SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Tuesday, 15 August 2017
Please don’t worship our soldiers (Published in New Indian Express 14 August 2017) Aditi Hingu
Monday, 14 August 2017
NEW BOOK BY BRIG HEMANT MAHAJAN- India’s Coastal Security, Challenges, Concerns & Way Ahead”
Indian Maritime Foundation(http://indianmaritimefoundation.org/) a think tank dealing with maritime security runs Maritime Research Centre along with a fellowship programme to support and encourage research on various facets of maritime domain. They tasked Brig Hemant Mahajan, a soldier at heart -with a flair for strategic and tactical research, to pen down his research on “India’s Coastal Security—Challenges, Concerns & Way Ahead” mainly to generate informed discussion among all stake holders for improving the coastal security qualitatively.
This book will provide a broad understanding of the precepts governing the growth of India's coastal security,for the media, government agencies and security forces of the country . This book is important for anyone who is associated with the maritime domain & India’s national security.
The study is based primarily on information gathered during the field trips to coastal states over the course of three years. The states visited were Maharashtra, Gujarat, Karnataka, Kerala, Andhra Pradesh, Tamil Nadu and the Andaman & Nicobar and Lakshadweep Islands. Data for the study has been obtained through personal observations as well as a combination of personal and group interviews. A number of naval, coast guard, and police personnel as well as officials of various ministries and departments engaged in the various dimensions of coastal security at the national, state and local levels have been interviewed including fishing community.
As we hurtle though the opening decades of the current century, inadequate coastal-security will continue to impose large vulnerabilities upon India.
Many positives have evolved since last eight years because of on-the-job training and learning. Establishment of JOC, improved coastal surveillance and infrastructure have improved coastal security. Intelligence generated is better. A large number of coastal security exercises have been very useful. Many operations based on intelligence inputs are being launched to prevent breaches in security.
Brigadier Mahajan’s book, with its emphasis upon practicable and viable action points, is an important attempt to reduce the effects of our vulnerabilities. As such, it is a valuable addition to the body of knowledge for all concerned with planning, legislating, coordinating, executing thus ensuring India’s coastal security.
This book should generate informed discussion among all stake holders for further improving the coastal security.I am sure you will find it useful.
India’s Coastal Security, Challenges, Concerns & Way Ahead”BY BRIG HEMANT MAHAJAN, YSM,Pages-336.Price-Rs 600/-
The book is available with Madhavi Prakashan,Dattakuti,1416,Sadashiv Peth,Pune-411030,Maharashtra,Tele-020-24474762,020-24475372,MOB-09325097494.E Mail-madhavipublisher@gmail.com
Brief Layout of the book-
1. Foreword Cmde Rajan Veer, President IMF.
2. Foreword Vice Admiral Pradeep Chauhan, AVSM BAR,VSM
3. Foreword Additional Director General Coast Guard Shri SPS Basara,
4. Foreword Shri Praveen Dixit, Ex DGP Maharashtra Police
5. Preface by the Author Brig Hemant Mahajan,YSM
6. Chapter 1 -Learning From the Past: History Of Coastal Security
7. Chapter 2-The Threat Today and Recommendations
8. Chapter -3 National Security,Indian Maritime Environment, Maritime Security And Internal Security
9. Chapter 4 Coastal Security And Indian Coast Guard
10. Chapter 5-Coastal Security and Marine Police
11. Chapter 6 Status Of Coastal Security In Coastal States/UTs
12. Chapter 7 Coastal Security And Indian Navy
13. Chapter 8-Coastal Security And Other Agencies
14. Chapter 9-Securing Ports, Coastal and Offshore Installations
15. Chapter 10-Coastal Security of Island Territories
16. Chapter 11 Intelligence Operations-Actionable Intelligence is the Key
17. Chapter 12-Maritime Legal Framework, Private Maritime Security Companies and Sagarmala
18. Chapter 13-International Best Practices: How Other ICGs Provide Coastal Security
19. Chapter 14 Future Scenario
20. Chapter 15 Summary of Major Recommendations
21. Appendix1A and Appendix 1B-Summary of various terror/criminal acts in the Southern states.
22. Appendix 2-Management of Land Borders: Lessons for Coastal Security
23. Important Abbreviations.
24. Selected Bibliography
25. Explanatory Notes
26. Authors Biodata
27. Page Index
Saturday, 12 August 2017
स्वातंत्र्यदिन, काश्मिरी जनता आणि दहशतवाद…! August 13, 2017 0
काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्वावस ठेवावा. त्यांचे संरक्षण करण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पृष्ठभूमीवर अतिरेक्यांनी दिलेल्या धमकीला भीक न घालता, काश्मिरी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये बिनधास्त सहभागी व्हावे अन् धमकी देणार्याभ अतिरेक्यांना सडेतोड उत्तर द्यावे! काश्मिरी जनता जोपर्यंत स्वत:ला भारताचा अविभाज्य घटक मानत नाही तोपर्यंत त्यांची सर्वांगीण प्रगती केवळ अशक्य आहे…
मंगळवारी, १५ ऑगस्टला देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. संपूर्ण देश त्यासाठी सज्ज आहे. दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिल्यानंतर आणि असंख्य क्रांतिकारकांनी हसतहसत स्वत:ला फासावर चढविल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. देश स्वतंत्र व्हावा यासाठी अगदी सामान्यातल्या सामान्य नागरिकांपासून तर महात्मा गांधींपर्यंत अनेकांनी आपापल्या परीने योगदान दिल्यानेच आज आम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची संधी मिळत आहे. असे असले तरी भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरखोर्यारत स्वातंत्र्यदिन साजरा होऊच नये यासाठी अतिरेकी संघटनांकडून धमक्या मिळू लागल्या आहेत. काश्मीरमधल्या शाळांतील मुलांनी आणि शिक्षकांनी १५ ऑगस्टच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देणारी पत्रके शाळांच्या भिंतींवर अतिरेक्यांकडून चिकटवण्यात आली आहेत. खोर्याीतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर दहशतवादाचे सावट आहे. परंतु, भारतीय सुरक्षा दलाचे जवान, काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या जिवाचे संरक्षण करण्यासाठी खोर्याेत सज्ज आहेत. नागरिकांनी अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बिनधास्त सहभागी व्हावे, असे आवाहन भारत सरकारनेही केले, हे योग्यच झाले.
गेल्या वर्षीपासून काश्मिरात दहशतवाद पुन्हा फोफावू लागला असताना, भारत सरकारने कणखर भूमिका घेत दहशतवाद निखंदून काढण्यासाठी लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग देशहितासाठी करीत लष्कराचे शूर जवान दररोज अतिरेक्यांना टिपत आहेत. दोनशेपेक्षा जास्त सशस्त्र अतिरेक्यांची ओळख पटवत त्यातले अर्धे यमसदनी पाठवून, खोर्याअतील दहशतवाद समाप्त करताना अर्धी लढाई सुरक्षा दलांनी जिंकली आहे. उरलेली लढाई सरकारही स्वत:च्या पातळीवर लढत आहे. गिलानी, मीरवाईज उमर फारूक आणि यासिन मलिकसारखे जे फुटीरतावादी नेते आहेत, जे भारताचे मीठ खाऊन पाकिस्तानची पाठराखण करतात, त्यांची दुकानदारी बंद करण्याचा वज्रनिर्धार सरकारने केला आहे. त्यातूनच गिलानी गटाचे सात लोक सध्या तुरुंगात धाडण्यात आले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
गेल्या वर्षी लष्कराने बुरहान वानी या कुख्यात अतिरेक्याला टिपले होते. त्यानंतर सबजार अहमद भट याला टिपले होते. आत्ता गेल्याच आठवड्यात लष्कराने अबु दुजाना या खतरनाक अतिरेक्याला मारले. त्यानंतर कालपरवाच मुसा गटाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात लष्कर यशस्वी झाले. दररोज दोन ते तीन अतिरेक्यांना हुडकून मारण्यात लष्कराला जे यश मिळत आहे ते पाहता, अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे आणि त्यातूनच त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शाळकरी मुलांनी सहभागी होऊ नये अशी धमकी दिली, हे स्पष्ट आहे. भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली असताना आणि सुरक्षा दलाचे जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करीत असताना, काश्मिरी जनतेने अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता स्वातंत्र्यदिन धुमधडाक्यात साजरा करायला हवा.
आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की, काश्मिरी जनता जोपर्यंत स्वत:ला भारताचा अविभाज्य घटक मानत नाही तोपर्यंत त्यांची सर्वांगीण प्रगती केवळ अशक्य आहे. भारतीय लष्कर जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमध्ये दाखल झाले होते, तेव्हा ते काश्मिरी जनतेच्या रक्षणासाठीच, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. जर आपण अजूनही दहशतवाद्यांनाच आश्रय देणार असू, तर शांतता अन् स्थैर्य कधीच लाभणार नाही अन् आर्थिक प्रगती तर शक्यच होणार नाही, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. कट्टरपंथी विचार कधीच प्रगतीकडे नेत नाहीत, ते विनाशाचेच कारण ठरतात, हे लक्षात घेऊन काश्मिरी जनतेने स्वयंनिर्णय घेतला तरच त्यांचे कल्याण होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. काश्मिरी तरुणांनी आयएसआय आणि फुटीरतावाद्यांच्या कचाट्यातून स्वत:ला सोडवावे आणि उत्तम आयुष्य जगण्याचा मार्ग मोकळा करावा.
आज काश्मीरमध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, ती त्या प्रदेशाला कुठे घेऊन जाणार, हे येणारा काळच सांगेल. पण, काश्मीरमधल्या लोकांची वृत्ती बदलली नाही तर ते आत्मनाश करून घेणार, यात शंका नाही! काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्यापासून आजपर्यंत तिथे कधीही शांतता नांदली नाही. नांदू दिली गेली नाही. बोटावर मोजण्याएवढ्या काही स्वार्थी लोकांनी तिथल्या शांतताप्रिय नागरिकांना भडकवले आणि आपल्या पोळ्या शेकण्याचा उद्योग केला. आजही तो घाणेरडा उद्योग सुरूच आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या चिथावणीवरून काश्मिरी तरुण भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर दगड फेकत आहेत, त्यांना शिवीगाळ करीत आहेत, त्यांचा अपमान करीत आहेत. अतिरेक्यांशी लढणार्यार आमच्या जवानांच्या मार्गात ते आडवे येत आहेत. तिथले तरुण पाकच्या चिथावणीला बळी पडत असेच वागत राहिले, तर त्यांच्या सत्यानाशाला कारणीभूत तेच ठरणार आहेत!
