Total Pageviews

Monday 29 July 2013

COMMUNAL RIOTS INDIA

By Sanjeev Nayyar From political discourse and media obsessions, a Martian landing in India would conclude that Gujarat 2002 was possibly the only communal conflagration to happen in independent India. Sometimes, BJP spokespersons, when pushed to the ropes in media interactions, try to inject Delhi 1984. But 2002 is the pre-dominant theme. A related obsession is to show that one man – Narendra Modi – is responsible for it all, when common sense tells us that a communal riot, even when it is organised by one community, happens between two communities. More often than not, rioting and attacks involve the direct or indirect collusion of political parties in provoking attacks, but in the case of 1984, it was Congress party members who led mobs in attacks on the Sikh community in retaliation for the assassination of Indira Gandhi by her body guards. 1984 thus does not fall into the category of communal riots between communities, and was in fact a direct attack by political party cadres on one community. Surely Narendra Modi must answer for 2002, but is he alone? However, now that the 2014 elections will make 2002 relevant again, it is as good a time as any to analyse all the riots India has witnessed since independence, and the 5 March issue of Outlook gives us a good bird’s eye-view on the issue. It shows the Gujarat 2002 communal riots in perspective. Outlook notes that there have been “58 major communal riots in 47 places since 1967. Ten in South India, 12 in East, 16 in West and 20 in North India. Since 1964, Ahmedabad has seen five major riots and Hyderabad four. The 1990s saw the most riots in the last five decades: 23. The 1970s saw seven riots, the 1980s 14; the 2000s have seen 13. Total toll: 12,828 (South 597, West 3,426, East 3,581 and North 5,224). In 1964, a wave of rioting in Calcutta (now Kolkata), Jamshedpur and Rourkela killed 2,500.” Riots with a toll of less than five were excluded; deaths due to communal bomb blasts were also excluded. (Read the full Outlook story here). Now, let us see which party ruled the relevant state during the riots and who was Chief Minister in incidents where more than 100 lives were lost. Table 1: Who ruled the state when more than 100 people died in riots -1967 onwards Table 1 Of the 17 riots mentioned in Table 1, nine took place under Congress/Allies rule, three under President’s Rule, four under other parties and one under BJP rule. President’s rule includes Kanpur and Bhopal, which could be included under BJP rule because party state governments were dismissed in the aftermath of the events of 6 December 1992. Prior to 2002, there were four riots in Ahmedabad with a toll of 912, and three riots in Surat and Vadodara with a toll of 197. One holds no brief for Narendra Modi but most intellectuals have failed to highlight the fact that Gujarat has a history of Hindu-Muslim riots. They also forget that about 30 percent of the 1,267 killed in the post-Godhra violence were from the majority community. But barring Modi, no Chief Minister has ever been demonised for the communal riots that happened during their watch. As the data show, many, many parties and CMs have to be in the dock if Modi has to be held accountable for 2002. A point worth pondering is what happened even before independence. In the aftermath of Gandhi’s efforts at Hindu-Muslim unity during the Khilafat Movement, Babasaheb Ambedkar examined Hindu-Muslim relations between 1920 and 1940 in his book, Thoughts on Pakistan (published 1941). Here are some excerpts from his listing: “1920 – Moplah Rebellion was essentially a rebellion against the British government but Hindus were raped, converted and killed, foul outrages upon women. 1924 – riots at Kohat, where about 155 were killed, Hindus had to evacuate city. 1925-26 – antagonisms between Hindus-Muslims became widespread. Riots in Calcutta, United Provinces and Bombay Presidency. 40 riots took place during the 12 months ending 1/4/1927 resulting in the deaths of 197 and injuries to 1,598. In 1927, the Afridis and Shinwaris were called upon to expel all the Hindus living in the neighborhood of the Khyber Pass. The year 1937 was full of communal disturbances at Panipat, Punjab, Sind to name a few places”. (Read more excerpts from Ambedkar’s book here). The point is not that riots ought to be seen as routine, but that there is a history of communal conflict that predates 2002, and there is a recent history that postdates 2002 as well. Assam 2012, several riots in Uttar Pradesh after the Samajwadi victory in the last elections, and today’s report on rioting in Rajasthan are part of the same story. Why do riots occur? When anger gets accumulated in the minds of a community and society/government is unable to find a solution, political elements may provide the tipping point for a conflagration. A small incident could trigger violence, where the intent is to injure, destroy property and/or kill members of the other community. The intent behind terrorists exploding bombs in crowded places is similar. It also creates fear in the minds of all concerned. For example, the Mumbai train blasts of July 2006. Unlike a riot, where the attackers are local and identifiable, those responsible for blasts are not visible, and might not even be local, but the message is loud and clear. Further, the reasons for blasts are mostly unknown to (or unacknowledged by) the common man. This makes it easier for any government to blame Pakistan after a bomb-blast even though every mission needs local support. In a deeper sense, riots and bomb blasts are similar. Indian’s tryst with bomb blasts and terror attacks started with the 1993 Mumbai blasts, where convictions were recently confirmed by the Supreme Court. Some 1,446 Indians died and 4,333 were injured in blasts from 1993 to 6 March 2013. The figures exclude those killed in the Khalistani/Kashmiri terrorist movements and Ulfa violence in Assam. (To read details of each blast, click here) An analysis of who ruled the state when terror attacks took place is insightful is given in Table 2. Table 2: Terror attacks/blasts since 1993 to date in which more than 25 lives were lost* *Excludes dead in the Khalistani/Kashmiri terrorist movements and ULFA violence. Table 2 Note that 10 of the 14 attacks took place under Congress/Allies rule and law and order is a state subject. No wonder, noted security expert B Raman wrote in 2009, “there have been four acts of mass terrorism since 1981. All the four were carried out when the Congress was in power in New Delhi. There have been three instances of targeted attacks on foreigners since 1991 – two in Jammu and Kashmir and one in Mumbai. All the three were carried out when the Congress was in power. There have been seven acts of ISI-sponsored aircraft hijackings since 1971. Six of them were carried out when the Congress and one when the BJP was in power. There has been one instance of an Air India plane being blown up in mid-air killing over 250 persons. This took place when the Congress was in power.” Around 52 percent of the 1,446 killed are in India’s terror capital, Mumbai. Has the Congress High Command or any Chief Minister of Maharashtra ever explained why they have not made Mumbai terror-resistant? The lackadaisical approach of the state government can be explained by the fact that the trial for the 2006 train blasts accused is still on nearly seven years after the event. Further, in February 2012, the Bombay High Court upheld the death penalty for three convicts in 2003 twin blasts case. What happened after that? Be it riots or terror attacks, the Congress too has a lot of answering to do. Surely Narendra Modi must answer for 2002, but is he alone? Successive US Presidents must explain why the US supports regimes with a poor human rights record and why it attacked a country in a fraudulent search for weapons of mass destruction that never existed

Sunday 28 July 2013

INDIAN ARMY WHAT IT DOED

जवानांसाठी प्राण केव्हा तळमळणार?
भारत हा एक अफलातून देश आहे. या एकाच देशात आपल्याला जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अनुभवता येते. म्हणजे इथे थरचे वाळवंटही आहे आणि वर्षांतील १२ महिने बर्फाचा जाडसर थर वागवणारी हिमालयातील शिखरेदेखील. वर्षांचे १२ महिने आणि दिवसाचे २४ तास पाऊस पडणारे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणही आहे आणि मानवी वस्ती असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक थंड (उणे ६३ अंश सेल्सियस )अर्थात अतिशीत असे वातावरण असलेले ठिकाणही आहे. एवढे सारे वैविध्य एकाच देशात पाहायला मिळणे तसे कठीणच. पण भारतात हे सारे आहे. शिवाय नदी- नाले, पर्वतरांगा तर आहेतच. इथल्या पर्वतरांगाही आगळ्या आहेत. ईशान्य भारतातील पर्वतरांगांमधून फिरताना एरवी जगभरातील इतर पर्वतरांगांमधून निर्धास्त फिरलेली मंडळीही आपली नांगी टाकतात. या पर्वतरांगांमधून सफाईदारपणे आपली लढाऊ विमाने चालविणारे आणि हेलिकॉप्टर्स नेणारे भारतीय हवाईदल हे जगातील अशा प्रकारचे एकमात्र हवाई दल आहे. प्रचंड वैविध्य असलेल्या या अशा देशाचे खडा पहारा देत रक्षण करणे हे तर त्याहूनही कठीण असे काम आहे. मात्र भारतीय संरक्षण दले खासकरून लष्कर हे काम नित्यनेमाने कोणताही खंड न येता सुखरूप पार पाडते. त्या कामाचा गवगवा कुठेही होत नाही ना त्या कामाची फारशी कुठे चर्चा होते.
भारतीय संरक्षण दलांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ज्या नानाविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्यांना काम करावे लागते त्याच विविध भौगोलिक परिस्थितींमधून त्यांचे जवानही आलेले असतात. कुणी राजस्थानच्या वाळवंटातून आलेला तर कुणी बर्फाचीच सोबत राहिलेल्या हिमालयातील एखाद्या गावातून. कुणी अशा ईशान्य भारतातून आलेला असतो की, त्याने समुद्र केवळ सिनेमामध्येच पाहिलेला तर कुणी मुंबईसारख्या ठिकाणाहून आलेला की ज्याला पहाडी प्रदेश म्हणजे नेमके काय हे ठाऊक नाही. पण हेच सारे जवान भारताच्या कानाकोपऱ्यात सर्व भौगोलिक परिस्थितींमध्ये विनातक्रार काम करत असतात. केवळ देशांच्या सीमांचे रक्षण करणे एवढेच त्यांचे काम नाही. तर अनेकविध बाबींसाठी आपण हक्काने त्यांचा वापर करतो. देशातील कोणत्याही भागात परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी शक्यता निर्माण झाली की, त्यांना पाचारण केले जाते. दहशतवादी हल्ल्याच्या वेळेसही आपल्याला त्यांची आठवण येते मग ताजमध्ये ते पोहोचले की, आपला आत्मविश्वास दुणावतो. ते कोणत्याही कठीण परिस्थितीला पुरून उरणारच आणि अंतिम विजय आपल्या जवानांचाच असणार हे आपण गृहीतच धरलेले असते. भीषण दुष्काळ पडल्यानंतरही मदत कार्यासाठी आपण त्यांना पाचारण करतो आणि एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही त्यांनाच मदतीसाठी बोलावतो. मग तो मुंबईमध्ये आलेला २६ जुलैचा महापूर असो किंवा अगदी अलीकडची म्हणजे गेल्याच आठवडय़ात घडलेली उत्तराखंडमधील केदारनाथ सारखी भीषण नैसर्गिक दुर्घटना असो. जवान त्या ठिकाणी पोहोचले की, आपला जीव भांडय़ात पडतो. त्यांचे अस्तित्त्व हे आपल्यासाठी आपण परिस्थितीवर मात केल्याचे निदर्शक असते. तेवढा विश्वास या भारतीय जवानांनी संपूर्ण देशातील सर्व नागरिकांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाने आणि कामाने निर्माण केला आहे. या विश्वासामुळेच तर आपला जीव भांडय़ात पडतो. ज्या भारतीय जवानांनी हा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण केला, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यामध्ये भारतीय नागरिकांचा किती वाटा आहे? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागते. त्यांनी नागरिकांना दिलेल्या विश्वासाच्या बदल्यात आपण त्यांना त्यांचे आयुष्य, त्यांचे कुटुंबीय यांच्याबद्दल देशवासीयांमध्ये सांभाळणुकीची भावना असल्याचा विश्वास आजतागायत आपल्याला म्हणजे नागरिकांना देता आलेला नाही. आज स्वातंत्र्याच्या एवढय़ा वर्षांनंतरही परिस्थिती अशीच राहणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
आपल्या मनात आपल्या जवानांविषयी सुपरमॅनची भावनाच असावी बहुधा. कारण त्यामुळेच आपण माणूस म्हणून त्यांचा विचार करताना दिसत नाही. सध्या उत्तराखंडमध्ये भीषण परिस्थिती ओढवलेली आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक अडकून पडले आहेत. गेले अनेक दिवस पाऊसपाण्याला न घाबरता सतत २४ तास अव्याहतपणे भारतीय सैन्यदलांचे मदतकार्य सुरू आहे. २४ तास काम करणाऱ्या या जवानांच्या विश्रांतीचे काय? जवानांना लागणाऱ्या मदतीचे काय? त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी कोण घेतो? त्यांची काळजी बहुतांश वेळेस तेच स्वत घेतात. अनेकदा असेही होते की, जवानांना अव्याहतपणे काम करताना पाहून स्थानिक नागरिकांना त्यांच्याविषयी आस्था वाटू लागते आणि मग ते नागरिक त्यांच्या मदतीसाठी येतात. पण असे मदतीसाठी येणारे नागरिक नेहमीच संख्येने कमी असतात. आपल्याला या जवानांविषयी फार कमी प्रश्न पडतात. कारण तीही माणसेच आहेत, याचा विसर आपल्याला पडलेला असतो.
