Total Pageviews

Tuesday 8 May 2018

ज्वलज्ज्वलनतेजस छ. संभाजी महाराज -डॉ. सदाशिव स. शिवदे, इतिहास अभ्यासक




इ.स. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले आणि या श्रींच्या राज्याचे संभाजीराजे छत्रपती झाले. एका बाजूला औरंगजेब आणि दुसर्‍या बाजूला सिद्धी व पोर्तुगीज यांचे आव्हान  महाराजांनी पेलले. कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअलीखान, रणमस्तखान, बहादूरखान यांच्याशी महाराजांनी दिलेला सामना हे संभाजीराजांच्या बाणेदारपणाचे एक विराट दर्शन होते. शिवछत्रपतींनी निर्माण केलेला गनिमी कावा महाराजांनी नित्य वापरल्याचे दिसते. शत्रूला जर्जर करुन सदैव अस्वस्थ करून सोडणे हे तंत्र संभाजीराजांच्या सर्व युद्धमोहिमांत दिसून येते. साधनांची कमतरता असताना देखील युद्धभूमीतून काढता पाय न घेता सदैव आपली युद्धसंमुख वृत्ती संभाजी राजांनी अखंड तेवत ठेवली.




वंग इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की, राष्ट्रनिर्माता होणे, याहून श्रेष्ठतम भाग्य मानवास प्राप्त होणार नाही. ते शिवछत्रपतींना लाभले. शिवाजीराजे झाले नसते, तर मराठा माणसाच्या जीवनाला तेथल्या प्रवाहात वाहत वाहात जावे लागले असते. किंबहुना हिंदुस्थानच्या इतिहासाला एक वेगळे स्वरुप प्राप्त झाले असते. डहर्ळींरक्षळ ुरी पेीं ेपश्रू ींहश ारज्ञशी ेष ींहश ारीरींहर परींळेप र्लीीं रश्रीे ींहश सीशरींशीीं लेर्पीीीींलींर्ळींश सशपळेपी ेष ाशवळर्शींरश्र ळपवळर (मध्ययुगीन भारतातील विधायक दृष्टिकोन निर्माण करणारा, उच्च कोटीचा तो मानव होता, तो फक्त मराठा राज्य निर्माण करणारा नव्हता.)

छ. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त केले आणि आनंदवनभुवन निर्माण करुन सगळीकडे मोठा संतोष मांडला. या महामानवाने आपण निर्माण केलेल्या राज्याची चोख व्यवस्था करुन रयतेच्या हिताच्या दृष्टीने गावसत्तेपासून राजसत्तेपर्यंत एक स्वतंत्र आखीवरेखीव प्रशासन निर्माण केले आणि महाराष्ट्राला एका संपन्न नैतिक पायावर उभे केले. इ.स. 1680 मध्ये महाराजांचे महानिर्वाण झाले आणि या श्रींच्या राज्याचे संभाजीराजे छत्रपती झाले. त्याच वेळी शके 1602 रौद्रनाम संवत्सर (इ.स. 1680 मध्ये) गागाभट्टांनी समयनयहा ग्रंथ लिहिला आणि तो संभाजीराजांना अर्पण केला. संभाजीराजांच्या शौर्यादी गुणसंपदेस ओळखून गागाभट्टांनी संभाजीराजे आपल्या पराक्रमाने दाही दिशा उजळून टाकतील अशी अपेक्षा केली. ते म्हणतात-

