SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Showing posts with label ISIS. Show all posts
Showing posts with label ISIS. Show all posts
Monday, 1 August 2022
Friday, 5 February 2021
Saturday, 26 January 2019
इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा
पूर्वी असा समज होता की, निरक्षर, समाजाचे
भान नसलेल्या लोकांना दुष्ट लोक धर्माच्या नावावर चिथवतात. ते काय बिचारे
भोळेभाबडे लोक. त्यांना काय माहिती दुनियादारी? मग अशा
लोकांना हत्यार बनवून धर्माच्या नावावर देशद्रोही बनवले जाते. पण, गेली काही वर्षे हा समज खोटा होताना दिसत आहे. ‘इसिस’
या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र
दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर. ठाण्यात अटक केलेल्यांपैकी एक जण
ठाणे पालिकेचा कर्मचारी. या सर्वांचा काहीतरी भयानक घातपात करण्याचा इरादा होता,
असा दावा केला जातो. मात्र, या पार्श्वभूमीवर
त्यांचे नातेवाईक सांगतात की, हे लोक भयंकर धार्मिक
प्रवृत्तीचे आहेत. ते असे असतील, यावर विश्वास बसत नाही. असो,
असे जरी असले तरीसुद्धा जर या संशयितांचा ‘इसिस’सारख्या क्रूर मानवताविरोधी संघटनेशी संबंध असेल तर कोणत्याही धर्माचे ‘बंदे’ असण्यासाठी ते पात्र आहेत का? हे स्पष्ट व्हायला हवे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड
सीरिया’ अर्थात ‘इसिस’ला इराकपासून संपूर्ण मध्य पूर्वेसह थेट उत्तर आफ्रिकेपर्यंत इस्लामची
राजवट स्थापन करून तथाकथित खलिफाची राजवट आणायची आहे. दुर्दैवाने, भारतीय मुस्लीम तरुण ‘इसिस’च्या
या इस्लामिक राज्याच्या दाव्याला बळी पडलेले दिसतात. तसेच ठाण्यातील मुंब्रा आणि
औरंगाबादमध्ये विशिष्ट समाज एकवटला आहे, तर त्या एकवटलेल्या
समाजातील काहींना कट्टरतेकडे आणि पर्यायाने देशद्रोहाकडे, मानवद्रोहाकडे
नेणाऱ्या प्रवृत्ती तिथे सक्रिय झाल्याचे दिसते. गरीब वस्तीत जायचे किंवा धार्मिक
कार्यक्रमात जायचे; गरीब असतील तर त्यांना सोनेरी स्वप्नांचे
भविष्य दाखवायचे आणि धार्मिक असतील तर त्यांना जन्नत-दोजख वगैरे सांगायचे. असले
धंदे करून तरुणांना आपल्या अतिरेकी पाशात ओढण्याचे काम अतिरेकी संघटनांचे
प्रतिनिधी करत आहेत. यासाठी वस्तीमध्ये जाऊन सेवाकार्य करण्याचे ढोंग ते उत्तमपणे
वठवतात. अशा ढोंगांना बळी पडणारेच पुढे रक्तपिपासू पशू बनतात, याचे दुःख आहे.
मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते
सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना इसिससाठी ‘स्लीपर सेल’चे काम करते. या माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा
तपास यंत्रणांचा दावा आहे. ठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा
इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहे. या अटका वेळीच झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे
चांगलेच आहे. इसिसचा धोका वाढत असल्याचा हा
इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशात
हमखास संशयित दहशतवाद्यांना अटक होते. छापे मारले जातात. एखादा मोठा कट उधळला
जातो. आताही प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असताना दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा, संभाजीनगर येथे काही ठिकाणी छापे मारले आणि नऊ संशयित
दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या सर्वांचा ‘इसिस’ या दहशतवादी
संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मुंब्रा येथील कौसा भागात मंगळवारी ही कारवाई
करण्यात आली. संभाजीनगर येथेही काही अटका झाल्या. हे सर्वच संशयित दहशतवादी
सुशिक्षित आहेत आणि संगणक, माहिती-तंत्रज्ञान यात ते तज्ञ
आहेत असे सांगण्यात येत आहे. अलीकडील काळात आपल्या देशात सुशिक्षित संशयित
दहशतवादी पकडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः संगणकीय तंत्रज्ञानात पारंगत
असणाऱयांचा वावर दहशतवादी कारवायांत वाढताना दिसत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने
गेल्या काही दिवसांत ज्यांना ताब्यात घेतले त्यात सुशिक्षित तरुणांचा भरणा जास्त
आहे. उच्चशिक्षित मुस्लिम तरुण-तरुणींना धर्माच्या, जिहादच्या नावाने भडकवायचे, त्यांचे ब्रेन वॉशिंग करून ‘जिहादी’ बनवायचे आणि दहशतवादी कारवायांत ओढायचे ही ‘इसिस’ या दहशतवादी
संघटनेची जुनीच मोडस् ऑपरेंडी आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील
एका अल्पवयीन मुलीचा
असाच किस्सा बाहेर आला होता. मानसोपचारतज्ञांकडून तिचे नंतर
कौन्सिलिंग करण्यात आले. कल्याणमधील चार तरुणदेखील इसिसमध्ये सहभागी झाले होते.
तीन वर्षांपूर्वी या प्रकरणाने देशभरातच खळबळ माजवली होती. ठाणे जिल्हय़ाशिवाय
मराठवाडय़ातही इसिसने हातपाय पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी येथे ‘सिमी’चे जाळे
होते. आता ‘इसिस’ तोच प्रयत्न करीत आहे. मराठवाडय़ातील परभणी येथून तीन
वर्षांपूर्वी नासीर याला ‘एटीएस’ने अटक केली होती. त्याशिवाय शाहीद खान हा तरुणही एक
किलो स्फोटकासह एटीएसच्या जाळय़ात सापडला होता. या दोघांवरही इसिसशी संबंध असल्याचा
संशय होता. रिझवान खान याला कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले होते. तो ठाणे
जिल्हय़ात इसिसचे ‘भरती केंद्र’ चालवीत असल्याचा संशय होता. ठाणे जिल्हा आणि इसिस हे
कनेक्शन नवीन नाही, जुनेच आहे. किंबहुना, मंगळवारी ज्या अटका मुंब्रा, कौसा येथून झाल्या त्याचे मूळ या जुन्या कनेक्शनमध्येच
आहे. इसिसला देशात फार समर्थन मिळणार नाही, येथील मुस्लिम तरुण या दहशतवादी संघटनेकडे मोठय़ा
प्रमाणात आकर्षित होणार नाहीत असे सरकारपासून सर्वच सांगत होते. मात्र तो अंदाज
पूर्ण खरा ठरलेला नाही असेच
एकंदर चित्र
दिसत आहे. महाराष्ट्रातून ‘इसिस’मध्ये मोठय़ा
प्रमाणावर मुस्लिम तरुण गेले नसले तरी हे कनेक्शन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नाही.
महाराष्ट्र एटीएसच्याच म्हणण्यानुसार त्यांनी किमान 86 तरुणांना इसिसमध्ये जाण्यापासून परावृत्त केले आहे. ही
संख्याही तशी लक्षणीयच आहे. ही मुले तिकडे गेली नाहीत हे आपल्या यंत्रणांचे यशच
आहे, पण हिंदुस्थानी मुस्लिम
तरुणांमधील ‘इसिस’चे आकर्षण संपलेले नाही हेच मुंब्रा, कौसा, संभाजीनगर
येथील एटीएसच्या अटकसत्रांमुळे दिसून आले आहे. मध्यंतरी राष्ट्रीय तपास
यंत्रणेनेही उत्तर प्रदेश, दिल्ली येथे छापे टाकून ‘इसिस’शी संबंधित
संशयितांना अटक केली होती. मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते
सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना म्हणजे ‘इसिस’चेच अपत्य
आहे. ती इसिससाठी ‘स्लीपर सेल’चे काम करते आणि या माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे
शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहे. ठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा
प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहे. या अटका
वेळीच झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहे.
इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे
Tuesday, 20 March 2018
जिथे जगातला कुठलाही कायदा अस्तित्वात नाही वा कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे बंधन नाही, तिथे भारत सरकार आपल्याच अडकलेल्या नागरिकांसाठी काय करू शकते? -PUDHARI
चार वर्षांपूर्वी ‘इसिस’ या इस्लामी जिहादी
संघटनेच्या हाती इराकमध्ये काही भागातील सत्ता गेली. त्यांनी आपले राज्य खिलाफत
म्हणून घोषित केल्यावर कुठल्याही धर्माच्या व वंशाच्या लोकांना गुराढोरासारखे
वागवण्याचा सपाटा सुरू केला. तेव्हा इराकच्या मोसूल शहरामध्ये काही भारतीय
कामधंद्यासाठी वास्तव्य करून होते आणि त्यांनी धोका ओळखून मायदेशी येण्याचा प्रयास
केला होता. त्यातल्या चाळीस भारतीयांच्या एका गटाचे ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी
अपहरण केले व त्यांना कुठल्या तरी तुरुंगात डांबले होते. त्यातून हरजित नावाचा एक
भारतीय सुखरूप निसटला म्हणून मायदेशी पोहोचू शकला. त्याच्यामुळेच असे अपहरण
झाल्याची माहिती भारत सरकारला मिळू शकली. तेव्हापासून भारताने मृत्यूच्या जबड्यात
अडकलेल्या या भारतीय नागरिकांच्या मुक्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न चालविले होते.
पुढे दोन वर्षांच्या हिंसाचारी रक्तपातानंतर ‘इसिस’चे राज्य संपुष्टात
आल्यावर, मोसूलचा
तोही भाग इराकच्या सेनादलाच्या ताब्यात आला आणि प्रत्येक जागी बेपत्ता भारतीयांचा
शोध घेणे सुरू झाले.
काही भारतीय पत्रकारही
मोसूलला जाऊन व चित्रण घेऊन आले होते; पण हे 39 भारतीय जिवंत आहेत वा
नाहीत, याचीही
काही माहिती मिळू शकत नव्हती. कायदेशीर भाषेत व व्यवहारात जोवर पक्के पुरावे नसतात, तोपर्यंत कुणाला मृत
घोषित करता येत नाही. म्हणूनच हे सर्व भारतीय ‘इसिस’कडून मारले गेल्याची
दाट शक्यता दिसत असतानाही भारत सरकार ते मान्य करायला राजी नव्हते. अशा व्यक्तींच्या
मृतावशेषांचाही शोध घेण्यात आला. त्यापैकी एका उद्ध्वस्त तुरुंगाच्या परिसरात एक
सामूहिक कब्रस्तान मिळाले आणि तिथल्या मानवी अवशेषांची कसून छाननी केली असता
बेपत्ता 38
लोकांचे ते अवशेष असल्याचे निष्पन्न झाले. एकूणच त्या मृतांच्या कुटुंबीयांसाठी
ही हृदयद्रावक घटना आहे आणि कुठल्याही सहृदय भारतीयांसाठी ती यातनामय बातमी आहे.
अशा घटनेची व तपासाची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.
त्यापैकी लोकसभेत गोंधळ चालू असल्याने त्यांना पूर्ण माहिती देता आलेली नाही.
ही अतिशय लज्जास्पद बाब
आहे. राज्यसभेत स्वराज यांचे कथन सर्व सदस्यांनी शांतपणे ऐकून घेतले. पण, लोकसभेत मात्र स्वराज
यांचे निवेदन चालू असताना विरोधी बाकांवरून गोंधळ घातला जात होता. 39 भारतीयांचे यातनामय
मृत्यू व त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खातही आपण लोकप्रतिनिधी म्हणून समजूतदारपणे
सहभागी होऊ शकत नाही काय? या
वागण्यातून गोंधळी खासदारांनी जनतेला कुठला संदेश दिला आहे? राजकारण आपल्या जागी
असते, पण
माणुसकी म्हणून काही सभ्यता सर्व जागी पाळायच्या असतात, याचेही आता भारतीय
राजकारण्यांना भान उरलेले नाही काय? इराकमध्ये कामानिमित्त
गेलेल्या भारतीयांना तिथे आकस्मिक राजकीय परिस्थितीने आपल्या जबड्यात ओढून घेतले, तर त्यांच्या सुटकेसाठी
भारत सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मध्यंतरी येमेनच्या युद्धात फसलेल्या
हजारो भारतीयांनाही सुखरूप मायदेशी आणण्याची कामगिरी याच सरकारने बजावलेली आहे.
