Total Pageviews

Thursday, 22 September 2011

anna visit to pakistan focus on corruption in india

अण्णा पाकिस्तानात जातील किंवा न जातील, पण पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारण्यापूर्वी अण्णांनी देशभावनेचा विचार केला असता तर बरे झाले असते.

अण्णा हो अकबर!
अण्णा हजारे यांच्याविषयी आता या देशातील पामरांनी काय बोलावे आणि काय लिहावे! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही युनोच्या महासभेत अण्णा आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे कौतुक केले आहे. त्यामुळे अण्णांचे मंत्रिमंडळ जोरात असायला हरकत नाही. भ्रष्टाचार हाच आमच्या देशातला खतरनाक शत्रू असून तो दहशतवादापेक्षा भयंकर आहे. या शत्रूशी फक्त लढून चालणार नाही, तर त्याला कायमचे गाडल्याशिवाय हा देश ताठ मानेने, मजबूत पायावर उभा राहू शकणार नाही. एका बाजूला बराक ओबामा यांनी अण्णांच्या आंदोलनाचे कौतुक केले तर त्याच वेळेला पाकड्यांचे एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांना भेटले. या पाक शिष्टमंडळाचे म्हणणे असे की, अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने ते प्रभावित झाले असून पाकिस्तानमधील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी अण्णांनी पाकिस्तानात यावे. तसे निमंत्रणच या मंडळींनी अण्णांना दिले आहे व अण्णांनीही फारसे आढेवेढे न घेता पाक शिष्टमंडळाचे हे आमंत्रण स्वीकारून ‘‘प्रकृतीस आराम पडला की पाकिस्तानात नक्की येतो,’’ असे जाहीर केले आहे. अण्णा पाकिस्तानात जातील किंवा न जातील हा पुढचा प्रश्‍न, पण पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारण्यापूर्वी अण्णांनी देशभावनेचा विचार केला असता तर बरे झाले असते. मुळात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचे अस्तित्व तरी उरले आहे काय? धर्मांधता, अराजकता आणि दहशतवादाने या देशांच्या चिरफळ्याच उडवल्या आहेत. जगाच्या नकाशावर दिसतात म्हणून यांना राष्ट्र म्हणायचे काय एवढाच प्रश्‍न आहे. धर्मांधता व हिंसाचाराच्या वणव्यात ही राष्ट्रे नष्ट झाली व हिंदुस्थानलाही नष्ट करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. हे मनसुबे तडीस नेण्याची एकही संधी पाकडे सोडत नाहीत. अशा स्थितीत पाकिस्तानशी निदान आपल्याकडील
कुणीही फालतू ‘गुलूगुलू’
करू नये. कश्मीरच्या खोर्‍यात काय चालले आहे? पाकड्यांच्या पाठिंब्यावरच तेथे अतिरेकी घुसतात व हिंदूंच्या कत्तली करून रक्ताचे सडे पाडतात. खोर्‍यात एकही हिंदू जिवंत राहता कामा नये असा पणच तोयबा, अल कायदा वगैरे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला आहे. मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी सतत जे बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ले सुरू आहेत त्यात या देशातील निरपराध लोकांचेच रक्त सांडत आहे. या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे पाकड्यांचाच हात आहे व जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत हिंदुस्थानला सुख, शांती लाभणार नाही. पाकिस्तानचे नाव घेतले की या देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाचा पारा संतापाने चढतो व पाकड्यांशी लढण्यासाठी त्यांच्या मुठी वळतात, मनगटे आपोआप चेततात. हिंदुस्थानच्या सध्याच्या हतबल परिस्थितीस फक्त पाकिस्तान आणि पाकिस्तानच जबाबदार असताना या देशातील कर्मदरिद्री राज्यकर्ते, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते मात्र पाकड्यांशी प्रेमाचे, सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी जिवाचा आटापिटा का करीत आहेत तेच कळत नाही! हिंदुस्थानच्या भूमीवर पाकपुरस्कृत अतिरेकी ‘बॉम्ब’ फोडत नाहीत, तर फुले उधळतात असेच या लोकांना वाटते. त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवर रक्तामांसाचे सडे पाडायचे आणि आपण त्यांच्यासाठी पायघड्या घालायच्या, हा निर्लज्जपणाच आहे. दोन देशांत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये असे आम्ही म्हणतो त्यामागची आमची तळमळ जरा समजून घ्या. क्रिकेटचे सामने खेळवल्याने, पाकड्या कलाकारांचे गजल, मुशायर्‍याचे कार्यक्रम मुंबई-दिल्लीत केल्याने पाकिस्तानच्या डोक्यातला हिंदुस्थानद्वेष कमी झाला असता तर आतापर्यंत लाखो निरपराधांच्या नाहक हत्या झाल्या नसत्या. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आता कुणी विचारीत नाही. तेथे
लष्कराची आणि आयएसआयचीच हुकमत
चालली आहे. खुद्द त्या इम्रान खाननेच सांगितले आहे की, पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष झरदारी हे अमेरिकेच्या हातचे ‘नपुंसक कठपुतली’ बनले आहेत. मग अशा नपुंसकाशी चर्चा वगैरे करून काय हशील? या नपुंसकांनी हिंदुस्थानातील इस्लामी दहशतवादास बळ देण्याचेच काम केले व हिंदुस्थानातही अराजक माजावे, पुन: पुन्हा फाळणी व्हावी यासाठी ते अल्लास पाण्यात घालून बसले आहेत. म्हणूनच पाकिस्तानचे काय वाटोळे व्हायचे ते होऊ द्या. आमचे रक्त सांडणार्‍यांविषयी कोणतीही सहानुभूती बाळगण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेची ‘सेना’ भ्रष्ट आहे व त्याच भ्रष्टाचारातला पैसा ते हिंदुस्थानातील अतिरेक्यांना पुरवीत आहेत. खुद्द राष्ट्राध्यक्ष झरदारी यांना ‘मि. टेन परसेंट’ असे उपहासाने म्हटले जाते. आजही मुंबई बॉम्बस्फोटांतील सर्व ‘वॉण्टेड’ दहशतवादी पाकिस्तानी लष्कराचे पाहुणे आहेत. दाऊद, मेमन, छोटा शकील यांना पाकिस्तान भ्रष्टाचाराच्या पैशातून पोसत आहे ते काय हिंदुस्थानातील गरिबीचा भार हलका व्हावा म्हणून? पाकिस्तानला हिंदुस्थानचे बरे झालेले कधीच बघवणार नाही. उलट हिंदुस्थानचा ‘नाश’ आणि विध्वंस व्हावा यासाठीच त्यांची ‘पावले’ पडत आहेत. पाकिस्तानातील गोरगरीब जनतेस या सगळ्यांची झळ बसत असेलही, पण काय करणार? हिंदुस्थानातही निरपराध्यांच्या रक्ताचे सडे पाडणारे पाकडेच आहेत. म्हणून अण्णा हजारे असतील किंवा आणखी कुणी, पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी मुंबई-दिल्ली बॉम्बस्फोटांत जे नाहक मेले त्यांच्या शोकमग्न, संतप्त नातेवाईकांशी आधी चर्चा करावी व मगच स्वत:स ‘निशाने पाकिस्तान’ म्हणून घोषित करावे. ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा इकडे किंवा तिकडे नेहमीच घुमत असतात. आता शांतता व सद्भावनेच्या नावाखाली ‘अण्णा हो अकबर’ची बांग कानावर पडू नये एवढीच आमची तळमळीची इच्छा आहे

No comments:

Post a Comment