सिंहासनच्छत्रेश्वराधिराजाधिराजैकशरण्यभूत:।

शम्भुुुस्वयंभु: प्रभुरस्तुतुष्ट: स्फुरत्पप्रतापोज्वलदिग्विभाग: ॥2

सिंहासने आणि छत्रे धारण करणारा, ज्येष्ठ राजे आणि सम्राट यांचे एकमेव आश्रयस्थान असलेला, ज्याच्या तळपणार्‍या पराक्रमाने दिशा उजळून गेल्या आहेत, असा स्वयंभू राजा संभाजी संतुष्ट होवो.वरील गोष्टीचा प्रत्यय संभाजीराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या झंझावाती कारकिर्दीत दाखवून दिला. राजसत्ता हातात आल्यानंतर त्यांनी फेबु्रवारी 1681 मध्ये बुर्‍हाणपूरची मोहीम हाती घेतली. शहाजादा अकबराने म्हटल्याप्रमाणे, विश्वसुंदरीच्या गालावरील तीळच अशा गजान्तलक्ष्मीचे माहेरघर असलेल्या बुर्‍हाणपूर नगराची दुर्दशा करुन प्रचंड लूट रायगडावर आणली; आणि त्यानंतर औरंगजेबाला स्वत: आपल्या नामांकित सरदारांसह आणि आपल्या मुला-नातवांसह कोटींचा खजिना बरोबर घेऊन महाराष्ट्रात पाऊल टाकावे लागले. संभाजीराजांपुढे हे एक फार मोठे आव्हान होते. या आव्हानापुढे सहस्त्रार्जुनाप्रमाणे महाराज उभे राहिले. आणखी दोन स्वराज्य आणि महाराष्ट्र संस्कृतीस पोखरणारे शत्रू आजूबाजूला होतेच. त्यांच्या कारवायांना प्रतिबंध घालणे गरजेचे होते. पोर्तुगीज आणि सिद्दी हे ते दोन शत्रू. पोर्तुगिजांनी गोव्यात चालविलेला धर्मांतराचा धुमाकूळ आणि सिद्दीने कोकण किनार्‍यावर चालविलेली आर्थिक आणि सांस्कृतिक लूटमार या गोष्टी महाराजांना खचितच बेचैन करीत होत्या.

औरंगजेबाने महाराष्ट्रात पाऊल टाकल्यानंतर रामसेजवर आपले नामांकित सेनापती पाठविले. अतिशय अल्प अशा शिबंदीशी टक्कर देण्यासाठी 6 वर्षे मोगली सैन्यास रामसेजवर खिळू राहावे लागले. या मोहिमेतील रामसेजच्या अनामिक किल्लेदाराचे कर्तृत्व निर्विवाद होतेच; पण त्यामागे खंबीरपणे उभे राहणार्‍या महाराजांचे महानेतृत्व हे भव्यदिव्य असेच होते.

गोव्याच्या पोर्तुगिजांवर केलेल्या मोहिमेबद्दल म.म. दत्तो वामन पोतदार यांच्याच शब्दांत सांगावयाचे झाल्यास ते संभाजीराजांच्या पराक्रमाचे शिखर आहे. मस्तवाल कोंद-दि-आल्व्हर या गव्हर्नरला आपला राजदंड टाकून स्वत:च्या जीवाच्या रक्षणासाठी करुणा भाकावी लागावी आणि आपली राजधानी हलविण्याचा विचार यावा ही गोष्ट खचितच संभाजीराजांच्या शौर्याचे, युद्धनीतीचे दर्शन घडविते. म्हणून गोव्यातील लोक या स्वारीस व्हडलेराजीकम्हणजेच मोठी स्वारीअसे म्हणतात. गोव्यात पोर्तुगिजांची त्रेधातारांबळ झाली, फार मोठी नामुश्की त्यांना पत्कारावी लागली, ही गोष्ट पोर्तुगालच्या इतिहासात नोंदविली गेली. ही गोष्ट महाराष्ट्रीयांचे शिर उंचावणारी खचितच ठरली. या सार्‍याचे श्रेय जाते छत्रपती संभाजीराजांकडे!

जंजिर्‍याच्या माहिमेत संभाजीराजांनी जंजिर्‍याचा दरवाजा ठोठावण्यासाठी समुद्रात सेतू बांधण्याची जी अफलातून कल्पना राबविली, तिच्यातून संभाजीराजांच्या मनात कोरलेल्या रामायणाचा पाठ आणि त्यांची प्रचंड इच्छाशक्ती लक्षात आल्यावाचून राहात नाही. या मोहिमेच्या फलिताचा विचार केला तर हे लक्षात येते की, जंजिरा किल्ला जिंकता आला नाही, तरी सिद्द्यांच्या नीच प्रवृत्तीवर मात्र विजय मिळविता आला. सिद्दद्यांनी संभाजीराजांची मोठी धास्ती घेतली अणि पश्चिम किनार्‍यावरील सिद्द्यांच्या नीच करावाया थांबल्या.

