Total Pageviews

Monday 27 April 2015

CHINESE PM VISIT TO PAKISTAN

चिनी अध्यक्षांच्या पाक-भेटीत झालेले करार आणि पाकिस्तानातून जाणारा चीनचा महामार्ग, हे भारतीय हितसंबंधांना बाधा आणणारे आहेतच. रशिया आणि चीन हे दोन देश अमेरिकेच्या गटात नसूनही पाकिस्तान या दोन्ही देशांची मर्जी राखून आहे आणि त्याच वेळी तो अमेरिकेलाही हवाहवासा आहे. पाकिस्तानचे हे वाढते आंतरराष्ट्रीय संबंधही आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजवणारेच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय राजकारणात नवनवे 'मित्र' जोडण्यात मग्न असताना त्यांच्या शपथविधीचे साक्षीदार, शेजारील पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एकाच वेळी चीन आणि अमेरिकेकडून मिळवलेली भरघोस मदत भारताची चिंता वाढवणारी आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. जिनिपग यांचे पाकिस्तानात येणे मोठय़ा भावाने घरी येण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केली. पाकिस्तानात पोहोचण्याच्या मुहूर्तावर जिनिपग यांनी डेली टाइम्स या पाकिस्तानी दैनिकात स्वत:च्या नावाने एक लेख लिहून आपले पाकिस्तानात येणे हे कसे भावाच्या घरी येण्यासारखे आहे असे म्हणत पाक चीन भाईभाईची नांदी गायिली. त्या लेखाचे 'पाक चीन दोस्ती िझदाबाद' हे शीर्षकच या दोन देशांत काय सुरू आहे, त्याची साक्ष देण्यास पुरेसे ठरेल. त्यांचा हा दौरा पाकिस्तानला काय आणि किती मिळाले याच्या बरोबरीने या चिनी दानशूरतेचा भारतावर काय परिणाम होणार या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या या पाक दौऱ्याच्या निमित्ताने भारताच्या तुलनेत पाकिस्तानची एक उल्लेखनीय बाब अधोरेखित झाली. तिचीही दखल घ्यायला हवी. ही बाब म्हणजे परस्परविरोधी आंतरराष्ट्रीय ताकदींना आपल्या हितासाठी वापरून घेण्याची पाक क्षमता. इतिहासात ती अनेकदा दिसून आली. परंतु वर्तमानातही ती तितक्याच क्षमतेने टिकून आहे. तेव्हा आधी ती समजून घ्यायला हवी. पाक हा सौदी अरेबियाच्या आíथक मदतीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. परंतु तरीही नवाझ शरीफ यांनी गेल्या आठवडय़ात सौदीच्या मदतीसाठी येमेनमध्ये पाक फौजा पाठवायला सपशेल नकार दिला. त्याआधी सौदीने पाकला सहज गंमत म्हणून, कोणत्याही परतफेडीच्या अटींशिवाय १०० कोटी डॉलर दिले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तितक्याच रकमेचे साह्य़ पाकिस्तानला मंजूर केले. हे साह्य़ साधेसुधे नाही. तर ते अत्याधुनिक शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणालीच्या रूपात आहे. महत्त्वाचे म्हणजे शरीफ यांना त्यासाठी अमेरिकेचा अध्यक्ष बराक हा आपला कसा मित्र आहे हे दाखवावे लागले नाही की त्यांना चहा पाजावा लागला नाही. वास्तविक अमेरिका आणि चीन यांचे संबंध तसे तणावपूर्णच आहेत. तरीही पाकिस्तानने मात्र या दोन्ही देशांची मर्जी उत्तमपणे सांभाळलेली आहे. जिनिपग यांच्या ताज्या दौऱ्यात हे दिसून आले. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तान कशी प्रयत्नांची शर्थ करीत आहे, असा निर्वाळा जिनिपग यांनी दिलाच. पण त्याच वेळी आतापर्यंतची विक्रमी गुंतवणूक पाकिस्तानसाठी जाहीर केली. म्हणूनच या दौऱ्याचे फलित भारतीय हितसंबंधांच्या परिप्रेक्ष्यातून पाहायला हवे. ४६०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक ही चीनची आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. एवढी रक्कम म्हणून तर ती महत्त्वाची आहेच. परंतु त्याच बरोबरीने या पशातून पाकिस्तानात काय केले जाणार आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. या पशातून उभा राहणार आहे तब्बल ३ हजार किलोमीटरचा महामार्ग. पश्चिम चीनपासून थेट ग्वादर या बंदराला जोडणारा. चीन-पाकिस्तान आíथक मार्ग असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे आणि चीनला तो केवळ तीन वर्षांत पूर्ण करायचा आहे. या असल्या प्रकल्प उभारणीतील चीनचा लौकिक लक्षात घेता इतके भव्य काम तीन वर्षांत कसे पूर्ण होईल असा भारतीय किंतु मनातदेखील येऊन चालणार नाही. हा रस्ता चीन तीन वर्षांत उभारेलच. तो पूर्ण झाल्यावर पश्चिम आशियातील तेल वा नसíगक वायू वाहून नेण्यासाठी चीनचे तब्बल १२ हजार किमी वाचणार आहेत, हेदेखील आपण लक्षात घ्यावयास हवे. यास अनेक परिमाणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजाराची फेररचना. आणखी फार फार तर चार-पाच वर्षांत अमेरिका ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल. तूर्त तो देश पश्चिम आशियातील तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. अमेरिकेची या तेल वापराबाबत स्पर्धा आहे ती फक्त चीनशी. अमेरिका तेलाच्या उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण झाल्यावर त्यास या वाळवंटातील गुंतवणुकीची इतकी गरज लागणार नाही. तेव्हा अमेरिकेच्या अनुपस्थितीने निर्माण होणारी पोकळी भरून काढेल तो चीन. तेव्हा या पाक महामार्गास त्या अर्थाने महत्त्व आहे. त्याच वेळी हा महामार्ग तयार झाल्यावर चीनचा या परिसरातील एकूणच दबदबा वाढेल. अगदी आपल्यासाठी भळभळती जखम असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधेही चीनची सरळ उपस्थिती असेल. तूर्त िहदी महासागरात चीन सक्रिय नाही. पण या नव्या पाक महामार्गामुळे तसे करणे चीनसाठी सहजसाध्य होणार आहे. पाकिस्तानचे ग्वादर बंदर उभे आहे ते मुळात चिनी अर्थसाह्य़ावर. नव्या महामार्गाने ते अधिकच चिनी होईल. या आधीही चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ही आपल्यासाठी मोठीच डोकेदुखी आहे. आता ती अधिकच होईल. पाकिस्तानचा अणुबाँब तयार झाला केवळ चोरटय़ा चिनी साह्य़ामुळे. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानातील ही थेट चिनी गुंतवणूक आपली झोप उडवणारी ठरेल हे निश्चित. जिनिपग यांच्या या एकाच दौऱ्यात आपल्यासाठी डोकेदुखी असणाऱ्या या दोन देशांत तब्बल ५१ विविध करार झालेत यावरून या उभयतांमधील मधुर संबंधांचा अंदाज बांधता येईल. चीनचे हे पाक औदार्य अमेरिकेच्या दानशूरतेपेक्षा अधिक आहे, ही बाबदेखील महत्त्वाची ठरते. यास आणखी एक कोन आहे. पाकिस्तान आणि रशिया या दोन देशांतील सुधारत चाललेल्या संबंधांचा. रशियाशी चांगले संबंध ही इतके दिवस आपली मक्तेदारी होती. पण आपले आणि अमेरिकेचे संबंध सुधारत असल्यामुळे रशियाने या प्रदेशात पाकिस्तानला चुचकारायला सुरुवात केली. आता हे संबंध भारत आणि रशिया या समीकरणाइतके नाही, तरी पूर्वीपेक्षा बरेच सुधारले आहेत. तेव्हा एकाच वेळी चीन आणि रशिया या दोन देशांशी पाक उत्तम समीकरण राखत आहे. या दोन्ही देशांतील समान धागा म्हणजे त्यांचा अमेरिका विरोध. रशिया आणि चीन हे दोघेही अमेरिकेच्या गटात नाहीत. पण तरी पाकिस्तान या दोन्ही देशांची मर्जी राखून आहे आणि त्याच वेळी तो अमेरिकेलाही हवाहवासा आहे. इतके दिवस चीनला विगुर मुस्लीम बंडखोरांनी सतावले होते. मूळचे तुर्की असलेले हे बंडखोर संपवण्यासाठी त्या देशाला आता पाकिस्तानची मदत अधिकृतपणे घेता येईल. ही सर्व लक्षणे आपल्यासाठी काही निश्चितच चांगली नाहीत. उलट धोक्याची घंटा वाजवणारीच आहेत. तेव्हा यास तोंड देण्याचा एक सोपा मार्ग दिसतो. तो म्हणजे अधिक अमेरिकाधार्जणिे बनण्याचा. पण त्यातही पुन्हा धोका आहे. एका देशाच्या इतके कच्छपि लागणे आपणास परवडणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर जातील तेव्हा त्यास ही सर्व पाश्र्वभूमी असेल. त्या दौऱ्यात जिनिपग हे मोदी यांना आपल्या गावी नेऊन झोपाळ्यावर बसवून त्यांचे आदरातिथ्य करणार आहेत किंवा काय, हे अद्याप कळावयास मार्ग नाही. परंतु आंतरराष्ट्रीय संबंधांचा हा झुला त्यांनी आपल्यापासून दूर नेला आहे हे निश्चित. आंतरराष्ट्रीय व्यवहारांत कोणीच कोणाचा मित्र नसतो. मात्र मित्र भासणाऱ्याच्या शत्रूशी आपली मत्री हवी हेच यातून दिसून येते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अखेर पाकिस्तानचा दौरा केलाच. चीनची पाकिस्तानशी होत असलेली जवळीक ही भारताच्या दृष्टीने तशी धोकादायकच मानली पाहिजे. जी शिनपिंग हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच पाकिस्तानचा दौरा करणार होते. परंतु, इमरान खानच्या राजकीय पक्षाने नवाझ शरीफ सरकारविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे दौरा स्थगित करावा लागला होता. पाकिस्तानात त्यावेळी मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यामुळेच अस्थिरताही निर्माण झाली होती. पाकिस्तानात दाखल होण्यापूर्वीच शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे गोडवे गायले. पाकिस्तानात चाललो म्हणजे आपल्या भावाकडे चाललो आहोत, अशी भावना माझ्या मनात असल्याचे सांगत शी जिनपिंग यांनी पाकच्या जिभेला मधाचे बोट चाटवल्यासारखे केले. वास्तविक चीनला पाकिस्तानशी मैत्री करण्याची तशी काहीही गरज नाही. परंतु, आशिया खंडातील मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या भारतावर कुरघोडी करण्यासाठीच चीनने आपल्या अध्यक्षांचा पाक दौरा आखला, हे न ओळखण्याएवढा भारतही आता दूधखुळा राहिलेला नाही. ‘चीन-पाकिस्तान मैत्री अमर रहे’ या मथळ्याखाली शी जिनपिंग यांनी स्वत: पाकच्या डेली टाईम्स या वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. तसे पाहिले तर चिनी राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच पाकभेट आहे. असे असतानाही पाकमध्ये जाताना आपल्याला अजिबात परके वाटत नाही आणि पाकला आपल्या हृदयात स्थान आहे, असे जे शी जिनपिंग यांनी म्हटले आहे, ते भारताला डिवचण्यासाठीच आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. माझ्या तरुणपणी मी पाकविषयी बरंच ऐकलं होतं आणि त्यावेळच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. जगाचं आकाश चीनसाठी पाकमुळंच मोकळं झालं आणि संयुक्त राष्ट्रसंघटनेत पाकच्या पाठिंब्यामुळेच चीनला स्थायी सदस्यत्व मिळालं, हे सांगायलाही शी जिनपिंग विसरले नाहीत. यावरूनच त्यांची भारतविरोधी खोडी लक्षात येते. हिंदी-चिनी भाईभाई करीत भारतावर आक्रमण करणार्या चीनवर अजिबात विश्वास ठेवून चालणार नाही. चीनच्या गोड बोलण्याला भुलणार्या पाकिस्तानलाही एक दिवस ड्रॅगनचे फूत्कार सहन करावे लागतील. आशिया खंडात स्वत:चे निर्विवाद वर्चस्व कायम राखण्यासाठी चीनकडून पाकिस्तानचा वापर केला जाईल आणि नंतर चिनी-पाकिस्तानी भाईभाई करीत एक दिवस ड्रॅगन पाकच्या गळ्याभोवती घट्ट फास आवळेल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. चीनला पाकिस्तानची गरज केवळ भारताला शह देण्यासाठी आहे. चीन पाकिस्तानला भरभरून मदत करेल, पाकचे गोडवेही गाईल, जी जी मदत करता येणे शक्य आहे ती सगळी करील. पण, गरज संपली की पाकला नेस्तनाबूत करण्यासही मागपुढे पाहणार नाही, हे पाकिस्तानच्या लाचार राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. ब्रिटिशांना एकसंध भारत नको होता, त्यामुळेच त्यांनी हिंदू-मुसलमानांत फूट पाडून अखंड भारताचे विभाजन केले. धार्मिक आधारावर भारतात भांडणे लावून दिलीत अन् नंतर पद्धतशीर योजना आखून भारताचे तुकडे पाडले. आज पाकिस्तानची जी अवस्था आहे, ती कमालीची वाईट आहे. पाक भारताचा अविभाज्य भाग असता, तर कदाचित तिथे समृद्धी नांदली असती, तिथले जीवनमानही चांगले राहिले असते. पण, ब्रिटिशांच्या कटकारस्थानाला बळी पडलेल्या तेव्हाच्या नेत्यांनी आज पाकिस्तानवर लाचारीची वेळ आणली आहे आणि पाकमधील आजचे नेतेही आंतरराष्ट्रीय समुदायाचा डाव ओळखण्यात अपयशी ठरले आहेत. चीन आपला वापर करून घेत आहे, हे जर पाकने लक्षात घेतले नाही आणि भारताविरुद्ध चीनची साथ दिली, तर त्याचे आणखी वाईट परिणाम हे पाकिस्तानमधील जनतेलाच भोगावे लागणार आहेत. चीनला पाकिस्तानशी तसे काहीच देणेघेणे नाही. चीनच्या मनात पाकिस्तानबद्दल असलेला कळवळा हा संपूर्णपणे कृत्रिम आहे आणि स्वार्थी आहे. विशिष्ट मुद्यांवरच चीन पाकिस्तानला पाठिंबा देतो, हे तिथल्या नेत्यांच्या लक्षात येत नाही असे नाही. पाकिस्तानातल्या नेत्यांचे राजकारणही भारतद्वेषावरच आधारित असल्याने देशातील जनतेला भारताविरुद्ध भडकवणे, भारताविरुद्ध अपप्रचार करीत राहणे हा उद्योग तेथील नेते सातत्याने करीत आले आहेत. म्हणूनच पाकी नेते चीनला साथ देत आहेत. चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे त्यांनी जे जंगी स्वागत केले, जी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था त्यांना पुरविली, ती भारतद्वेषातूनच. १९५० च्या उत्तरार्धात जेव्हा भारत आणि चीन यांच्या संबंधात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून चीनने पाकिस्तानशी जवळीक करण्यास प्रारंभ केला. भारताशी प्रतिकूल असल्याने पाकिस्तानच्या भौगोलिक स्थितीचा लाभ उठवण्याची चीनने ठरविले आणि आजतागायत चीनचा तसला उद्योग सुरू आहे. १८ एप्रिल १९५५ रोजी बांडुंग येथे अलिप्त राष्ट्रांची परिषद भरली होती. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष माओ यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. तेव्हापासून आजतागायत भारत-चीन संबंधात तणावच राहिला आहे. मधल्या काळात १९६२ साली चीनने भारतावर आक्रमणही केले होते. त्यामुळे तर दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांमध्ये आणखी तणाव वाढला होता. आज बांडुंग येथे जे संमेलन होते आहे, त्याला उपस्थित राहण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तानमार्गे पोहोचले आहेत, हे लक्षात घेतले आणि चीनमध्ये पाकिस्तानबाबत जी भावना आहे ती लक्षात घेतली, तर चीनची भूमिका स्पष्ट होते. ही स्पष्ट भूमिका लक्षात घेऊनच भारतालाही आपले परराष्ट्र धोरण ठरवावे लागेल, त्याचप्रमाणे संरक्षणसिद्धताही करावी लागेल. १९६२ सारखी स्थिती पुन्हा उद्भवणारच नाही आणि चीन पुन्हा आगळीक करणारच नाही, याची कसलीही शाश्वती नाही. संयुक्त राष्ट्रसंघटनेत स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाकिस्तानने चीनला मदत केली होती, असा उल्लेख शी जिनपिंग यांनी त्यांच्या लेखात करणे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. वास्तविक, तेव्हाचे आपले पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही चीनसाठीच वकिली केली होती आणि त्याची आठवण भारतीयांना करवून देत भारतात नेहरूंविरुद्ध असंतोष पसरवायचा हा शी जिनपिंग यांचा हेतू स्पष्ट दिसतो आहे. तोही भारतीय राज्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. देशातील आम जनतेची धारणा तर अशीच आहे की, स्वत:चा दावा मजबूत करण्याऐवजी पंतप्रधान असताना नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत चीनला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे तेव्हाच्या निर्णयावरून भारतीय जनतेत रोष निर्माण करण्याचा आजच्या चिनी राज्यकर्त्यांचा हेतू भारतीय राजकारण्यांनी लक्षात घेतला पाहिजे. जे झाले ते झाले, त्यावरून अंतर्गत राजकारणात कॉंग्रेसला ठोकण्याचे काम विरोधी पक्षांना करता येईल. पण, त्यावरून देशात फूट पडू नये याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाकिस्तानने ५०-६० वर्षांपूर्वी जशी आपली हवाई सीमा चीनसाठी खुली केली होती आणि जगाशी संपर्क करण्याचा चीनचा मार्ग मोकळा केला होता, तसाच तो आजही राहावा, शिवाय पाकिस्तानच्या सामुद्रिक हद्दीचाही वापर जागतिक व्यापार वाढविण्यासाठी आणि आशिया खंडात आपली ताकद वाढविण्यासाठी करावा, हा चीनचा मुख्य हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठीच चीनने पाकिस्तानला आर्थिक पाठबळ दिले आहे, हे उघड आहे. मे महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचा दौरा करणार आहेत. त्यावेळी देशाला वाटणार्या सर्व चिंता मोदी यांनी चीनपुढे स्पष्टपणे मांडतीलच. चीनसोबत भारताचा भौगोलिक मुद्यांवरही वाद आहे. तो वाद कमी करण्याच्या दृष्टीने आणि भारताचा चीनने बळकावलेला भूभाग पुन्हा परत मिळविण्यासाठीही आगामी काळात प्रयत्न करावे लागणार आहेत. चीनने पाकिस्तानशी केलेली मैत्री ही भारतासाठी कधीही परवडणारी नाही. चिनी ड्रॅगनचे फूत्कार आणि पाकिस्तानकडून दहशतवादाला घातले जाणारे खतपाणी, या दोन्ही बाबी भारताला परवडणार्या नाहीत. या दोन्ही आघाड्यांवर भारत सरकार कशी भूमिका पार पाडते यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. आशा करू या- मोदी सरकार सर्व आघाड्यांवर यशस्वी शिष्टाई करेल.

No comments:

Post a Comment