Total Pageviews

Showing posts with label WATER SECURITY. Show all posts
Showing posts with label WATER SECURITY. Show all posts

Wednesday, 4 September 2019

महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प -tarun bharat- मंदार सावंत- अनुवाद - Rahul Mahangare 04-Sep-2019

महाराष्ट्र राज्य हे त्यातल्या बऱ्याच विभागांमध्ये पावसाची कमतरता आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. एका बाजूला ठाणे आणि मुंबईसकटचा कोकण प्रांत आहे, जिकडे वर्षाचेसरासरी पर्जन्यमान हे २५००-३००० मिमी असते. कोल्हापूरसारखा पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश आहे, जिथे वार्षिक पर्जन्यमान हे १०७० मिमी असते. महाबळेश्वरसारख्या प्रसिद्ध उंचावरच्या ठिकाणी सरासरी पाऊस ५८२० मिमी असतो (या वर्षी तिथे ७०५० मिमी इतका पाऊस पडला.) आणि एका बाजूला मराठवाडाविदर्भआणि उत्तर महाराष्ट्रासारखी क्षेत्र आहेत, जिथे अनुक्रमे ८५० मिमी११०० मिमी आणि ७०० मिमी पाऊस पडला.
 
यावर्षी मराठवाडयात पावसाची ३५ ते ४० टक्के कमतरता आहे आणि पावसाच्या मोसमातला एकच महिना शिल्लक आहे. अहमदनगर आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांच्या नशिबीसुद्धा या मोसमाअंती सरासरीपेक्षा कमी पाऊसच आहे. मराठवाड्यासारखी गंभीर परिस्थिती जरी नसली तरीही पश्चिम महाराष्ट्राचे कृषीक्षेत्र सोडल्यास इतरत्र शेती ही पावसाच्या भरोशावरच आहे आणि सिंचनाचं पाठबळही नाहीतिथे फेब्रुवारीपासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागेल. मराठवाडा हा गेल्या पाच दशकापासून दुष्काळाचा सामना करतो आहे.
 
फडणवीस सरकारने पहिल्या कार्यकाळात महत्वाकांक्षी असा 'जलयुक्त शिवार' प्रकल्प आणला व प्रत्येक गावाची पाण्याची गरज ओळखून त्याप्रमाणे गावकऱ्यांना या प्रकल्पात सहभागी करून घेऊन प्रत्येक ठिकाणी पाणी साठवण्याच्या व पाण्याचे संधारण करण्यासाठीच्या छोट्या छोट्या जागा बांधणे व ते पाणी मातीत जिरवण्याची व्यवस्था केली, जेणेकरून भूजलाचा स्तर वाढेल. याआधी सत्तेवर असलेल्या काँग्रेस-एनसीपीचे मोठी धरणं बांधण्याच्या धोरणापासून वेगळा असलेला हा प्रकल्प सरकारने आणला, हा निर्णय स्वागतार्ह होता. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात धरणांच्या प्रकरणांमध्ये ७० हजार कोटींचा घोटाळा झाला असून राज्याच्या सिंचन क्षमतेमध्ये फक्त १ टक्क्याने वाढ झाली होती.

याउलट, जलयुक्त शिवाराच्या प्रकल्पात पाच वर्षात केवळ ८००० कोटी रुपये खर्च झाले असून १९००० गावांपैकी केवळ १६,५२१ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काही ना काही काम झालेले आहे
. सरकारने शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या आजूबाजूला किंवा शेतात मध्यम आकाराचे तळे बांधण्यासाठी ५०००० रुपयांचे अनुदानही दिलेले आहे. तसंच, या प्रकल्पाअंतर्गत २०१६ ते २०१९ पर्यंत १.२ लाख तळ्यांची निर्मिती झालेली आहे. १७००० टीएमसी पाण्याचा अतिरिक्त साठा १६,५२१ गावांमध्ये या प्रकल्पामुळे २०१५ पासून झाला आहे, असा सरकारचा दावा आहे. जलयुक्त शिवार ही एक सुरुवात आहे, ज्याचे यशापयश हे पावसावर अवलंबून आहे. कमी बरसलेला मान्सून हा या साठ्यावर परिणाम करू शकतो.
 
यापुढची तार्किकदृष्ट्या योग्य पायरी म्हणजे बोगदे आणि पाईपलाईनच्या साहाय्याने नद्यांची जोडणी होय. त्याद्वारे अतिरिक्त पाणी असलेल्या नद्यांचे पाणी पावसाच्या भरोशावर असणाऱ्या नद्यांकडे वळवणे, हा त्यामागचा उद्देश आहे. कोकणच्या नद्यांचे पाणी मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवण्याच्या चर्चा मागील काही दशकांपासून चालू आहेत. परंतु कोकण आणि देशाच्या मध्ये सह्याद्रीची पर्वतरांग पसरली आहे, जी दोघांना विभागते. यामुळे अनेक अशा प्रकल्पांना अडथळा आलेला आहे. पण, मागील पाच वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यांनी अनुक्रमेपोलावरम आणि कालेश्वरमसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून हा प्रयत्न करून पाहिला आहे. हे प्रकल्प या राज्यांचाविशेषत: तेलंगणासारख्या उन्हाने पोळून निघणाऱ्या राज्याचा चेहरामोहरा बदलून टाकतील.
 
अनेक वर्षांच्या प्रयत्नांमधून महाराष्ट्र सरकारने सरतेशेवटी पश्चिमेकडच्या कोकणकडच्या उल्हास,वैतरणानर-परआणि दमणगंगेसारख्या नद्या ज्यांची अतिरिक्त पाणीपातळी १६७ टीएमसी आहे, ज्यातील अधिकतम पाणी हे समुद्रातच जातेत्यातील ५७.९१ टीएमसी पाणीसाठा हा मराठवाडाउत्तर महाराष्ट्र आणि विस्तारणारे मुंबई-ठाणे महानगर इथे वळवण्यात येईल. या नद्या गोदावरीच्या खोऱ्याजवळ असल्याकारणाने या जोडणीचे काम सुलभ झाले. वरील नमूद केलेल्या नद्या या गोदावरीच्या पात्राला जोडून १५.६ टीएमसी पाणीपुरवठा हा मराठवाड्याला करता येईल. जायकवाडी धरण हे मराठवाड्याचं सर्वात मोठं धरण आहे. (क्षमता - १०२ टीएमसी) हे पैठण इथे आहे. याचं जलग्रहण क्षेत्र हे गोदावरीच्या पात्रामुळे भरलं जातं. या वर्षी नाशिक आणि अहमदनगर इथे झालेल्या अतिरिक्त पावसामुळे २१ धरणांतून गोदावरीत करण्यात आलेल्या विसर्गामुळे मराठवाड्याची जीवनदायिनी समजले जाणारे जायकवाडी धरण हे ९१ टक्के इतके भरले. परंतु;याव्यतिरिक्त मराठवाड्यातल्या कमी पावसामुळे इतर महत्त्वाच्या धरणांचा साठा हा अतिशय धोकादायक निचांकावर येऊन पोहोचला आहे.