या सर्व गोष्टींना समर्थपणे तोंड देत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हैदोस घालणार्‍या मोगली सैन्याशी संभाजीराजांचे सैन्य चिवटपणे लढत होते. औरंगजेब दरबाराच्या अखबारांचा आढावा घेतला असता मोगली सैन्याचा स्वैर संचार आणि मराठी सैन्याचा त्यांच्याशी होणारा सामना या गोष्टी पदोपदी वाचण्यास मिळतात. कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअलीखान, रणमस्तखान, बहादूरखान यांच्याशी महाराजांनी दिलेला सामना हे संभाजीराजांच्या बाणेदारपणाचे एक विराट दर्शन होते. मल्हार रामराव चिटणीस म्हणतात, ‘रणमस्तान कल्याण प्रांती येऊन उपद्रव केला. हे वर्तमान महाराजांस कळल्यावर रायगडाहून निघोन फौजेसुद्धा कल्याणास गेले. रणमस्तान यांसी युद्ध देऊन रसबंदी (करुन) आणि काही मारुन जेर केेले असता याकुदखान जंजिर्‍याहून कुमकेस गेले. त्यांनी जहाजातून उतरुन मधी मोरचे देऊन रणमस्ताखान यास रसद पोचविणे वगैरे पुरावा केला. तोें घाटावर रोहिलाखान होते. त्यास कळल्यावर तेहि कुमकेस येऊन रणमस्तखान यास निभावून घेऊन घाट चढून गेले. महाराज माघारे रायगडास आले.

शहाजादा मुअज्जम याची रामघाटास झालेली फरफट ही औरंगजेबास एक अत्यंत लांच्छनास्पद अशी बाब ठरली. इ.स. 1684 पर्यंत संभाजीराजांची समशेर चौफेर तळपत होती. औरंगजेबास कोठेही निर्विवाद यश मिळत नव्हते. त्याने आपल्या डोक्यावरील किमॉश वैतागून जमिनीवर टाकला आणि संभाजीला जिवंत पकडल्याशिवाय किंवा ठार मारल्याशिवाय तो धारण करणार नाही अशी प्रतिज्ञा केली. येथेच संभाजीराजांच्या औरंगी सेनेस दिलेल्या प्रचंड प्रहाराचे दर्शन घडते.

औरंगजेबाचे विशाल आक्रमण पेलून धरुन एका बाजूने भागानगरचा कुतुबशहा आणि दुसर्‍या बाजूने विजापूरचा आदिलशहा यांना उठविणे आणि रामसिंग कछवा आणि आपल्या आश्रयास आलेल्या औरंगजेबाचा शहाजादा अकबर यांच्या माध्यमातून दिल्लीला धडक देणे ही रणनीती अत्युच्च दर्जाची होतीच आणि त्यापेक्षा संभाजीराजांच्या स्वसामर्थ्यावरील विश्वासाची द्योतक होती. तसेच आपल्या वडिलांची दिल्लीन्द्र पदलिप्सव:ही जिद्द पुरी करणारी होती. यासाठी त्यांनी रामसिंगास लिहिलेले संस्कृत पत्र हा एक भक्कम पुरावा आहे. संभाजीराजांचे शौर्य, धैर्य, साहस हे त्याला साजेसेच होते.

नऊ वर्षे रणभूमीवर आपले धैर्य, जिद्द आणि ताकद सतत पणाला लावून संभाजीराजांनी अखेरीस या रणचंडीस आपला देह अर्पण केला. त्यांची अखेरची झुंज होती ती कळी काळाशी. एका दुर्दैवी क्षणी कैद झाल्यावर ज्या बाणेदारपणाने समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूला तोेंड दिले, ते पाहिल्यावर त्यांच्यातील जळजळती जिद्द किती अभेद्य होती, अपूर्व होती, अतुलनीय होती, हे इतिहास असाच प्रकर्षाने नोंद करीत राहिल.