म्हणजे सध्या उत्तराखंडमध्ये ज्या परिस्थितीत लष्कराचे मदतकार्य सुरू आहे, ती परिस्थिती एकूणच माणसांसाठी भयावह आहे. पहिल्या दोन दिवसांनंतरच तिथे रोगराईला मोठय़ा प्रमाणावर सुरुवात झाली आहे. खास करून दूषित पाण्यामुळे होणाऱ्या विकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रोगराईच्या जीवजंतूंसाठी तिथे पोषक वातावरण आहे. ही रोगराई फक्त सामान्यांनाच होते आणि जवानांना होत नाही, असे नाही. रोगराईच्या जंतूंसाठी सामान्य काय आणि जवान काय दोन्ही माणसेच. पण रोगराईच्या बातम्यांमध्ये कुठेही जवानांमध्ये काय स्थिती आहे, याचा उल्लेख कधीच कुठेच नसतो. त्या परिस्थितीचा त्रास त्यांनाही होतोच. पण त्याचा उल्लेख कुठेच नसतो.
एका बाजूला अशी परिस्थिती असताना दुसरीकडे देशात काय सुरू असते. तर देशातील अनेक वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांना चिंता असते ती सिद्धदोष गुन्हेगार असलेल्या संजय दत्तची. तो त्याची पत्नी असलेल्या मान्यताला म्हणे दररोज प्रेमापोटी एक पत्र लिहितो आणि त्या पत्राला तीही न चुकता दररोज उत्तर देते. देशभरातील अनेक वाहिन्या आणि वर्तमानपत्रांसाठी ही बातमी उत्तराखंडपेक्षाही मोठी असते, हे या देशाचे दुर्दैवच म्हणायला हवे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. देशाच्या सीमारेखांवर पुन्हा एकदा कारगिल सदृश परिस्थिती निर्माण होते की, काय अशी अवस्था होती. कारगिल आणि त्या परिसरात त्यावेळेस शिखरांवरचे तापमान उणे २०च्या आसपास होते. या परिसरातील शिखरांवर त्या तापमानात एकदा बंकरमध्ये जाऊन बसले की, किमान सहा महिने तिथेच काढावे लागतात. कितीही काही झाले तरी बाहेर येता येत नाही. हवामान अतिशय खराब असते आणि बाहेर जाण्या- येण्याची कोणतीही सोय नसते. तुफान हिमवर्षांव होत असतो. त्या परिस्थितीत कारगिलसारखी अवस्था पुन्हा ओढवू नये म्हणून जवान डोळ्यात तेल घालून होते. भारत- पाक संबंधांमध्ये आलेला तणाव सीमेवर कोणत्याही क्षणी बाहेर येईल, अशी स्थिती होती. कारगिलनंतर भारतीय जवानांच्या अवस्थांकडे थोडे लक्ष देण्यास सरकारने सुरुवात केली. त्याचा फायदा असा झाला की, बंकरमध्ये सलग सहा महिने राहणे ही वाटते तितकी सोपी बाब नाही, याची जाण सरकारला झाली. लहानसा बंकर आणि बाहेर वातावरण उणे २० आणि चार सहकाऱ्यांबरोबर सहा महिने त्याच वातावरणात काढायचे हा प्रकार मानसिक ताण वाढवणारा आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. म्हणून मग तिथे सौरऊर्जा आणि पवनऊर्जेचा आधार घेत प्रायोगिक तत्त्वावर एक टीव्हीसेट बसविण्यात आला. दिवसातून अर्धा तास तो पाहता येईल एवढीच ऊर्जा मिळणार होती. पण त्या अध्र्या तासाच्या रंजनाने मनावरचा ताण हलका होऊन जवान ताजेतवाने होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात झाले वेगळेच. कारण सीमेवर तणाव होता, कोणत्याही क्षणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी अवस्था होती. आणि त्यावेळेस जवानांपैकी एकाने सहज टीव्ही लावून देशभरातील चॅनल्स लावून पाहिली.. त्यानंतर सर्वाचाच संताप अनावर झाला आणि त्यानंतर त्यांनी तो टीव्ही बंदच ठेवणे पसंत केले. असे काय सुरू होते त्या देशभरातील सर्व चॅनल्सवर? सीमेवर तणाव होता, त्याचवेळेस देशाला चिंता लागून राहिली होती ती काळवीट शिकार प्रकरणात अटक झालेल्या सलमान खानची आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील अटक झालेल्या संजय दत्तची. त्यांना अटक झाल्यापासून कोणत्या जेलमधील कोणत्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांना काल रात्री काय खायला मिळाले, कोणते कपडे त्यांनी परिधान केले इथपासून ते कालची रात्र त्यांची कशी गेली इथपर्यंत सारे काही सुरू होते. फक्त त्यांनी कोणती अंतर्वस्त्रे वापरली तेवढेच सांगणे चॅनल्सनी बाकी ठेवले होते. देशासमोरची परिस्थिती कोणती आणि देशात काय सुरू आहे हे सारे पाहून जवान व्यथित झाले होते. आपण प्राणांची ही बाजी कुणासाठी लावतो?, असा प्रश्न त्यांना पडला होता.
मदतकार्यात प्रसंगी काही जवानांचेही बळी जातात. त्यांची दखल कुणीच का घेत नाही. त्या जवानांच्या कुटुंबीयांचे काय? तो आपला कुणीच नसतो का? मग त्याच्या कुटुंबीयांसाठी कोण करणार? त्याचा मृत्यू युद्धात न झाल्याने शहीदअसेही त्याच्या नावामागे लागत नाही. त्यामुळे कोणतीच विशेष मदत त्याच्या कुटुंबीयांना मिळत नाही. ना कुणाचे लक्ष त्याच्या त्या निधनाकडे जाते. खरे तर तोही याच देशाच्या कामी आलेला असतो, शहीद झालेला असतो. अशा शहिदांसाठी आपले प्राण केव्हा तळमळणा

PATRIOTSM WHAT IT MEANS

राष्ट्रभक्तीची सच्ची भावना रुजविण्याचा प्रयत्न करणे जरुरी६०५
स्वातंत्र्य
मिळाले आणि तेव्हापासून अनेक व्याख्यांचं स्वरूप बदलायला लागलं. प्रभात फेऱ्या काढणं, राष्ट्रभक्तीपर गीतं म्हणणं, सत्याग्रह, सूतकताई, प्रसंगी ब्रिटिश सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाणं, तुरुंगात जाणं, साधी रहाणी स्वीकारणे, ग्रामोद्धार, अबलोद्धार, अस्पृश्योद्धार इत्यादींसाठी काम करणे ही स्वातंत्र्याआधीची देशभक्ती होती. सरकारी नोकरी करणं हीही त्यावेळी देशभक्तीच होती. सध्या देशप्रेम हे आपण केवळ सोयीने वापरण्याची, स्वातंत्र्य सैनिक आणि लष्करावर सोपवलेली बाब आहे. आजच्या काळात तुम्ही देशभक्तीची व्याख्या कशी कराल?'कोणत्याही भारतीयास देशभक्ती शिकविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या भारतामध्ये देशभक्तांचे काही प्रकार आहेत. ज्याला आपण देशभक्ती म्हणतो, त्याचा आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा संबंध असा कितीसा असतो? देशभक्ती या शब्दाचं वजन आपण कोणत्या मापात तोलतो, हे तपासून पाहण्याची गरज आहे. अनेक वेगवेगळ्या रंगीत समस्या समोर असताना आपण देशभक्ती या संकल्पनेचा अर्थ काय लावतो, हे पाहिल्याखेरीज या समस्यांच्या निराकरणासाठी अत्यंत आवश्यक असणारं "देशभक्तीचं टॉनिक' उपलब्ध होणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. नक्की काय केलं म्हणजे माणूस देशभक्त होतो,हे पहाणे आवश्यक आहे. भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या सामन्यात हरवले (किंवा हल्ली ऑस्ट्रेलियाला!) की आपल्या देशावरील प्रेमाला उधाण येते. या देशाच्या सर्व समस्या जणू सुटल्या आहेत, उत्साहाला सीमा रहात नाही, चर्चा होते, घोषणा होतात, आरोळ्या दिल्या जातात, गाणी वाजतात, नाच होतो, देशावरील आपले प्रेम सगळ्या जगाच्या निदर्शनास येते. भारतामध्ये चित्रपटामधून देशभक्ती शिकविण्याची एक पद्धत आहे. "बॉर्डर' पाहिला, की आपण सैनिक होतो, "रंग दे बसंती' पाहिला की व्यवस्थेवर बोलायला आपण पात्र ठरतो,