 
तसंचनर-पर नद्याही गिराना नदीला जोडल्या जातील आणि १०.७६ टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्राला पोहोचेल, जिथे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. ३१.६० टीएमसी पाणी हे दमणगंगेतून पिंजळ नदीला जाईल आणि मुंबई-ठाणे परिसराला अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकेल. या दोन महानगरांची लोकसंख्या ही एकूण महाराष्ट्राच्या ३० टक्के एवढी आहे आणि ती नजीकच्या २-३ दशकांत वाढणार आहे. या जोडणीमुळे २०६० पर्यंत पाण्याचा प्रबंध होईल. मुंबई महानगरपालिकेतून या जोडणीच्या कामासाठी राज्य सरकार निधीची तरतूद करणार आहे.
 
इस्रायलच्या मदतीने महाराष्ट्र सरकार मराठवाड्यात वॉटरग्रीड उभारण्याच्या बेतात आहे, ज्याची किंमत १०००० करोड आहे. पाईपलाईनच्या प्रयत्नांनी उत्तर आणि दक्षिण मराठवाडा जोडण्याचा इस्रायली कंपन्यांचा बेत आहे. उत्तर मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो पण दक्षिणेत पावसाचे दुर्भिक्ष आहे. मांजरासिद्धेश्वरयेलदारी, लोअर दुधना, विष्णूपुरी, लोअर मनार, माजलगाव, सिना-कोळेगाव, अप्पर पैनगंगा, जायकवाडी आणि लोअर तेरणा हे या प्रकल्पाअंतर्गत जोडले जाणार आहे. जिल्हानिहाय पाण्याच्या गरजेप्रमाणे हे पाणी एका धरणातून दुसऱ्या धरणात सोडले जाईल. या वरील प्रकल्पाप्रमाणे जोडणी झाल्यास १५.६० टीएमसी पाणी प्रथमत: जायकवाडी धरणात येईल. पाणी यानंतर वॉटर ग्रीडच्या माध्यमातून दुसऱ्या धरणात सोडण्यात येईल. यामुळे मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची गरज भागू शकेल. महाराष्ट्र सरकारने बारमाही असलेल्या पूर्व विदर्भातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला पश्चिमेकडे वाहणाऱ्या नळगंगा नदीला जोडण्यासाठी ८२९४ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. ४८० किमी मोठ्या बोगद्यातून हे पाणी पश्चिम विदर्भाच्या पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचे दुर्भिक्ष मिटवेल तसेच नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची व औद्योगिक गरज भागवेल.
 
हे प्रकल्प महाराष्ट्रातील विविध भागांसाठी शिरा असल्यासारख्या कार्यान्वित होतील. यासाठी पाईपलाईनच्या रूपाने छोट्या छोट्या धमन्यांप्रमाणे जाळेही सर्व ग्रामीण महाराष्ट्रात २०२४ पर्यंत उपलब्ध होईल. मोदी सरकारच्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येक गावाला पाणी पोहोचेल. पाणी हा अतिशय तुटवडा भासणारा नैसर्गिक घटक आहे, म्हणूनच पाण्याच्या वापरावर कायदेशीर निर्बंध आणून ठिबक सिंचनाच्या पद्धतीने पाण्याचा वापर करण्यास सांगण्यात येईल. विशेषत: उसाच्या पिकासाठी. आधीच पाण्याचा तुटवडा असलेल्या मराठवाड्यामध्ये उसाच्या पिकांमुळे पाण्याच्या शोधात खोल बोअरवेल खणल्यामुळे पाणीपातळी खाली घसरली आहे. घसघशीत पैसा देणारं आणि लागवडीला सोप्या असणाऱ्या उसाची लागवड करण्यापासून सरकार कोणाला रोखू शकत नाही. पाण्याचा योग्य वापर हा ठिबक सिंचनाच्या आधारे करायला लावणं आणि यासाठी प्रवृत्त करणं हाच सुवर्णमध्य असू शकतो.
 
नदीजोडणी प्रकल्पांमध्ये विस्थापित होणाऱ्या गावांचे चांगल्याप्रकारे पुनर्वसन केल्यामुळे बऱ्याच अडचणी कमी होतील. विशेषत: तथाकथित पर्यावरणवाद्यांना या मुद्द्यावरून नेहमीप्रमाणे थयथयाट करता येणार नाही. अशा पर्यावरणवाद्यांना पर्यावरणापेक्षा तत्कालिक प्रसिद्धीमध्येच जास्त रस असतो. विस्थापितांचं सुरक्षित पुनर्वसन ही सरकारचीसुद्धा जबाबदारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत कधीच न दाखवलेली संवेदनशील बाजू दाखवण्याची संधी ही फडणवीस सरकारकडे आहे.
 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नजरेत घेता हे प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाले तर पुढील ५ वर्षांत दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीसांचा अजेंडा २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यशाची फळं चाखायला देऊ शकतो. फडणवीस हे धडाक्याने व युद्धपातळीवर कामे करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी याच्या वेगवान अंमलबजावणीसाठी स्वतःची वॉर रूमही उघडली आहे. न्यायालयाच्या माध्यमातून याचिकांद्वारे आणि आणि पर्यावरणवादी यांच्याकडून विरोध होऊ शकतो. सरतेशेवटीदुष्काळमुक्त महाराष्ट्र हा १ ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे घोडदौड सुरू करू शकेल. (प्रस्तावित २०३० च्या आधी) गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताकडे मी प्रार्थना करतो की, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठीच्या प्रयत्नांना यश दे.

