खाणसम्राट ‘रेड्डी बंधू’ यांना सीबीआयने अटक केली आहे. प्रश्न इतकाच आहे की, या कारवाईमागे सीबीआयची नियत साफ आहे काय?
सम्राटांचे दिवस भरले!आमच्या देशात कसले नसले तरी ‘सम्राटांचे पीक’ बरेच आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सम्राट निर्माण झाले आहेत. शिक्षणसम्राट, दारूसम्राट, खेळसम्राट, उपोषणसम्राट, राजकारणातले कार्यसम्राट, खुर्चीसम्राट, वृत्तपत्रसम्राट, त्याचप्रमाणे आता ‘खाणसम्राट!’ कर्नाटकातील असेच एक खाणसम्राट ‘रेड्डी बंधू’ यांना सीबीआयने अटक केली आहे. रेड्डी बंधूंचा खाणींचा म्हणजे शेवटी मातीचाच धंदा आहे, पण अति तेथे माती झाली. त्यामुळे इतर सर्व सम्राटांप्रमाणे रेड्डी बंधूंनाही तुरुंगाची हवा खावी लागली. प्रश्न इतकाच आहे की, या कारवाईमागे सीबीआयची नियत साफ आहे काय? रेड्डी बंधू हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. बेल्लारी व आसपासच्या परिसरात रेड्डी बंधूंचे साम्राज्य आहे. पैसा व सत्ता यामुळे त्यांनी संपूर्ण भाग आपल्या मुठीत ठेवल्याने किमान २०-२५ आमदार व पाच खासदार ते निवडून आणू शकतात व कर्नाटकातील कोणत्याही सरकारचे रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवतात. कर्नाटकातले म्हणजे दक्षिणेतले भाजपचे पहिले सरकार आले त्यात रेड्डी बंधूंची मोठी मेहनत होती. त्यामुळे रेड्डी बंधूंवर भाजप नेतृत्वाची मेहेरबानी असायला हरकत नाही. रेड्डी यांनी कर्नाटकात आमदारांचा एक गट पोसला व त्या बळावर ते मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करीत राहिले. बेल्लारी परिसरातील सर्व प्रशासकीय व पोलीस अधिकारी आपल्याच मर्जीने नेमावेत ही रेड्डी बंधूंची मागणी असे, पण येडियुरप्पा यांनी त्यास विरोध करताच रेड्डींनी आमदारांचा मोठा गट भाजपमधून बाहेर काढून बंडाचा झेंडा फडकवला. शेवटी सरकार वाचविण्यासाठी भाजपला रेड्डींना शरण जावे लागले. रेड्डी यांनी खाणीच्या धंद्यातून जे साम्राज्य उभे केले ते डोळे दिपवणारे आहे व कायद्यापेक्षा बेकायदा खाण व्यापारानेच त्यांच्यावर पैशांचा पाऊस पाडला. विसेक वर्षांपूर्वी रेड्डी बंधूंची स्वत:च्या मालकीची सायकल घ्यायची हैसियत नव्हती. आज तेच रेड्डी बंधू सोन्याच्या सिंहासनावर बसून राजकारण करतात. तिरुपती बालाजीस ५० कोटींचा हिरेजडित मुकुट चढवतात. स्वत:चे विमान आणि हेलिकॉप्टर राखतात. निवडणुकीत शेकडो कोटींचा धुरळा उडवतात. आमदार, खासदार विकत घेण्यासाठी थैल्या मोकळ्या सोडतात. हे सर्व प्रयोग कायदेशीर पैशांतून होत नसतात. बेहिशेबी काळे धन ज्यांच्यापाशी सडत पडले आहे त्यांनाच हे सर्व करणे शक्य होते. रेड्डी बंधू हे फक्त कर्नाटकातलेच नव्हे तर आंध्रातलेही बडे प्रस्थ आहे. कॉंग्रेसचे वाय.एस.आर. रेड्डी आंध्रचे मुख्यमंत्री होते तेव्हा कर्नाटकच्या रेड्डींशी त्यांची व्यावसायिक हातमिळवणी होती. मुख्यमंत्री वाय. एस. आर. यांचे अपघाती निधन झाल्याने रेड्डी बंधूंचा आधारवड कोसळला, पण वाय.एस.आर.पुत्र जगनमोहनशी संबंध सलोख्याचे राहिले. जगनमोहनने आंध्रात कॉंगे्रसविरोधात बंड केले व कॉंग्रेसला धुळीस मिळविण्याची कसम खाल्ली. जगनमोहनला इशारा देण्यासाठी कॉंग्रेसने सीबीआयचे हत्यार वापरून कर्नाटकातील रेड्डी बंधूंना तुरुंगात टाकले काय? ‘कॉंग्रेसशी पंगा घ्याल तर जगनमोहन, तुलाही तुरुंगात टाकू’ अशी धमकीच रेड्डी बंधूंवरील कारवाईतून देण्यात आली आहे. रेड्डी बंधू यांनी आंध्र व कर्नाटकात बेकायदेशीर खाणी खोदून गडगंज पैसा कमावला, पण त्यांच्यावर कारवाई करायला इतका उशीर का लावला? सीबीआय कोणाच्या आदेशाची वाट पाहत होती? चला, राजकारणातला आणखी एक सम्राट अशा प्रकारे तुरुंगात गेला. सम्राटांचे दिवस भरले आहेत

No comments:
Post a Comment