Total Pageviews

Saturday 19 May 2018

पाक-बांगलादेशी हस्तकांच्या दंगलींची दहशत-प्रभाकर पवार-SAMNA



जोगेश्वरीच्या बेहराम बागमध्ये राहणाऱ्या फारुख देवडीवाला व त्याच्या साथीदारांना महाराष्ट्र एटीएसने नुकतीच अटक केली. याआधीही हिंदू नेत्यांची हिटलिस्टघेऊन फिरणाऱ्या व काठमांडू येथून प्रवासी विमानाचे अपहरण करणाऱया अतिरेक्यांना जोगेश्वरीच्या बेहराम बागमधूनच अटक करण्यात आली होती. जोगेश्वरीचा बेहराम बाग हा परिसर पाकिस्तानी अतिरेक्यांचा व हस्तकांचा अड्डा आहे. याच परिसरातून घातपाती कारवाया व दंगली कशा घडवायच्या याचे प्रशिक्षण देण्यासाठी मुस्लिम तरुणांना पाकिस्तानात पाठविले जाते. हे अनेकदा पोलीस तपासात उघड झाले आहे.
मध्यंतरी बांगलादेशींच्या घुसखोरीला महाराष्ट्र एटीएसने चाप लावला होता. एबीटीया बांगलादेशी अतिरेक्यांच्या हस्तकांना अटक करून त्यांच्या कारवायांना लगाम लावला होता. असे असतानाच गेल्या आठवडय़ात पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेसाठी काम करणाऱया जोगेश्वरीच्या बेहराम बागच्या फारूख देवडीवाला, फैजल मिर्झा खान व अल्लारखा अशा तिघांना एटीएसने अटक केली असून त्यांच्या कबुलीजबाबात मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. फारूख हा पन्नास वर्षीय आरोपी मूळचा दाऊद टोळीतील आहे. मुंबईतील अनेक खून खटल्यात सहभागी असलेला हा गुंड १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर दुबईत पळाला होता. परंतु पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचे नाव नसल्याचे त्याला कळल्यानंतर तो पुन्हा मुंबईत आला व आयएसआयसाठी काम करू लागला. अलीकडे इस्लामिक स्टेट (आयएस) लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आदी पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या कारवाया थंडावल्यानंतर (किंबहुना एटीएसने त्यांच्या कारवायांना आळा घातल्यानंतर) आयएसआयने आपले डोके वर काढले आहे. नेहमीप्रमाणे आयएसआयने आघाडीच्या हिंदू नेत्यांना टार्गेट केले आहे. त्यांचा हेतू साध्य होण्याची शक्यता कमी असली तरीही मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांच्या संरक्षणात पोलिसांनी नुकतीच वाढ केली आहे.
दाऊद टोळीही सक्रिय
दाऊद हा आयएसआयचा एजंट आहे. त्या दाऊदच्या व मुंबईसह देशभरातील त्याच्या पिलावळीच्या मदतीने हिंदू नेत्यांना टार्गेट करून पुन्हा एकदा मुंबईसह देशभरात हाहाकार माजविण्याचा आयएसआयचा कट आहे. आयएसआयला हिंदुस्थानात Logistic Support आहे. स्थानिक हस्तकांच्या मदतीनेच आयएसआयने आतापर्यंत शंभरच्या वर बॉम्बस्फोट मालिका मुंबईत घडवून आणल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्यांनी तर २६/११रोजी मुंबईत हाहाकार माजवीत ताज, ओबेरॉय, लियोपोल्ड या हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. छत्रपती शिवाजी टर्मिनसलाही टार्गेट करून सुमारे पावणेदोनशे निरपराध व्यक्तींचे प्राण घेतले. तसाच त्यांचा पुन्हा एकदा प्रयत्न असून त्यासाठी आता आयएसआय मुंबईसह देशभरातील दाऊदच्या गुंडांची मदत घेणार आहे. परंतु महाराष्ट्र एटीएस पाकिस्तानी अतिरेक्यांचे मनसुबे उधळून लावील असे एटीएसकडून सांगितले जाते.
मोठा शस्त्र्ासाठा जप्त