काश्मीरचे काय होणार याची चिंता सगळ्यांनाच वाटत असली, तरी केंद्रातील मोदी सरकार काश्मीरचा प्रश्न योग्य रीतीने हाताळत आहे आणि त्याबाबत सामान्य जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. जेवढी चिंता आपल्याला आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक चिंता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकार्यांणना आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याकडे वाकड्या नजरेने पाहणार्यायला धडा शिकविण्याची ताकद आमच्या सेनादलात आहे, याविषयी आम्ही खात्री बाळगली पाहिजे. आज काश्मिरात जी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेत सरकारने निश्चिआतपणे उपाय योजले असणार, यात शंका नाही. योजलेले उपाय गोपनीय ठेवणे आवश्यक नसते तर ते सरकारने जनतेला सांगितलेच असते. आपण निवडून दिलेले सरकार असल्याने त्यावर विश्वारस ठेवत सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत हे खरे असले तरी सगळे दहशतवादी मुसलमानच आहेत, हे दुर्दैवाने खरे आहे. काश्मीर भारतात विलीन झाल्यापासून भारत सरकारने कधीही काश्मीरला सापत्न वागणूक दिली नाही. मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याच्या मार्गातही सरकारने कधी बाधा आणली नाही. त्यांच्या धार्मिक मान्यताही कधी फेटाळून लावल्या नाहीत. एखादे सरकार तुम्हाला जर तुमच्या धर्मातील रीतिरिवाजानुसार वर्तन करण्याची अनुमती देत आहे, तर मग त्या सरकारच्या विरुद्ध आवाज उठविण्याचे कारण काय? जे सरकार तुम्हाला धर्माचरणाचे संपूर्ण स्वातंत्र्य देते त्या सरकारविरुद्ध लढाई लढणे इस्लामला खरे तर मान्य नाही. इस्लाममध्ये ही बाब निषिद्ध मानली जाते.
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता असताना भारताच्या जवानांवर दगडफेक होत नाही, असे मानले जाते. बहुतांशी ते खरेही आहे. पण, नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता जाताच तिथे दगडही फेकले जातात, हिंसाचारही वाढतो, भारताविरुद्ध जनमानस पेटून उठते, हे कसे काय? सत्ता गमावलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तर फुटीरवाद्यांना चिथावणी देत नाहीत ना? तेच तर त्यांना आर्थिक रसद पुरवत नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्ने उपस्थित होतात. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर जे संस्कार झाले आहेत, त्या संस्कारांमुळेही कदाचित त्यांची नॅशनल कॉन्फरन्स फुटीरतावाद्यांना चिथावणी देत असेल. त्यांचे वडील शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी जे संस्कार दिले, ते लक्षात ठेवूनच फारूक यांची वाटचाल सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी कुपवाडात झालेल्या चकमकीचा मुसलमानांना बदनाम करण्याशी काय संबंध आहे? काहीच नाही. सीमेपलीकडून पाकिस्तानप्रशिक्षित अतिरेकी काश्मिरात घुसतात, आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात, त्यात आमचे शूर जवान शहीद होतात अन् हे अतिरेकीही मरतात. आता चकमक करणारे आणि मरणारे अतिरेकी हे मुसलमान आहेत, हा काय सुरक्षा दलाचा दोष आहे का? त्या चकमकीची चर्चा करणार्यां चा दोष आहे का? अजीबात नाही. मग, फारूक अब्दुल्ला यांनी चकमकीच्या चर्चेचा संबंध मुसलमानांच्या बदनामीशी जोडण्याचे कारण काय? कारण आहे त्यांचे अतिशय संकुचित, घाणेरडे, जातीयवादी राजकारण.
काश्मीरखोर्या त आज जेवढे नेते आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत, ते सगळे या आंदोलनाला ‘इस्लामिक’ असे संबोधत आहेत. पण, खरे पाहता या आंदोलनाचा इस्लामशी काहीएक संबंध नाही. गनिमी कावा आणि कटकारस्थान करून लढाई लढणेही इस्लामच्या तत्त्वात बसत नाही. असे असतानाही काश्मिरातील नेते गनिमी काव्याने आणि कटकारस्थान करून भारतीय लष्करासोबत लढताना दिसतात. ही बाब इस्लामच्या विरुद्ध आहे, असे इस्लामला मानणारे अनेक विद्वान सांगतात. आज काश्मिरी तरुणांना भारतीय लष्कराविरुद्ध चिथावण्यात आले आहे. हे तरुण दगड फेकून स्वत:चा जीव धोक्यात घालताहेत. मात्र, यांच्या जिवावर काश्मिरी नेते आपल्या पोळ्या शेकून मजा मारत आहेत. काश्मिरात अशांतता, अस्थिरता असल्याने मुलं शाळेत जात नाहीत, तरुण कॉलेजात जात नाहीत, त्यांचे शिक्षण अर्धवट होत आहे. दुसरीकडे मात्र चिथावणी देणार्याल फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांची मुले उच्चशिक्षित होऊन तिकडेच राहात आहेत अन् रग्गड कमाईही करीत आहेत. फुटीरतावादी सगळे नेते भारत सरकारकडून विविध सोईसवलतीही घेत आहेत अन् भारताविरुद्ध लढाईही पुकारत आहेत. या नेत्यांचे ऐकणे सोडले नाही तर तिथल्या तरुणाईचे भविष्य अंधकारमय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. फुटीरतावादी नेते आपल्याच लोकांचे जीवन बरबाद करीत आहेत, हे तिथल्या लोकांनी ओळखले पाहिजे.
