सोशलमिडिया आजच्या युगाचे अगदी हक्काचे ठिकाण आहे. जेथे व्यक्तीला पूर्णपणे व्यक्त होता येते, जेथे सर्जनशीलतेला पूर्णपणे वाव मिळतो, जेथे जगाशी स्वत: ला जोडून घेणे अत्यंत सोपे आहे, तसेच विविध क्रिया-प्रतिक्रियांचे जे माहेर घर आहे. अशा सोशल मिडीयावर आजची तरुणाई मोठ्याप्रमाणात अवलंबून आहे. मात्र यात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब हे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म्स वगळता अन्य मजेशीर आणि उपयुक्त सोशलमिडिया प्लॅटफॉर्म्स आपणास माहिती आहेत का ? त्याबद्दल जाणून घेऊयात.
LinkedIn (लिंक्डइन) – व्यवसायिक सोशल मिडिया म्हणून प्रसिद्ध असलेले लिंक्डइन आज अनेक व्यवसायांसाठी मोठ्याप्रमाणात उपयुक्त ठरत आहे. एकाच व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना जोडणारे हे माध्यम नोकरी शोधण्यासाठी, उत्तम उमेदवार मिळविण्यासाठी, प्रोजेक्ट्स, विविध व्यावसायिक माहितीसाठी वापरले जाते. जवळपास ४०० दशलक्ष युजर्स याचा वापर करतात.
Pinterest (पिनट्रेस्ट) – इमेजेस, जी.आय.एफ. इमेज, लिखाण, आणि व्हिडीओ या तिघांची एकत्रित माहिती व्यावसायिक स्वरूपाकरिता करण्यासाठी पिनट्रेस्ट या सोशल मिडीयाचा उपयोग केला जातो. मनात येणाऱ्या सर्व कल्पनांचं एकत्रित व्यासपीठ म्हणजेच पिनट्रेस्ट होय. यात ब्लॉग, व्हिडीओ, इमेजेसच्या स्वरुपात कल्पनांचा साठा करता येतो. जवळपास २० कोटी युजर्स महिन्याभरात पिनट्रेस्टचा वापर करतात.
Tumblr (टंब्लर) – तुम्हला कमी शब्दात लिहायचे असेल, तसेच SEO, ब्लॉगिंग साईट यांबद्दल अवघड वाटत असेल, तर एकदा थंब्लर जरूर वापरून पहा. मायक्रो ब्लॉगिंग सोशल मिडिया अशी थंब्लरची ओळख आहे. यात सर्व मल्टीमिडियाचा वापर करण्याची मुभा आहे, त्यामुळे अनेक ब्लॉगर थंब्लरकडे आकर्षित होऊ लागले आहेत. २००७ साली सुरु झालेल्या या सोशल मीडियात जवळपास २० कोटी युजर्स नोंदणीकृत आहेत.
Quora (कोरा) – प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मानवी जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाबाबत चर्चा करण्याचे व्यासपीठ म्हणजेच कोरा होय. एखाद्या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर मिळविण्याचे कोरा हे मोठे मध्यम बनले आहे. साधारणत: उच्च शिक्षितांचे चर्चेचे ठिकाण म्हणून कोराकडे बघितले जाते. एका माजी फेसबुक कर्मचाऱ्यांद्वारे हे सुरु केले गेलेले हे मध्यम आज मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवत आहे.
Vine (वाईन) – ४० कोटी युजर्स असलेले वाईन, व्हिडीओ शेअरिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध सोशल मिडिया म्हणून नावलौकिक मिळवत आहे. लहान-लहान व्हिडीओद्वारे यात युजर्स आपली सर्जनशीलता प्रकट करत असतात. हे युट्युबसारखे सोशल मिडिया असले तरी देखील यात व्हिडीओची वेळ हा वेगळेपणा आहे. अधिकतम व्यावसायिक वापरासाठी वाईनचा उपयोग केला जातो.
Flickr (फ्लिकर) – फोटो शेअरिंग साईट म्हणून सुप्रसिद्ध असलेले फ्लिकर आज जगभरातील फोटोचे मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे. साधारणत: याचा ड्राईव्ह म्हणून वापर केला जातो. जेथे सर्व फोटो साठवता येतात. एम्बेडकरण्याची सुविधा असल्यामुळे एकत्रितपणे ही सर्व छायाचित्रे वेबसाईट, मोबाईल अॅप अशा ठिकाणी फ्लिकरद्वारे दाखवता येऊ शकतात. १० कोटीपेक्षा अधिका युजर असलेले फ्लिकर ६० पेक्षा अधिक देशांत प्रभावीपणे वापरले जाते.
या शिवाय देखील अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म जगभरात विविध कारणांसाठी वापरली जातात. भारतात त्यापैकी काहीच प्रसिद्ध आहेत. मात्र आपण सर्व वरील सोशल माध्यमे एकदा नक्कीच वापरून बघाल अशी अशा करतो
No comments:
Post a Comment