देशभक्तांचा प्रकार मेणबत्त्या लावण्यापासून ट्वीटर आणि फेसबुक वापरण्यापर्यंत वेगवेगळी देशभक्तीची कर्तव्ये बजावताना दृष्टीस पडतो आहे. कुठे लोकपाल आंदोलनासाठी मेणबत्त्या लावा, कुठे मुक्या प्राण्यांसाठी मेणबत्त्या लावा, कुठे शहिदांसाठी मेणबत्त्या लावा, मेणबत्त्या मात्र पेटल्या पाहिजेत, भाषणे झाली पाहिजेत.
मेणबत्त्या लावून देश सुधारणार नाही, चित्रपट पाहून देश सुधारणार नाही, क्रिकेट पाहून तर आशाच नको.आपापलं काम व्यवस्थित करणं हीच देशभक्ती ' प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.ज्यानं त्यानं आपापलं काम व्यवस्थित करणं म्हणजे काय करणं? साध्या साध्या हजारो कामांची यादी करता येईल. रस्त्यानं नीट आणि वेग मर्यादित ठेवून वाहन चालवणं, रस्ता क्रॉस करणाऱ्यांना रस्ता ओलांडू देणं, आपल्या वाहनाची धडक बसून कोणी पडणार नाही, जखमी होणार नाही, मरणार नाही अशी सावधगिरी बाळगणं, रस्त्यांवरचे दिवे लावणं आणि सूयोर्दयाला ते बंद करणं, शिक्षकांनी नीट शिकवणं, परीक्षकांनी उत्तरपत्रिका नीट तपासून परीक्षांचे निकाल वेळच्या वेळी लावणं, सरकारी कार्यालयातली काम नियमानुसार करणं, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, अशी पाटी सरकारी कार्यालयात लावण्याची पाळी येणं, अचानक संप अथवा बंद पुकारून सामान्य माणसांना वेठीला धरणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामं भराभर संपवणं, मंत्री वगैरे लोकांनी 'वरकमाई' चा मोह धरणं, अर्थमंत्र्यांनी निवडणुकीकडे लक्ष ठेवून अर्थसंकल्प बनवणं, अशी हजारो कामेरस्त्यावरील
सिग्नल पाळणं ही देशभक्ती आहे, रस्त्यावर थुंकणं ही देशभक्ती आहे, स्त्रियांचा आदर करणं ही देशभक्ती आहे, दिलेला शब्द पाळणं ही देशभक्ती आहे, दिलेली वेळ पाळणं ही देशभक्ती आहे, भ्रष्टाचारास उत्तेजन देणं ही देशभक्ती आहे, लाच देणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे, आपल्याआधी लोकांचा विचार, ही देशभक्ती आहे, रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत नाचणं ही देशभक्ती आहे, चूक मान्य करणं ही देशभक्ती आहे, जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार करणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे, मतदान करणं ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, ही देशभक्ती आहे, वाद घालता काम करणं ही देशभक्ती आहे, इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम माजवणं ही देशभक्ती आहे, चांगल्या कामात कोलदांडा घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:पलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि खरं सांगायचं तर "सुजाण नागरिक' बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे. ज्या देशामधील नागरिक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास पात्र असतात, त्या देशाला प्रगती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते. रस्त्यात अपघात घडला तर जखमी माणसाला तडफडून मरू न देणे,ही देशभक्ती आहे