या आशा-आकांक्षांचे कवडसेही काहींना दिसू लागले. परंतु, त्याचा उपयोग किती कौशल्याने करून घेतला जातो, त्याला कसा प्रतिसाद मिळतो, यावरच अनेक गोष्टी अवलंबून असल्याने आत्ताच कोणता निष्कर्ष काढण्याची वा राजकीय श्रेयवादाच्या लढाईत अडकण्याची गरज नाही. मुळात डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आणि ओमर अब्दुल्ला यांची सत्ता जम्मू-काश्मीेरमध्ये असतानाच ९.२ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचे बांधकाम सुरू झाले होते आणि आता भाजप सरकारच्या काळात ते पूर्ण झाले. यातील सातत्य लक्षात घेऊन व्यापक भूमिकेतूनच याकडे पाहायला हवे. या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर मार्गावरील अंतर तीस किलोमीटरने कमी होईल. दळणवळण आणि एकूणच कनेक्टिरव्हिटी वाढायला त्याची मदत होईल. वेळ नि इंधन वाचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोगद्याचे उद्‌घाटन करतानाही या बाबींचा उल्लेख केला. परंतु, या निसर्गरम्य खोऱ्यातील जनतेत असलेली मानसिक दरीही भरून येईल काय, हा प्रश्न त्यामुळेच या निमित्ताने प्रकर्षाने समोर येतो. ‘काश्मितरी जनतेने आता या बोगद्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि पर्यटन कसे वाढेल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे’, असे सांगताना पंतप्रधानांनी ‘पर्यटन की दहशतवाद?’ यातून काश्मिवरी जनतेला निवड करायची आहे, असा मुद्दा मांडला. पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असलेले काश्मीमरचे अर्थकारण लक्षात घेता मोदी यांचा हा सवाल महत्त्वाचा आहे. ‘काही काश्मिहरी तरुण दगड फोडून आपले भविष्य उज्ज्वल बनवू पाहत असतानाच काही मात्र हातात दगड घेऊन, फुटीरतावाद्यांना संरक्षण देत आहेत. हे कितपत योग्य आहे,’ असा भावनिक सवालही मोदी यांनी भाषणात केला. या बोगद्याच्या निमित्ताने येथील राजकीय कोंडीही फुटावी, अशी आशा जागवण्याचा मोह पंतप्रधानांना झाला नसता तरच नवल. मात्र आशा बाळगतानाही वास्तवाचे भान न सोडलेले बरे. हा बोगदा म्हणजे भूगर्भशास्त्रातील एक चमत्कारच म्हणावा लागेल! अत्यंत प्रतिकूल हवामानात बोगदा पूर्ण झाल्यामुळे आता जम्मू आणि श्रीनगर या शहरांमधील अंतर सुमारे दोन तासांनी कमी होणार आहे. पृथ्वीतलावरील नंदनवन अशी ओळख असलेल्या काश्मीिरच्या खोऱ्यात खुश्कीमच्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी झालेली ही मोठी सोय आहे; कारण याच मार्गावरील वाहतूक ही प्रतिकूल हवामानात कोसळणाऱ्या दरडी, तसेच अन्य बाबींमुळे अनेक दिवस बंद पडलेली असते. या ऐतिहासिक बोगद्यामुळे आता खोऱ्यात येणाऱ्या आणि विशेषत: थेट श्रीनगरपर्यंतच्या विमानप्रवासाचे भाडे न परवडणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळेच हा बोगदा जम्मू-काश्मीनर राज्याच्या विकासाला चालना देईल, अशी अपेक्षा करता येते. गेली काही दशके काश्मी रचे खोरे दहशतवाद, त्यामुळे होणारा रक्त.पात यामुळे अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडले आहे. परिणामी तेथील जनतेचाही विकास पुरता खुंटून गेला आहे. पंतप्रधानांच्या भाषणाचा विचार या पार्श्वअभूमीवर करावा लागतो. काश्मीजरमध्ये गेल्यावर मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या ऐतिहासिक भाषणाचे स्मरण होणे, हेही स्वाभाविकच म्हणावे लागेल! ‘काश्मीारचा प्रश्नब हा केवळ कायदेकानू वा घटना या चौकटीतून सोडवता येणे कठीण आहे. त्यासाठी ‘काश्मिीरीयत, इन्सानियत तसेच जम्हूरियत (लोकशाही)’ या तीन बाबींचे संदर्भ विचारात घ्यावे लागतील,’ असे वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना स्पष्ट केले होते. मोदी यांनी आधी वेगळी भाषा केली असली, तरी आता ते वाजपेयींच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊ पाहत आहेत. ‘या बोगद्याच्या माध्यमातून काश्मिारी तरुणांनी विकास घडवून आणावा आणि पाकव्याप्त काश्मीवरमधील जनतेला, त्यांचे निर्णयकर्ते (म्हणजेच पाकिस्तान सरकार) काय करत आहेत, ते दाखवून द्यावे!’ या मोदी यांनी यावेळी केलेल्या आवाहनात तथ्य असले, तरी फुटीरतावादी नेते आपली भूमिका तसूभरही बदलण्यास तयार नाहीत, हेही लक्षात घ्यावे लागेल. ‘भारत सरकारने जम्मू-काश्मीीरमधील सर्व रस्ते सोन्या-रूप्याने वा हिऱ्या-माणकांनी मढवले, तरी त्यामुळे काश्मिनरी जनतेच्या मनातील स्वायत्ततेची आणि स्वयंनिर्णयाची भावना दूर होऊ शकणार नाही’, या ‘हुर्रियत’चे नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्टच होते. माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनीही ‘केवळ बोगदे आणि रस्ते बांधून काश्मीारचा प्रश्नह सोडवता येणार नाही’, याकडे लक्ष वेधले आहे. एकूणच काश्मी‘र प्रश्नारचा पेच नि आव्हान पाहता येथील मानसिक दऱ्या सांधण्यासाठी सरकारला आणि देशवासीयांनाही अनेक आघाड्यांवर प्रयत्न करावे लागणार आहेत, याचे भान विसरता कामा नये. तशा प्रयत्नांसाठी अशी पायाभूत कामे फार तर पूरक ठरू शकतात.

Bangladesh and India’s terrorism problem While Bangladesh has cracked down, the West Bengal government’s failure to act is worsening the situation


Illustration: Jayachandran/Mint With Bangladesh Prime Minister Sheikh Hasina finally making her long-awaited state visit to India next week, there is already much discussion about how the bilateral relationship can be taken to the next level. Some have suggested focusing on the development of the Bay of Bengal region; others have urged that seemingly intractable diplomatic challenges such as the Teesta river water-sharing agreement be resolved first. There have also been reports of a defence deal as well as agreements to boost trade, transit and energy security. Surprisingly, the issue of radical Islamist terror, which has been gaining ground not just in Bangladesh but also in West Bengal, has received limited attention, even though counter-terrorism has been one of the biggest success stories of the bilateral relationship. For many years, New Delhi’s primary concern with Dhaka was anti-India elements using Bangladeshi territory as a safe haven. On the one hand, militants from the North-East took advantage of the porous border to slip away from Indian security agencies. On the other, there were radical Islamist groups such as Harkat-ul-Jihad al-Islami Bangladesh (HuJI-B) and Jamaat-ul-Mujahideen Bangladesh (JMB) that sought to foment trouble in both countries. The first decade of this century was a particularly bad decade since Khaleda Zia, with her less-than-favourable view of India, and her Islamist allies allowed malcontents to flourish. It was not until August 2005, when the JMB triggered some 500 bombs in all but one district of Bangladesh within half an hour, that Khaleda Zia changed tack. However, the situation only changed in any meaningful way when Sheikh Hasina returned to power in 2009. She immediately cracked down on Islamist militancy and assured New Delhi that Bangladeshi territory would no longer support anti-India activities. But now the tables seem to have turned. Many of those who were feeling the heat in Bangladesh found refuge in West Bengal, where they have regrouped and reorganized themselves into a relatively potent force, as was evident in the 2014 accidental blast in Burdwan, which literally blew the lid off the JMB’s extensive network in Bengal. The JMB has had a presence in Bengal for more than a decade and has carried out subversive activities in this country