Total Pageviews

Saturday, 26 May 2018

सावरकरांचे सैनिकीकरण May 25, 2018 प्रा. संजय सदाशिव वैशंपायन



सावरकरांचे सैनिकीकरण हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी होतेपरंतु खंडित हिंदुस्थानचे स्वातंत्र्यनेताजींसह कोणत्याच क्रांतिकारकाच्या स्वप्नात नव्हतेयाचाच अर्थ सैनिकीकरण अखंड हिंदुस्थानच्यास्वातंत्र्यासाठीच होतेम्हणजेच सैनिकीकरणाला विरोध हा अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विरोधहोताविभाजन स्वीकारणे किंवा  स्वीकारणे हा नंतरचा प्रश्न होता१९३९ साली ब्रिटिश भारतीय सेनेतशेकडा ३५ स्वधर्मीय आणि शेकडा ६५ विधर्मीय होतेहिंदूंच्या सैनिकीकरणामुळे ही प्रमाणे उलटी झालीआणि सावरकरांच्या दूरदृष्टीची प्रचीती आली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाहीर केले होते की, हिंदुस्थानच्या रक्षणासाठी आणि भविष्यकाळात स्वराज्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जे अत्यंत उपयुक्त व व्यवहारी साधन ठरणारे आहे ते सैनिकीकरणच होय. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापासून राजकारण सैन्याबाहेर ठेवण्याचे ब्रिटिश सरकारचे धोरण आहे. याउलट सैन्यात राजकारण घुसविण्याचे आपले धोरण असले पाहिजे. हे केल्याशिवाय आपण स्वातंत्र्याची लढाई जिंकू शकणार नाही. ब्रिटिश सैन्यातील हे शस्त्र्ाधारी सैनिक आज आपल्याला परकीय सरकारचे पगारी नोकर आहेत असे वाटत असले तरी योग्य वेळ येताच देशाशी एकनिष्ठ असलेले ते कणखर हिंदू देशभक्त ठरल्याशिवाय राहणार नाहीत. एखादी पिस्तूल किंवा बंदूक जवळ सापडली तर तरुणांना तुरुंगात टाकणारे ब्रिटिश सरकार आज आपण होऊन तुमच्या हाती बंदुका, तोफा नाइलाजाने पण विश्वासाने देत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन सैनिकी शिक्षण घ्या. हजारो तरुणांनी तोफा, बंदुका, विमाने, जहाज बांधणी, दारूगोळा आदी कारखान्यांत शिरून तंत्रज्ञ म्हणून शिक्षण घेतले पाहिजे. हिंदुस्थानातील प्रजेला गुलाम करण्याची मेकॉलेची योजना तेच शिक्षण घेऊन तुम्ही असफल केलीच ना? मग तुमच्या हिताच्या दृष्टीने याचा लाभ घ्या. तुमचे शत्रू कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला सांगतो की, बंदुका हातात घ्या आणि संधी येताच त्यांचा स्वातंत्र्यासाठी उपयोग करा. सैन्यात शिरताना सरकारला काही करार लिहून द्यावा लागला तर द्या. कराराची मागची बाजू कोरी असते. वेळ येताच तेथे तुम्ही तुम्हाला हवे तसे करार लिहा, असे सावरकर म्हणत.
नेताजी सुभाषबाबूंचादेखील सुरुवातीला सावरकरांच्या सैनिकीकरणाला विरोध होता, कारण ब्रिटिश सरकारची चाकरी करून ब्रिटिश अधिक बळकट होतील असे त्यांना वाटत होते. साम्राज्यशाहीच्या रक्षणासाठी याचा उपयोग होईल असे काँगेसला वाटत होते. पण सैनिकीकरणाचा अर्थ सुभाषबाबूंना २२ जून १९४० या दिवशी त्यांनी जेव्हा आपणहून अकस्मात सावरकर सदनात सावरकरांची भेट घेतली तेव्हा उलगडला. तुम्ही हॉलवेलचे