Total Pageviews

Sunday 15 May 2011

ARMY SOLDIER MOHMAD SHAIKH DIES IN ENCOUNTER IN KASHMIR

सोलापूर। दि. 15 (विशेष प्रतिनिधी)

सोलापूरच्या मातीला असलेली बलिदानाची परंपरा राखत काश्मिर खो:यात शहीद झालेल्या मोहम्मद मोहसीन शेख याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. मोहसीनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असला तरीही शौर्य आणि देशाभिमानाची प्रेरणा दफनविधीस जमलेल्या तरुणांच्या मनात ठासून होती. जनाजा नमाजच्यावेळी मोहसीनच्या वडिलांना आवरता न आलेला हुंदका पाहून अंत्यविधीस जमलेले सर्वचजण भावूक झाले होते.

काश्मीर खो:यातील कुपवाडा परिसरात अतिरेक्यांच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देताना सोलापूरचा मोहम्मद मोहसीन शेख (वय—27) हा शहीद झाला होता. मोदी कब्रस्तानमध्ये अखेरची सलामी देऊन, शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. शहिदाचे पार्थिव दिल्लीहून विमानाने पुणो येथे आणण्यात आले होते, तेथून रविवारी पहाटे 3 वाजता पुण्याहून खासगी अॅम्ब्युलन्समधून सोलापुरातील शास्त्रीनगर येथील घरी आणण्यात आले. सकाळी इस्लामधर्माच्या रितीरिवाजाप्रमाणो आंघोळ घालून पार्थिव सोलापूरकरांना दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी 8 वाजता लष्कराच्या वतीने घरासमोर मानवंदना दिली.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, महापौर आरिफ शेख, तहसीलदार रामभाऊ माने, पोलीस आयुक्त हिंमतराव देशभ्रतार आदी उपस्थित होते. त्यानंतर 8.30 वाजता जवानाची अंत्ययात्र काढण्यात आली. अंत्ययात्र शानदार चौक, मौलाली चौक, जगदंबा चौक, सिव्हिल चौक मार्गे न्यायालयाच्या बाजूला असलेल्या पानगल महाविद्यालयाच्या मैदानावर आणण्यात आली.

ाहर काझी सय्यद अमजद अली यांनी ‘नमाजे जनाजा’ अदा केली. हजारो मुस्लीम बांधवांनी उभे राहून नमाज पठण केले. पुढे ही अंत्ययात्र किडवाई चौक, विजापूरवेस, पंचकट्टा, सिद्धेश्वर हायस्कूल, डॉ.आंबेडकर चौक (पार्क चौक), डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गे व्ही.आय.पी. रोडवरील मोदी मुस्लीम कब्रस्तान येथे पार्थिव आणण्यात आले. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी शहरवासीयांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मोदी कब्रस्तान येथे शासकीय इतमामात लष्कराचे जवान आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर हावेत तीन वेळा फायरींग करून मानवंदना देण्यात आली. 12 वाजता विधीवत दफन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम, जिल्हाधिकारी जगदीश पाटील, प्रांताधिकारी पराग सोमण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे—पाटील, नगरसेवक बाबा मिस्त्री, तौफिक शेख, माजी महापौर अॅड. यू.एन.बेरिया, मनोहर सपाटे, माजी सभागृह नेते मकबूल मोहोळकर, उपअभियंता मोहन कांबळे आदी उपस्थित होते.

मानवंदना देण्यासाठी दिल्ली येथील लष्कराचे सुभेदार रवींद्रपाल सिंह, हवालदार ए. डी. भोसले, 38 महाराष्ट्र बटालीयनचे सुभेदार विरसेन तांबे, सुभेदार राणा, हवालदार बाळासाहेब खराडे, डी. पी. दास, राजकुमार, अहमदनगर येथील एस.ओ.टी.टी. ट्रेनिंग स्कूलचे सहदेव काटे, सुभेदार रणदिवे, सैनिक बोर्डाचे गोडबोले आदी अधिकारी, जवान उपस्थित होते. अंत्ययात्रेमध्ये 10 ते 12 हजार लोकांनी सहभाग घेतला.

मोहसीन शेख यांनी कमी वयात देशासाठी बलिदान दिले. हा सोलापूरचा इतिहास झाला असून अशा पद्धतीने वीर मरण आलेला मोहसीन हा भाग्यवान तरुण आहे. अशी चर्चा अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या लोकांमधून केली जात होती.

मोहसीन शेख यांचे स्मारक व्हावे— पालकमंत्री

मोहम्मद मोहसीन शेख यांनी देशासाठी दिलेले बलिदान सोलापूरकरांच्या कायम स्मरणात राहण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे एक स्मारक तयार करण्यात यावे. अशी अपेक्षा पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी यावेळी व्यक्त केली.

रस्त्याला नाव देणार— महापौर

शास्त्री नगर येथील मोहसीन शेख यांच्या घरासमोरील रस्त्याला ‘शहीद मोहसीन शेख’ असे नाव देणार असून, लवकरच यावर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन अंमलबजावणी करू, असे आश्वासन यावेळी महापौर आरिफ शेख यांनी दिले.

मोहसीन तुङो सलाम..

शहरातील विविध चौकात तरुण मंडळाच्या वतीने मोहसीन तुङो सलाम.. मोहसीन शेख अमर रहे.., ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी.. अशा अनेक घोषवाक्यासह वेगवेगळय़ा पद्धतीने काढलेल्या फोटोचे डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते.

सोलापूरकरांच्या दु:खात ढग झाले सहभागी

उन्हाळय़ामुळे दररोज 40 अंश सेल्सियसच्या पुढे तापमान जात असताना रविवारी मात्र दिवसभर ढगाने हजेरी लावली होती. मोहसीनच्या कुटुंबावर आणि नातेवाईकावर कोसळलेल्या दु:खात ढगही सहभागी झाले आहेत की काय असा आभास निर्माण झाला होता

No comments:

Post a Comment