Total Pageviews

Tuesday, 29 May 2018

प्लास्टिकचा वापर-बंदी नाही, ‘स्मार्ट’ वापर हवा -तन्मय टिल्लू-महा एमटीबी

स्टिकचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात प्रचंड वाढला आहे. साध्या चहाच्या कपापासून ते पाणी पिण्याच्या बाटलीपर्यंत सगळीकडेच प्लास्टिकचा वापर वाढला आहे. तो बंद न करता येण्यासारखा आहे.
यंदाच्या ‘जागतिक पर्यावरण दिना’चे सारथ्य भारताकडे आहे. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख एरिक सोल्हेम हे मुंबई दौऱ्यावर आहेत. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की, “प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत आपण विचार करू शकत नाही. कारण, प्लास्टिकने दैनंदिन जीवन सुसह्य केले आहे. त्यामुळे वापरात असलेले प्लास्टिक कशा पद्धतीने रिसायकल करता येईलयाकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे.” त्यांचे हे विधान खरोखरच विचार करण्यासारखे आहेप्लास्टिक वापरावर आता पूर्णपणे निर्बंध घालणे मुंबईसारख्या शहरात तरी शक्य नाहीचपण मग या प्लास्टिकचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे करता येईलयाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहेप्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात प्रचंड वाढला आहे. साध्या चहाच्या कपापासून ते पाणी पिण्याच्या बाटलीपर्यंत सगळीकडेच प्लास्टिकचा वापर वाढला आहे. तो बंद न करता येण्यासारखा आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सरकारने केला. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी मुंबईच्या किनारी मृतावस्थेत सापडलेल्या देवमाशाचे उदाहरण सरकारने दिले होते. प्लास्टिकमुळे या देवमाशाचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात प्लास्टिक आढळून आल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाल्याचेही सरकारने म्हटले होते. त्यानंतर प्लास्टिक आणि थर्माकोलवर सरसकट बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. उच्च न्यायालयाने प्लास्टिकबंदीला स्थगिती देण्यास नकार दिला. प्लास्टिकच्या बाटल्यांवर प्रक्रिया करण्यासाठी वा अस्तित्वात असलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी उत्पादकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याच आधारे सर्वसामान्यांनाही त्यांच्याकडील प्लास्टिकची पिशवी, बॉटल तसेच थर्माकोलची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
दरम्यान, प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरामुळे पर्यावरण, मानवी तसेच प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणाचे हे नुकसान रोखण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला असला तरी प्लास्टिक पिशवीचा वापर करणारे किराणा माल व्यावसायिकफळभाजी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांचा प्रश्न यामुळे सुटणारा नाही. मुळात मागणी आहे म्हणून विक्री होते, हे सूत्र प्लास्टिक पिशव्यांच्या बाबतीत लागू होते. किराणा माल व्यावसायिक, फळभाजी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून माल खरेदी केल्यानंतर ग्राहकच छोट्यातल्या छोट्या जिन्नसासाठी प्लास्टिक पिशवीची मागणी करतोत्यामुळे परिणामी विक्रेत्यालादेखील प्लास्टिक पिशवी ठेवण्यावाचून पर्याय राहात नाहीत्यामुळे जर प्लास्टिकचा वापर कमी करायचा असेलतर त्याचे दैनंदिन व्यवहारातील महत्त्व कसे कमी करता येईल? त्यासाठी काय पर्याय निवडता येतील? ग्राहकांचे मनपरिवर्तन करून त्यांना प्लास्टिक नको, कापडी पिशवी वापरा, हे सांगता आल्यास आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी ग्राहकांनी केल्यास प्लास्टिकचा वापर आपसूक कमी होईल. पण,प्लास्टिकला पर्याय कापडी किंवा कागदी पिशव्यांचा जरी असला तरी कापडी पिशवी तयार करण्यासाठी येणारा खर्च हा अधिक आहे, तर कागदी पिशवीला वजनाची मर्यादा आहे.
त्यामुळे ‘स्मार्ट’ पर्याय शोधण्यावाचून आता पर्याय नाही. प्लास्टिकला पर्याय प्लास्टिकच, पण संशोधनातून सिद्ध झालेले आणि रिसायकल करता येण्याजोगे असे प्लास्टिक पर्याय नव्याने तयार करण्याची गरज आहेसोन्यातील कचरा ज्या पद्धतीने तापवताना जळून जातो आणि शुद्ध सोनं उरतंत्याप्रमाणे कचरा वगळून उरणारं शुद्ध प्लास्टिक गरजेच्या जागी वापरणे, हा एक पर्याय आहे. या ‘जागतिक पर्यावरण दिना’ला आपण प्रत्येक नागरिकाने केवळ त्या दिवसाचे औचित्य म्हणून नाही तर भीष्मप्रतिज्ञा करत प्लास्टिक वापराबाबत संशोधन आणि त्याच्या पुनर्वापराच्या योग्य पद्धती शोधायला हव्या. प्लास्टिक वापराबाबत छेडलेले हे युद्ध नाही, तर त्याबाबत एक व्यापक दृष्टिकोन ठेवत प्लास्टिकच्या ‘स्मार्ट’ वापरावर लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment