Total Pageviews

Saturday 2 November 2013

ALLIANCE TRUE FRIENDS REQUIRED AGAINST CHINA

भारताने चिन विरुध खर्‍या मित्रांची फळी मजबूत करणे महत्वाचे दमदाटी करून चीनने आपल्याला बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही करावयास लावली.चीनने भारतीयाना व्हिसा नाकारायचा आणि भारताने मात्र चिनी नागरिकांसाठी पायघड्या घालायच्या हे भारतासाठी लज्जास्पद आहे.चीनच्या स्टॅपल व्हिसामुळे अरुणाचल प्रदेशच्या अनेक नागरिकांना अपमानित व्हावे लागते, चिनी बनावटीची शस्त्रे मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतातील बंडखोरांना दिली जात आहेत.मागच्या आठवड्यात चिनच्या सरकारी मुखपत्रात एक लेख प्रसिध झाला. या प्रमाणॆ पुढच्या काही वरषात चिन ६ मोठ्या लढाया लढू शकतो.त्यामधे एक लढाई भारताशी अरुणाचल प्रदेश करता होईल.आपण तयार असावे.चीनला भारतासोबत फक्त व्यापार हवा आहे.चीन दौर्‍याने काय साधले? परिस्थिती जैसेथेच राहणार आहे. चीनच्या मग्रुरीला जपानचे चोख उत्तर व्हिएतनाम, ब्रह्मदेश, भारतासह चिनी लष्कराच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने कारवाया, घुसखोऱ्या सुरूच असतात. अत्याधुनिक लष्कराच्या बळावर शेजारी राष्ट्रांना नमवायची चीनची भाषा काही नवी नाही. चीनच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य धोरणच साम्राज्यवादी असल्याने, शेजारी राष्ट्रांच्या भूमीवर हक्क सांगून घुसखोऱ्या करतो. आशियात जपान व भारत हे चीनला आपले प्रतिस्पर्धी वाटतात. जपानशी कुरापत काढली आणी जपानने आपले एयरफ़ोर्स अलर्ट केले.आपल्या लष्करी सामर्थ्या-च्या बळावर शेजारी राष्ट्राशी सतत संघर्ष आणि कुरापती काढणाऱ्या चीनला जपानने चोख प्रत्युत्तर द्यायचे धाडस दाखवले आहे. भारत मात्र चीनशी नरमाईने वागतो प्रशांत आणि हिंदी महासागरावर आपले वर्चस्व निर्माण व्हावे, यासाठीही चीनने आपले नौदल अत्याधुनिक केले आहे. भारतीय सीमेवर तर चिनी लष्कराची घुसखोरी कायमचीच सुरू आहे. एकीकडे शांततेची भाषा बोलायची आणि त्याचवेळी इंचा इंचाने शेजारी राष्ट्रांची भूमी बळकवायची, हा चिनी सरकारचा खाक्या आहे. . पण, चीनच्या अफाट लोकसंख्या आणि लष्करी सामर्थ्याला न घाबरता, साम्राज्यवादी धोरणाला रोखायची हिंमत आपल्या देशाकडे आहे आणि वेळ आल्यास आमची युद्धाचीही तयारी आहे, अशा भाषेत बजावत जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी अलीकडेच जाहीरपणे, चिनी सत्तेला आव्हान दिले आहे. चीनने पीत सागर, पूर्व व दक्षिण चीन सागर हे आपले क्षेत्र असल्याचे घोषित केले आहे. चीनच्या या घोषणेला भीक घालण्यास त्या भागातील छोटी राष्ट्रे पण तयार नाहीत. या सागरातील स्पार्टले व अन्य बेटांवर तसेच तेल क्षेत्रांवरही चीन एकतफीर् अधिकार सांगत आहे, पण त्याला फिलिपीन्स, व्हिएतनाम व अन्य आशिआन राष्ट्रांनी हरकत घेतली आहे. ‘खर्‍या मित्रांची फळी उभी करावी जपानने चिनी राज्यकर्त्याच्या आक्रमक धोरणासमोर नरमाईने धोरण न स्वीकारता जशास तसेच उत्तर देत चीनच्या साम्राज्यवादी धोरणाला रोखायच्या सुरू केलेल्या मोहिमेची गंभीर दखल आपल्या केंद्र सरकारने घ्यायला हवी. शांततेच्या गावगप्पा मारत चीनसमोर झुकते धोरण स्वीकारणाऱ्या भारतानेही असाच आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे चीनची आक्रमक वागणुक कमी होऊ शकते.हाच अबे यांनी स्वीकारलेल्या धोरणाचा धडा आहे. भारतासाठी आता अमेरिका किंवा युरोपपेक्षाही, पूर्व आशिया, जपान, कोरियाचे लष्करी आणि आर्थिकसामर्थ्य महत्त्वाचे ठरणार आहेत.चीनला उत्तर देण्यासाठी भारताला स्वत:च्या ‘खर्‍या’ मित्रांची फळी उभी करावी लागेल. चीनचे कुणी ‘खरे’ मित्र नाहीत. म्यानमार, व्हिएतनाम व तैवानसुद्धा चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांमुळे चिंतित आहेत. चीन ज्या देशांना आपले प्रभावक्षेत्र मानतो अशा दक्षिण, दक्षिणपूर्व आशियाई तसेच पूर्व आशियातील राष्ट्रांशी पारंपरिक मैत्री संबंध मजबूत करून भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे.भारतासाठी आता अमेरिका किंवा युरोपपेक्षाही, पूर्व आशिया, जपान, कोरियाचे लष्करी आणि आर्थिकसामर्थ्य महत्त्वाचे ठरणार आहेत. म्यानमार, व्हिएतनाम व तैवानसुद्धा चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांमुळे चिंतित आहेत.