Total Pageviews

Monday, 12 September 2011

INCOMPETANT GOVT CANNOT STOP BOMB BLASTS

सरणार कधी रण... By : Shankar Deo 12 Sep 2011 दिवसेंदिवस बॉम्ब स्फोटाची गंभीरता कमी कमी होत चालली आहे. रेल्वे अपघात, मोटार अपघाताप्रमाणेच या बॉम्ब स्फोटाची आता जनतेला सवय होत चालली आहे. मुंबई स्फोटानंतर सहा महिन्याच्या आत दिल्लीत दुसरा बॉम्ब स्फोट होतो हे सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे. लोक काही दिवसांनी अजून देशात बॉम्ब स्फोट का झाला नाही असे विचारु लागतील. ती वेळ येवो. आपली संपूर्ण अंतर्गत सुरक्षा यंत्रणा कशी दिशाहीन आहे या दोन्ही स्फोटांनी दाखवून दिलेले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तर दिल्ली ही राजकीय राजधानी आहे. म्हणूनच ही दोन्ही ठिकाणे अतिरेक्यांचे महत्वाचे टार्गेट ठरत आहेत. आपल्या सुरक्षा यंत्रणा हे बॉम्ब स्फोट रोखण्यात पूर्णपणे अयशस्वी झालेल्या आहेत. स्फोटानंतर मात्र बॉम्बमध्ये काय वापरले, स्फोट किती वाजता झाला, कसा झाला, त्याची तीव्रता किती याचीच माहिती सरकार दरवेळेस निलाजरेपणे देत असते तेंव्हा -याच जणांना हसू येते. जे स्फोटात गेले त्यांच्याबद्दल दु: व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि प्रत्येकाच्या नावाने चार-पाच लाखांची नोटांची पुडकी फेकली की आपली जबाबदारीसंपली असे सरकारला वाटते आहे. हायकोर्टाच्या गेटसमोर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्याची निविदा दिल्ली सरकारच्या खात्यने चारवेळा का रद्द केली याची चौकशी करण्यास कोणीच तयार नाहीत. प्रत्येक कामात टक्केवारी आणणा-या प्रशासन यंत्रणेची बेजबाबदार वृत्ती कोणत्या संकटांना आमंत्रण देते याची सरकारला ना खंत ना खेद आहे. केंद्रात आणि दिल्लीत एकाच पक्षाचे सरकार असून गृहमंत्री जबाबदारी दिल्ली सरकारवर का ढकलतात हे आश्चर्य आहे. स्फोट झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाची जी विधाने पुढे येतात त्यामुळे त्यामुळे हसावे की रडावे तेच कळत नाही. एकूणच देशाची अंतर्गत सुरक्षा ही आता "भगवानके भरोसे" असणारी बाब बनत आहे. गेल्या शतकातील शेवटच्या दशकापासून सुरु असलेल्या या स्फोटांछ्या मालिकेत अडीच हजाराच्या आसपास निष्पाप जीव बळी पडलेले आहेत. पण या विरोधात काम करण्याची मानसिकता आपल्या सरकारकडे अजूनही निर्माण झालेली नाही हे देशाचे दुर्दैव आहे. या आतंकी हल्ल्यांबाबत आपण अमेरीकेकडे मदत मागतो पण जुळ्या टॉवरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरीकेने अंतर्गत सुरक्षेचे जे मजबूत मार्ग अवलंबैले त्यापसून आपण काहीच धडा घेत नाही. आपण फ्क्त हा भ्याडपणा आहे असे जाहीर करतो. पण या अतिरेक्यांना शोधून काढून त्यांचा पुरता बिमोड करु असे म्हणण्यास आपण का-कू करतो. केवळ सत्ता आणि मते याकडे लक्ष देताना सरकार देशाची सुरक्षा पणाला लावीत आहे याकडे कुणीच लक्ष देत नाही. याच महिन्यात अमेरीकेवर आतंकवादींनी केलेल्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अमेरीकेच्या महासत्तेला हादरा देण्या-यांना त्याचवेळी अध्यक्ष बुश यांनी तंबी दिली होती की हे काम करणा-यांना शोधून काढून त्याचा शेवट केल्याशिवाय अमेरीका गप्प बसणार नाही. आपले नेते असे बोलतही नाहीत. लादेनला शोधून काढण्यासाठी अमेरीकेने इराकपासून अफगाणीस्तानपर्यंत अनेक हल्ले केले आणि तो पाकीस्तानात आहे कळल्यावर सर्व आंतरराष्ट्रीय कायदे बाजूला ठेवून लादेनचा खातमा केला. असे आपल्याकडून घडेल काय? याची शंका आहे. अमेरीकेवर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारने तेथे होमलॅण्ड सुरक्षेचे नवे कवच तयार केले. त्यात वीस हजाराच्या वर अत्यंत विश्वासू आणि कार्यक्षम लोकांची भरती केली. मग त्यांना अब्जावधी डॉलर देऊन व्यापक अधिकारीही दिले. आपल्याकडे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा तयार केली पण ही यंत्रणा दिल्ली आणि मुंबईचे स्फोट थांबवू शकली नाही. सुरक्षेबाबर हा पांढरा हत्तीच ठरत आहे. अमेरीका आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करत नाही. व्हीसा देताना काटेकोर चौकशी केली जाते. किंग खानपासून माजी राष्ट्रपतींपर्यंत कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींची संपूर्ण तपासणी करण्यास ते मागेपुढे पहात नाहीत. आपल्या विमानतळावर अशी तपासणी होते काय याबाबत शंका आहे. अमेरीकेतील सुरक्षायंत्रणांकडे संशयीत व्यक्तींची माहिती असते. तेथील गुप्तचर यंत्रणा अशा लोकांवर पाळत ठेऊन असतात. आपल्याकडे मात्र कोण येतो, कोण जातो याकडे कुणाचे लक्ष नाही. दहशदवादी संघटांना पैशाचे पाठबळ असावे लागते. या पैशाचा ओघ कुठून येतो हे अमेरीकेने शोधून काढले. आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरीकेने देशातील बॅंकांमध्ये असलेली ही दहशदवादी मंडळींची खातीच गोठवून टाकलेली आहेत. जॉर्ज बुशनी या "होमलॅण्ड" सुरक्षेला जन्म दिला अमेरीकी सरकारचे मजबूत पाठबळही दिले. नंतर आलेल्या ओबामांनी बुशसाहेबांच्या या कार्यक्रमाला मुदतवाढ दिली. हे असे कठोर प्रयत्न केल्यामुळेच अमेरीका दहा वर्षे सुरक्षित राहिली त्यांना लादेनचा खातमा करता आला. अमेरीकी जनताही सरकारच्या मागे उभी राहिली. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील सरकारचे खंबीर धोरण हे धोरण राबविण्यात कणखरपणा होय. आज भारतीय जनता महागाई, गरीबी, टंचाई यांनी मेटाकुटीला आलेली आहे. स्फोट झाल्यानंतर किंवा कुठेही आपण मेणबत्त्या घेऊन धावतो. बाजीप्रभूप्रमाणे आपण खिंड लढवीत आहोत. हे रण कधी संपणार याची वाट पहात आहोत. शिवछत्रपती केंव्हा जन्म घेणार याची वाट कुठवर पहायची हाच मोठा प्रश्न आहे. म्हातारे नेतृत्व गाडा किती आणि कसा ओढणार

No comments:

Post a Comment