पुतळे उखडून टाकून बंदीगृहात जाऊन सडत पडाल आणि पुतळे हलले म्हणजे इंग्रज हलले असे नव्हे. तुम्ही बंदिवासात पडणे म्हणजे शत्रूला हवे ते आपणहून करणे नव्हे काय? क्रांतिकारकांशी सक्रिय संबंध नसला तरी तुम्ही संबंध राखीत आहात तेव्हा गुप्तता राखू शकता. मला रासबिहारी बोस यांचे जपानमधून आलेले पत्र आपण पाहावे. जपान अजून १ वर्षाच्या आत युद्धात पडेल अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे; परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यासारखेच तुम्हीही ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटून जावे आणि जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांचे पुढारीपण स्वीकारावे. स्वातंत्र्याची प्रकट घोषणा करावी आणि बंगालच्या उपसागरातून किंवा ब्रह्मदेशातून जपान युद्धात पडताच साधेल त्या मार्गाने हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर बाहेरून स्वारी करावी. मला जी २-३ समर्थ माणसे दिसतात त्यातही माझा डोळा तुमच्यावर आहे, असे सावरकरांनी त्यांना सांगितले.
सावरकरांची कोणी कितीही निर्भर्त्सना करो इतर कोणापेक्षाही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस हे सावरकरांबद्दल काय म्हणतात हे सर्वात महत्त्वाचे आहे. आझाद हिंद रेडिओच्या सिंगापूर केंद्रावरून सुभाषचंद्र बोस काय म्हणाले होते ते पाहा
हिंदुस्थानातील काही अदूरदर्शी नेते माझ्या कार्यालयाला विरोध करतात; परंतु वीर सावरकरांसारखा एकमेव दूरदर्शी नेता उघडपणे तरुणांना सैन्यात शिरावे असे उत्तेजन देत आहे. सावरकरांपासून स्फूर्ती घेऊन सैन्यात दाखल झालेल्या या हिंदी तरुणांतून आमच्या हिंदी स्वातंत्र्यसेनेला (आझाद हिंद सेनेला) समरकलेत प्रवीण आणि मुरलेल्या, प्रशिक्षित तसेच ताजा दमाच्या सैनिकांचा पुरवठा होत आहे. संदर्भ हिंदुहृदयसम्राट भगवान सावरकर (हिं.भ.सा. पृष्ठ ११६ रा.स. भट.)
तसेच आझाद हिंदच्या टोकियो आकाशवाणी केंद्रावरून हिंदू महासभेच्या जपान शाखेचे अध्यक्ष आणि अभिनव हिंदुस्थानचे सदस्य रासबिहारी बोस म्हणाले, ‘‘सावरकरजी, आकाशवाणीवरून तुम्हाला अभिवादन करण्यात मला माझ्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याचा (अभिनव भारताचे अध्यक्ष सावरकर होते) सन्मान केल्याचा आनंद लाभत आहे. तुम्हाला वंदन म्हणजे प्रत्यक्ष त्यागमूर्तीलाच वंदन करणे होय. तुमच्या अनिर्बंध सुटकेमागे  काहीतरी परमेश्वरी योजना असावी असे मला वाटते. शत्रूच्या परराष्ट्रीय राजकारणावर देशाचे राजकारण अवलंबून ठेवता कामा नये, हा तुमचा प्रचार, तुमचा राजकीय दूरदर्शीपणा आणि अचूक निदान यांचा निदर्शक आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्रया भारतीय राजनीती सूत्रावर आधारलेल्या उपदेशाप्रमाणे इंग्रजांच्या शत्रूशी हातमिळवणी करून आपण स्वातंत्र्ययुद्ध लढले पाहिजे हा तुमचा सिद्धांतच स्वातंत्र्यसिद्धीचा मार्ग आहे खरे आहे.’’ (हिं.भ.सा. पान क्र. ११७).
