Total Pageviews

Friday 13 May 2011

NAXALS TO INCREASE ARMED STRENGTH TO 20,000

पीपल्स गुरीला लिबरेशन आर्मी'ची (पीजीएलए) मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार- संख्या दुप्पट म्हणजेच 20 हजारांपर्यंत वाढविणार
माओवादी पक्षाची यापूर्वी 2007 मध्ये नववी राष्ट्रीय बैठक झाली होती. यानंतर तीन वर्षांत पक्षाच्या पॉलिट ब्यूरोमधील तीन तर कम्युनिस्ट सेंटरमधील 14 सदस्य ठार झाले आहेत. त्यामुळे "पीडब्ल्यूजी'मधील सक्रिय सदस्यांकडे आता अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार, पक्षाच्या कम्युनिस्ट सेंटरमधील सदस्यसंख्या 19 ते 28 दरम्यान होऊ शकते. तसेच, पॉलिट ब्युरोमधील सदस्यसंख्या चार ते आठ इतकी वाढू शकते. याशिवाय, राज्य आणि केंद्र सरकारविरोधात लढण्यासाठी "पीपल्स गुरीला लिबरेशन आर्मी'ची (पीजीएलए) मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. पक्षाकडे सध्या दहा हजार "पीजीएलए' आहे. येत्या 2013 पर्यंत ही संख्या दुप्पट म्हणजेच 20 हजारांपर्यंत वाढविण्याचे पक्षाने ठरविले आहे.
तरुणांच्या भरतीवर विशेष लक्ष पक्षाच्या गेल्या राष्ट्रीय बैठकीनंतर 200 प्रशिक्षित तरुण आणि तरुणींची निवड करण्यात आली होती. त्यांना संगणक आणि मोबाईल या आधुनिक तंत्रांची बारकाईने माहिती देण्यात आली होती. आतासुद्धा अशाच तांत्रिकदृष्ट्या शिक्षित तरुणांच्या भरतीवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे माओवादी सूत्रांनी सांगितले.माओवाद्यांनी प्रसिद्ध केली नोकरभरतीची जाहिरात ऑपरेशन ग्रीन हंट'च्या पार्श्‍वभूमीवर, माओवाद्यांनी जोरदार भरती मोहीम सुरू केली आहे. माजी सैनिक, शाळा सोडलेली मुले-मुली आणि तरुण डॉक्‍टरांना लक्ष्य करून मुख्यत्वे ही मोहीम आखण्यात आल्याचे सांगण्यात येते. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात या भरतीची माहिती देणारी पत्रके वाटण्यात येत असून, गावागावांत पोस्टर चिकटविण्यात येत आहेत.

'
पोलिस पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध क्रांती करा आणि अमर व्हा' अशी घोषणा पत्रके आणि पोस्टरमधून देण्यात आली आहे. पश्‍चिम बंगाल, ओरिसा, झारखंड छत्तीसगडमध्ये अलीकडच्या काळात माओवाद्यांनी पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांवर (सीआरपीएफ) केलेले हल्ले भ्रष्टाचारी शक्तींविरुद्धचा विजय म्हणून दाखविण्यात येत आहेत. 15 ते 25 या वयोगटातील मुलांना स्वयंपाकी, चालक, परिचारक, डॉक्‍टर, संगणकचालक, डिझेल-पेट्रोल पंपचालक या पदांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन तेलगू, गोंडी ओरिया भाषेतील या पत्रक-पोस्टरांमध्ये करण्यात आले आहे. अगदी दहा ते पंधरा वयाच्या मुलांनाही संधी असल्याचे त्यात म्हटले आहे.
करीमनगर निझामाबाद जिल्ह्यातील सीमेवरच्या गावांत राहणारे आदिवासी माओवाद्यांना अन्नधान्य, इंधन अशी सामग्री तर पुरवतातच; शिवाय सुरक्षा दलांच्या हालचालींची माहितीही देतात. या माहितीचा वापर करू शकतील; मात्र त्यांचा पोलिसांना संशय येणार नाही, अशा लोकांच्या शोधात माओवादी आहेत. निवड झाल्यानंतर शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही पत्रकात घेण्यात आली आहे. स्वत:ची शस्त्रे असणाऱ्यांनाही संधी देण्यात येणार असली, तरी ही शस्त्रे वापरण्याचा अधिकार मात्र संघटनेकडे राहणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज छायाचित्रांसह विशिष्ट पोस्ट बॉक्‍स आणि सामाजिक संघटनांच्या तक्रारपेट्यांमध्ये टाकावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या "जाहिराती'नंतर प्रशासनाने नालगोंडा जंगल परिसरातील तरुणांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलिस आणि सुरक्षा पथकांना दिल्या आहेत. माओवाद्यांनी अलीकडच्या काळात पाचशे युवकांची भरती पूर्ण केली असल्याची माहिती गुप्तचरांना मिळाली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षात (माओवादी) 65 टक्के नेते आंध्रातील असून, 45 टक्के भूमिगत नक्षलवादीही याच राज्यातले आहेत. नेत्यांपैकी 40, तर नक्षलवाद्यांपैकी 30 टक्के लोकांनी वयाची पंचेचाळिशी ओलांडली आहे. हे लक्षात घेऊन पक्षावरील तेलगू वर्चस्व कायम राखण्याचाही उद्देश या भरतीमागे असल्याचे सांगण्यात येते

'

No comments:

Post a Comment