Tuesday, 30 July 2019

भारत सरकारची ‘जलशक्ती’ अभियान मोहीम महा एमटीबी 30-Jul-2019 अच्युत राईलकर

सद्यस्थितीनुसार ग्रामीण भागातील सुमारे 80 टक्के घरांमध्ये नळाचे पाणी मिळण्याची वानवा आहे. देशातील प्रत्येक घरामध्ये 2024 पर्यंत नळातून पाणी मिळावे, या उद्देशाने 1 जुलै 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलशक्ती अभियाना’ची घोषणा केली. त्याविषयी...
 
नीति आयोगाच्या 2018च्या पाण्यासंबंधीच्या अहवालानुसार, देशातील 60 कोटी नागरिकांना मोठ्या जलसंकटाला तोंड द्यावे लागत आहे.सरकारने ज्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत जलसंकट आहे, तेथील 255 जिल्ह्यातील 1,593 ठिकाणांच्या दुष्काळी भागाकरिता भूजलामध्ये वाढ होण्याकरिता 1 जुलैपासून ‘जलशक्ती’ मोहीम सुरू करून त्याकरिता प्रथम व द्वितीय पर्वाचे काम करण्याकरिता 550 गट करून 255 क्रियाशील (सचिव दर्जाच्या) अधिकाऱ्यांची सरकारने नेमणुका केल्या आहेत.
 
2014 पासून आतापर्यंत ग्रामीण भागातील लोकांना मिळणारे नळाचे पाणी (टक्क्यांमध्ये)
 
2014-15 (13.3)
2015-16 (13.6)
2016-17 (15.6)
2017-18 (17.0)
2018-19 (18.3)
 
राज्यानुरुप उपलब्ध नळाचे पाणी (टक्क्यांमध्ये)
 
50 टक्क्यांहून जास्त
 
सिक्कीम (99)
गुजरात (78)
हिमाचल (56)
हरियाणा (53)
पंजाब (53)
पुदुच्चेरी (50)
 
50 टक्क्यांहून कमी
 
कर्नाटक (44)
महाराष्ट्र (38)
तेलंगण (34)
आंधप्रदेश (34)
जम्मू-काश्मीर (30)
तामिळनाडू (30)
केरळ (17)
मिझोराम (16)
उत्तराखंड (14)
राजस्थान (12)
मध्यप्रदेश (12)
अंदमान-निकोबार (10)
अरुणाचल (9)
छत्तीसगढ (9)
झारखंड (6)
मणिपूर (6)
नागालँड (5)
ओडिशा (4)
त्रिपुरा (3)
आसाम (2)
बिहार (2)
उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि मेघालय (1)
 
राज्यवार दुष्काळी प्रदेशातील ‘जलशक्ती’ अंतर्गत सुरु असलेले कामे
 
तामिळनाडू (541)
राजस्थान (218)
उत्तरप्रदेश (139)
तेलंगण (137)
पंजाब (111)
हरियाणा (81)
आंध्रप्रदेश (69)
कर्नाटक (53)
बिहार (30)
गुजरात (30)
मध्य प्रदेश (29)
दिल्ली (24)
महाराष्ट्र (20)
जम्मू-काश्मीर (15)
अरुणाचल प्रदेश (11)
 
जलशक्ती अभियाना’च्या प्रथम पर्वाचे काम 1 जुलै, 2019 ते 15 सप्टेंबर, 2019 आणि दुसऱ्या पर्वाचे काम 1 ऑक्टोबर, 2019 ते 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत असेल. या ‘जलशक्ती’ अभियानात पाण्याची जपणूक व पर्जन्यजलाची साठवण करणे, पारंपरिक जलस्रोतांचे नूतनीकरण करणे, कूपनलिकांच्या दुरुस्त्या करणे व खड्डे करून त्यात पर्जन्यजल झिरपून जाण्याची व्यवस्था करणे व सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातून पुनर्वापर जल निर्माण करणे, भूजलामध्ये वाढ करणे, झाडांची लागवड करणे आदी कामांचा अंतर्भाव आहे.
 
स्वतंत्र ‘जलशक्ती’ खाते
 
मोदी सरकारने ‘जलशक्ती’ विभागाच्या कामांकरिता स्वतंत्र खात्याची उभारणी केली. त्यात पेयजल, मलमूत्र स्वच्छता कामे, जलस्रोत, नद्या, गंगा शुद्धीकरण कामे, देशात सर्व घरांकरिता नळाचे शुद्ध पाणी पुरविणे, पाणी संचयन करणे या कामांकरिता गजेंद्रसिंग शेखावत यांची जलशक्तीमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. 255 जलसंकटांच्या जिल्ह्यांचे काम त्यानी ताबडतोब हातात घेतले आहे. शेखावत यांनी यासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीतील काही मुद्दे प्रकर्षाने मांडत आहे. पाणी हा विषय संपूर्ण विश्वाकरिता फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या देशात 65 टक्के नागरिक भूजलावरती म्हणजे विहिरीच्या पाण्यावर तहान भागवितात. देशातील एकूण वर्षाला मिळणाऱ्या चार हजार अब्ज घनमीटर पाण्यापैकी फक्त 1,198 अब्ज घनमीटर पाणी वापरण्याजोगे आहे व त्यातील 300 अब्ज घनमीटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध असलेल्या 5 हजार, 400 जलाशयांमध्ये साठविता येते. भूजलातील व इतर ठिकाणच्या पाण्यासह आपण फक्त 600 अब्ज घनमीटर पाणी वापरात आणू शकतो. लोकसंख्यावाढीमुळे व पाणीटंचाईमुळे 1950 मध्ये प्रत्येक माणसाला मिळणारे 5,100 घनमीटर पाणी आताच्या काळात माणशी 1,400 घनमीटरपर्यंत कमी झाले आहे. हळूहळू हा आकडा एक हजार घनमीटरपर्यंत पोहोचेल म्हणजेच जलदुर्भिक्षतेच्या मर्यादेला पोहोचेल. अनुमानाकरिता यात माणशी दिवसाला 50 लिटर पाण्याचा वापर हिशोबात धरला आहे. हे पाण्याचे संकट वा जलक्रांती प्रथम दूर झाली पाहिजे. 1 जुलैला जलशक्ती मंत्रालयाने 255 जिल्ह्यातील 1 हजार, 593 ठिकाणी जलशक्ती मोहिमेचे काम सुरू केले आहे. हे जलसंकट दूर करण्याकरिता चार प्रकारची कामे करावी लागतील. पर्जन्यजल साठवण करणे वा जमिनीत ते जिरवून भूजलाचा साठा वाढविणे. दुसरे काम म्हणजे, पाण्याचा योग्य प्रकारे वापर करणे. आपल्या जलवापरामध्ये घरगुती पाणी, औद्योगिक कामाकरिता वापर व शेतीकरिता वापर असतो. परंतु, शेतीकरिता 89 टक्के व इतर घरगुती-औद्योगिक वापराकरिता फक्त 11 टक्के पाणी लागते.
 