सावरकरांचे रत्नागिरीतील एक सहकारी देशपांडे हे जपानमध्ये होते आणि त्यांच्या सहीने सावरकरांच्या एका मित्राला लिहिलेली पत्रे व तसाच उलटा पत्रव्यवहार हा खरे तर सावरकर आणि रासबिहारी यांच्यातील पत्रव्यवहार आहे. तेजोगोल या बाळाराव सावरकर यांच्या पुस्तकात ही पत्रे उपलब्ध आहेत. कारण थेट पत्रव्यवहार शक्यच नव्हता.
मे १९४३ पर्यंत नेताजी पूर्वेकडे आलेलेही नव्हते. त्यापूर्वीचा एक प्रसंग सुप्रसिद्ध जपानी लेखक जे.जी. ओहसावा यांनी १९५४ च्या ऑगस्टमध्ये लिहिलेल्या ‘Two great Indians in Japan’ या पुस्तकात आलेला आहे ते म्हणतात
‘‘फेब्रुवारी १९४२ मध्ये सिंगापूरला जपान्यांनी ब्रिटिशांवर चढाई केली; परंतु ब्रिटिश प्रतिकार कडवा होता. इतक्यात आझाद हिंद सेनेचे प्रमुख रासबिहारीजी एकटेच पुढे गेले आणि ब्रिटिश सैन्यातील अधिकारी आणि सैनिकांसमोर मातृभूमीशी अप्रामाणिक होऊ नका अशा आशयाचे कळकळीचे भाषण केले आणि चमत्कार झाला. ५० हजार हिंदी सैनिक आणि कर्नल गिल यांच्यासारखे ३० भारतीय अधिकारी आजाद हिंद सेनेत दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धातील वीर सावरकरांचे सैनिकीकरणाचे प्रयत्न अशा रीतीने यशस्वी होण्यास प्रारंभ झाला. सावरकरांच्या आंदोलनाची ती एक पावतीच होती.
जे जपान्यांना दिसते ते हिंदुस्थानींना का दिसू नये?
वीर सावरकर म्हणतात – ‘सर्व धर्म एकाच ईश्वराकडे जातात ही भाबडी समजूत आहे. हिंदुस्थानबाहेरून या देशात आलेले धर्म देशद्रोहाकडेच जातात आणि या देशाचे तुकडेच पाडतात.१९३९ साली ब्रिटिश भारतीय सेनेत शेकडा ३५ स्वधर्मीय आणि शेकडा ६५ विधर्मीय होते. हिंदूंच्या सैनिकीकरणामुळे ही प्रमाणे उलटी झाली आणि सावरकरांच्या विधानाची प्रचीती आली. १९४७ मध्ये सैन्यात असलेले ३५ टक्के विधर्मीय पाकिस्तानात गेले आणि ६५ टक्के स्वधर्मीय देशाच्या रक्षणासाठी उरले. असे न होते तर आपण हिंदू म्हणून अस्तित्वाच नसतो. हे प्रमाण शेकडा २० पर्यंत खाली उतरू शकले असते. (अर्थात विधर्मीय ८०) आपल्याकडे असलेल्या ६५ टक्के सैन्यबळावरच कश्मीर, हैदराबाद वगैरे समस्यांचे निराकरण होऊन ही संस्थाने हिंदुस्थानात विलीन होऊ शकली. दूरदर्शीपणा म्हणतात तो हाच. सैन्यात राजकारण घुसविण्याचा सावरकरांच्या योजनेचा साक्षात्कार पं. नेहरूंना झाला. पाच वर्षांत सैन्य दोन लाखांनी वाढल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सावरकरांचे सैनिकीकरण हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी होते; परंतु खंडित हिंदुस्थानचे स्वातंत्र्य नेताजींसह कोणत्याच क्रांतिकारकाच्या स्वप्नात नव्हते. याचाच अर्थ सैनिकीकरण अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीच होते. म्हणजेच सैनिकीकरणाला विरोध हा अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विरोध होता. विभाजन स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हा नंतरचा प्रश्न होता


No comments:

Post a Comment