Total Pageviews

Monday 16 May 2011

ARMY QUICK TRACK JUSTICE IN ADARSHA CASE

http://epaper.dnaindia.com/newsview.aspx?eddate=5/17/2011&pageno=5&edition=40&prntid=140603&bxid=30513234&pgno=5

THESE BUREAUCRTS WILL ENSURE THAT ALL BUREAUCRTS ARE PROTECTED.
INDIAN ARMY HAS ALREADY PUNISHED GENERAL HOODA ONLY SERVING GENERAL INVOLVED IN ADARSHA.HE WAS DENIED HIS PROMOTION HAS RESIGNED FROM ARMY.IN ADDITION HE WILL GET PUNISHMENT AS DECIDED BY COURT OF LAW.

आता 'आदर्श'ची हार्ड डिस्क गायब
आधी महत्त्वपूर्ण कागदपत्रे... मग फाइल्स... आता तर थेट कम्प्युटरची हार्ड डिस्क... ही यादी आहे कुलाब्यातील वादग्रस्त 'आदर्श' सोसायटीशी संबंधित 'गायब' झालेल्या महत्त्वपूर्ण माहितीची. महाराष्ट्राच्या नगरविकास खात्यात हे 'चमत्कार' होत असून सोमवारी सीबीआयनेच मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हा गौप्यस्फोट केला.

कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श सोसायटीची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या पथकाने नगरविकास खात्यातील एकूण नऊ कम्प्युटर्सची तपासणी केली होती. त्यातील एका कम्प्युटरमधील हार्ड डिस्कच गायब झाल्याचे आढळून आले. 'आदर्श'विषयी माहिती असलेल्या कम्प्युटरमधीलच हार्ड डिस्क गायब झाल्याने त्याविषयी सखोल चौकशी आवश्यक असल्याचे सीबीआयने कोर्टापुढे सांगितले. याच नगरविकास खात्यातून सर्वप्रथम 'आदर्श'शी संबधित कागदपत्रे गहाळ झाली असून त्याप्रकरणी तिघा कर्मचाऱ्यांना सीबीआयने गेल्या आठवड्यातच अटक केली आहे. त्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्या मंत्रालयातूनही 'आदर्श' संबंधित फाइल गायब होण्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता.

फाइल प्रकरणातील तिघांच्या कोठडीत वाढ

नगरविकास खात्यातील हार्ड डिस्क गायब झाल्याची माहिती सीबीआय देत असतानाच 'आदर्श'च्या फायलीतील चार पाने गहाळ झाल्याबद्दल अटक झालेल्या डेस्क ऑफिसर गुरुदत्त वाजपे, एन. एन. नार्वेकर व वामन राऊळ या नगरविकास खात्यातील तिघा सरकारी कर्मचा-यांची कोठडी १८ मेपर्यंत वाढविण्याचे आदेश सोमवारी कोर्टाने दिले. तिघांच्या जामीन अर्जावर १८ मे रोजी सुनावणी होणार आहे

No comments:

Post a Comment