नुसतेच भारतीय नव्हेत, तर 43 लहान-मोठ्या देशांच्या
फसलेल्या नागरिकांना येमेनच्या मृत्युगोलातून बाहेर काढण्याचा चमत्कार भारत
सरकारने घडवलेला होता आणि त्याचे जगभरात कौतुक झालेले आहे. यातून एक गोष्ट लक्षात
येते, की
परदेशी गेलेल्या नागरिकांसाठी भारत सरकार प्रयत्न करू शकते. पण, तिथल्या घटनाक्रमाची
कुठली जबाबदारी त्याची असू शकत नाही. कारण, तिथली हुकूमत वा
शासनव्यवस्था आपल्या हाती नसते. आज नीरव मोदी वा विजय मल्ल्या यासारखे कुख्यात लोक
परदेशात लपलेले आहेत. पण, त्यांना
उचलून इथे आणण्याचा कुठलाही अधिकार भारत सरकारपाशी नाही. त्यासाठीही
गुंतागुंतीच्या कायदेशीर मार्गाने वाट काढावी लागत असते. शेजारी पाकिस्तानात दडी
मारून बसलेल्या दाऊदलाही इथे गुन्हे नोंदलेले असून, मायदेशी आणणे जिकिरीचे
काम आहे. ज्या देशात कायदेशीर प्रस्थापित राज्य आहे, तिथली ही स्थिती असेल, तर जिथे जगातला कुठलाही
कायदा अस्तित्वात नाही वा कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे बंधन नाही, तिथे भारत सरकार
आपल्याच अडकलेल्या नागरिकांसाठी काय करू शकते? त्या देशावर हल्ला करणे
वा युद्ध पुकारणे शक्य नसते.
अमेरिकेसारख्या
देशालाही अफगाणिस्तानात तालिबान्यांवर कारवाई करताना दमछाक झालेली आहे. ‘इसिस’च्या तावडीत फसलेल्या
भारतीयांना सोडवून आणणे म्हणूनच अशक्य होते. पण, ते जिवंत असण्याची आशा
होती. म्हणूनच ‘इसिस’ची सत्ता संपुष्टात
आल्यापासून भारत सरकारने मुक्त इराकी प्रदेशात या गायब भारतीयांचा कानाकोपर्यात
शोध घेण्याची मोहीम चालवली होती. पण, अखेरीस त्यांना तिथे
ठार मारण्यात आल्याचे निष्पन्न झाले. इतके दिवस आशेवर असलेल्या त्यांच्या
कुटुंबीयांचे दु:ख डोंगराएवढे असेल. त्याची नुसती कल्पना करावी. मग अशावेळी
त्यांच्या दु:खात सहभागी होणे व सहानुभूती व्यक्त करणे, हे आपल्यासाठी कर्तव्य
बनून जाते. भारतीय लोकप्रतिनिधींनी त्याची जाणीव दाखवली नाही, ही बाब म्हणूनच खेदजनक
आहे. परराष्ट्रमंत्री हा दु:खद अहवाल सादर करत असतानाही लोकसभेतला गोंधळ म्हणूनच
त्या वेदनेवर मीठ चोळणारा होता. मूठभर पक्ष आणि डझनभर नेते यांच्या अहंकाराच्या
पायाखाली सामान्य भारतीयांच्या भावना व जिव्हाळा कसा तुडवला जातो, त्याचा हा अनुभव अतिशय
क्लेशदायक आहे. हा अनुभव कुठल्याही संवेदनशील भारतीयांचे मन पिळवटून टाकणारा
म्हणावा लागेल. राजकारणातून माणुसकी इतकी हद्दपार झालीय का?