आपण सध्या जे शेतीकरिता पाणी वापरतो त्यात फार पाणी फुकट घालवितो. एक किलो तांदळाच्या उत्पन्नाकरिता सरासरी भारतात 5,600 लिटर पाणी वापरले जाते, तर चीनमध्ये फक्त 350 लिटर पाणी लागते. भारतात 89 टक्के पाणी शेतीकरिता वापरले जाते, तर चीन व ब्राझील देशात हे प्रमाण अनुक्रमे फक्त 65 टक्के व 60 टक्के एवढेच आहे. आपल्याकडे बुद्धी व तंत्रज्ञानाची कमतरता नाही, पण आपण भारतीय पाण्याला महत्त्व न देता त्याचा अनावश्यक वापर करतात. तिसरा प्रकार म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे.सिंगापूरसारख्या देशात मलशुद्धीकरण करून पाण्याचा पुनर्वापर केला जातो. नेहमीच्या वापरलेल्या पाण्यात तेथे 70 टक्क्यांपर्यंत पुनर्वापराचे पाणी वापरले जाते. असे भारतात घडले तर कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा व पंजाबमधील सध्या चालू असलेले जलतंटे दूर होऊ शकतील. चौथी गोष्ट म्हणजे वृक्षांची लागवड करणे. त्यामुळे वृक्षलागवड करुन आपण आपला प्रदेश अधिकाधिक हरित बनविला पाहिजे.
 
दुष्काळी 255 जिल्ह्यांच्या जलसंकट दूर करण्याकरिता ‘जलशक्ती’ मंत्रालयाने सर्व राज्यांकडे पारंपरिक पाणथळी व जलसाठ्यांविषयी विचारविनिमय सुरू केला आहे. यावेळी काही माहिती ‘जलशक्ती’ खात्याला बुंदेलखंडाच्या दुष्काळी विभागातून कळली. साधारण सहाशे ते एक हजार वर्षांपूर्वीच्या काळातील तत्कालीन चांदेला राज्यकर्त्यांनी नऊ हजार पाण्याच्या टाक्या बांधल्या होत्या. त्यातील अडीच हजार टाक्या शोधून, त्यातील अडीचशे टाक्यांचे गेल्या दोन वर्षांत नूतनीकरण करून त्या वापरण्यास सुरुवात झाली आहे व बुंदेलखंडच्या दुष्काळी समस्यांपैकी अर्ध्या समस्या दूर झाल्या आहेत. जर सर्व नऊ हजार टाक्या शोधून, त्या वापरात आणण्याजोग्या बनविल्या, तर बुंदेलखंड प्रदेश हा जलयुक्त श्रीमंत बनेल. या सगळ्या टाक्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, या सर्व टाक्या एकमेकांना जोडलेल्या होत्या. एका टाकीतील पाणी कमी झाले, तर जोडणीमुळे परत भरले जाते. तशीच एक जुनी जलसंचय यंत्रणा जयपूरच्या एका किल्ल्यातही कार्यरत होती. त्या किल्ल्यात एक तीन कोटी लिटर क्षमतेची टाकी व त्याला 25 किमी लांब जाळी असलेला कालवा बांधलेला आहे. त्यात पर्जन्यजल साठविले जायचे व ते एक वर्षभर किल्ल्यात राहिलेल्या 30 हजार सैनिकांच्या सहज उपयोगी पडायचे.
 
गंगाशुद्धीकरणाकरिता सरकारतर्फे 20 वर्षांपूर्वी मलजल प्रक्रिया केंद्रे स्थापली गेली. पण, ती राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे बंदच पडली. त्यामुळे जर गावकऱ्यांना प्रक्रिया केंद्रे नकोत, मग पाणी कसे शुद्ध होणार, हा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी आता वाराणसीला 27मलजलवाहिन्यांवर प्रक्रिया केंद्रे सरकारतर्फे बांधली जाणार आहोत व ती चालविण्याकरिता राज्य सरकारकडे केंद्र सरकारच्या मदतीने करार करण्यात येईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, जर जर्मनीमध्ये र्‍हाईन नदी शुद्धीकरण अनेक पर्वांच्या कामाला 25 वर्षे लागली, तर गंगा शुद्धीकरण कामाला काही वर्षे लागू शकतात. नागरी क्षेत्राकरिता शुद्ध पाणी पुरविण्याचे केंद्र सरकारचे ध्येय असून या कामांच्या निधीसाठी बीओटी, पीपीपी मॉडेल इ. तयार करावी लागतील. अगदी लहानपणापासून आपण पाण्याला जलदेवता मानत आलो आहोत. प्रत्येक गावात एक तळे असायचे. त्याच परिसरातील क्षेत्रामधून पाणी साठविले जायचे व ते पाणी उन्हाळ्याच्या वेळी कामाला यायचे. परंतु, आता अशा जलसाठ्याच्या परिसरात अतिक्रमणे वाढली आहेत. जनमानसाच्या विचारसरणीमध्ये जीवनशैलीमुळे बदल घडला आहे. या अशा भरकटलेल्या समाजाला जागे करून आपण हे जलसंकट दूर करायला हवे.

