SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Showing posts with label PATRIOTIC INDIANS. Show all posts
Showing posts with label PATRIOTIC INDIANS. Show all posts
Saturday, 13 August 2022
Friday, 12 August 2022
Saturday, 6 July 2019
ज्ञानदीप उजळविणारा फौजी-महा एमटीबी 05-Jul-2019- तेजस परब
आपले संपूर्ण आयुष्य लष्करात सीमेवर लढून
देशसेवेसाठी अर्पण केल्यानंतर निवृत्तीनंतरही समाजकार्याद्वारे माजी सैनिक कृष्णा
बसवत यांनी त्यांच्या परिसरातील 120 वनवासी मुलांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंध:कार दूर
केला आहे. त्यांच्या कार्यामुळे आठवीनंतर शिक्षणापासून
दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुढे शिकण्यासाठी एक प्रेरणा दिली आहे. निवृत्तीनंतर आपला वेळ समाजकार्यात घालवावा, यासाठी
त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वनवासी पाड्यांवर जाऊन त्यांना शिक्षणाच्या
मूळ प्रवाहात आणले. पालघरच्या डहाणू तालुक्यातील वनई
चंद्रनगर भागात राहणारे कृष्णा बसवत हे 1988 मध्ये
सैन्यात भरती झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी जम्मू-काश्मीर,
रांची, अरुणाचल प्रदेेश, बंगळुरू आदी भागांमध्ये कर्तव्य बजावले होते. या
काळात त्यांनी आपली कौटुंबिक जबाबदारीही व्यवस्थितपणे पार पाडली. त्यांनी याच गावात राहून आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले.
सुट्टीच्या वेळी जेव्हा ते आपल्या गावाकडे येत, त्यावेळी
त्यांना परिसरातील वनवासी पाड्यावरील मुलांची शिक्षणाची समस्या कळली. आठवीनंतर या वनवासीबहुल भागांतील मुले शिक्षणापासून दूर जात असल्याचे
त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, त्यातही
अनेक मुले वीटभट्टी, कारखाने, एमआयडीसी,
शेती आदी कामांमध्ये व्यस्त होत असल्याचेही समजले.
वह्या-पुस्तकांमध्ये रमण्याचा काळ असताना त्या कोवळ्या
हाताना दिवसभर राबावे लागत असल्याची सल बसवत यांच्या मनात कायम होती. त्यांनी याबद्दल काहीतरी करण्याचा निर्धार मनात पक्का केला होता. मात्र, कर्तव्यामुळे या कामाला वेळ देणे शक्य
होत नव्हते. 2008 मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी आपले
सहकारी मधू चौधरी, देवेंद्र सनवार, विजय
घुटे, काशिनाथ जाधव, भास्कर
कोठारी आदी सहकाऱ्यांना सोबत घेतले. बसवत आणि
सहकाऱ्यांचा या वनवासी पाड्यांवर आदर असल्याने पालकांनीही सकारात्मक भूमिका घेतली.
आपले मूल शाळेत गेले तर त्याचा एकवेळचा जेवणाचा खर्चही भागेल,
हे कळल्याने पालकांनीही संमती दिली. अनेक
विद्यार्थ्यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर शिष्यवृत्तीही मिळवण्यास सुरुवात केली.
वही-पेन, दप्तर, गणवेश
आणि अन्य साहित्य मिळू लागल्याने मुलेही पुन्हा शाळेकडे वळली. दरम्यान, पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांनाही शालोपयोगी साहित्याची मदत सुरूच होती. त्याचबरोबर अन्य आवश्यक वस्तूही मिळू लागल्याने विद्यार्थ्यांनीही
अभ्यासात रस दाखवला. वीटभट्टी, शेतमजुरी
यापासून मुले परावृत्त झाली आणि शिकू लागली. आता
वेगळ्या नववी आणि दहावीसाठी वर्गशिक्षक नेमण्यासाठीही शाळा प्रशासनाकडे मागणी केली.
त्यांच्या मागणीची आणि कार्याची दखल घेत, शाळेनेही
दोन शिक्षकांची यावर्षीपासून नेमणूक केली आहे.
या मुलांना एका छताखाली आणत त्यांना शाळेत येण्याची
सवय त्यांनी लावली. बसवत
यांची कन्या कविता हिने बी.एस्सी, बी.एडपर्यंतचे
शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, कोणत्याही परताव्याची
अपेक्षा न करता या मुलांना शिकवण्याचा वसा तिने वडिलांच्या प्रेरणेने घेतला.
बसवत कुटुंबीयांनीही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांच्या
पत्नीसह मुलांनी वडिलांच्या सेवाकार्यात हातभार लावला. वडिलांच्या अनुपस्थितीत
ग्रामस्थांच्या समस्या, त्यांना लागणारी मदत करण्यासाठी बसवत
कुटुंबीयही पुढे येतात. गावातील रुग्णांवर उपचार, त्यांना
दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्वतः कृष्णा बसवत आणि त्यांचे
सहकारी तत्पर असतात. वनवासी भाग असल्याने अनेकदा आजारी पडल्यावर नेमके काय करावे, रुग्णाला
रुग्णालयात दाखल कसे करावे आदी समस्या येथील नागरिकांसमोर आहेत. त्या सोडवण्याचे कामही बसवत करत असतात. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी
साऱ्यांचा विश्वास जिंकलेला आहे.