before; but the Burdwan blast exposed for the first time a conspiracy to dislodge the government in Bangladesh being plotted in India. Notably, the JMB and its ilk have benefited in no small measure from the benign gaze of West Bengal chief minister Mamata Banerjee, who has chosen to curry favour with Islamic hardliners. Such myopic politics not only brings no significant benefits to her voters in the long run but also erodes the national interest and, in this case, threatens national security. On the Bangladeshi side too, the situation has been complicated by a new wave of violent religious polarization—which has also swept terror groups such as Al-Qaeda and the Islamic State into the fray. This wave rose with the 2013 Shahbagh protest movement, when the Sheikh Hasina government’s decision to execute war criminals from 1971 was met with virulent opposition from the Jamaat-e-Islami (JeI). At the time, the latter was the country’s largest religious-political party (it has since been derecognized as a political party), and its leadership found itself facing the hangman’s noose. The public support for secularism and progressive values has seemingly galvanized hardline elements, resulting in this recent surge of Islamist militancy wherein secular bloggers and activists as well as foreign citizens have been targeted. As Animesh Roul from the New Delhi-based Society for the Study of Peace and Conflict notes for the counter-terror centre at the US’ West Point military academy: “Jamaat-ul-Mujahideen Bangladesh (JMB) and Harkat-ul-Jihad al-Islami Bangladesh (HuJI-B), both of which trace their lineage to JeI, have become increasingly militant and energized. New groups have also emerged such as Ansar al-Islam, which has acted as the Bangladeshi wing of al-QaRs.ida in the Indian Subcontinent (AQIS), and Jund al-Tawheed wal Khilafah (JTK), whose loyalties lie with the Islamic State, making Bangladesh a new field of competition for the global jihadist powerhouses.” This competition seems to have already spilled over into India. Earlier this month, Idris Ali, a suspect in the Dhaka café attack, was arrested from Kolkata. Previously, the Birbhum-born Islamic State sympathizer Abu Musa had told the National Investigation Agency (NIA) that the Dhaka attack masterminds had travelled to India, stayed in Kolkata and met with him in Malda. Musa was arrested last year and a chargesheet filed by the NIA in December mentions his plans to carry out lone wolf attacks as well as underlines his links to JMB militant Abu Suleiman and former Indian Mujahideen militant Shafi Armar, a Bhatkal native who has been fighting in Syria with the Islamic State. Clearly, Bangladesh and India (particularly in West Bengal) are facing similar threats. The difference is that while the former has gone on the offensive with raids and crackdowns across the country, in West Bengal, the government refuses to even acknowledge the threat. Earlier this week, after The Times Of India reported that Dhaka had informed Delhi of a threefold increase in infiltration into India by HuJI and JMB militants, state officials in Bengal dismissed the report as scare-mongering by the Centre. Presumably, such an assessment is driven by domestic political compulsions but that doesn’t help anybody’s case.

Sunday, 2 April 2017

टूरिझम हवे की टेरोरिझम? April 3, पंतप्रधानांचा काश्मिरी तरुणांना सवाल – काही दगडफेक करतात, काही दगड फोडून बोगदा तयार करतात – देशातील सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचे राष्ट्रार्पण


टूरिझम हवे की टेरोरिझम? April 3, 2017021 – पंतप्रधानांचा काश्मिरी तरुणांना सवाल – काही दगडफेक करतात, काही दगड फोडून बोगदा तयार करतात – देशातील सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचे राष्ट्रार्पण – नितीन गडकरी यांचे अभिनंदन श्यामकांत जहागीरदार उधमपूर, २ एप्रिल काश्मिरातील युवकांसमोर टूरिझम आणि टेररिझम असे दोन मार्ग आहे टूरिझमच्या मार्गाने जम्मू काश्मीरचा विकास होऊ शकतो, तर टेररिझमचा मार्ग त्यांना विनाशाकडे नेऊ शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील चेनानी-नाशरी दरम्यानच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या बोगद्याचे लोकार्पण केल्यानंतर उधमपूर येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह, जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोरा, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उपमुख्यमंत्री निर्मलसिंह, सार्वजनिक बंाधकाम मंत्री नईम अख्तर, प्रदेश भाजपा अध्यक्ष सत शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बोगद्याचे लोकार्पण केल्यानंतर हेलिकॉप्टरने मोदी आणि अन्य मान्यवरांचे सभास्थळी आगमन झाले. मोदी यांचे आगमन झाल्यावर तसेच त्यांचे भाषण सुरू असतांना ‘मोदी, मोदी’चा अखंड गजर सुरू होता. या बोगद्याच्या कामासाठी केंद्र सरकारने पैसे दिले असले तरी त्याच्या उभारणीत क़ाश्मीर खोर्‍यातील युवकांचे मोठे योगदान आहे. जवळपास ४ हजार तरुणांनी दगड फोडून हा बोगदा घडवत राज्याच्या विकासात आपले योगदान दिले, तर दुसरीकडे काही भरकटलेले तरुण दगडफेक करून खोर्‍याच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. खोर्‍यात सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटनांवर या माध्यमातून मोदी यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. खोर्‍यातील हिंसाचारात आतापर्यत अनेक निर्दोष तरुणांचा बळी गेला., काश्मीरची भूमी रक्ताने लाल झाली. ४० वर्षांपासून खोर्‍यात हा प्रकार सुरू आहेे. यातून आतापर्यंत कोणाचेच भले नाही, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. हा बोगदा म्हणजे जम्मू-काश्मीरच्या विकासाची भाग्यरेषा ठरेल. या बोगद्याने जम्मू आणि श्रीनगरमधील अंतरच कमी होणार नाही, तर हदयानेही हे दोन्ही प्रांत जवळ येतील, असा विश्‍वास व्यक्त करत मोदी म्हणाले की, या बोगद्यामुळे राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, तसेच रोजगारही वाढेल. प्रति माणशी उत्पन वाढवण्याची क्षमता देशात फक्त जम्मू-काश्मीरमध्येच पर्यटनामुळे आहे. पर्यटनाची ताकद ओळखा आणि त्यादृष्टीने कामाला लागा. यासाठी केंद्र सरकारकडून जी काही मदत लागेल, ती सर्व करायला आम्ही तयार असल्याचा निर्वाळा मोदी यांनी दिला. या बोगद्यामुळे शेतकर्‍यांना आपला शेतमाल, फळे, भाजीपाला आणि फुले दिल्लीच्या बाजारात पाठवता येतील. आतापर्यंत अनेकवेळा जम्मू-श्रीनगर मार्ग ठप्प राहात असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. आता मात्र या बोगद्यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे, तरुणांना रोेजगाराच्या अनेक संधी मिळणार आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. बोगद्याचे काम करतांना पर्यावरणाचे रक्षण करण्यात आले. यातून जगासमोर एक आदर्श उभा करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ८० हजार कोटींचे पॅकेज दिले होते. आतापर्यंतच्या पॅकेजचा खर्च कागदावरच होत होता. यावेळी मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरला विकासाच्या प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याची ग्वाही देत मोदी म्हणाले की, यापासून कोणी आम्हाला रोखू शकणार नाही. जम्मू-काश्मीरची प्रगती कशी होते हे आम्ही सीमेपलीकडच्या लोकांना दाखवून देऊ. जम्मू क्षेत्रासह राज्याचा संतुलित विकास करण्याची हमी मोदी यांनी दिली. राज्यात असेच आणखी ९ बोगदे