Saturday, 18 May 2019


दुष्काळाकडे गांभीर्यानं पाहा (अग्रलेख)-DIVYA MARATHI-
संपादकीय | Update - May 14, 2019, 09:44 AM IST
संकट एवढे भयानक आहे की केवळ सरकारवर अवलंबून न राहता मोठ्या उद्योगांकडून मदत घेत सामना केला पाहिजे


महाराष्ट्रातल्या १५१ तालुक्यांतील जनता दुष्काळामुळे कमालीची पोळून निघते आहे. पिण्याच्या पाण्यासाठी माय-माउलींची वणवण, पदरी असलेलं पशुधन टिकवण्याचे आव्हान, कुटुंबाला सांभाळण्यासाठी पुरेशा रोजगाराची भ्रांत अशा अत्यंत बिकट प्रश्नांना तोंड देत जगण्याचेच आव्हान शेतकरी व शेतीतल्या रोजगारावर अवलंबून असलेल्या ग्रामीण जनतेसमोर उभे आहे. स्थिती भयानक आहे, पण सरकार, प्रशासन अजून म्हणावे तितके गंभीर नाही. अशा कठीण स्थितीतही महाराष्ट्रातील जनतेने खूपच संयम दाखवला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणुकीच्या काळात प्रचारामध्ये रमण्याची खूपच सवड दिली. खरे तर नेत्यांची नारेबाजी जेव्हा चालू होती तेव्हाच लोक भीषण दुष्काळाला सामोरे जात होते. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी तेव्हा शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवली नाही. शेतकऱ्यांनी तेही खपवून घेतले. पण आताही सरकारचा पवित्रा केवळ बोलण्यापुरताच राहिला, तर निवडणुकीअगोदरच्या संयमाची अपेक्षा सरकारने लोकांकडून करू नये. संपर्कमंत्री, पालक सचिव यांना दुष्काळी जिल्ह्याचे दौरे करण्यास सांगितले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे समजू नये. मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या फुफाट्यातून साधणार काहीच नाही. जोपर्यंत थेट शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांना मदतीचा थोडा तरी गारवा जाणवणार नाही. कोणीही ज्येष्ठ नेते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वणवण फिरताहेत, असे चित्र नाही. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. एक वेळ चाऱ्याचा तुटवडा झाला, लोकांना अन्य-धान्य कमी पडू लागले तर ते कोठूनही आणून पुरवता येईल, पण पाण्याच्या बाबतीत मात्र कसलेच सोंग, बाहेरची मदत उपयोगाची नाही. त्यासाठीच सरकारने आणीबाणी समजून काम करायला हवे. ते होते असे दिसत नाही. दुष्काळग्रस्त भागातील फळबागांची परिस्थिती चिंताजनक आहे. एखादे पीक गेले तर ते मोडून पुढच्या हंगामात नवीन पिकाची तयारी करता येते. परंतु फळबाग मोडीत निघाली तर पुन्हा बाग उभी करायला वर्षापेक्षा जास्त काळ जातो. छोटा बागायतदार तग धरू शकत नाही. अशा बागा मोडीत निघाल्या आहेत. रोजगाराच्या समस्येला तर सरकारने अजून स्पर्शही केलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागात हिंडून बघावे. चांगल्या घरच्या महिलाही रोजगारासाठी तोंड झाकून गावापासून दूर ऑटोने जात आहेत, हे सरकारला कधी समजणार? संकट एवढे भयानक आहे की केवळ सरकारवर अवलंबून न राहता मोठ्या उद्योगांकडून मदत घेत सामना केला पाहिजे. कोणत्याही पक्षाने दुष्काळाचे भांडवल करत राजकारण न करता सर्व जाणकारांना, लोकांना दिलासा देण्यासाठी बरोबर घेतले पाहिजे. प्रश्न केवळ तीन-चार आठवड्यांचा नाही. पावसाने ताण दिला तर ते लक्षात ठेवून जास्तीच्या मदतीच्या नियोजनाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यानंतरही गांजलेल्या शेतकऱ्याला उभारीसाठी मदतीचे आव्हान सरकारसमोर आहे.

Friday, 17 May 2019

पाणीसमस्येवर रामबाण तोडगा काय?TARUN BHARAT

देशात लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुका अंतिम टप्प्यात असताना आणि सरकार कोणते येणार याबाबत उत्सुकता असताना, सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा सार्‍यांना सहन कराव्या लागत आहेत. एकीकडे आपल्या मनातील सरकार सत्तेवर येण्याचा आनंद आणि दुसरीकडे मान्सूनचा पाऊस पाच ते सहा दिवस उशिरा येणार असल्याचे दुःख अशा पेचात जनता सापडली आहे. ‘जल हैं तो कल हैं’ किंवा ‘पाणी हेच जीवन आहे’, असे आपण म्हणत असलो तरी वर्षभर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तुम्ही-आम्ही फारसे काही करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाण्याचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिथे पाणी नसेल तेथे जीव-जंतूच नाही तर सृष्टीदेखील वास करीत नाही. मानव वस्तीचा तेथे अभाव असतो. जगातील कुठलेही क्षेत्र, वस्तू, उद्योग अथवा कुठल्याही कार्याबाबत बोलायला जाल तरी त्याचा संबंध पाण्याशी आल्याशिवाय राहात नाही. या सार्‍याच बाबींना पाण्याशिवाय अर्थ उरत नाही. आपण जागतिक जल दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. पण त्यापासून निश्चित काही बोध घेतो का? हा खरा प्रश्न आहे. कडक उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर पाण्याबाबत जलजागृती करण्याचे महत्त्व आपल्या डोक्यातही राहात नाही. पाणी टंचाई या विषयावर साधे मतप्रदर्शन करायलाही आपण टाळतो.

