Total Pageviews

Friday 13 May 2011

SUICIDE ATTACK PAKISTAN 70 KILLED

पाकिस्तान- आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात ७० ठार , May 13, 2011 AT 09:53 AM (IST) पेशावर- पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळ आज (शुक्रवारी) झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात ७० जण मृत्युमुखी पडले आहेत. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ठार केल्यानंतर आधीच अडचणीत आलेल्या पाकिस्तानवर हा मोठा आघात आहे.
प्रशिक्षण केंद्रावरून जवानांना दहा दिवसांच्या सुट्टीसाठी बसमधून घरी रवाना करण्यात येत होते, त्यावेळी त्यांनी नागरी वेष परिधान केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
पेशावरपासून ३० किलोमीटर उत्तरेकडे असलेल्या शबकदार भागामध्ये हा हल्ला झाला. पाकिस्तानच्या वायव्येमधील महत्त्वाचे शहर असलेल्या पेशावरमध्ये या पूर्वीही तालिबान अल-कायदाशी संबंधित अतिरेक्यांनी हल्ले केले आहेत.
चारसद्दा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख निसार खान मारवात म्हणाले की, या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाला आहे; त्यापैकी ६५ जण निमलष्करी दलाचे आहेत. इतर पाच नागरिकांचे मृतदेह शबकदार रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या हल्ल्यात १२ वाहने उद्ध्वस्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेले नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबरला दारा आदम खेल भागात मशिदीजवळ ६८ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यानंतरचा हा पाकिस्तानातील सर्वांत मोठा हल्ला आहे.प्रतिक्रिया खूप वाईट वाटले वाचून . बिचारे निष्पाप लोकांना का त्रास . Saw some pictures on CNN. It;s horrible. एकमेकांना मारून मारतील ते आपण फक्त बघत बसुया आता, आपलायला त्यांनी त्रास दिलाय आता त्यांना भोगु देत , देवाच त्यांना शीक्श देतोय. सर्वांनी सावध होण्याची वेळ आहे. दहशतवादी पाकिस्तान ताब्यात घेत आहे.सर्वाधिक धोका भारताला. वंदे मातरम. जे पेरले तेच उगवले" हा तर निसर्गाचाच नियम आहे, आणि पाकिस्तान आणि अमेरिका नेमके हेच विसरत आहेत, आपल्याला वाईट वाटायचे कारण? जैसी कारणी वैसी भरणी " सचिन said: सुवर्णा अगदी बरोबर बोलला आपण. सापाला पोसू नये!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! सचिन said: सुवर्णा अगदी बरोबर बोलला आपण. सापाला पोसू नये
On 13/05/2011 03:24 PM sai said: काही नाही हि नाटका आहेत हि नाटक पाकिस्तानची .................अमेरिकाला दाखवायाला कि पाकिस्तान चा लादेन अथवा दहशतवादी संघटnaशी काहीही संबध नाही जशी रामाची मार्झी...कोणी काहीही करो...... हा आतंकी BHASMASUR ,aata tyanchyavarach ulatala aahe.dushkarmanchi fale bhogavich laganar. पाकिस्तान चा हा कट आहे. भारताप्रमाणे त्यांच्यावरही दहशदवादी हल्ले होतात हे दाखवण्याचा. पाकिस्तान ला काय हे रोजचच असेल. सुहास said: जैसी कारणी वैसी भरणी " असेच होणार म्हणून सापाला कधी पोसू नये
On 13/05/2011 10:19 AM
"
On 13/05/2011 10:08 AM suvarna said:
On 13/05/2011 10:24 AM Samadhan said:
On 13/05/2011 11:28 AM RAM BHOLWANKAR said:
Pakisthananech nirman kelela
On 13/05/2011 10:51 AM Ganesh said:
On 13/05/2011 12:06 PM Ram said:
On 13/05/2011 03:45 PM
On 13/05/2011 04:49 PM vilas said:
"
On 13/05/2011 03:45 PM
On 13/05/2011 06:45 PM Raj Patil said:
"
On 13/05/2011 05:44 PM Vijay said:
On 13/05/2011 08:49 PM tushar ambede said:
On 13/05/2011 09:52 PM sachin said:
On 13/05/2011 10:37 PM poonam@usa said:

No comments:

Post a Comment