बांधण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. नितीन गडकरी येत्या दोन वर्षात राज्यात रस्ते विकासाची ६० हजार कोटींची कामे केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. १५ ऑगस्ट २०१८ पयर्र्ंत जम्मू-श्रीनगर हे २९३ किमीचे अंतर आणखी ६२ किमीने कमी करण्याची घोषणा करत गडकरी म्हणाले की, यामुळे जम्मूवरून श्रीनगरला चार तासातच पोहोचता येईल. जम्मू येथील रिंगरोडसाठी २१०० कोटी, तर श्रीनगर येथील रिंगरोडसाठी २२०० कोटी देण्याची तसेच या कामाच्या निविदा तातडीने काढण्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. लडाख येथील जोजिला पास येथे ६ हजार कोटी खर्च करून रस्ते बांधण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मेहबुबा मुफ्ती केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे जम्मू-काश्मिरातील परिस्थितीत सुधारणा होत असली तरी अजून खूप काही करायचे असल्याचे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्यामुळेच मागील वर्षीच्या संकटाच्या परिस्थितीतून जम्मू काश्मीर बाहेर येऊ शकले, अशी कृतज्ञताही मुफ्ती यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करतांना मुफ्ती म्हणाल्या की, मोदी जे म्हणतात, ते करून दाखवतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. उत्तरप्रदेशातील विजयाबद्दल मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंदसिंह यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते. आणि आकाशात हजारो चांदण्या… चेनानी-नाशरी बोगद्याचे औपचारिक उद्घाटन मी केले असले तरी तुम्हीसुद्धा या बोगद्याच्या उद्घाटन प्रक्रियेत आपल्या मोबाईलचे फ्लॅश चालू करून तसेच भारतमातेचा जयजयकार करत सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी करताच उपस्थित लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या मोबाईलचा फ्लॅश चालू करून तसेच भारतमातेचा जयजयकार करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. एकाच वेळी हजारो लोकांच्या मोबाईलचे फ्लॅश चालू झाल्यामुळे आकाशात तारे चमकल्यासारखे वाटत होतेबोगद्याची १० वैशिष्ट्ये: १. दोन लेनचा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. यामुळे जम्मू-श्रीनगर हे अंतर १०० कि.मी. ने कमी होणार आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचणार आहे. २. हा बोगदा बांधण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. खराब हवामान असताना जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केला जातो. हा बोगदा मात्र कधीही बंद करावा लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन हा बोगदा रामबन जिल्ह्यातील नाशरी येथे बाहेर पडतो. ३. बर्फवृष्टी आणि दरड कोसळण्याची भीती असलेल्या ४४ ठिकाणांपासून हा बोगदा तुमची सुटका करणार आहे. ४. या बोगद्याच्या उभारणीसाठी एकूण १ हजार ५०० इंजीनिअर्स, भूगर्भतज्ज्ञ आणि कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली. ५. या बोगद्यासाठी एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये इतका खर्च आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बोगद्याची उभारणी केली. ६. बोगद्याच्या सुरक्षेसाठी सुमारे १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कंट्रोल रूमकडून तत्काळ वाहतूक पोलिसांना त्यांची माहिती दिली जाणार आहे. ७. दोन लेनवर २९ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पॅसेज आहे. ८. बोगद्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणूनही खबरदारी घेण्यात आली आहे. बोगद्यात हवा खेळती राहावी, कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढू नये यासाठी ठिकठिकाणी छिद्रं ठेवण्यात आली आहेत. ९. बोगद्यात पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एखाद्या वाहनात बिघाड झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून ही व्यवस्था असणार आहे. १०. या बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्याचा इतर भागांशी बाराही महिने संपर्क राहणार आहे. व्यापार आणि पर्यटन या दोहोंसाठी हा बोगदा पर्वणी ठरेल. जम्मू-काश्मीरसाठी हा बोगदा लाइफलाइनच ठरणार आहे.

शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच! आज चैत्र शुद्ध अष्टमीनिमित्त पुण्यातील शिवभक्त मंडळी लालमहालात शिवतेजदिन साजरा करीत आहेत. छत्रपती शिवरायांच्या या साहसी आणि अत्यंत नियोजनबद्ध यशस्वी आक्रमणाचे हे पुण्यस्मरणमिलिंद र. एकबोटे.


लालमहालावरील सर्जिकल स्ट्राइक April 3, 2017 Facebook Twitter >> अफझलखानवधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण शाहिस्तेखानाचे संकट उभे राहिले. त्याने प्रथम चाकणच्या संग्रामदुर्गवर हल्ला चढवला. अपुऱ्या सैन्यानिशी मराठय़ांनी त्याच्याशी निकराचा संघर्ष केला; परंतु ५५ दिवसांच्या संघर्षानंतर संग्रामदुर्ग मोगलांच्या ताब्यात गेला. चाकणपासून पुण्यापर्यंत खानाच्या विशाल फौजेचा वेढा पडला होता आणि त्यामध्ये स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. भोर, रोहिड्याच्या परिसरातसुद्धा शाहिस्तेखानाचे सैनिक धुमाकूळ घालत होते. या सर्व घटनांचा महाराज विचार करत होते. राजगडावर आपल्या विश्वासू मंडळींबरोबर त्यांनी विचारविनिमय करून योजना पक्की केली. रामनवमीच्या आदल्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध अष्टमीला लालमहालावर हल्ला करण्याचे निश्चित ठरले. ते दिवस मोगलांसाठी रमजानचे होते. त्या दिवशी सहावा चंद्र होता. रमजानच्या दिवसांत रात्री मोगल सैनिक खाऊन पिऊन सुस्तपणे झोपलेले असत. शिवाय तो दिवस बादशहाच्या राज्यारोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या दिवसांपैकी होता. त्या दिवशी प्रत्येक प्रहरी नौबती वाजवण्याचा मोगली प्रघात होता. या सर्व गोष्टींचा फायदा घेण्याची व्यूहरचना महाराजांनी आखली होती. महाराज शत्रूचा धर्म जाणत नव्हते, तर शत्रुत्वाचा धर्म पाळत होते हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. पुण्याजवळच्या अंबिल ओढ्यापर्यंत राजगडवरून सिंहगडमार्गे महाराज आपल्या निवडक तीन हजार सैन्यनिशी घोड्यावरून आले. त्यांच्याबरोबर नेताजी पालकर, चिमणाजी व बाबाजी देशपांडे बंधू, कोयाजी बांदल, येसाजी कंक, सर्जेराव जेधे, चांदनी जेधे, तानाजी मालुसरे इ. विश्वासू मंडळी होती. देशपांडे बंधू महाराजांचे बालमित्र होते. त्यांना लालमहालाची खडा न् खडा माहिती होती. लालमहालात बालपणी ते महाराजांबरोबर वावरले होते, खेळले होते म्हणून महाराजांनी त्यांना बरोबर घेतले होते. त्यांचा या प्रसंगात चांगला उपयोग झाला. या देशपांडे बंधूंच्या नेतृत्वाखाली लालमहालात घुसण्याची जबाबदारी असणारे पथक देण्यात आले होते. आंबिल ओढय़ापासून निवडक ४०० जणांना घेऊन महाराज पायीच निघाले. अर्थात सावधगिरी म्हणून चिलखत आणि जिरेटोप होताच! पुण्यात शिरताना ठिकठिकाणी त्यांची चौकशी झाली. परंतु सैनिकांच्या बदलीची वेळ अचूक पाळल्याने महाराजांचे सैनिक बेमालूपणे लालमहालापर्यंत पोहोचू शकले. खानाचे प्रचंड सैन्य होते आणि व्यवस्थापन ढिसाळ होते. त्यामुळे महाराजांच्या सैनिकांची चौकशी व्हायची तेव्हा बाबाजी व चिमणाजी उत्तर द्यायचे, ‘आम्ही कटकातील लोक आहोत. चौकी पहाऱ्यास गेलो होतो.’ या उत्तराने पहारेऱयांचे शंकानिरसन होई. त्यामुळे लालमहालापर्यंत पहाटे ३ पर्यंत पोहोचल्यावर मुदपाकखान्याकडे ही मंडळी पोहोचली. त्या ठिकाणी आचारी मंडळींचे काम सुरू झाले होते. मुदपाकखाना व खानाचा जनानखाना याच्यामध्ये असलेली एक दिंडी बुजवण्यात आली होती. ती दिंडी मोकळी करूनच खानापर्यंत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे सर्व आचाऱयांना कापून काढण्याशिवाय पर्याय नव्हता. एखादा आचारी सावध झाला आणि ओरडला तर सगळीच पंचाईत होण्याची शक्यता होती. थोड्यात वेळात या आचाऱ्यांना यमसदनाला पाठवून महाराजांच्या सैनिकांनी दिंडी मोकळी करून जनानखान्यात प्रवेश करून खानाचा शोध घेण्यास सुरुवात केली. खानाच्या बायकांनी सर्व समया विझवून टाकल्यामुळे सर्वत्र अंधार झाला. या अंधाराचा फायदा घेऊन खान दोन बायकांच्या मागे लपला होता. महाराजांनी त्याला शोधून काढून त्याच्यावर अत्यंत त्वेषाने हल्ला केला. त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे उडाली आणि अंधारात महाराजांना खानाची गर्दन उडाल्याचा भास झाला. अशाप्रकारे खानावरील हल्ला झाल्यावर महाराजांनी पटापट सैनिकांना मोहीम आटोपण्याचे आदेश दिले. महाराज व त्यांचे सैनिक लालमहालातून सुरक्षितपणे निसटले. नदीपलीकडे सर्जेराव जेधे व चांदजी जेधे हे दोन्ही कान्होजी पुत्र रोकडोबा मंदिराजवळ महाराजांसाठी घोडे घेऊन थांबले होते. तेथून महाराज वारजेमार्गे सिंहगडला वळसा घालून राजगडाकडे रवाना झाले. याचवेळी महाराजांनी कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना पालते बांधून त्यांना पळवले आणि मोगलांची फसवणूक केली. तेवढ्या वेळात महाराज सुरक्षितपणे राजगडावर पोहोचले होते. महाराजांचा हा गनिमी कावा जगप्रसिद्ध असून त्याचा वापर आजही युद्धामध्ये केला जातो. याप्रसंगी कोयाजी बांदेल जखमी झाले. महाराजांनी त्यांना त्यांच्या पराक्रमासाठी आलंदे गाव इनाम दिले. इकडे लालमहालात गोंधळ माजला. खानाचा आवडता मुलगा अबुल हसन वडिलांचा बचाव करताना मारला गेला. खानाची एकूण ५५ माणसे मारली गेली. शाहिस्तेखान इतका धास्तावला होता की त्याने आपल्या बोटांवर मलमपट्टी करायला हकीमसुद्धा बोलावला नाही. त्याला अशी भीती वाटत होती की हकिमाच्या वेषात शिवरायच पुन्हा येऊन आपली गर्दन उडवतील. या घटनेमध्ये शिवरायांचे साहस, निर्भयता, अचूक नियोजन कौशल्य, प्रजेविषयीची कळकळ आणि ईश्वराविषयी समर्पित भावना स्पष्टपणे दिसते. दोन-तीन दिवसांतच शाहिस्तेखान पुण्यातून औरंगाबादेस गेला. तिथून त्याला आसामच्या सुभेदारीवर पाठवण्यात आले. अशाप्रकारे शाहिस्तेखानाची फजिती आणि नाचक्की झाली. चार महिन्यांपूर्वी हिंदुस्थानी लष्कराने सर्जिकल स्ट्राइक करून पाकव्याप्त कश्मीरमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी प्रत्येक हिंदुस्थानीयांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. परंतु त्या सर्जिकल स्ट्राइकची प्रेरणा कदाचित लालमहालावरील यशस्वी आक्रमणाच्या घटनेत दडली असावी.