काश्मिरी लोकांनी जरा भूतकाळात डोकावून पाहिले तर त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडेल, दुसरे काही नाही! ज्या अंधार्यां गल्लीला अंतच दिसत नाही अशा गल्लीत फुटीरतावादी नेते काश्मिरी तरुणाईला ढकलत आहेत. फुटीरतावाद्यांमध्येही दोन गट आहेत. एकाला असे वाटते की, काश्मीर स्वतंत्र झाले पाहिजे अन् दुसर्याफला असे वाटते की, पाकिस्तानात विलीन झाले पाहिजे. आज काश्मीरकडे जो पर्याय शिल्लक आहे तो भारत किंवा पाकिस्तान नव्हे, तर यश व अपयश हाच आहे. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर काश्मिरी जनता अपयशी ठरल्याचेच दिसते आहे.
काश्मिरी जनतेच्या कल्याणासाठी भारत सरकारने सर्व प्रकारचे उपाय केलेत, प्रचंड आर्थिक मदत केली, सुरक्षा पुरविली. असे असतानाही तिथली जनता दरिद्री, अस्थिर जीवन जगत आहे, हे दुर्दैवीच होय. आज जगात जेवढे मुसलमान आहेत, त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त प्रगती कुणाची झाली असेल तर ती भारतातल्या मुसलमानांची झाली आहे! भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या देशात प्रत्येकाला आपल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार आचरण करता येते. तसे स्वातंत्र्य आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी देशांचा विचार केला, तर सर्वाधिक श्रीमंत मुसलमान हे भारतात आहेत. ही बाब तमाम मुस्लिमांनी लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करण्यापूर्वी काश्मिरी तरुणांनी हजारदा विचार केला पाहिजे. पाकिस्तान हा भारतासोबतच स्वतंत्र होऊनही दिवाळखोर का आहे, याचा विचार केला तर काश्मिरींना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. अमेरिकेने फेकलेल्या तुकड्यांवर पाकिस्तान आणखी किती दिवस गुजराण करणार आहे? एकाच वेळी स्वतंत्र झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत आज किती अंतर आहे आणि ते का आहे, हेही काश्मिरी नागरिकांनी लक्षात घ्यावे, म्हणजे परिस्थितीचा आणखी चांगला अंदाज त्यांना येईल
शोपियान: अतिरेक्यांशी चकमक; २ जवान शहीद महाराष्ट्रातील एका जवानाचा समावेश. सुमेध गवई (अकोला) असं जवानाचं नाव.
स्वातंत्र्याची किंमत
अनुराधा प्रभुदेसाई |
‘‘मी एकदम मस्त आहे. फक्त माझ्या डोक्याला मोठी जखम झाली आहे, माझा उजवा हात प्लॅस्टरमध्ये आहे. माझ्या पोटावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि माझा डावा पाय मिसिंग आहे, कारण आपल्या शेजारच्या देशातील मित्रांनी बॉर्डरवर पेरून ठेवलेल्या भूसुरुंगावर माझा पाय पडला आणि माझ्या डोळ्यादेखत माझा पाय हवेत उडाला..’’ जोरजोरात हसत कॅप्टन शौर्य म्हणाला, ‘‘बाकी मी फिट आहे मॅम. काळजी नको. पण एक विनंती आहे. माझ्या बडीसाठी प्रार्थना करा. कारण त्याचे दोन्ही डोळे गेले आहेत.’’ कॅप्टन शौर्यच्या या उद्गारातच सैनिकांचं सारं आयुष्यच समोर येतं. आपल्या देशवासीयांसाठी लढणाऱ्या, प्रसंगी आयुष्य वेचणाऱ्या या सैनिकांना आपण जाणून घ्यायला हवं आणि त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याच्या किमतीचं भान आपल्याला आहे का हेही स्वत:ला विचारायला हवं.. भारतीय स्वांतत्र्य दिनाला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने..
कॅलेंडरमधील ती फक्त एक तारीख,
२८ सप्टेंबर, पण प्रोफेसर नय्यर यांच्यासाठी त्याचं खूप महत्त्व होतं. बरोबर ३ वर्षांपूर्वी याच दिवशी मी त्यांना भेटले होते. ‘‘आज अनुज ३९ वर्षांचा झाला असता..’’ त्यांच्या या उद्गाराने कारगिल युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या, महावीर चक्राने सन्मानित झालेल्या अनुजच्या आयुष्यात डोकवायची संधी मिळाली.. पहिल्याच वाक्याने त्यांचे डोळे पाणावलेले दिसले..
‘‘सर, आम्ही ‘लक्ष्य फाऊंडेशन’तर्फे कारगिल युद्धातील वीरांवर पुस्तक तयार करीत आहोत. कॅप्टन अनुजवरही लिहायचं आहे. म्हणून तुम्हाला भेटायला आले.’’ त्यांनी ‘हो’ म्हटलं आणि बोलू लागले, पण प्रोफेसर माझ्याशी नव्हे जणू स्वत:शीच संवाद साधत होते..
