काही वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरमधील काही दहशतवाद्यांनी सोशल मिडियावर आपले एक छायाचित्र प्रसारित केले होते. जम्मू काश्मीरमधील स्थानिक तरुण मुलांनी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्यानंतर एकत्र येत हे छायाचित्र काढले होते. या छायाचित्राच्या माध्यमातून त्यांनी भारतीय सैन्याला आपल्याला शोधून दाखवण्याचे एकप्रकारे आव्हानच दिले होते. तसेच याद्वारे राज्यातील अन्य मुस्लिम तरुणांची मनं भडकवून त्यांच्या मनात दहशतवादाविषयी एक क्रेझ निर्माण केली जात होती. भारताविरुद्ध युद्ध पुकारल्यास आपल्याला जन्नत अर्थात स्वर्ग मिळेल अशी बतावणी या दहशतवाद्यांकडून केली जात असे. एकंदर ११ दहशतवाद्यांनी एकत्र येऊन हे छायाचित्र काढले होते. मात्र भारतीय सैन्याने थोड्याच महिन्यांच्या कालावधीत या सर्वच्या सर्व ११ दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला व त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी पाठवले आहे. या ११ पैकी १० जणांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे तर त्यातील एकाने घाबरून जाऊन आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे आता या छायाचित्रातील एकही दहशतवादी शिल्लक राहिलेला नाही. भारतीय सैन्याचे हे मोठे यश मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये एक जवान मारला गेला तर १० दहशतवादी मारण्याची ग्वाही दिली होती. गेल्या काही महिन्यांत जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठ्या प्रमाणावर जेरीस आणले असून अनेक प्रमुख दहशतवाद्यांना ठार मारण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात होत असलेल्या या कारवाईबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
छायाचित्रातील ११ दहशतवादी व त्यांची सद्यस्थिती -
दहशतवादी | मृत्यू दिनांक | मृत्यूचे कारण | वय |
१) सद्दाम पद्देर | ६ मे २०१८ | एन्काउंटर | वय २३ |
२) बुरहान वाणी | ८ जुलै २०१६ | एन्काउंटर | वय २२ |
३) आदिल अहमद खांडे | २२ ऑक्टोबर २०१५ | एन्काउंटर | वय २० |
४) नसीर अहमद पंडित | ७ एप्रिल २०१५ | एन्काउंटर | वय २९ |
५) अफाक भट | २६ ऑक्टोबर २०१५ | एन्काउंटर | वय २५ |
६) सबझर अहमद भट | २६ मे २०१७ | एन्काउंटर | वय २६ |
७) अनीस | मे २०१६ | एन्काउंटर | - |
८) इश्फाक हमीद दार | ८ मे २०१६ | एन्काउंटर | वय २३ |
९) वसीम मल्ला | ७ एप्रिल २०१५ | एन्काउंटर | वय २७ |
१०) वसीम अहमद शाह | १४ ऑक्टोबर २०१७ | एन्काउंटर | वय २४ |
११) तारिक अमहद पंडित | २८ मे २०१६ (जिवंत) | आत्मसमर्पण | वय २५ |
शोपियाँ : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही तासांपासून सुरु असलेली चकमकीत ५ दहशतवाद्यांना ठार मारण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या मोहिमेत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सद्दाम पद्दार आणि काश्मीर विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रफी हे देखील मारले गेले असण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक शेष पॉल वैद यांनी ट्वीटर वरून कारवाईविषयी माहिती दिली. या मोहिमेत सहभागी झालेल्या व पराक्रम गाजवलेल्या सर्व भारतीय जवानांचे वैद यांनी अभिनंदन करत कौतुक केले आहे.
जम्मू काश्मीर विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापकपदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत डॉ. रफी अहमद शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक पोलिस व जवानांना मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता रफी दहशतवाद्यांना जाऊन मिळाला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रफीच्या कुटुंबियांना पोलिसांनी बोलावून घेतले व त्यांनी रफीशी संपर्क करून त्यास शरण येण्यास सांगावे असे सांगितले. रफीची आई, पत्नी व भावाला पाचारण करण्यात आले. रफी दहशतवाद्यांना जाऊन मिळणार असल्याची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान रफीचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला होता व शोपियाँमधील बडगाम परिसरात त्याची नाकाबंदी करण्यात आली. रफीसोबत अन्यही काही दहशतवादी लपून बसले होते. रफीला शरण येण्यास सांगितले असता रफी व अन्य दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले. जवळपास ३ तास चाललेल्या या चकमकीत अखेर रफी याला मारण्यात सुरक्षारक्षकांना यश आले. रफीसोबत हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सद्दाम पद्दर देखील मारला गेल्याची शक्यत वर्तवली जात आहे
No comments:
Post a Comment