अनुपुराणकार म्हणतो,

सर्वेऽपि प्रथिता: प्रतापभरिता: प्रौढाहवाडम्बरा: ।

प्रारब्धप्रचुरात्सवं हरहरेत्याभाषमाणा भटा:।

सानन्दं सकुतूहलं बव महामन्त्रोन्नता मन्त्रिण:।

शम्भोश्छत्रपते: सहैव सकलाश्चकु: परं विस्मयम्॥145

अर्थ ः मोठमोठ्या युद्धामध्ये आपल्या शौर्याने प्रसिद्ध झालेले सैनिक युद्धोत्सव चालू झाल्यावर हर-हर अशी घोषणा करु लागले. छत्रपती शंभूराजे आणि त्यांना उत्तम सल्ला देणारे मंत्री हे सगळेच विस्मयचकित झाले.

शिवछत्रपतींनी निर्माण केलेला गनिमी कावा महाराजांनी नित्य वापरल्याचे दिसते आणि त्यामुळे शत्रूला जर्जर करुन सदैव अस्वस्थ करून सोडणे हे तंत्र संभाजीराजांच्या सर्व युद्धमोहिमांत दिसून येते. साधनांची कमतरता असताना देखील युद्धभूमीतून काढता पाय न घेता सदैव आपली युद्धसंमुख वृत्ती संभाजी राजांनी अखंड तेवत ठेवली. 31 मार्च 1686 च्या इंग्लंडच्या राजाच्या मुंबई आणि सुरत येथील वखारीच्या अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रांस संभाजीराजा हा युद्धसंमुख राजा आहे, त्याच्याशी काळजीपूर्वक वागा, त्यास मदत करा असे लिहिले आहे.

छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानानंतर मराठी राज्य ज्या प्रकारे खंबीरपणे उभे राहिले, त्यासंबंधीच्या इतिहासाची पाने वाचताना हे लक्षात येते की, संभाजीराजांचे काळाची मती कुंठित करणारे हौतात्म्य आणि त्यानंतर निर्माण झालेल्या शूर सेनानींची झुंजार रणवृत्ती, हिंदू पदपादशाहीचा अभिमान आणि हे श्रींचे राज्य निर्माण करणार्‍या श्रीमंत योगी शिवछत्रपतीवरील अढळ श्रद्धा या सार्‍या गोष्टींचा उद्रेक झाला आणि प्रचंड राष्ट्रयि शक्ती निर्माण झाली.

छत्रपती संभाजीराजांची नऊ वर्षांची कारकीर्द आणि तिची सांगता त्यांच्या आत्मबलिदानाने झाल्यामुळे जदुनाथ सरकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना स्वराज्यनिर्मितीचे भाग्य लाभलेला मोठा राजा असे म्हटले आहे. छ. संभाजीराजांबद्दल असे म्हणावेसे वाटते, स्वराज्याचे रक्षण करता करता स्वत:च्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य छ.संभाजी महाराजांना लाभले. ज्यांनी शिवछत्रपतींना आणि संभाजीराजांना प्रयोगरुप रामायण ऐकविले, त्या केशव पंडितांनी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत राजारामचरितम्हा ग्रंथ लिहिला. राजाराम महाराजांचे वर्णन करताना राजाराम महाराजांचे बंधू संभाजीराजे यांचे वर्णन अशा एका ताकदीच्या शब्दातून केले आहे. तो शब्द म्हणजे संभाजीराजांच्या चरित्राचे सारच होय-

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महिभृताम्।

श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा॥5

संभाजीकेन च भ्राता ज्वलज्ज्वलनतेजसा

विलुंठितेषु सर्र्वेषु पौरजानपदेषुच॥6

याचा अर्थ असा की - सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महीपालांचा पाडाव  करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती आणि ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी यांच्या विरहित असलेला राजाराम.... यामुळे छ.संभाजीराजांना केशव पंडितांनी दिलेले विशेषण ज्वलज्ज्वलनतेजसहे किती सार्थ आणि योग्य आहे, हे त्यांनी आपल्या पराक्रमाने सिद्ध केले आहे. म्हणून माझी एक कळकळीची इच्छा आहे की, यापुढे प्रत्येक महाराष्ट्रीयाने महाराजांचा उल्लेख करताना ज्वलज्ज्लनतेजस संभाजीराजाअसा करावा ही विनंती आणि म्हणून धारातीर्थी तप आचरणार्‍या राजाच्या बलिदानामुळे हे राज्य सुखी आहे, त्या शूरास त्रिवार वंदन

No comments:

Post a Comment