‘‘त्याची एन. आय. एफ. डी., बी. आय. टी. एस आणि आणखी तीन शाळांसाठी निवड झाली होती. अतिशय हुशार होता तो, पण त्यानं एन. डी. ए.ला जायचं निश्चित केलं. अगदी लहानपणापासून तो धाडसी आणि बेडर होता. मारामाऱ्या करायचा, खेळात नंबर वन, शूटिंग खूप आवडायचं आणि मुळात तो खूप द्वाड होता. इतका की एकदा त्याच्या शिक्षिकेनं त्याच्या खोडय़ांना वैतागून नोटीस बोर्डवर लिहिलं होतं, ‘आय वॉन्ट अनुज डेड ऑर अलाइव्ह’ मग त्यानं माफी वगैरे मागितली, पण तो हुशारही तितकाच होता म्हणून त्यांचा लाडकाही होता. त्याचे सगळे गुण हे सैनिक बनण्यासाठीच योग्य होते.’’ एक दीर्घ श्वास घेऊन ते भूतकाळाची कवाडं उघडू लागले..
‘‘कॅप्टन विक्रम बात्रा आणि कॅप्टन अनुज हे बडी होते. जानते हो बडी किसे कहते है? ’’
‘‘हा. हा. मानो दो दिल मगर एक जान.’’ मी उत्तरले.
‘‘वाह क्या बात कही! कारगिलमध्ये दोघांचे टेन्ट युद्धभूमीवर बाजू बाजूला होते. दोघेही शेर होते. हातात हात घालून सैन्यात गेले आणि स्वर्गातही! युद्धभूमीवरच त्यांना वीरमरण आलं. तुला माहितीच आहे ना २५ वर्षांच्या कॅप्टन विक्रमला मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ तर २४ वर्षांंच्या अनुजला ‘महावीर चक्र’ने सन्मानीत केलं गेलं ते. और सुनना चाहते हो बडी के बारेमें? कारगिल युद्धभूमी.. असाच एक अनुजचा ‘१७ जाट’चा बडी होता. अनुज आणि त्याचे सैनिक वीरता आणि पुरुषार्थाचा परमोच्च बिंदू गाठत होते. अनुजने वाटेतील तीन बंकर उद्ध्वस्त करून शत्रूला जेरीस आणलं होतं. आता चौथा बंकर. तो उद्ध्वस्त झाला की मोहीम फत्ते! पण अंधारात दडलेला एक बंकर त्यांच्या नजरेतून सुटला.. ते पुढे निघाले. आणि शत्रूने डाव साधला. त्यांना प्रत्युत्तर द्यायला निघालेल्या अनुजच्या छातीत.. बहुतेक शत्रूच्या त्या गोळ्यांवर त्याचे आणि त्याच्या टीमचेच नाव होते. पहाटे ५.३० वाजता हे घडलं. या घटनेनं चवताळून उठलेल्या अनुजच्या त्या बडीनं ६.३० ला शत्रूवर जोरदार हल्ला करून अनुजच्या शहादतचा बदला घेतला. सगळेच शेर तिथे एकत्र आलेले होते..’’ मी मध्ये काही बोलायचा प्रयत्न केला, पण प्रोफेसर त्यांच्याच विश्वात होते..
Friday, 11 August 2017
दुबईका चष्मा, चिनकी चड्डी*मात्र इथल्या पाकप्रेमी व चिनप्रेमी लोकांच्या जीवाची घालमेल संपलेली नाही.अशा मुखपत्रात अग्रलेख लिहून कारत यांनी भूतानच्या भानगडीत भारताने नाक खुपसण्याचे कारण नसल्याचा सल्ला दिलेला आहे.* *उलट चिनशी भारताने निर्विवाद दोस्ती करावी आणि अमेरिकेशी असलेली जवळीक संपवावी; असा कारत यांचा अग्रलेखातील सल्ला आहे.*
Who Will Win the Great China-India Naval War of 2020? As the two giants stare each other down in the Himalayas, the real conflict may erupt at sea. Bottom line: Don’t be taken in by numbers indicating that China would steamroll India in a sea fight. Martial enterprises are seldom that neat.
