Total Pageviews

Tuesday, 27 September 2011

LAND SCAM BY CRICKETER VIRENDER SEHBAGH

भारताचा फटकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हरियाणातील एका जमीन घोटाळा प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दिल्लीकर सेहवागला हरियाणा सरकारने क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी गुडगाव येथे गुडगाव-झज्जर मार्गाजवळ एक राखीव भूखंड दिला होता. सेहवागने या भूखंडावर सेहवाग इंटरनॅशनल स्कूल साठी एक भव्य इमारत बांधली आणि पंचतारांकीत खासगी शाळा सुरू केली आहे. मात्र क्रिकेट अकादमीसाठी कोणतेही विशेष बांधकाम केले नाही. त्याची ही कृती म्हणजे राखीव भूखंडाचा गैरवापर असल्याचा आरोप होत आहे.

हरियाणातील प्रसारमाध्यमांनी सेहवागच्या कृतीचा निषेध केला आहे. त्यांनी सेहवाग विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, सेहवागने हरियणातून येत असलेल्या बातमी संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सेहवागने फोनवर अथवा कॅमे-यापुढे येऊन स्पष्टीकरण दिलेले नाही

No comments:

Post a Comment