 
 
 
 
यंदा केरळमध्ये मान्सून 4 जूनला धडकणार असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केल्यानंतर भारतीय हवामान विभागाने मान्सून सहा जून रोजी म्हणजे दोन दिवस उशिरा येईल, असे जाहीर केले. यामध्ये दोन-चार दिवसांचा फरक पडू शकतो, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून वेळेत येणार म्हटले की बळीराजाच नव्हे तरा सारा देश सुखावतो. मान्सूनमुळे अनेक समस्या मार्गी लागतात. देशातील उन्हाळ्याची धग कमी होते. त्यामुळे होणारे आजार आपोआप कमी होतात. ताप, उष्माघात, डोकेदुखी, अंगाचा दाह होणे आदी उष्णतेमुळे होणारे आजार टळतात. शेतकरी सुखावतो आणि नांगरणी, खुरपणी, पेरणीच्या कामाला प्रांरभ करतो. सरकारदेखील चांगल्या पावसाच्या अंदाजाने आनंदते. पाणीटंचाईसाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजना बंद करण्याच्या मागे ते लागते. टँकरची मागणी हळहळू कमी व्हायला लागते आणि त्यावर लागणारा खर्च सरकारला इतर विकास कामांकडे वळविणे शक्य होते. कृषिक्षेत्रातील व्यावसायिक सुटकेचा निःश्वास सोडतात. पीक-पाण्याच्या गप्पा वाढतात आणि त्यासंदर्भातील खरेदी-विक्रीतही तेजी येते. देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषिआधारितच आहे. 70 टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती अथवा शेतीशी संबंधित उद्योग-धंद्यांवर आहे. त्यामुळे भारतासाठी पाण्याची गरज किती आहे, हे वेगळे सांगायला लागू नये.
 
सामान्यतः उन्ह वाढू लागले की सारे खडबडून जागे होतात. तहान लागली की विहीर खणू नये, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण तिचा विसर सार्‍यांना वर्षभर पडलेला असतो. दिवसेंदिवस पर्जन्यमानात घट होत होती. पाऊस पडत नाही असे नाही, पण पावसाळ्याच्या चार दिवस सतत थोडाथोडा पडण्याची स्थिती आता राहिलेली नाही. क्लायमेट चेंजचा परिणाम उन, वारा, थंडी यावरही झालेला आहे. थंडीच्या प्रदेशात अतिथंडी जाणवायला लागली आहे तर उष्णतेने पोळणार्‍या प्रदेशांची धग देखील वाढलीच आहे. पावसाचेही काम बेभरवशाचे झाले आहे. कधी इतका पाऊस कोसळतो की शहरातील सार्‍या गटारी बुजून पूरपरिस्थिती निर्माण होते. नागपूर शहरात गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या काळात अशी स्थिती निर्माण झाली होती. एकाच वेळी कोसळलेल्या पावसाला तोंड तरी कसे द्यायचे, असा प्रश्न मग प्रशासनापुढे उभा ठाकतो. उत्तराखंडमध्ये अथवा पर्वतीय भागांमध्ये तर असे प्रसंग अनेकदा घडतात. रस्ते दुभंगणे, नदी-नाल्यांना पूर येणे, दरडी कोसळणे हे एकाचवेळी पडलेल्या पावसामुळेच होते. पावसाळ्याच्या चार महिन्यातील चारच दिवस प्रचंड पाऊस कोसळतो आणि मान्सूनमधील पाण्याचे लक्ष्य ओलांडले जाते. प्रत्यक्षात अनेक नदी-नाले पावसाळ्यातही मग तळ गाठते होतात. पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणातील बदल, वाढती लोकसंख्या, कमी पडणारा पाणीसाठा, पाण्याचा अपव्यय अशा बर्‍याच गोष्टींमुळे पाणी टंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करते पण त्या सार्‍या तात्पुरत्या असतात. त्याचा फायदा शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला होतोच असे नाही. त्यामुळे पाण्याची साठवणूक व्यक्तिगत पातळीवर करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे पाणीसंचयाचे प्रकल्प घरोघरी राबवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, उन्हाळ्याच्या दिवसात इमारत बांधकामांसारखे प्रकल्प स्थगित ठेवणे किंवा आवश्यक तेवढ्याच प्रकल्पांना मंजुरी देणे, अशा उपाययोजना केल्या जाऊ शकतात. एकीकडे पाणी टंचाई असताना पाण्याचा उपसासुद्धा औद्योगिक वापरासाठी वाढलेला आहे. कितीही पाणी साठवा ते संपूनच जाते. पाण्याची इतरी मोठी मागणी पूर्ण करणे कुठल्याही सरकारला अशक्य आहे. त्यामुळे पाण्याचा मर्यादित वापर हा त्यावरील उपाय राहू शकतो.
पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार व शेतात ठिबक सिंचन योजना या गोष्टींकडे जर माणूस वळला तर पाण्याचे योग्य नियोजन होऊ शकते. त्यासाठी फक्त एकजूट, कष्टाची तयारी हवी. तरच या दुष्काळ नावाच्या शापातून कायमची मुक्ती मिळू शकते. महाराष्ट्र राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवल्याचे उत्कृष्ट परिणाम बघायला मिळत आहेत. अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात जिथे पिण्यासाठी पाणी दिसत नव्हते, त्या ठिकाणी जलयुक्त शिवारमुळे पुरेसे पाणी वर्षभर उपलब्ध होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आपण दुष्काळ आणि पाणी टंचाईवर बोलतोच खूप आणि त्याबाबत उपाययोजना करतो कमी. त्यामुळे प्रत्यक्ष कृतीतून पाण्याच्या सुयोग्य वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याचा सुयोग्य वापर कसा करावा, याचेही मार्गदर्शन करणार्‍या व्यावसायिक संघटना उभ्या झाल्या आहेत. व्यक्तिगत पातळीवरही याची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांना पेलाभर पाणी देऊन ते वाया जाण्याची शक्यता बघता, त्यांना अर्धा पेला भरून पाणी देणे, बेसिनमध्ये तोंड धुताना नळ सतत सुरू न ठेवणे, आंघोळ करताना शॉवर सतत सुरू न ठेवणे, उन्हाळ्याच्या दिवसात दुचाकी आणि चार चाकी वाहने पाईपने न धुणे, रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी न देणे, रस्त्यांवर उगाच पाण्याचा सडा न टाकणे, कपडे धुताना पाण्याचा अपव्यय टाळणे, आदी उपाययोजना करता येणे शक्य आहे. पाण्याचा पुनर्वापर ही पण योजना गावागावात, घराघरात राबवली पाहिजे. एकदा वापरलेले पाणी फेकून न देता त्याचा योग्य पुनर्वापर केल्यास परसबागा फुलतील. सांडपाणी गटर, नाल्यात न सोडता शोषखड्‌ड्यात सोडले पाहिजे. निकामी पाणी बागेतल्या झाडांना वापरल्यास शुद्ध पाण्याची नासाडी थांबू शकते. पाणी बचतीचे प्रयोग अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच केले जात आहेत, ते प्रयोग पुन्हा एकदा पुनर्जिवित करण्याची आवश्यकता आहे. पाणी चंटाई ही निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे, त्यावर मानवानेच रामबाण तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

Saturday, 27 April 2019

जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण.*चला कामाला लागूया. जागोजाग जलमंदीरांची स्थापना करुया. Rainwater Harvesting करुया..