पूर्वेत जपानशी आर्थिक व व्यूहात्मक संबंध वाढवावे लागतील. ऑस्ट्रेलियातील कॉझर्वेटिव्ह नेते टोनी ऍबर्ट यांना मिळालेला कौल सुस्पष्ट व निर्विवाद आहे. भारताच्या दृष्टीने ऍबर्ट यांच्या रूपाने आणखी एक मित्र मिळेल. टोनी ऍबर्ट यांचे भारताशी मैत्रीचे घनिष्ठ नाते आहे. महासत्ता म्हणून नव्याने उदयाला येणार्या देशांमध्ये केवळ चीन नाही तर भारतही तेवढाच महत्त्वाचा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियाला तीन वर्गातील देश महत्त्वाचे व जवळचे आहेत. पहिले म्हणजे शेजारी देश, दुसरे म्हणजे उत्तम व्यापारी संबंध असणारे देश आणि तिसरे म्हणजे व्यूहात्मक सहकारी म्हणून जवळचे ठरणारे देश. या तीनही वर्गात भारत बसतो.आपण ऑस्ट्रेलियाला पण आपल्या आघाडीत सामिल केले पाहीजे. चीनला रोखण्याचा एक मार्ग : व्हिएटनाम चीनने व्हिएतनामवर दबाव टाकला होता, परिणाम झाला की, व्हिएतनामने आपला शत्रू असलेल्या अमेरिकेशी मैत्री प्रस्थापित केली. आता व्हिएतनामने दक्षिण चीन सागरात अमेरिकन आरमार ठेवण्यास अनुकूलता दर्शविण्यास सुरुवात केली आहे. चीनने फेब्रुवारी १९७९ मध्ये व्हिएतनामवर हल्ला केला. परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी चीनच्या दौर्यावर होते. झालेल्या हल्ल्यामुळे वाजपेयी चीन दौरा अर्ध्यावर टाकून भारतात परतले होते. या युद्धात चीनचे ४० हजार सैनिक, तर व्हिएतनामचे १ लाख सैनिक धारातीर्थी पडले. उभय देशांमध्ये तणाव कायम आहे. जसा चीन पाकिस्तानचा वापर भारताविरूध्द करतो, तसाच आपण व्हिएटनामचा वापर चीनविरूध्द करायला पाहिजे. आपण या देशाशी सैनिकी संबंध वाढवायला हवेत. भारत आणि व्हिएटनाम एकाच प्रकारचे रशियन बनावटीची शस्त्रे वापरते.आपण त्यांना नौदल, हवाईदल मजबूत करायला मदत केली पाहिजे. आपली ब्राम्होस मिसाईल आपण त्योना दिली पाहिजे. ज्यामुळे त्यांची चीनबरोबर युध्द करायची क्षमता वाढेल. आपण डोंगराळ भागात आणि जंगलात लढाई करण्याच्या अनुभवाची व्हिएटनामबरोबर देवाणघेवाण केली पाहिजे. य़ामुळे चीनशी युद्ध झाले तर व्हिएटनामची मदत घेता येईल. व्हिएतनाम हे प्रखर राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असलेले राष्ट्र आहे.व्हिएतनामी जनतेत भारताबद्दल एक सहजभाव आणि आत्मीय प्रेमाची भावना दिसून येते. गेल्या शतकात त्याने चीन, फान्स आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना पराभूत करून जगाला आश्चर्यचकित करून टाकले होते. भारत व्हिएतनामच्या वायुसेनेच्या पायलटांना प्रशिक्षित करीत आहे. या देशाला गैरपरमाणू क्षेपणास्त्रे देण्याचाही भारताचा विचार आहे. पूर्व आणि दक्षिण-पूर्व क्षेत्रात चीनचे वाढत जाणारे युद्धखोर धोरण आणि आर्थिक प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी व्हिएतनाम हा देशच आपला विश्वसनीय मित्र आहे. आपले प्रत्युत्तर काय असावे लडाखमधील चिनी लष्करी अतिक्रमणाला, छोटे समजणे धोकादायक ठरणार आहे. असे प्रोत्साहन मिळत राहिले, तर घुसखोरीबाबत चीनला काळजी करण्याचे कारणच उरणार नाही. बाकी देशापैकी भारताची कुरापत काढणे सोपे, असे चीनला वाटते. हा समज भ्रामक आहे, याची जाणीव करून देण्यासाठी तरी भारताने धैर्य दाखविले पाहिजे. आपण चीनच्या लष्करी सामर्थ्यावर अंतराळातून, आकाशातून, जमिनीवरून, समुद्रातून आणि सायबर स्पेस मधून लक्ष ठेवले पाहिजे. यामध्ये आपल्याला अमेरिका व चीनच्या शत्रूंची मदत घेता येईल.चीनचे शत्रू हे आपले मित्र आहेत म्हणून आपण जपान, व्हिएटनाम, तैवान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, मंगोलिया यांच्याशी सामरिक संबंध आणि लष्करी सहकार्य वाढवले पाहिजे. जेणेकरून चिनी सैन्याला वेगवेगळ्या आघाड्यावर लक्ष द्यावे लागेल. चीनच्या मदतीने पाकिस्तान हा जगातला पाचवा अणुबॉम्ब असणारा देश बनला आहे. आपण पण व्हिएटनाम आणी जपानशी आपले अणुबॉम्ब सहकार्य वाढ्वु शकतो.

1 comment:

  1. sir I want to talk to u through mails, phone or anything available....
    I want to ask u some questions regarding India's border disputes..... please sir do help me.... its imp for my college assignments

    ReplyDelete