Enjoy the company of your children. Very touching message. A beautiful post ..........from one mother to another mother
Thursday, 10 August 2017
आझाद मैदानात झालेल्या हिंसक दंगलीला पाच वर्ष पूर्ण झाली. या प्रकरणी चार्जशिटही दाखल झाली पण मुख्य आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरतोय. मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा असं त्याचं नाव आहे. पाच वर्ष झाली तरीही पोलिसांना त्याच्या विरोधात पुरावे सापडत नाही म्हणून त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये. मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा, 11 ऑगस्ट 2012 च्या आझाद मैदान दंगलीतला आरोपी क्रमांक 7. पाच वर्ष होऊन गेली तरीही अद्याप मोकाट आहे. आझाद मैदानातली दंगल हा हल्ला होता पोलिसांवर, हा हल्ला होता माध्यमांवर.-पाच वर्षांपूर्वी ११ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर रझा अकादमीने मुस्लिम मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन करून जो धुडगूस घातला त्याचे नंतर नेमके काय झाले? त्यात जे पोलिस जखमी झाले, ज्या महिला पोलिसांवर हात टाकण्याचे दु:साहस करण्यात आले त्यांचे काय झाले? ज्यांनी हे सर्व केले त्यांना कोणती शिक्षा झाली? दंगलीत भाग घेणारे सर्व पकडले गेले का? त्यांना शिक्षा झाली का? हे आणि असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत…-सोमनाथ देविदास देशमाने
काश्मीरमधील ‘कलमी वावटळ’ कशासाठी? विजय साळुंके
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७०वे कलम आणि या राज्यातील कायम निवासी ठरविण्याचा अधिकार देणारे ३५ ए कलम यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या; तसेच मुस्लिमबहुल असूनही त्याला मिळालेला अल्पसंख्याकाचा दर्जा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या तीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत. दहशतवादी कारवायांवर थोडेफार नियंत्रण आले असताना या तीन मुद्द्यांवर राज्यातील प्रादेशिक पक्षांचा केंद्राशी नवा संघर्ष उभा राहू पाहत आहे. त्यातून भडका उडू शकतो.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी भारतीय उपखंडातील मुस्लिमांविषयी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. मुस्लिम जेथे बहुसंख्य असतात तिथे त्यांना निर्विवाद वर्चस्व हवे असते. मुस्लिमेतरांना त्यांचा न्याय्य वाटा द्यायची त्यांची तयारी नसते. जिथे ते अल्पसंख्य असतात तिथे मात्र त्यांना बहुसंख्याकांच्या बरोबरीने हक्क हवे असतात. अखंड हिंदुस्थानच्या फाळणीतून निर्माण झालेल्या पाकिस्तानात आणि त्यातून फुटून निघालेल्या बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांना मुस्लिम नेत्यांच्या या नीतीचा फटका बसला. जम्मू-काश्मीर राज्यातील काश्मीर खोऱ्यातील बहुसंख्येने (९४ टक्के) असलेल्या मुस्लिमांच्या नेत्यांनी तेच धोरण चालू ठेवले आहे.
राज्यघटनेतील कलम ‘३५ ए’च्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आलेल्या प्रकरणात सत्तारूढ आघाडीच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि त्यांचे राज्यातील प्रतिस्पर्धी डॉ. फारुक अब्दुल्ला या हाडवैऱ्यांनी एकत्र येत केंद्राला आव्हान दिले आहे.‘राज्याचा खास दर्जा काढून घेतला तर इथे कोणी तिरंगा हातात घेणार नाही,’ असे मुख्यमंत्री म्हणाल्या, तर फारुकनी, ‘दडपता येणार नाही असे बंड उभे राहील,’ असा इशारा दिला. अतिशय कठीण परिस्थितीत काश्मीर संस्थान भारतात विलीन झाले. त्यामुळे इतर साडेपाचशे संस्थानांप्रमाणे ते संघराज्यात विरघळून जाण्यास अटकाव करणारी कलम ३७०ची तरतूद करावी लागली. त्याचा फायदा घेत आपली राजकीय जहागीर टिकविण्याचा शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या वारसांचा प्रयत्न राहिला आहे. त्या दिंडीत मुफ्ती महंमद सैद यांची राजकीय वारस मेहबूबा मुफ्तीही सामील आहेत.
भारतात आलेल्या संस्थानांमध्ये जम्मू-काश्मीर हे आकाराने सर्वांत मोठे. त्यातील काश्मीर खोऱ्याचा आकार जेमतेम अकरा टक्के आहे. मात्र, काश्मीर खोऱ्यात मुस्लिम ९४ टक्के असल्याने संपूर्ण राज्यात ते म्हणतील ती पूर्व अशी स्थिती राहिली आहे. घटनासमिती स्थापन झाली तेव्हा संस्थानातील जम्मू आणि लडाख या टापूंची उपेक्षा करून काश्मीर खोऱ्यातील चार जणांना प्रतिनिधित्व देण्याची चूक महागात पडली. जम्मू आणि लडाखचे प्रतिनिधी घटनासमितीत असते, तर या संस्थानांतील मुस्लिम वर्चस्व कायमस्वरूपी टिकविण्याचा शेख अब्दुल्लांचा डाव यशस्वी ठरला नसता.
काश्मीर हे पर्वतांच्या कुशीत वसलेले जगातील सर्वांत मोठे खोरे आहे. तिथे अनेक संस्कृतींचा उगम झाला. काश्मीरचे भारतीय वैचारिक क्षेत्रावर सुमारे दोन हजार वर्षे वर्चस्व राहिले आहे. त्यात मुस्लिम कालखंड जेमतेम सहाशे वर्षांचा आहे. काश्मीरचा राजकीय इतिहास काश्मिरी, बिगरकाश्मिरी राजेशाहींचा राहिला आहे. १५८६ मध्ये अकबराच्या सैन्याने काश्मीर मुघल साम्राज्याला जोडले आणि काश्मिरींचे स्वातंत्र्य गेले. १७५२ मध्ये अफगाण राजा अहमद शाह अब्दाली, १८१९ मध्ये शीख राजा रणजितसिंह व १८४६ मध्ये डोग्रा राजा गुलाबसिंह यांच्याकडे काश्मीर गेले. गुलाबसिंह आणि ब्रिटिशांच्या संमतीने या राज्याचा विस्तार झाला.
भौगोलिकदृष्ट्या काश्मीर खोरे हे मध्य आशियात मोडत असले, तरी धार्मिक व ऐतिहासिक दृष्टीने ते भारतीय उपखंडात आहे. हिंदू-बौद्ध-हिंदू-मुस्लिम असा त्याचा धार्मिक प्रवास झाला. इराणमधून आलेल्या हमदानी या सूफी फकिराने तेथे इस्लाम रुजवला. शेख अब्दुल्लांपासून बहुतेक काश्मिरी राजकीय व विभाजनवादी नेत्यांच्या दोन-चार पिढ्याच इस्लामी आहेत. ब्रिटिशांकडून ७५ लाखांना काश्मीर विकत घेणाऱ्या डोग्रा राजाच्या राजवटीत हिंदू पंडितांचे वर्चस्व राहिले. त्याची प्रतिक्रिया म्हणून शेख अब्दुल्लांनी मुस्लिम कॉन्फरन्स काढली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीपासून प्रेरणा घेत व तसेच जम्मूतील हिंदू प्रजेला राजाविरुद्धच्या संघर्षात ओढून घेण्यासाठी पक्षाचे नाव बदलून नॅशनल कॉन्फरन्स (१९३८) करण्यात आले. मात्र, जम्मूत काँग्रेसच्या प्रभावाने त्या आधीच पंधरा वर्षे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी चळवळ सुरू झाली होती.
जम्मूतील मुस्लिमांना सहभागी करून घेण्यासाठी शेख अब्दुल्लांनी (१९३९) पक्षाचे नेतृत्व आलटून-पालटून काश्मीर खोरे व जम्मूतील नेत्याकडे देण्याची तयारी दाखविली. मात्र, ही युती तुटली. काश्मिरी मुस्लिमांबरोबरच्या संघर्षात जम्मूतील काँग्रेस चळवळीने पाठिंबा दिला नाही. शेख अब्दुल्ला हे ‘मोलाचे रत्न’ नेहरूंनी गळ्यात बांधले होते. जम्मूतील मुस्लिमांना वजन मिळाले असते तर शेख अब्दुल्लांची पुढील मनमानी रोखली गेली असती. खरेतर काश्मीरच्या गेल्या पाचशे वर्षांच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम नव्हे, तर काश्मिरी-बिगर काश्मिरी राजवट असा संघर्ष दिसतो. विलीनीकरणानंतर भारतातील राजकीय वर्चस्व रोखण्यासाठी व तथाकथित काश्मिरी अस्मितेचे अस्तित्व टिकविण्यासाठी ३७० वे कलम आणि १९५४ च्या कलम ‘३५ ए’चा वापर केला जात आहे.
शेख अब्दुल्लांनी आपले वर्चस्व वाढवायला महात्मा गांधी आणि नेहरूंचा वापर केला. मौलाना अब्दुल कलाम आझाद, अब्दुल गफार खान यांच्याशी जवळीक काश्मिरी उपराष्ट्रवाद टिकवून धरण्यात अडथळा ठरली असती. तसेच काश्मिरी मुस्लिमांमध्ये धर्मनिरपेक्षतेचे आकर्षण वाढले असते. हा उपराष्ट्रवाद टिकवण्याची परंपरा अब्दुल्ला घराण्याने पुढे चालू ठेवली. काश्मीर प्रश्नावर ‘काश्मिरियत, जम्हुरियत, इन्सानियत’च्या चौकटीतून तोडगा काढण्याचा वाजपेयींचा भाबडेपणा त्यांच्या वारसांनीही चालू ठेवला आहे. १९९० मध्ये हिंदू पंडितांना हुसकावून लावल्यानंतर ‘काश्मिरियत’ हा राजकीय ‘जुमला’ ठरला आहे. शेख अब्दुल्लांच्या राजवटीपासूनच राज्यातील शिक्षण संस्था व मशिदींनी ‘मुस्लिम राष्ट्रवादा’चा खुंटा मजबूत करण्यात हातभार लावला. नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, हुरियत, दहशतवादी या सर्वांचा ‘अजेंडा’ परस्परपूरक आहे. २००८ मध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या सुविधांसाठी जमीन देण्याच्या मुद्द्यावर अली शाह गिलानी मसारत आलम यांनी उघडपणे, तर आता कलम ‘३५ ए’च्या मुद्द्यावर खोऱ्यातील राजकीय नेते, हुरियत, दहशतवादी यांनी केंद्राला आव्हान दिले. काश्मीर खोऱ्याला मुख्य प्रवाहाशी एकरूप होऊ दिले, तर काश्मीरची मुस्लिम ओळख पुसली जाण्यापेक्षा आपले हितसंबंध, आपले वर्चस्व टिकणार नाही, याची खरी चिंता आहे
Tuesday, 8 August 2017
सुरक्षा यंत्रणांचे लक्षवेधी कार्य
“लष्कर-ए-तोयबा’ चा काश्मीरमधील म्होरक्या अबू दुजाना याला त्याच्या साथीदारासह ठार करून भारतीय लष्कराने अतिरेक्यांविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अस्थिर करण्यासाठी दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या मदतीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्याला भारतीय लष्कराकडून वेळोवेळी ‘करारा’ जबाब देऊन अतिरेक्यांचे म्होरके खतम करण्याचे सूत्र अवलंबिण्यात आले आहे. अगदी सुरुवातीला “लष्कर-ए-तोयबा’ चा कमांडर बुऱ्हाण वाणी त्यानंतर अबू कासीम आणि आता अबू दुजाना याला ठार करून भारतीय लष्कराने “लष्कर-ए-तोयबा’चे कंबरडे मोडले आहे. दुर्देवाची बाब म्हणजे या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या एका विशिष्ट गटाचा पाठिंबा असल्यामुळे अबू दुजाना याला ठार केल्यानंतर पोलीस आणि जवानांवर नागरिकांकडून दगडफेकीचे प्रकार घडले त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पुन्हा तणावग्रस्त बनली आहे. असाच प्रकार बुऱ्हाण वाणी आणि अबू कासीम याच्या हत्येनंतरही झाला होता.