भारतात परंपरेने पावसाळी किंवा हिवाळी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅकटर किंवा बैल नांगराने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेमी खोल पर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोश अवस्थेत जातात त्या नष्ट होतात. *जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते.* शिवाय जमिनीची इलेक्ट्रीकल कंडक्टीविटी वाढते. *तसेच जमिनीतील पोटाश, कॅल्शियम, मेग्नेशियम यांची घनता वाढते.* अपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. इतर बाबी मध्ये पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, कारण त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोल पर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते, त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते ,त्यामुळे सूक्ष्म अन्न द्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.                                                                                 पृथ्वीचं पोट (भूगर्भ) हे एक बँकेचं खातं आहे. ज्यात लक्षावधीं वर्षांची पाण्याची झालेली बचत साठवलेली होती. अगदी पिढ्यान पिढ्या साठत आलेली बचत..
       जमीनीवर असलेलं पाणी जसं की पाऊस,नदी, सरोवरं ही तुमची कमाई आहे. त्यातला ३५% वाटा सूर्य नावाचं आयकर खातं कापून घेतं. तेच पुढे पावसाच्या रूपाने पगारासारखं परत येतं. त्यातला काही भाग भूगर्भातील बचत खात्यात जमा होतो. तर बराचसा भाग तुम्ही खर्च करता. आता खाणारी तोंडं वाढली (लोकसंख्या). उधळपट्टी वाढली(वॉटर थीम पार्क, तरण तलाव, आस्थापनं, सर्वीस सेंटर इ.). तसं तुम्ही बचत खातं पण बुडीत काढायला निघालात. त्या खात्यामुळे इतर जे व्याज म्हणून मिळणारे फायदे होते. (वन संपदा, तापमान नियंत्रण) ते ही झपाट्यानं कमी होऊ लागले. 
         पाऊस दरवर्षी पडतो. पण आपल्याला सवय काय? तर....  पगार झाला की पंधरा वीस दिवस मजा मारायची. शेवटचे आठ - दहा दिवस भणंगासारखं उधार उसनवारी करत फिरायचं. तेव्हा नारे द्यायचे. "पाणी वाचवा." तीच परीस्थिती आताही आहे. जागतिक हवामान बदलामुळे पगार (पाऊस) वेळेवर व पुरेसा होईनासा झालाय. आपल्या उधळपट्टीला आवर नाही. त्यात शुद्ध पाण्याच्या जलचक्रात (पाऊस - बाष्पीभवन  -पाऊस) आपण गटारं व सांडपाणी नावाचं एक वाईट कर्ज वाढवत नेतोय.
          थोडक्यात, पाण्याच्या बाबतीत आपला लवकरच 'विजय माल्ल्या' होणार आहे. तो देश सोडून पळाला. आपण पृथ्वी सोडून कुठं पळणार आहोत?
.


Saturday, 6 April 2019

पाण्याचा वापर जरा जपून...TARUN BHARAT


  
जल ही जीवन हैअथवा जल हैं तो कल हैंया म्हणी आपल्या नेहमीच कानावर पडतात. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणार्‍या या म्हणी उगाचच पडल्या असतील का? वस्तुस्थितीचा त्याला आधार असल्याशिवाय या म्हणी अस्तित्वात आलेल्या नाहीत. आपल्याकडे पाण्याची टंचाई फार आहे असे नाही. देशातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असेलही, पण ती झळ इतर काही देशांच्या तुलनेत फारशी म्हणता येणार नाही. पण दुष्काळ काही सांगून येत नाही. पाणी टंचाईची कुणी भविष्यवाणी करू शकत नाही. पण, यंदा पाऊस कमी पडणार आणि सरासरीच्या 93 टक्के पर्जन्यमान राहील, असा अंदाज स्कायमेट या खाजगी कंपनीतर्फे देण्यात आला आहे. आजही महाराष्ट्रासह देशातील अनेक भाग दुष्काळामुळे होरपळत असताना स्कायमेटने केलेली ही भविष्यवाणी निश्चितच िंचतित करणारी आहे. अल्‌ निनोमुळे ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या कालावधील सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला गेला आहे आणि यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 55 टक्के राहील, असेही भाकीत केले गेले आहे. पॅसिफिक महासागरात सक्रिय होणार्‍या अल्‌ निनोमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया आणि भारताच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारासुद्धा स्कायमेटने दिला आहे. भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असल्याने स्कायमेटच्या या इशार्‍याकडे गांभीर्याने बघितले जायला हवे. आपल्यासाठी पावसा-पाण्याचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. कमी पावसाचा इशारा केवळ शेतकर्‍यांनाच चिंतेत टाकणारा असतो असे नव्हे, तर सरकारला त्याची िंचता लागून गेलेली असते. दुष्काळी परिस्थितीत उद्भवणार्‍या स्थितीचा आढावा आणि त्याबाबतच्या उपाययोजना महिनाभरापूर्वी तयार राहायला हव्यात. भारत शेतीप्रधान देश असला, तरी अजूनही देशातील सर्व शेतजमीन िंसचनाखाली आलेली नाही. अनेक धरणे नुसती कागदावर आहेत. तयार झालेल्या धरणांमधील पाणीसाठा आटत चालला आहे. पाऊस कमी होणे याचा संबंध थेट देशाच्या अर्थकारणाशी जोडला जातो. पाऊस कमी होणे म्हणजे कृषी उत्पादनात घट होणे, त्यामुळे शेतकर्‍याचे अर्थकारण बिघडणे आलेच. पुढे याचा फटका दलाल आणि सरतेशेवटी सरकारला बसणे. याची परिणती सरकारचा महसूल घटण्यावर झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे पर्जन्यमान कमी होणार, याचा अर्थ देशाचे अर्थकारण डळमळीत होणार, हे निश्तिच!