Friday, 21 April 2017
आधी इशरत, आता नजीम-ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे गाव पुन्हा एकदा प्रसिद्धीस आले आहे. यापूर्वीही ते चांगलेच गाजले होते. उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा येथील अक्रम मंजिल इमारतीत पहाटे छापा घालून नजीम ऊर्फ उमर शमशाद अहमद शेख या २६ वर्षीय इसिसच्या दहशतवाद्याला अटक केली. यामुळे एका फार मोठ्या संकटातून देश वाचला आहे.-TARUN BHARAT
ऑपरेशन मुंब्रा’च हवे! मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला हे चांगले असले तरी मुंब्य्रातील देशविरोधी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार हा प्रश्न उरतोच.
मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला हे चांगले असले तरी मुंब्य्रातील देशविरोधी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार हा प्रश्न उरतोच. खबरी मिळाल्यावर तर धरपकडी होणारच, पण त्याहीपेक्षा आता ‘ऑपरेशन मुंब्रा’ हाच जालीम उपाय आहे. तो केला तरच मुंब्रा हे इसिसचे आश्रयस्थान बनू शकणार नाही आणि महाराष्ट्रासह देशाचा ‘सीरिया’ होणार नाही.
इस्लामी दहशतवाद आणि मुंब्रा हे कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे. अर्थात, त्यात तसे नवीन काही नाही. मात्र ‘इसिस’ या खतरनाक संघटनेच्या दहशतवाद्यांना तेथून पुन्हा ताब्यात घेण्यात आल्याने हे कनेक्शन अत्यंत धोकादायक वळणावर आले आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुंब्रा आणि मराठवाडय़ातील वैजापूर येथून इसिसच्या काही हस्तकांना अटक करण्यात आली होती. त्यात इसिससाठी भरती करणाऱया मुद्दबीर शेख या ‘कमांडर’ला ताब्यात घेण्यात आले होते. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएस यांनी संयुक्त कारवाई करून नजीम ऊर्फ उमर शमशाद अहमद शेख या इसिसच्या प्रमुख हस्तकाला अटक केली आहे. इसिससाठी तरुणांची भरती करणे, त्यांचे ब्रेन वॉश करून दहशतवादी कारवायांसाठी त्यांना तयार करणे अशी कामे नजीम करीत होता. मुंब्रा आणि इस्लामी दहशतवाद हे कनेक्शन खूप जुने आहे. १९९३च्या मुंबईतल्या भीषण बॉम्बस्फोटांसाठी वापरलेले आरडीएक्स येथीलच खाडीत उतरविण्यात आले होते. लश्कर-ए-तोयबाची फिदायीन इशरत जहाँदेखील मुंब्रा येथीलच होती. ती तोयबाची मानवीबॉम्ब होती अशी कबुली खुद्द हेडली याने शिकागो कोर्टात दिली आहे. तोयबा आणि अल कायदाचे अतिरेकी मुंब्रा येथून याआधी पकडले गेले आहेत. आता इसिसचे कमांडर, हस्तक ताब्यात घेतले जात आहेत. मुंब्रा येथून जवळच असलेल्या कल्याण येथील चार तरुण इसिसमध्ये सामील झाल्याचे गेल्या वर्षी उघड झाले होते. शिवाय मुंब्रा येथील तरबेज नूर मोहम्मद तांबे हा तरुणही इसिसमध्ये सामील होण्यासाठी घरातून पळून गेल्याची तक्रार त्याच्या भावानेच केली होती. मुंब्य्राचे सर्वच मुस्लिम बांधव देशविरोधी कारवायांत सहभागी आहेत असे नाही, पण तरीही मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला हे चांगले असले तरी मुंब्य्रातील देशविरोधी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार आणि दहशतवादी सापांची वळवळ कधी कायमची ठेचली जाणार हा प्रश्न उरतोच. खबरी वगैरे मिळाल्यावर तर धरपकडी होणारच, पण त्याहीपेक्षा आता ‘ऑपरेशन मुंब्रा’ हाच जालीम उपाय आहे. तरच मुंब्रा हे इसिसचे आश्रयस्थान बनू शकणार नाही आणि महाराष्ट्रासह देशाचा ‘सीरिया’ होणार नाही.