अबू कासीम याच्या हत्येनंतर “लष्कर-ए-तोयबा’ची सूत्रे आपल्या हाती घेणारा अबू दुजाना हा गेल्या सात-आठ वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्यात सक्रिय होता. त्याला जिवंत पकडण्यासाठी दहा लाखाचे इनामही जाहीर करण्यात आले होते. त्याच्या मागावर लष्कराचे जवान होतेच मात्र यापूर्वी सुमारे पाच-सहा वेळेस तो त्यांना गुंगारा देऊन पसार झाला होता. गेल्या मे महिन्यात त्याला पकडण्यासाठी तो लपून बसलेल्या गावाला जवानांनी वेढाही घातला होता मात्र तेथील नागरिकांनी जवानांवर सारखी दगडफेक केल्यामुळे व गोळीबार केल्यास नागरिक मरतील या भीतीने जवानांनी माघार घेतल्यामुळे त्याला पळून जाण्यात यश आले होते. मात्र यावेळी पुलवामा जिल्ह्यातील हाकरीपोरा येथे मंगळवारी झालेल्या चकमकीत अबू दुजाना याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले.
उधमपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेला हल्ला, पंपोर येथे लष्करी जवानांवर झालेला हल्ला तसेच अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर केलेला गोळीबार आदी घटनांमागचा अबू दुजानाहा ‘मास्टरमाईंड’ होता. विशेष म्हणजे अबू दुजाना सतत पाकिस्तानच्या संपर्कात असायचा. त्याला पकडण्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून भारतीय लष्कराने खास मोहीम सुरु केली होती. सुमारे पंधरा दिवसापूर्वी अबू दुजाना बंदेपुरा येथे असल्याची खबर लष्कराला मिळाली होती त्यावेळी तो चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र जाताना त्याचा मोबाईल मोटारीमध्ये राहिल्याने या मोबाईलच्या साहायाने जवानांना त्यांचा ठावठिकाणा माहित झाला आणि हाकरीपोरा येथे मंगळवारी झालेल्या चकमकीत अबू दुजानाचा खात्मा करण्यात आला. अबू दुजाना हा पाकिस्तानी नागरिक असल्याने त्याच्या मृत्यूची पाकिस्तानला लगेच कळविण्यात आली मात्र पाकिस्तानाने नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले असून दुजानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. अबू दुजानाचा पाकिस्तानला परत जाण्याच्या बेतात असतानाच त्याला ठार करण्यात यश आल्याने दहशतवादी गटांना चांगलाच धक्का बसला आहे. अबू दुजाना जहाल अतिरेकी तर होताच पण ‘अय्याशी’ करण्यातही माहीर होता. त्याची हीच सवय त्याला नडली आणि रात्रीच्या वेळी पत्नी बरोबरच प्रेयसीला भेटण्याच्या प्रयत्नांत तो भारतीय लष्कराच्या जाळ्यात सापडला अशी अधिकृत माहिती आहे. अबू दुजाना यांच्यानंतर आता काश्मीर खोऱ्यात आता झकीर मुसा नावाचा एकमेव जहाल दहशतवादी कार्यरत असल्याचे समजते. भारतीय लष्कराचे जवान त्याच्याही मागावर असून लवकरच त्याला पकडण्यात यश येईल व तसे झाल्यास दहशतवादविरोधी मोहिमेला आणखी बळकटी येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून दहशतवाद्यांची सर्व मार्गाने कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास मदत झाली होती. तरीही दहशतवादी संघटनांना ‘बाहेरून’ आर्थिक रसद पुरविली जात होतीच ते लक्षात घेऊन ‘हुरियत कॉन्फरन्स’ सारख्या संघटनांच्या दोन्ही गटांच्या नेत्यांच्या घरांवर ‘एनआयने’ धाडी घालून बेहिशोबी रक्कम मोठ्या प्रमाणावर जप्त केली. ‘हुरियत’चे प्रमुख सईद अली शहा गिलानी यांच्या दृष्टीने तो मोठा धक्का होता. याशिवाय गिलानी यांचे प्रमुख सहकारी मोहम्मद अश्रफ खान यांच्यासह अनेकांना यासंदर्भात स्थानबद्ध करण्यात आले आहे त्यामुळे ‘हुरियत’शी संबधित असणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहे. तरी देखील फारूक अब्दुल्ला सारखे राजकीय नेते आपल्या वक्तव्याने काश्मीरमधील दहशतवादांना खतपाणी घालीत आहेत. काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे हेच त्यामधून प्रकट होते
Subscribe to:
Posts (Atom)