पर्जन्यमान कमी होणार असल्याचा इशारा कुण्या संस्थेने दिला असला, तरी एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही. आपण आपल्याकडे उपलब्ध पर्यायी जलस्रोतांचा वापर अशा वेळी करू शकतो. पण, दिवसेंदिवस पाण्याचा उपसा वाढल्याने जमिनीतील पाण्याच्या साठ्यात घट होत आहे. आपण म्हणू केवळ एका वर्षी पाऊस कमी पडल्याने काय बिघडत? पण, येथेच आपण मार खातो. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करण्याची सवय माणसाला असली पाहिजे. जो मातीत राबतो, ज्याला पाऊस न पडण्याचा िंकवा कमी पडण्याचा थेट फटका बसतो, ज्याची पिके उन्हामुळे करपून जातात, ज्यांना पावसाअभावी पेरण्याच करता येत नाहीत, त्या व्यक्ती मात्र याबाबत विचार करायला प्रवृत्त होतात आणि आपली उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था काय असेल, याबाबतची गणिते मांडायला सुरुवात करतात. वेल प्लांड इज हाफ डनअशी आपल्याकडे म्हण आहे. त्याच धर्तीवर जे शेतकरी असे प्लािंनग करतात, त्यांना पर्जन्यमान कमी झाले तरी फारसा फरक पडत नाही. पण, अशी पर्यायी व्यवस्था अल्पभूधारक शेतकर्‍याकडे असणे शक्यच नसते. त्यामुळे तो नाडला जातो. महाराष्ट्रातील 151 तालुके सध्या दुष्काळाने ग्रासले आहेत. अनेक ठिकाणी आजच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ठिकठिकाणी टँकर्स लावण्यात आले आहेत. गावागावातील तहान मिटविली जात आहे. पण, कमी पावसामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होणारच. पाऊस झाला नाही तर पशुखाद्य कुठे मिळेल याची ज्याला कल्पना आहे, जो पर्यायी शेतीपूरक जोडधंदा सुरू करण्याची तयारी करेलच, हे सांगण्यासाठी कुणा पंडिताची गरज नाही. खरेतर पाण्याची समस्या का निर्माण होते, त्यासाठी जबाबदार कोण, या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मानवापर्यंतच येऊन ठेपतात. माणसाने पाण्याचा प्रचंड उसपा केलेला आहे. पाणी वापरण्याचे त्याचे नियोजन अयोग्य आहे. आंघोळीसाठी किती पाणी वापरावे, संडासामध्ये फ्लश किती वेळ वापरावा, गाड्या धुण्यासाठी किती पाण्याचा वापर व्हावा, आंघोळ किती वेळ आणि किती पाण्यात करावी, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मानवाच्या बेजबाबदार वृत्तीकडे अंगुलिनिर्देश करतात. पाण्याचे योग्य नियोजन केले तर भविष्यात कितीही कमी पर्जन्यमान झाले, तरी त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे गेल्या 3-4 वर्षांपासून पाण्याची प्रचंड पाणी टंचाई जाणवत आहे. 2015 पासून येथील धरणांची पाण्याची पातळी घसरू लागली आहे. शहरातील नळाचे पाणी बंद करण्यात आले असून, पाण्यासाठी रेशिंनग सुरू झाले आहे. पाण्यासाठी रांगा हे रोजचेच दृश्य झाले आहे.

पाण्याचा सर्वाधिक संबंध अर्थकारणाशी येतो. पाण्याच्या उपलब्धतेबाबत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असला, तरी जोवर पाण्यासाठी वणवण भटकणे तेही स्त्रियांना पाण्यासाठी करावे लागणारे कष्ट कमी होणार नाहीत, तोवर पाण्याची समस्या कमी झाली असे म्हणता येणार नाही. जागोजागी उपलब्ध असलेले पाणी, त्याचे वाटप, पुरवठा व वापराचे अर्थशास्त्र, पाण्याची उत्पादकता व करधोरण असे या प्रश्र्नाला अनेक पैलू आहेत. दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा जास्तच जाणवू लागला आहे. गेल्या 100 वर्षांत पाऊसमानात फारसा फरक पडलेला नाही. उलट अतिवृष्टीच्या घटना वाढत असल्याने जास्त पावसाचीच नोंद अनेकदा झाली आहे. पण, हे पाणी साठवण्याच्या फारशा सोयी आपण केल्याच नाही. पाणी अडवा पाणी जिरवाहे साधे आणि सोपे तंत्रज्ञान आपण केवळ कागदोपत्रीच ठेवले. पण, राज्यातील नव्या सरकारने जलयुक्त शिवार आणि नाल्यांचे खोलीकरण व विस्तारीकरण हे उपक्रम हाती घेतले आहेत. वॉटर हार्वेस्टिंग हा पाणी साठवण्याचा उत्तम उपाय. पण, त्याला प्रतिसाद तेवढा नाही. पाणी साठवणूक हा प्रकार आजचा नाही. पूर्वापार चालत आलेला आहे. अगदी महाभारत आणि रामायणातही पाण्याच्या सरोवरांचे दाखले मिळतात. पाण्याचा संबंध जसा अर्थकारणाशी जोडला जातो, तसाच तो देशाच्या विकासाशीही जोडला जातो. पाण्याची कमतरता परिसरात अनेक समस्या जन्म देऊन जाते. कमी पाणी म्हणजे माणसाच्या आरोग्याशीदेखील खेळ आहे.
येमेन, लिबिया, जॉर्डन या देशांमध्ये कायम पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या देशांमध्ये एकवेळ दारू अथवा बीअरच्या बॉटल्स उपलब्ध होतील, पण पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स मिळणे अवघड जाते. विशेष म्हणजे बाटलीबंद पाण्याच्या किमतीही खिशाला न परवडणार्‍या आहेत. महाराष्ट्राचा विचार करता, या राज्यात लहान-मोठ्या तब्बल 400 नद्या आहेत, पण उन्हाळ्यात त्यातील बहुतांश नद्या आटून जातात. बारमाही नद्यांचा आकडा बोटावर मोजण्याइतका आहे. पाण्याचा जपून वापर, पाण्याची योग्य साठवणूक, पाण्याचा अपव्यय टाळणे, काटकसरीने वापर, अशा काही बाबींचे पालन देशवासीयांनी केले, तर कितीही कमी पर्जन्यमान झाले तरी त्याची झळ बसणार नाही..