व्हिसाबंदीची कोंडी
अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि आता न्यूझीलंडनेदेखील व्हिसा नियम कठोर केले आहेत. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अमेरिका फर्स्ट’ हा प्रचाराचा मुद्दाच बनवला होता. त्यानुसार त्यांनी आता ‘एच १ बी’ व्हिसावर निर्बंध आणले आहेत. विदेशी व्यक्तींना अमेरिकेतर्फे हा व्हिसा मिळतो. अमेरिकेच्या संगणक क्षेत्रातील ८० टक्के जागा हिंदुस्थानी तंत्रज्ञ आणि आयटी तज्ञांनी व्यापली आहे ती याच व्हिसाच्या जोरावर. ट्रम्प यांनी लादलेल्या ताज्या निर्बंधामुळे हा ‘टक्का’ खाली घसरणार आहे. थोडक्यात, अनेक हिंदुस्थानी आयटी ‘इच्छुकां’ना अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार आहे. पुन्हा अमेरिकी आस्थापनांना सेवा पुरविण्याचे कंत्राट घेतलेल्या हिंदुस्थानी कंपन्यांनाही या निर्बंधाचा फटका बसणार आहे. अमेरिकेप्रमाणे ऑस्ट्रेलियानेही ‘४५७ व्हिसा’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टर्नबुल हे गेल्याच आठवडय़ात हिंदुस्थानभेटीवर होते. पंतप्रधान मोदींसमवेत दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करून त्यांनी ‘सेल्फी’ही काढला. मात्र ऑस्ट्रेलियात परतताच ‘४५७ व्हिसा’ रद्द करून त्या देशात काम करणाऱया काही हजार हिंदुस्थानी कामगारांना धक्का दिला. शिवाय हा व्हिसाच रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियात जाऊ इच्छिणाऱयांसाठीही दरवाजे बंद झाले आहेत. तशीच स्थिती न्यूझीलंडमध्येही होणार आहे. व्हिसाचे नियम किती शिथिल आणि कठोर करायचे, व्यावसायिक, नोकरदारांच्या स्थलांतराची मर्यादा, भूमिका किती सौम्य किंवा कडक ठेवायची हा शेवटी त्या त्या देशाचा अधिकार असतो. तो मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तिन्ही देशांनी केलेल्या व्हिसाबंदीच्या कोंडीने हजारो हिंदुस्थानी इच्छुकांचा श्वास कोंडणार हे निश्चित आहे. मात्र तूर्त तरी ही कोंडी सहन करण्याशिवाय पर्याय नाही.
Saturday, 25 March 2017
इस्लामिक स्टेट (IS)शी सुरू असलेले युद्ध March 26,-प्रमोद वडनेरकर
Tuesday, 14 March 2017
Thursday, 9 March 2017
इसीस के खतरे को ऐसे रोकें-हेमंत महाजन*
Wednesday, 8 March 2017
भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये बाँबस्फोट होणे व लखनऊमध्ये इसिसचा एक संशयित दहशतवादी चकमकीत मारला जाणे, या वेगवेगळ्या घटना दिसत असल्या तरी त्यामागे इसिससारखी कडवी संघटना असल्याचे पुढे येणे हे चिंताजनक आहे
इसिसची पिलावळ भारतात!-T BHARAT
Saturday, 22 October 2016
MUST READ ALL ABOUT ISIS PRESENT STATUS-Does ISIS Need Territory to Survive? Brand Control Is More Important to ISIS Than Territory-Brand Is Important,-- but ISIS’s Territorial Sovereignty Is Integral to ISIS’s Brand-WILL Dedicated ISIS Members Will Map Out a Survival Strategy ?-A State-Less Caliphate Is Less Inspiring to Prospective Recruits and Financiers
Subscribe to:
Posts (Atom)