बसवत आणि सहकाऱ्यांनी आता काही सामाजिक
संस्थांना या मुलांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यापैकीच एक असलेल्या‘स्पंदन फाऊंडेशन’तर्फे ‘एक पेन
एक वही’ योजनाही सुरू केली आहे. या मुलांना आर्थिक हातभार
मिळावा, यासाठी आपापल्या परिने मदत करावी, असे आवाहन ‘स्पंदन फाऊंडेशन’च्या
प्रमोद मोहिते केली असून ‘एक वही, एक
पेन’ या उपक्रमाच्या माहितीसाठी 91-9619037586 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. समाजकार्य करत
असताना त्यांनाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर
शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे खर्चिक होते. बसवत आणि त्यांचे सहकारी
महिन्याकाठी काही रक्कम साठवत असतात. त्यातून हा खर्च भागवण्याची कसरत सुरू असते. अशा तर्हेने अवघे जीवन देशासाठी अर्पण करणाऱ्या या अवलियाला सलाम...
मुंबई महापालिकेवर टिका करणाऱ्या समर्पीत ! बृहमुंबई महानगर पालिकेतील एका अतिशय जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना विनंती. बेजबाबदार नागरिक भावना
मुंबई महापालिकेवर टिका करणाऱ्या समर्पीत !
बृहमुंबई महानगर पालिकेतील एका अतिशय
जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना विनंती. बेजबाबदार
नागरिक भावना
आपण टीव्हीवर बातम्या मध्ये पाहतोय की
मीडियाने महापालिकेच्या अपयश मिळाल्याबद्दल बाऊ केला आहे. *कबूल आहे की अनेक
शहरामध्ये पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून पूर्व नियोजनाचा अभाव होता यात अनेक
महापालिका अपयशी ठरल्यात* . पण, एक सुजाण नागरिकाच्या भावनेतून वैयक्तिक
स्तरावर *तुम्ही* नाही का अपयशी ठरलात ?
*तुम्ही*
खाद्य पदार्थांचे वेष्टन्न, प्लास्टिक प्लेट्स आणि चमचे *ट्रेनच्या
खिडकीतून बाहेर फेकून देता* जे नष्ट होत नाही व रेल्वे ट्रॅकच्या ड्रेनेज मध्ये
अडकून राहते ज्यामुळे ट्रॅकवर पाणी साठते व
ट्रेन बंद होतात.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
तुमचे वापरलेले सॅनिटरी पॅड व प्लास्टिक वस्तू कचरा कुंडीत न टाकता थेट टॉयलेटच्या
ड्रेन मधून फ्लश करून देता ज्यामुळे सिवेज पाईपलाईन ब्लॉक होते.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
तुमच्या गाड्या रस्त्यावर अशा ठिकाणी पार्क करता की जिथून पालिकांच्या ट्रकला
ड्रेनेज सफाई करता येता येत नाही. दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
तुमच्या घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा या मध्ये वर्गीकरण करत नाही व
तुम्ही अथवा तुमचा सफाई कामगार तो कचरा एकत्रितरित्या बेजबाबदारपणे रस्त्यावर
टाकतो व तो कचरा पावसात विखुरला जातो. दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
*तुम्ही*
खरेदीसाठी मार्केटमध्ये जाताना पुनर्वापर करण्यायोग्य कापडी पिशवी नेत नाही
जेणेकरून प्लास्टिक मुक्त समाज निर्माण होईल,
आणि भाजीवाल्यासोबत आणखी एका कॅरीबॅग
साठी वाद घालता.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
घरातून बाहेर पडताना पुनर्वापर करण्यायोग्य
पाण्याची बाटली सोबत न नेता प्रत्येक वेळी जेव्हा मिनरल वॉटरची बाटली खरेदी करता
तेव्हा प्लास्टिक कचरा वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावता.
दोषी कोण ?
*महापालिका
का तुम्ही ?*
महापालिका *घनकचरा ( आरोग्य ) विभागाचे
कामगार सर्व कचरा गोळा करण्याचे काम करतो, तोच नाल्यात ,गटारात उतरतो आणि स्वच्छ
करतो.सार्वजनिक संडास , मलनिःसारण नळीका , मोठे हॉस्पिटल मध्ये आजारी रूग्णांची घाण साफ
करणे,पालिकांचे कामगार हे सतत मोठमोठ्या रोगराईचा
सामना करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य संभाळत असतो, ह्या
कामगाराचे आयुष्य फक्त ४०ते ५०वर्षे असते,*
त्याला घाणीचे काम करताना दारूचा आधार
घ्यावा लागतो.त्याशिवाय घाणीत काम करु शकणार नाही.
सर्वच सुशिक्षित नागरिकांना विचारतो
की, जर साधं कचर्याची गाडी बाजूंनी गेली तरी नाकाचे केस जळतात, *ज्याप्रकारे
सीमेवर असलेल्या सैनिक शत्रूचा शिरकाव आपल्या सीमेत येऊ देत नाही आणि नागरिकांचे
रक्षण करतो त्याच प्रमाणे पालिकेचे कामगार नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करतो.
*घाणीत
रोज मरणारा कामगार दिसत नाही.... त्याला मरताना सर्टिफिकेट मिळते "बेवडा मेला
" हेच त्यांचे "परमवीर चक्र"असते.*
आपणही आत्मपरिक्षण करावे...... उठसुट
महापालिकेवर बोटे दाखवू नये , *आपणं सुध्दा या सुंदर शहराची काळजी घ्यावी...
कारण कचरा निर्माण करून यास जबाबदार आपणच आहोत....*
ही नम्र विनंती.........
बदलाची सुरुवात होते ती
*तुमच्यापासून
सुरवात करा*
*आधी
एक जबाबदार नागरिक बना.*
Subscribe to:
Posts (Atom)