१९९३ नंतर मुंबई शहरात बॉम्बस्फोट मालिका सुरूच होत्या. २००४ व २००५ साली मात्र अतिरेक्यांना मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे २००६ साली मुंबईसह महाराष्ट्रात काही करून बॉम्बस्फोट व त्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगल घडवून अराजक माजविण्याचा लष्कर-ए-तोयबाचा कट होता, परंतु २००६ च्या पहिल्या टप्प्यात तो यशस्वी झाला नाही. मुंबई एटीएसने मिळालेल्या माहितीवरून संभाजीनगर, परभणी, मालेगाव, बीड आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात छापे मारत ४२ किलो आरडीएक्स, १६ एके-५६ रायफल्स, ५० हॅण्डग्रेनेड आदी स्फोटकांसह मोठा शस्त्र्ासाठा हस्तगत केला. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील गगनचुंबी हज कमिटीच्या इमारतीत धाड घालून मौलाना गुलाम याह्या या इसमासह दोन डझन अतिरेक्यांना अटक केली व जानेवारी महिन्यात बॉम्बस्फोट घडवून महाराष्ट्रात जातीय दंगल घडविण्याचा कट एटीएसने उधळून लावला. त्यावेळी पाकिस्तानची वळवळ थांबेल असे वाटले होते, परंतु तसे काही झाले नाही. जानेवारीत मोठा शस्त्र्ासाठा पकडला गेल्यानंतर अतिरेक्यांनी केवळ सहा महिन्यांत (दाऊदच्या स्थानिक गुंडांची मदत घेऊन) बदला घेतला.
पाकिस्तानी व बांगलादेशींची धरपकड
२००६ च्या ११ जुलैचा तो मंगळवार होता. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. चाकरमानी लगबगीने लोकल पकडून घरी परतत असतानाच विरार व बोरिवली लोकलमध्ये ७ ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. कुकरमध्ये ठेवलेल्या आरडीएक्सचा स्फोट होऊन त्यात १८६ रेल्वे प्रवाशांचा बळी गेला. त्यात १० मुस्लिम बांधवही होते. पाकिस्तानी अतिरेक्यांनी ठरविल्याप्रमाणे मुंबईत हाहाकार माजविला. त्यानंतर दोन वर्षांने ताज, ओबेरॉय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून लष्कर-ए-तोयबाने रेल्वे इतकेच पावणेदोनशे बळी घेतले. २६/११ नंतर मुंबईत २०११ साली झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस व दादर येथे अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात २७ जण ठार झाले. त्यानंतर मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात (गेल्या ७ वर्षांत) पाकिस्तानी अतिरेक्यांना एटीएसने केलेल्या धडक कारवाईमुळे यश आलेले नाही. परंतु अलीकडे बांगलादेशी अतिरेकी व दाऊदच्या हस्तकांची धरपकड पहाता मुंबईत पुन्हा एकदा एक जोरदार धमाका करण्याचा पाकिस्तानचा डाव असून सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. बॉम्बस्फोट घडविण्यात आले नाहीत तर जातीय दंगल घडविण्याचा पाकिस्तानचा कट आहे.
दंगली घडविण्याचे प्रशिक्षण
संभाजीनगरमध्ये गेल्या आठवडय़ात काय झाले? फारुख देवडीवालासारख्या दाऊदच्या हस्तकांनीच संभाजीनगरात दंगल भडकवली आहे हे कसून चौकशी केल्यास उघड होईल. फारुख देवडीवाला याने मुंबईसह महाराष्ट्रात बऱयाच मुस्लिम तरुणांना घातपात घडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात पाठविले आहे. तेथेही हिंदुस्थानात दंगली कशा भडकावयाच्या याचे धडे दिले जातात. त्यामुळे कोलकातासारख्या ठिकाणी खुलेआम जमाव पोलीस ठाण्यावर पेट्रोल ओतत आहे. पोलीस ठाण्यांना आगी लावत आहे. आक्रमक व्हा, पोलीस व हिंदूंवर चाल करून जा, असेच हिंदुस्थानातून पाकिस्तानात घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुस्लिम तरुणांना शिकवले जात आहे. त्यात देवडीवालासारखे हॅण्डलर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तेव्हा संभाजीनगरची दंगल भडकविणारे फारुख देवडीवालासारखे पाक हस्तक कोण आहेत याचा संभाजीनगर पोलिसांनी शोध घ्यावा, नाहीतर भविष्यात गल्लीगल्लीमध्ये जातीय दंगलींचा वणवा पेटेल हे लक्षात ठेवा. जे कश्मीरात सुरू आहे ते उद्या साऱया हिंदुस्थानात सुरू होईल


No comments:

Post a Comment