Total Pageviews

Thursday, 29 September 2011

16 COUNTRIES TO TRAIN WITH INDIAN ARMY

VERY LARGE NUMBER OF COUNTRIES TRAIN WITH INDIAN ARMY TO BENEFIT FROM THEIR EXPERINCES OF TACKLING TERRORISM
BUT POLICE PREFER TO GET TRAINERS FROM FOREIGN COUNTRIES.

लष्करी आणि राजनैतिक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने जगातील १६ देशांच्या लष्करांबरोबर २०११-१२ या वर्षांत भारतीय लष्कराच्या संयुक्त कवायती होणार आहेत.

संयुक्त लष्करी कवायतींकडे परस्परांचे लष्कर आणि इतर सैन्यदलांमध्ये समन्वय आणि सहकार्य वाढविण्याचा प्रभावी उपाय म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच भारतानेही या कडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापूवीर् वर्षाला दोन-एक लष्करी कवायतीत सहभागी होणाऱ्या भारताने यंदा वर्षभरात चक्क सोळा देशांशी संयुक्त लष्करी कवायतींचे आयोजन केले आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, मंगोलिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान, किरगिझस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, मालदिव, सेशेल्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांशी या वर्षांत लष्करी कवायती आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 'भारताचा दहशतवादविरोधी आणि बंडखोरविरोधी लढ्यातील अनुभव आणि गेल्या साठ वर्षांत जगातील प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक स्वरुपाच्या रणांगणात भारतीय लष्कराने केलेली कामगिरी पाहून अनेक देशांनी संयुक्त लष्करी कवायतींचा प्रस्ताव समोर ठेवला होता. त्याचबरोबर शहरी आणि निमशहरी भागात दहशतवाद्यांशी मुकाबला करताना भारतीय लष्कर काय कारवाई करते, हे त्यांना जाणून घ्यायचे होते,' असे हा अधिकारी म्हणाला. लष्कराची 'जंगल वॉरफेअर स्कूल', 'हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल' या संस्थांचाही त्यांच्या लष्कराला लाभ होऊ शकतो.

No comments:

Post a Comment