Total Pageviews

Tuesday 20 December 2016

भारतानंतर आता पाकिस्तानातही नोटाबंदी 20-December-2016


: 09:26:46 Last Updated at: 20-December-2016 : 09:45:18 ऑनलाइन लोकमत इस्लामाबाद, दि. 20 - भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी भारताने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयापासून प्रभावित होत आता पाकिस्ताननेही नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या संसदेत 5000 रुपयांची नोट चलनातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला आहे. भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही काळ्या पैशावर आळा आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. (हिंसाचारानंतर व्हेनेझुएलानं घेतला नोटाबंदीचा निर्णय मागे) (नोटाबंदीमुळे मोडलं महिला तस्करीचं कंबरडं) पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने हे वृत्त दिलं आहे. पाकिस्तान मुस्लीम लीगचे उस्मान सैफुल्लाह खान यांनी हा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव बहुमताने संसदेत पारित करण्यात आला. 'पाच हजाराची नोट चलनातू रद्द केल्याने बँक खात्यांचा वापर वाढेल आणि लपवून ठेवण्यात आलेल्या काळा पैसा कमी होईल', असा दावा प्रस्तावात करण्यात आला होता. तसंच ही नोटाबंदी फक्त एकदाच न करता दर तीन ते पाच वर्षांनी करण्यात यावी जेणेकरुन बाजारावर नियंत्रण ठेवण्यात येईल असंही प्रस्तावात सांगण्यात आलं होतं. पाकिस्तानचे कायदा मंत्री झाहिद हमीद यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला असून 'यामुळे बाजारात आणि देशात आर्थिक आपत्ती निर्माण होईल आणि पाच हजाराची नोट उपलब्ध नसल्याने परकीय चलानाचा वापर वाढेल', असं म्हटलं आहे. 'सध्या बाजारात 3.4 लाख कोटींच्या नोटा चलनात असून यामध्ये 1.02 लाख कोटी पाच हजाराच्या नोटेच्या स्वरुपात आहेत', असंही त्यांनी सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment