चीनच्या सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी
(पीटीआय)
Wednesday, September 14, 2011 AT 06:52 PM (IST)
लेह - चिनी सैनिकांनी जम्मू-काश्मीरमधील लेह परिसरातील भारतीय हद्दीत घुसखोरी करून लष्कराची जुनी ठाणी उध्वस्त केली आणि तंबूही उखडून फेकले. चूमर क्षेत्रात ही घुसखोरी झाली आहे. चीनचे सैनिक भारतीय हद्दीत सुमारे ३०० किलोमीटर आत घुसले होते, अशी माहिती उघड झाली आहे. परंतु वृत्ताचे लष्कराने खंडन केले.
दोन वर्षांपूर्वी जून आणि जुलैमध्ये चीनकडून भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न झाला होता. जूनमध्ये चूमर परिसरात चीनच्या हेलिकॉप्टरने हवाई हद्दीचा भंग केला. भारतीय हद्दीत खाद्य पदार्थांची पॅकेट टाकली होती. त्यानंतर जुलैमध्ये माउंट गया परिसरात सुमारे दीड किलोमीटर आत चिनी सैनिक घुसले होते. त्यांनी परिसररातील दगडांवर लाल रंगात चीन, असे लिहिले होते
सीमावर्ती भागातील भारतीय भूभाग चीनचा असल्याचा दाखविण्यासाठी चिनी सैनिकांनी ही घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. सीमेवरील घुसखोरीसंदर्भात वेगवेगळी माहिती उपलब्ध झाली आहे. चीनच्या दोन हेलिकॉप्टरनी भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि सुमारे एक ते दीड किलोमीटर आत ते उतरले. त्यातून उतरलेल्या सैनिकांनी जुनी ठाणी आणि तंबू उखडून फेकले. याबाबत उपलब्ध झालेल्या दुसऱ्या माहितीत मात्र, हेलिकॉप्टर चीनच्या हद्दीत उतरले आणि तेथून सैनिकांनी घुसखोरी केली. परिसरातील गुराख्यांनी या बाबीला पुष्टी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हेलिकॉप्टर उतरले आणि चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले. त्यांनी जुनी ठाणी आणि तंबू उध्वस्त केले, असे त्यांनी सांगितले.
घुसखोरी नवीन नाही
दोन वर्षांपूर्वी जून आणि जुलैमध्ये चीनकडून भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न झाला होता. जूनमध्ये चूमर परिसरात चीनच्या हेलिकॉप्टरने हवाई हद्दीचा भंग केला. भारतीय हद्दीत खाद्य पदार्थांची पॅकेट टाकली होती. त्यानंतर जुलैमध्ये माउंट गया परिसरात सुमारे दीड किलोमीटर आत चिनी सैनिक घुसले होते. त्यांनी परिसररातील दगडांवर लाल रंगात चीन, असे लिहिले होते
No comments:
Post a Comment